तुला संध्याकाळी पाहताना....

तुला संध्याकाळी पाहताना
मी उगाच काहीतरी बरळत असतो
डोळे मन भरत असतात अन्
विरह रिकामा होत असतो.....

तुझीच मिठी शिल्लक आहे,मी हरवलो तर पोलिस चाैकशी
करत नाही ........
बोटांची एकमेकात गुंतवणूक असते ,ज्याचा EMI भरावा
लागत नाही ......

जाता जाता गजऱ्यातल्या दोन कळ्या देऊन जा,आठवण
कधीच कोमेजत नसते....
नख निघालंच तर तुळशीत टाक,
मंजिरी बोटांवर उगवत नसते ...

तुटली पापणी फुंकर मारून तुला मिळवायचे
हजार मार्ग 
उडती भुवयी वेलांटी आणि अोठावरचा तीळ म्ह
णजे विसर्ग.....

न्हाऊन आल्यावर केसांना झटकायचिस आणि
म्हणे पाण्याला रंग नसतो
थेंब थेंब घरभर वेचायचो तेंव्हा, बरं झालं अत्तराला
फाया असतो ...

!निनाद!
......

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नख निघालंच तर तुळशीत टाक,
मंजिरी बोटांवर उगवत नसते ...

तुटली पापणी फुंकर मारून तुला मिळवायचे
हजार मार्ग

नख उचकटुन काढणे, पापणी कापणे- हे असे जीवघेणे प्रकार कोणाकडुन माहीती काढुन घेण्यासाठी यातना देण्यासाठी करतात म्हणे. ह्या कवितेत काही गुप्त मेसेज तर नाही ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0