जालावरचा रोचक कंटेंट : कुठे, कसा आणि कधी शोधायचा.

संपादकांनी धाग्याला छोट्या मोठ्या प्रश्नांत हलवला तरी हरकत नाही!

आंतरजालाची सहज सवय झाली आहे. अर्थार्जन, मनोरंजन अशा सर्व बाबी आता मला इंटरनेटशिवाय कल्पणे अशक्य होऊन बसले आहे.
इथे वावरणार्‍यांपैकी बर्‍याच जणांची अशीच अवस्था झाली असावी असं सुरुवातीलाच गृहीत धरतो.
बहुतांश भारतीय लोकांसाठी इंटरनेट ही प्राथमिक गरज नसेलही. ज्यांचं जालधोरण तात्पुरतं आणि निकडीवर आधारित आहे त्यांनी ह्या चर्चेला पास द्यायला हरकत नाही. जाणतं वाचन, निवडक चित्रपट-टी. व्ही शोज आणि कोणतीही ज्ञानलालसा, ज्ञानसाधना ह्या गोष्टी ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्यासाठीच हा धागा आहे असं ढोबळपणे समजून बोलुत.

माझा बहुतांश वेळ इंटरनेटशी जोडलेला असतो. विषय अजून समजण्यासाठी एक उदाहरण घेऊत. लायब्ररीचं. वाचनाची आवड असणार्‍याला दर्जेदार पुस्तकांपर्यंत जायला खूप चिखल तुडवावा लागतो. माझ्या बाबतीत इंटरनेटबद्दल असंच काहीसं होत आहे. एका टप्प्यानंतर जे समोर येईल ते पाहायला, ऐकायला आणि वाचायला जीवावर येतं. आता मला कळलं आहे, की लायब्ररीतले बाबा कदम-सुहास शिरवळकर यांचे रॅक्स माझ्यासाठी नाहीत. मला तो सेक्शन लायब्ररीत सहज "पास" करून अधिक रोचक रॅक्स कडे जाता येतं. पण माझ्याबाबतीत दुर्दैवानं इंटरनेटवर तसं होत नाही. मी माझा इंटर्नेट-वावर काळजीपूर्वक तपासला असता लक्षात आलं की जरी दुनियेतल्या लाखो दर्जेदार आणि रोचक गोष्टी खुल्या असल्या तरी माझा वावराचा काळ खूपदा चिखल उपसण्यासाठीच जात आहे. तुमच्यापैकी कोणाला ही अडचण येते का? त्यासाठी तुम्ही काय करता? तुमच्या R.S.S फीडरमध्ये कोणकोणते फीड्स आहेत? ऐसी अक्षरे सोडून तुम्ही उत्तम कंटेटच्या शोधात जालावर कुठे कुठे भटकता? तुमच्या रेडिटमध्ये कोण कोणते सब्सस्क्रीप्शन्स आहेत? तुम्ही कोणते उत्तम पॉडकास्टस ऐकता? मेडियम, युट्युब, व्हिमिओ या माध्यमांमध्ये तुम्ही किती चोखंदळ आहात? तुम्ही फेसबूकला वैतागला आहात का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

रोचक धागा आहे.

प्रकाशनसंस्था त्यांच्याकडचा मालच दाखवतात आणि पाचदहांनी ते वाचलं की तीच यादी आपल्याला भिरकावली जाते.वृत्तपत्रांकडे पगारी वाचक ठेवलेले असतात त्यांच्याकडून रविवारपुरवणीत थोडक्यात परिक्षणं येतात ती उपयुक्त ठरतात.नवीन लेखक उदयास येतात त्यांचे नाव माहित करायला ते एक उत्तम साधन ठरते.बय्राच प्रकाशनसंस्था एक प्रत उदा टाइम्स,इं एक्सप्रेस वगैरे पेपरांकडे पाठवतात। तिथून महिन्याभरात नोंद घेण्याजोगे बाहेर पडते."ट्रेन्डिंगमध्ये" जाण्यास सहा आठ महिने जातात.msn news ,yahoo news,the hindu यांची निवड वेगळी असते.यांचे बुकमार्क करून ठेवतो कारण RSS FEEDमध्ये फार उशिरा अपडेट्स देतात पेपरवाले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदम-शिरवळकर रॅक्सवर काही रोचक नसेल हा पूर्वग्रह अजिबात ठेवत नाही. "नवा सिंहगड परिसर" पासून "शासकीय मराठी शब्दकोशा"पर्यंत मिळेल ते वाचत जातो. अर्थात सकस अन्नापेक्षा चटपटीत पदार्थांमध्येच मन जास्त रमतं त्यामुळे त्याचा त्रास होत नाही.

पण विषय एक नंबर आहे. नंदन, धनुष, ppkya, कोल्हटकरकाका इ० लोकांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लायब्ररीत कदाचित हा पूर्वग्रह निकामी ठरत असेल, परंतु जालावर मिळेल ते वाचत जाण्याचा धोका म्हणजे, युट्युब सारखी माध्यमे प्रगत अल्गोज वापरून तुम्हाला त्याच त्याच प्रकारचे चॅनल्स सुचवतात. त्यांच्यावर मात करून अधिक वैविध्य हवे असेल तर लोक्स काय काय करतात ते वाचायची उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याकरिता साधारण जमल्यास प्रायव्हेट मोडमधे ब्राउझ करणे, हिस्टरी/कुकीज उडवणे, मोबाईलचा अ‍ॅप कॅशे/डेटा उडवणे अशी कामे करतो. त्याच त्या गोष्टी समोर येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनात येतील ते सर्चेस दणादण टाकून व्हिडिओज़ बघत जाणे हा पर्याय मी अवलंबतो. त्यात अंडरवॉटर बास्केट वीव्हिंगपासून गॉर्डन रॅमसेच्या शोपर्यंत काहीही असते. बरीच रत्ने हाताला लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे उत्तम ( मीही हेच करतो , फक्त माझ्या जिव्हाळ्याच्या म्हणजे रॉक आणि ब्लुज बाबतीत ... BBC च्या documentaries एकदम ज्ञानवर्धन करतात, मग अजून खोलात जटा येते , आणि मग अजून खोलात ...... )
यु ट्यूब ही एक मनुष्यजातीवर उपकार करणारी वस्तू आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही फेसबूकला वैतागला आहात का

हो., गेल्या काही महिन्यांत फेसबुकाने फीड अल्गोची आई झवली आहे. आता पुर्वीपेक्षा फेसबुकावर एक दशांशही वेळ घालवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला त्याच त्याच पोस्टी, आणि मग "अबक हॅस कॉमेन्टेड ओन हिज पोस्ट" म्हणून तासंतास पुन्हा त्याच पोस्टी पहायचा कंटाळ आलाय. माझ्या मित्रसमुदायातील फारतर १५-२०% च्या पोस्टी फीडवर येतात. असं का होतं कळत नाही. आणि आजकाल तर "सजेस्टेड पोस्ट" च्या नावाखाली जाहिरातींचा माराच चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी खूप शाळकरी मैत्रिणी फेसबुकवरती होत्या पण मग काहीजणी जातपातीच्या अभिमानविषयक पोष्टी टाकू लागल्या. तेव्हा त्यांना तांदूळातील खड्यासारखे दूर केले. व मग एकंदरच विरस झाल्याने आता जेमतेम १२-१३ मैत्रीणी/नातलग आहेत पण आहेत ते एकदम जीवलग आहेत. त्यांच्याशी फेसबुकच्या खाजगी पत्रव्यवहारातून अतोनात गप्पा होतात.
.
जातीपातीबद्दल अभिमान असण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही पण तो समाजात विशेषतः अठरापगड समाजात बोलून दाखविणे मला अशिष्ट वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जातीपातीबद्दल अभिमान असण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही पण तो समाजात विशेषतः अठरापगड समाजात बोलून दाखविणे मला अशिष्ट वाटते.

शुचि, मुखवटा शिष्टसंमत असेल कदाचित पण बरोबर आहे का? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु आपल्या जातीचे लोक भेटले असता हव्या तितक्या गप्पा मारा. कौतुक करा. अन्य जातीच्या लोकांपुढे कशाला?
___
मला वाटतं तुझा प्रश्न हा आहे की -मला चातुर्वर्ण्य व्यवस्था पटते मग मी मुखवटा धारण करायचा का? चातुर्वण्य व्यवस्थेनुसार तुम्ही स्वतःतरी वागता का हे स्वतःला विचारुन पहायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा प्रश्न फक्त ह्या उदाहरणा पुरता नव्हता, इन जनरल, मनातल्या खर्‍या विचारांना पॉलिटीकल करेक्टनेस चा मुखवटा घालण्याबद्दल होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म्म. मुखवटा काढून = दुतोंडी न वागायला धैर्य लागते हे खरे आहे. उदा - मला गब्बर यांची मुस्लिम धर्माविषयीची मते पटतात. तुझी इमिग्रेशनसंदर्भात. पण मी बोलू शकत नाही कारण मला पुढे कोणी उलटतपासणी सुरु केली की चोख उत्तरे द्यावयास येणार नाही. पण मग मी चीअर लीडर म्हणुन काम करते (९०% मनात, १०% बाहेर)
.
मुखवटा टाळावाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जातीपातीबद्दल अभिमान असण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही पण तो समाजात विशेषतः अठरापगड समाजात बोलून दाखविणे मला अशिष्ट वाटते.

हिंदुस्थानात (हिंदू आणि मुसलमान ही) दोन राष्ट्रे आहेत, असे ब्या. जीना तथा ब्या. सावरकर ही थोर नेतेमंडळी आपापल्या परीने प्रतिपादून गेली. व्यक्तिश:, मला हा क्लासिक अंडरष्टेटमेंटचा प्रकार वाटतो.

..........
अध्याहृत.

द्विराष्ट्रवाद उपाख्य टू नेशन थियरी फेम.

भू-भू-भू थियरी तथा धर्मांतर-म्हणजेच-राष्ट्रांतर फेम.

कोणाच्या प्रति, ही बाब अलाहिदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी प्रामुख्याने तंत्रज्ञान व माझ्या कामाच्या क्षेत्राच्या संदर्भातले लेख वाचतो. जवळपास ७० ते ८० टक्के वाचन सध्या तेच आहे. हॅकर न्यूज (https://news.ycombinator.com/)वर बहुतांशी बातम्या कळतात. तिथून इकडंतिकडं जाता येतं.
इतर नॉन-टेक बातम्यांसाठी (जगभरात काय चाललंय ते समजायला) गूगलन्यूजच्या पहिल्या पानावर जितक्या बातम्या दिसतात त्या पुरतात. त्यात एखादी बातमी इंटरेस्टिंग वाचली तर ती उघडून त्या अनुषंगाने आणखी शोधाशोध करता येते. इंडियन एक्सप्रेस नियमित वाचायचो पण ते 'जाहिराती बघाच' हे खूळ सुरु झाल्यापासून आता बंद केलाय. पुणे-महाराष्ट्र बातम्यांसाठी लोकसत्ता आणि सकाळ वाचतो.
स्कॉट अॅडम्सचा ब्लॉग नियमितपणे वाचतो. http://blog.dilbert.com/
स्वामीनाथन (http://swaminomics.org/) आणि अजय शाह (https://ajayshahblog.blogspot.com/) यांचे बहुतेक लेख अधूनमधून वाचले जातात.
एरिक डिट्रिच (http://www.daedtech.com/) चा ब्लॉग प्रत्येक सॉफ्टवेअर डेवलपरने नियमितपणे वाचलाच पाहिजे इतकं रेकमेंडेशन करण्याइतका आवडतो. पॉल ग्रॅहमचे लेख आधी आवडत असत पण अलीकडे एकंदर स्टार्टपमधल्या लोकांबरोबर काम करुन ते वर्क कल्चर आणि तसलं कल्चर रेकमेंड करणारा ग्रॅहम आता आवडत नाही. सुदैवाने तो सारखंसारखं लिहित नाही ही एक जमेची बाजू आहे. Wink
दुर्दैवाने अनेक आवडते टेक लेखक आता दीर्घ लेख लिहायचे सोडून ट्विटरवर केवळ दोनचार ओळींची पिंक मारण्यात धन्यता मानतात त्यांचे लेख मिस करतो.

इथं आणखी काही रेकमेंडेशन मिळाले तर नक्की आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय. तो आताशा मलाही फारसा आवडत नाही. पण त्याचा कधी मधी येणारा लेख चुकवू वाटत नाही. लोकसत्ता, लोकप्रभा माझ्यासाठी संपले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीसाठी हा चांगला विषय आहे.

मीहि जवळजवळ दिवसभर संगणकाला आणि इंटरनेटला धरून असतो. सुदैवाने येथे इंटरनेट स्पीड उत्तम असते आणि अपलोड-डाऊनलोडची मर्यादाहि पार करण्यापलीकडची आहे त्यामुळे ती काळजी नसते.

येथे उत्तम पब्लिक लायब्ररी आहे. त्यातून माझ्या आवडत्या विषयांवरची पुस्तके आणतो. (अर्थात त्यात मराठी काहीहि नसते त्यामुळे माझे अलीकडील मराठी वाचन जवळजवळ उरलेच नाही असे म्हणता येईल.) त्यामध्ये संदर्भासाठी दिलेली पुस्तके आवर्जून पाहातो आणि मला उपयुक्त वाटतात ती इंटरनेटवरून उतरवून घेतो. जुनी असल्यास ती archive.org, books.google.com, scribd.com, Digital Library of India, माझ्या माहितीच्या काही विद्यापीठांच्या digital लायब्ररीज अशा ठिकाणी कोठे ना कोठे विनामूल्य उपलब्ध असतातच. एखादे पुस्तक इंटरनेटवरून विकतहि घेतो. असा माझाकडे सध्या २५०० डिजिटल पुस्तकांचा संग्रह झाला आहे.

मधूनमधून jstor.org, academia.edu, shodhganga.inflibnet.ac.in अशा जागांवर चक्कर टाकून काही उपयुक्त/मनोरंजक दिसल्यास उतरवून घेतो आणि सवडीने वाचतो. jstor.org ह्या एरवी मर्यादित असलेल्या जागी आमच्या पब्लिक लायब्ररीच्या लॉगइन वर प्रवेश करता येतो हे मोठेच सद्भाग्य आहे.

फेसबुकचे माझे खाते आहे पण ते कसे वापरायचे हेच माहीत करून घेतलेले नाही त्यामुळे त्याच्या वाटेला बिलकूल जात नाही. ट्विटर, वायबरचे खातेच नाही त्यामुळे तथाकथित सोशल मीडियावर वेळ वाया जात नाही. वॉट्सअ‍ॅपचा वापर दिवसातून एकदा नातेवाईक, भाचे-पुतणे, माझ्याहूनहि मोठे असलेले दोनतीन काका-आत्या अशांशी संबंध ठेवण्यासाठी करतो.

मला जगभरचे दर्जेदार चित्रपट पाहण्याची आवड आहे. यूट्यूब, नेटफ्लिक्स येथे ह्यांचा प्रचंड साठा आहे. त्यातून काहीतरी निवडून दररात्री आम्ही दोघे एक चित्रपट पाहतो. माझा एक संगणक मोठ्या टीवीला कायमचा जोडलेला आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर आणि घरच्याघरी सोयीस्कर आणि आवडीच्या Ekorness Reclining Chair वर बसून मद्यपान करीतकरीत सिनेमा पाहण्याची मौज काही वेगळीच आहे.

मला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण नाही पण आवड खूप आहे. दिवसभर संगणकावर मागे यूट्यूब, Music India online (mio.to) असे काहीतरी सुरू करून ऐकणे चालूच असते.

आमच्यासारख्या निरुद्योगी निवृत्तांना इंटरनेट हे मोठेच वरदान आहे असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जालावरचा रोचक कंटेंट, दिवस ही नाही व रात्रही नाही अशा, सांजवेळेस, घरांतही नाही आणि घराबाहेरही नाही, म्हणून उंबर्‍यावर बसून आणि माणूसही नाही आणि पशूही नाही अशी अवस्था आल्यावर, लॅपटॉपवर शोधावा, म्हणजे साक्षात नरसिंहाचे दर्शन होते, म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अवांतर - नरसिंहावरुन आठवलं. मुलगी ४-५ वर्षाची असताना तिला झोपताना प्रह्लादाची गोष्ट सांगे व मग मला झोपवुन मगच ती झोपे Wink
एकदा इतकी पेंगुळले होते की बरळले "मग हिरण्यकश्यपुने नर्सिंहाला मांडीवर घेतले व तीक्ष्ण नख्या ...." पहाते तो ही ढमाली हसते आहे. म्हणजे इतक्या लहान वयातही विनोदबुद्धी होती, कळत होतं. मग आम्ही दोघी हसू लागलो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझेही बर्‍याच वेळेला असे झाले आहे. माझ्या दोन्ही नात-नातुंना, वय वर्षे ६, दुपारी १२.३० ला शाळेतुन घरी आल्यावर, जेवणे आटोपून, गोष्टी सांगत सांगत झोपवायची जबाबदारी माझी असायची. दररोज नवीन गोष्ट असा आग्रह असायचा. कधी कधी, ' आज नवीन गोष्ट वाचली नाही' असे सांगून , पुर्वी ऐकवलेली गोष्टच सांगत असे. माझ्यावरही झोपेचा अंमल चढत असे, त्यावेळी चुका व्हायच्या, आणि तेव्हढाच धागा पकडून , नात-नातू,' अहो आबा, हे काय सांगताहेत ?' असे म्हणून चुका लक्षात आणुन देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोटन टोमॅटोज हे चित्रपट शोधण्यासाठी माझे महत्त्वाचे टूल आहे. त्याच्या, मुविडीबी आणि आय्मडीबी यांच्या सर्विशी वापरून केलेले https://movieo.me/ हे एक अतिशय सुंदर संस्थळ सध्या मी वापरत आहे.
१. मस्त डिजाईन
२. चित्रपट शोधणं अतिशय सोप्पं
३. आणि पाहिलेल्या चित्रपटांचा ट्रॅक ठेवणं देखील चांगलं आहे.

चित्रपट शोधण्यासाठी आयम्डीबी मी कधीही वापरत नाही. तिथे सगळा प्रकार मोठ्या पब्लिकच्या हाती असतो. टी. व्ही. शोज साठी खूपदा गार्डियन, वायर्ड, रोलिंगस्टोन इत्यादी वापरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुक?
सियार की जब मौत आती है तब वह गाँव की तरफ दौडता है। ( कोंबडी तर मिळतच नाही पण गावातले कुत्रे फाडतात त्याला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकवर ठरावीक लोक अजिबात पकवत नाहीत ह्याची खात्री आहे. अशा लोकांना स्टॉक (stalk) करते. त्यातून फेसबुकाला माझ्या आवडीनिवडी बऱ्यापैकी समजल्या आहेत.

सुशि, बाबा कदम ह्यांच्या वाट्याला मीही जात नाही, पण ठरावीक लोक फेसबुकवर त्याचीही कमतरता भरून काढतात. ह्या प्रकारात फार वेळ जाणार नाही, ह्याची काळजी मात्र घ्यावी लागते. माझ्या फेसबुक यादीत चिकार मराठी लोक आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातलं 'सांस्कृतिक गॉसिप' १५-२० मिनीटांत फेसबुकवर समजतं. (उदाहरणार्थ, मेहेतांनी भाषांतराचं एक पुस्तक मागे घेतलं.) 'ही बातमी समजली का'मधून वाचण्यासारख्या बऱ्याच लिंका मिळतात (मात्र 'बिल्डरने मांसाहाऱ्यास घर विकणे नाकारले' किंवा 'माशी शिंकली' छाप लिंका कटाक्षाने उघडत नाही.)

पुस्तकांसाठी - गेली काही वर्षं तरी संस्थळांवरच्या चर्चांमधूनच काही विषय समोर येतो; मग त्या विषयावरची पुस्तकं स्थानिक ग्रंथालयातून आणून वाचली जातात. ('डाउनटन'च्या धाग्यावर दोन पुस्तकांच्या सूचना मिळाल्या.) दोन-चार महिन्यांतून एखादा 'हाफ प्राईस बुक्स' नावाच्या दुकानात चक्कर होते. तिथे ५-७ डॉलरांत बरीच चांगली, मला समजतील आणि आवडतील अशी पुस्तकं मिळतात. ह्या बाबतीत अमेरिकेत असण्याचा फायदा फारच जाणवतो. पण त्यामुळे मराठी वाचन जालावर होतं तेवढंच; क्वचितच मराठी पुस्तकं वाचली जातात.

कोल्हटकरांएवढे सिनेमे बघणं होत नाही; पण नेटफ्लिक्स आणि ग्रंथालय मिळून बऱ्यापैकी चांगले सिनेमे बघणं होतं. त्याबद्दलही माहिती मैत्रांकडूनच बरेचदा मिळते. ऑस्टीनच्या ग्रंथालयाच्या संस्थळावरही सजेशन्स मिळतात; तीसुद्धा वाईट नसतात.

थोडक्यात, मी टेक्नोमंद नसले तरीही काय बघावं आणि वाचावं ह्या संदर्भातल्या सूचनांसाठी सध्या माणसांचाच बराच वापर करत्ये.

दुर्दैवाने अनेक आवडते टेक लेखक आता दीर्घ लेख लिहायचे सोडून ट्विटरवर केवळ दोनचार ओळींची पिंक मारण्यात धन्यता मानतात त्यांचे लेख मिस करतो.

अगदी! ह्यात ट्विटरसोबत फेसबुकचीही भर घालायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मात्र 'बिल्डरने मांसाहाऱ्यास घर विकणे नाकारले'

BiggrinBiggrinBiggrin
रहावत नाही ना? ROFL
__
टेक्नोमंद ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशिष्ट उदाहरणाचा उल्लेख केला आणि विषयाशी संबंधित आणखी एक उदाहरण सापडलं. फेसबुकवर मी काही लोकांना 'स्टॉक' करते, त्यांतल्या एकीकडून हा दुवा मिळाला -
Single woman seeking a house in Mumbai? ‘Bachelor Girls’ tells you why it’s like hell

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Women are constantly put on the defensive about their choices – to stay single, to not have children, to live on their own.

लेख वाचला. खरच परिस्थिती वाईट दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही फेसबूकला वैतागला आहात का?

फेसबुक = टिंकु बस्स एवढच माझं समीकरण आहे. तिच्याकरता ते ठेवलय.
___
एखादं चांगला अ‍ॅस्ट्रॉलॉजी लेख मिळाला की त्यातील कळीचे शब्द देऊन १० लेख मिळतात व मस्त रपेट घडते.
तेच कवितांचे, कवितेची अर्धी ओळ दिली की कवितेच्या बर्‍याच साईटस मिळून जातात.
__
बाकी इन्टेलेक्च्युअल लेखांच्या लिंका देण्याचे महत्त्वाचे काम ऐसीवरील काही जणाकडे आऊटसोर्स केलेले आहे व ते काम अतिशय समाधानकारक रीत्या पूर्ण होते आहे WinkROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>बाकी इन्टेलेक्च्युअल लेखांच्या लिंका देण्याचे महत्त्वाचे काम ऐसीवरील काही जणाकडे आऊटसोर्स केलेले आह>>

लिंका लिंका रोझिज असं सदर असावे एखादं.
राकु परत या.

#मीही पुस्तक प्रदर्शनांना जातो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुक आणि ट्विटर. तिथे चांगल्या लोकांना (पत्रकार, समालोचक, अर्थतज्ञ वगैरे) फॉलो करा. लोक छान आर्टिकल शेअर करत असतात. बहुतांश वाचनीय कंटेंट तिथून मिळवतो. अर्थात मराठी कंटेंट कमी मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ट्विटरवर राजदिप सरदेसाइ,शोभा डे,वीर संघवी वगैरे फालो केलेले पुन्हा नवीन नावे शोधायला हवीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजदिप सरदेसाइ,शोभा डे,वीर संघवी

हे लोक भिकार आहेत. शेखर गुप्ता, असदुद्दिन ओवेसी, सदानंद ढुमे, सुचेता दलाल, चित्रा सुब्रमण्यम यांना करा फॉलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री , शेखर गुप्ता बघत होतोच , तुम्ही लिहिलेली उरलेली मंडळी बघितली , especially ढुमे आणि ओवेसी इंटरेस्टिंगच आहेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकिपीडिया मेन पेज वर अनेक रँडम आणि रोचक गोष्टी असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकाड वर्ष फेब्रुवारीत दिल्ली(प्रगति मैदान) आणि मुंबई(क्रॅास मैदान भरणारे) मोठे पुस्तक प्रदर्शन गेली दहा वर्षेतरी दिल्लीतच भरते.जालवरचे कंटेंट नाहीये पण नोंदनीय असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या इतका मजेशीर दुसरा चटकन अनुभव नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

गब्बरसिंग ज्या लिंका (तोंडावर) फेकत असतो त्या रोचक असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी आत्तापावेतो एकही लिंक उघडलेली नाही आहे. त्याचे निम्मे प्रतिसाद मी दोन शब्द सुद्धा वाचलेले नाहीत. पण तेवढ्यावरूनही त्याच्यात छुपा फडतूसवादी दडला आहे असं जाणवतं. खरं खोटं शुचि जाणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो लिंका फार अति रोचक असतात- आय व्हाऊच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही लिंका नक्कीच रोचक असतात. अलिकडेच कुठल्याशा प्रतिसादात वाचलेली 'The Three Languages of Politics' ह्या पुस्तकावरचे इतर रिव्हू पण वाचले. रोचक वाटले. "कधीतरी" वाचेन च्या यादीत नोंद केली.

चिखल उपसायला लागतोय याची जाणीव मलाही होऊ लागली आहे. वाटतं तर खूप, टाईम वेस्ट करणार्‍या कंटेण्ट पासून दूर असावं. पण ... असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तेवढ्यावरूनही त्याच्यात छुपा फडतूसवादी दडला आहे असं जाणवतं.

बहोत दिनोंके बाद कोई मिला है जो इतनी बात कर सके .... !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हेरिटॅसियमचे व्हिडिओ आवडीने बघतो. प्रामुख्याने भौतिकशास्त्राबद्दलच्या संकल्पना सोप्या करून सांगणारे असतात. Designing Effective Multimedia for Physics Education ह्यावर त्याने पीएचडी केली आहे. त्याचे दुसरे चॅनलही (सत्याचे समस्थानिक) उत्तम आहे. ह्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या विषयांवर व्लॉग असतात. फिजिक्स गर्लचेही काही व्हिडिओ छान असतात. आजकालचे तितके खास वाटत नाहीत. टॉम स्कॉटचे व्हिडिओ अनोळखी जागांबद्दल, कधी कधी प्रोग्रॅमिंगबद्दलच्या कल्पनांबद्दल असतात. ह्याचे व्हिडिओ तुलनेने लांबीला कमी असतात. सीजीपी ग्रेचे विविध संस्थांबद्दलचे (उदा. युरोपीय महासंघ, व्हॅटिकन इ.) व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बर्याच कोन्सेप्ट समजुन घ्यायला ... https://www.khanacademy.org/ वाचते... मी मराठी वाचते ..फेसबुक पुस्तकांच्या ग्रुप्सचा ह्यासाठी उपयोग होतो...

https://www.ted.com/talks पण मला बरे वाटते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0