एन आर आय मराठी लोक

माझ्या मैत्रिनिने मला या साइतचा पत्ता दिला म्हणून मी इथे आले. सुरवातीला मराठि लिहिण्याच्या प्रयत्न केला पण जमले नाहि. हळुहळु शिकेन असे वाटते.

मी गेली काही वर्शे अमेरिकेत रहाते. या साइतवर ज्या प्रकारची चर्चा वाचन वगेरे गोष्टिन्वर केली जाते ते पाहुन आनन्द झाला. इथल्या चर्चेमुळे नवी पुस्तके कळली.

माझा अनुभव असा आहे की अमेरिकेत माझ्या आजुबाजुला रहाणार्या मराठि लोकाना एकन्दर मराठि पुस्तकान्बबद्दल काडिचा इंट्रेस्स्ट नसतो. लोकल मंडळामधे एकन्दर बोलिवुड गाण्यावर नाच होतात, लोक भावगीताचे कार्यक्रम ऐकतात , स्किट वगेरे बसवली जातात पण शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम मन्डळात क्वचितच केले जातात. एकंदर सर्व ओढा सोपे करण्याकडे आहे.

सर्व काही कठिण करावे , कन्टाळवाणे करावे असे मला म्हणायचे नाही, पण मराठि भाषा जपण्याच्या आणि तिच्या सन्वर्धनाचा दावा जिथे केला जातो, किन्वा कुथल्याही कलेला आश्रय दिला जातो असे सान्गितले जाते तेथे निदान काही प्रमाणात तरी दर्जेदार काम केले जावे ही अपेक्शा चुक आहे काय ?

महाराष्ट्रातल्या गावात , शहरात आणि महाराष्ट्राबाहेर काय परिस्थिती आहे ? मला जे जाणुन घ्यायचे आहे.

(शुद्धलेखन शिकत आहे. हळुहळु सुधारणा करते.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.333335
Your rating: None Average: 1.3 (3 votes)

महाराष्ट्रातही सुगम संगीत, कोंबडी पळाली याला शास्त्रीय संगीतापेक्षा जास्त मागणी आहे. अमेरिकेत रहायला लागले म्हणजे फार अभिरूची वाढली असा अर्थ नव्हे.

तसाही एकंदर ओढा सोपे करण्याकडे असे तर कीबोर्डवरची शिफ्ट की योग्य वेळेस वापरणंही फार कठीण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----
आम्ही चर्चा करणारे ... चर्चिल!

अमेरिकेत आले म्हणजे अभिरुचि वाढते असे मी म्हन्टलेले नाही. तसे तुम्हाला कुथे दिसले ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीअक्षरेवर स्वागत. चर्चाविषयावर लवकरच लिहीन.

तुम्ही मराठीत टंकन करण्याचा प्रयत्न करत आहात, हे उत्तम आहे. मला वाटतं चर्चिल यांनी लिहिल्याप्रमाणे शिफ्ट की वापरलीत तर तुमच्या बहुतेक चुका शुद्ध होतील

दीर्घ वेलांटी साठी - शिफ्ट + i
दीर्घ उकारासाठी - शिफ्ट + u
ण लिहिण्यासाठी - शिफ्ट + n
ट लिहिण्यासाठी - शिफ्ट + t
अनुस्वारासाठी - शिफ्ट + m
ष लिहिण्यासाठी - ( शिफ्ट + s ) + h

एवढं लक्षात ठेवलंत तर जवळपास पूर्ण शुद्ध लिहिता येईल. बाकी माहिती उजवीकडे दिसणाऱ्या टंकनसहाय्य या दुव्यावर मिळेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेशजी. तुमच्या सूचनांचा वापर करून लिहायला शिकते.
(अरे जमतंय की.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीअक्षरेवर स्वागत.

वाचन संस्कृती एकूणच मराठी लोकांमधे किती पसरलेली आहे? अमेरिकेत येणारे बहुसंख्य मराठी लोकं हे तांत्रिक विषयांमधे पदव्या मिळवलेले, काम करणारे असतात. याला अपवादही आहेतच, पण बहुसंख्येबद्दल बोलू. तांत्रिक विषय अभ्यासक्रमात शिकणार्‍या, ठरलेल्या रूळावरून जाणार्‍या किती लोकांना अभ्यासक्रमाबाहेरच्या वाचनाची गोडी असते?
माझ्या घरात, आजूबाजूला अशी उदाहरणं मला दिसतातच; इंग्लिश माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मराठी वाचनाची सवय नाही, म्हणून गोडी नाही, म्हणून सवय नाही असं दुष्टचक्र आहे. असे अनेक लोकं मला निदान मुंबई-पुण्यामधे दिसतात. अमेरिकेत येणार्‍या मराठी लोकांमधे या मुंबई-पुण्याच्या लोकांचं प्रमाण बरंच असेल असं मला वाटतं; तुमचा अनुभव वेगळा असल्यास जरूर सांगा.
किमान वाचन करणारे लोकं सापडले तरी त्यावर किती लोकं विचार करतात? काल "मी अमकं पुस्तक वाचलं, खास आवडलं नाही", (किंवा आवडलं) असं सांगणार्‍या व्यक्तींना "का" हा प्रश्न विचारून पहा. किती लोकांना याच्या उत्तरादाखल चार शब्दतरी नीट सांगता येतील?

हा विषय दिसतो तेवढा सोपा नाही असं वाटतं.

टंकनाबद्दल राजेश घासकडवी आणि चर्चिल यांनी आधीच सूचना दिलेल्या आहेत. अधिक मदत हवी असल्यास मला खरड करू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा विषय दिसतो तेवढा सोपा नाही असं वाटतं.

होहो फारंच मोठी गहन वैश्विक समस्या आहे. माझ्या ना काल मोबाइलचे नेटवर्क तब्बल १७ मिनिटे जाम झाले होते. कसा काढला मी तो वेळ मलाच माहित. आणि परवा नेटफ्लिक्सची मूव्ही दोनवेळा अडकली... खरंच फारंच अवघड आहे ! वाटते तितके सोप्पे नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत सर्व प्रकारच्या संस्कृतींची चटकदार भेळ आहे की चिखल आहे हे सांगण कठीण असलं तरी या संमिश्र संस्कृतीने 'क्षण' फार महत्त्वाचा केला आहे हे मात्र नक्की. क्षणिक सुखं, क्षणिक दु:ख... सारं काहि क्षणिक आणि तेवढ्यापुरतं.. मग ती गाणी असोत, चित्रपट असोत नाहीतर कुटुंब असोत..

असो. न्यूयॉर्क च्या गणेशोत्सवात "आफ्टर आय से XXX, यु हॅव टु से 'मम'" अशी पूजा सांगितलेली ऐकल्यावर त्या एलिफंट गॉडला 'नॉलेज' ऐवजी 'ज्ञान' अन 'विसड्म' ऐवजी थोडी 'बुद्धी' दे अशी प्रार्थना करावी की नाही या विचारात पडलो होतो.. अजूनही विचारातच आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>"आफ्टर आय से XXX, यु हॅव टु से 'मम'"

"मी XXX म्हटल्यावर तुम्ही 'मम' म्हणायचं" या वाक्यात आणि वरच्या वाक्यात फरक काय हे कुणी समजवेल का? उगाचच अमेरिकेला झोडपणं सोडा राव. Wink

सरसकट(कट) धाग्यावर सरसकट प्रतिसाद येणे अपेक्षितच, पण " ऋटस्, यू टू? "

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धेला भाषेबिषेचे बंधन नसते रे ऋषिकेशा. केंव्हा बरें कळायचें तुला हे? आता तूच सांग बघू, त्या बाप्पाला 'गॅण्फॅटी' वगैरे म्हणण्यापेक्षा विस्डम-गॉड किंवा नॉलेज-गॉड म्हटलेलं बरं नव्हे काय?!

जोक्स अपार्ट, मागं एकदा एका लोकल 'महाराष्ट्रा मंडल' मध्ये मंत्रपुष्पांजलीचे धिंडवडे काढलेले ऐकवले/बघवले नाहीत. लोकं खुदुखुदु हसत होते पण एकजण पुढं आला नाही. मी अक्षरश: त्याला थांबवून मंत्रपुष्पांजली पहिल्यापासून सुरू केली. त्या मुलाचाही दोष नाही. तो तसाच शिकला असणार लहानपणापासून. आणि इथं परदेशात आपल्या लोकांना एकत्र आणण्याचं काम आपण करतो या भावनेपुढं उच्चारांतले दोष हे खुजेच. त्याला कल्पनाही नसावी कदाचित आपण चुका करतोय. पण ज्यांना आहे तेही पुढाकार घेत नाहीत हे पाहून वाईट वाटलं. अजून उत्साहानं एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात हेच मोठं म्हणायचं! तो एक प्रकारचा माज झळकत असतो एकेकाच्या चेहर्‍यावर! सगळेच असे असतात असंही नाही, पण अशी मंडळी अगदीच मोजकीही नाहीत.

सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे इथं 'महाराष्ट्र मंडळा'त बसून एकमेकांशी अत्यंत अशुद्ध इंग्लिशमध्ये संवाद साधू पाहणारे लोक! असं करण्यामागचं कारण समजत नाही. या मंडळांचा मुख्य हेतू समभाषिक लोकांना एकत्र आणणे एवढाच मर्यादित आहे काय असं वाटतं कधीकधी हे पाहून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत सर्व प्रकारच्या संस्कृतींची चटकदार भेळ आहे की चिखल आहे हे सांगण कठीण असलं तरी या संमिश्र संस्कृतीने 'क्षण' फार महत्त्वाचा केला आहे हे मात्र नक्की.
काय वाक्य आहे!
तुम्ही इथले सखाराम गटणे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५०च्या दशकापासून बघतेय,आपले राजकारण, संस्कृती अगदीच सुमार होत चाल्लेय. साहित्यात नवनविन प्रयोग होत असतात ही एक चांगली बाब.बाकी गणेशोत्सवातला धांगडधिंगा,होळीच्यावेळचे कर्कश ओरडणे ह्यातून आपण मराठी लोक देशाला आपली संस्कृती दाखवून देत असतोच.
परदेशस्थ मराठींना हे करायला मिळत नाही. निदान अमेरिकतले काय्दे कडक आहेत असे वाचलेय्.म्हणून मग ते भेंड्या,गाण्याचे कार्य्क्रम ह्यातून दर्शन घडवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५०च्या दशकापासून बघतेय,आपले राजकारण, संस्कृती अगदीच सुमार होत चाल्लेय.

रमाबाईंकडून शिकण्यासारखं खूप आहे. पहिली गोष्ट म्हणजे वयाच्या (किमान) सत्तरीतही* कमालीच्या सफाईनं त्यांनी केलेलं टंकन (हे या धाग्यावर मुद्दामच लिहिलं पाहिजे म्हणा! Wink ) त्यापलीकडे, त्यांचे अनुभव जर इथं उमटले तर, खूप काही संचित साध्य होऊ शकतं. इथल्या तिशीतल्या, चाळीशीतल्या सदस्यांना त्याचा उपयोग निश्चित होईल. Smile
* पन्नाशीत त्यांनी काही गोष्टी पाहिल्या तेव्हा त्यांचे वय दहा वर्षांचे असावे असे गृहीत धरले तरी आज त्या सत्तरीत पोचतातच. तेव्हा त्या कळत्या, म्हणजे षोडशीच्या पुढच्या वयाच्या असतील तर त्यांची पंच्याहत्तरी झाली आहे. तेव्हा त्यांचं वय विशीच्या पुढचं असेल तर आज त्या ऐंशीच्या... अँड सो ऑन. त्यामुळं त्यावेळी त्या ज्या वयाच्या असतील तेवढा त्यांच्याविषयीचा आदर वाढत जाणार...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही भारतात वाढलात की अमेरिकेत वाढलात (केव्हा वाढलात), कुठे वाढलात वगैरे अनेक गोष्टींवर तुम्ही येणार्‍या अनुभवाचा अर्थ काढत असता. त्यामुळे तुम्हाला जे जाणवत असतं ते सगळं सापेक्ष आहे.

वयाच्या बाराव्या पंधराव्या वर्षी आम्ही आख्खी गीता पाठ केली होती, पण एकाही ओळीचा अर्थ आत्मविश्वासाने सांगू शकत होतो असे म्हणू शकत नाही. पण अमेरीकेतल्या वाढलेल्या एका चार वर्षाच्या चिमुरडीला गीतेतले श्लोक अर्थासह सुस्पष्ट सांगतांना ऐकल्यावर आम्ही एकेकाळी गीता पाठ केली होती हे सांगणंच बंद केलं. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम भारताबाहेर करून कलाकार जेव्हढे पैसे मिळवतात तेव्हढे पैसे ते देशात मिळवत असतील असे वाटत नाही. (कोणी म्हणेल "पैश्यांची" तुलना बरोबर नाही, पण ते खरे नाही.)

मराठी माध्यमाच्या शाळेत मराठी मित्रांबरोबर वाढलेलो असतानाही आमच्या मित्रांना मराठी पुस्तकांची तरी ओढ कुठे होती? शास्त्रीय संगीत वगैरे तर सोडाच. उलट इथे अमेरिकेत कॉलेजमधल्या १४-२० वर्षांच्या मुलामुलींना लावण्या वगैरे बसवताना पाहिलं की कौतुक वाटतं. बॅले, कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी गोष्टी वयाच्या ६व्या वर्षी शिकणार्‍या ह्या अमेरीकेत जन्मलेल्या पोरी पाहिल्या की त्यांच्या आईवडिलांचा राग येतो. अरे जगू द्या की त्या पोरांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या या प्रश्नाची दखल इथल्या सदस्यांनी घेतली म्हणून आभारि आहे. मला जे म्हणायचं आहे ते किंचित अधिक चांगल्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते.

माझ्या धाग्यामधे मी जे वर्णन केलं त्याला निव्वळ अमेरिकेतलीच मराठी माणसं दोषी आहेत असं मला बिलकुल म्हणायचं नाही. एकंदर वाचन संस्क्रुती, कला आदि विषयांमधली गोडी , त्याची जाण या गोष्टी सरासरी लोकसंख्येमधे कमीच आढळतात हेही मला मान्यच आहे.

मला इतकंच म्हणायचं आहे की निव्वळ बोलिवूड डान्स , किंवा भावगीत यामधेच इथल्या माणसानी अडकून राहू नये. आमच्या भागात गेल्या वर्षी नाटक केलं गेलं ते होतं "आई रिटायर होतेय !". आता तुम्ही सांगा : कुठल्या निकषाने या नाटकाची निवड स्प्रुहणीय आहे ? मध्यममार्गीय नाटकं करावी लागतात हे मी मान्य करते; परंतु या अशा स्वरूपाच्या नाटकांची निवड कुठल्या निकषावर होत असावी हे मला समजलेलं नाही.

मराठि वाचना संदर्भात सगळा आनंदी आनंदच आहे. परवा मी एकांना - ज्यांना थोडाफार मराठी वाचण्यात इंट्रेस्ट आहे असं मानल जातं त्याना - साहित्य संमेलनाचे भाषण वाचले का असं विचारलं तर त्यांना अध्यक्ष कोण हे माहिती नव्हतं. पण मी डहाक्यांचं नाव सांगितलं तरी चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह जाईना.

एकंदर लोक ग्रीन कार्ड, सिटिजनशिप, अमेरिकन प्रेसीडेंटची निवडणुक, रिपब्लिकन्सच्या प्रायमरीज , क्रिकेट , आयपीएल, हिंदी सिनेमे , अमेरिकन स्पोर्ट्स यामधे अद्ययावत दिसले. परंतु या, लोकप्रिय, "मेनस्ट्रीम" विषयांपलिकडे जराही जाताना कुणी दिसत नाही.

जमेल तसे आणखी याबाबत सांगायचा प्रयत्न करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला इतकंच म्हणायचं आहे की निव्वळ बोलिवूड डान्स , किंवा भावगीत यामधेच इथल्या माणसानी अडकून राहू नये. आमच्या भागात गेल्या वर्षी नाटक केलं गेलं ते होतं "आई रिटायर होतेय !". आता तुम्ही सांगा : कुठल्या निकषाने या नाटकाची निवड स्प्रुहणीय आहे ? मध्यममार्गीय नाटकं करावी लागतात हे मी मान्य करते; परंतु या अशा स्वरूपाच्या नाटकांची निवड कुठल्या निकषावर होत असावी हे मला समजलेलं नाही.

मराठि वाचना संदर्भात सगळा आनंदी आनंदच आहे. परवा मी एकांना - ज्यांना थोडाफार मराठी वाचण्यात इंट्रेस्ट आहे असं मानल जातं त्याना - साहित्य संमेलनाचे भाषण वाचले का असं विचारलं तर त्यांना अध्यक्ष कोण हे माहिती नव्हतं. पण मी डहाक्यांचं नाव सांगितलं तरी चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह जाईना.

एकंदर लोक ग्रीन कार्ड, सिटिजनशिप, अमेरिकन प्रेसीडेंटची निवडणुक, रिपब्लिकन्सच्या प्रायमरीज , क्रिकेट , आयपीएल, हिंदी सिनेमे , अमेरिकन स्पोर्ट्स यामधे अद्ययावत दिसले. परंतु या, लोकप्रिय, "मेनस्ट्रीम" विषयांपलिकडे जराही जाताना कुणी दिसत नाही.

महाराष्ट्राबाहेरच्या परंतु भारतातल्या सर्वसाधारण महाराष्ट्र मंडळांना (किंवा मराठीभाषक समाजांना) ही निरीक्षणे बहुधा थोड्याफार फरकाने तितकीच लागू पडावीत, असे (या बाबतीत जो फार थोडा अनुभव तोही फारा वर्षांपूर्वी घेतलेला आहे, त्यावरून) मांडू इच्छितो.

विशेषतः दुसर्‍या निरीक्षणाबाबत बोलायचे झाले, तर खुद्द महाराष्ट्रातसुद्धा परिस्थिती याहून खूप वेगळी असावी, याबाबत साशंक आहे.

तिसर्‍या निरीक्षणाच्या बाबतीत, ग्रीनकार्ड / सिटिझनशिप / अमेरिकन प्रेसिडेंटची निवडणूक / रिपब्लिकन्सच्या प्रायमरीज़ / अमेरिकन स्पोर्ट्स या किंवा अमेरिकाविषयक इतर विषयांवरच्या आपल्या अफाट अज्ञानाच्या आणि अचाट मतांच्या जोरावर, येणार्‍याजाणार्‍या अमेरिकास्थिताची कोठल्याही सोम्यागोम्याने बौद्धिके घेणे ही महाराष्ट्रवासी मराठीभाषकांची जरी जित्याची खोड असली, तरी महाराष्ट्राबाहेरच्या परंतु भारतातल्या मराठी अड्ड्यां-मेळाव्यांच्या बाबतीत हे विषय कदाचित चर्चेतून बाद ठरावेत. (कारण, तेथे सारेच मेळेकरी एका नावेत. बौद्धिके घ्यायला एखादा वाट चुकलेला अमेरिकास्थित अनिवासी जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत असल्या विषयांवर चर्चा करण्यात काय हशील?) तेथील विषय कदाचित वेगळे असतीलही, परंतु "मेनस्ट्रीम" विषयांपलीकडे न जाण्याबाबतचे निरीक्षण बहुधा तेथेही लागू पडावे.

(बायदवे, कोण डहाके? आणि मला ते माहीत असलेच पाहिजेत, हे काय म्हणून? आणि हो, आजकाल नसले, तरी एके काळी माझे मराठी वाचन, खूप चांगले वगैरे नाही, तरी इतकेही वाईट नव्हते. म्हणजे, फक्त पु.ल.च वाचले होते, अशातला भाग नव्हता, तर पु.लं.पलीकडे काही अत्रे, चिं.वि. जोशी, गडकरी, झालेच तर कोल्हटकर वगैरेही मंडळी आहेत, इतपत ऐकून तरी होतो, पैकी काहींचे माफक थोडेफार वाचलेही होते. पण ते सोडा. मी मराठीभाषक आहे - निवासी असो वा अनिवासी, महाराष्ट्रवासीय/महाराष्ट्रीय वा अन्यराज्यस्थित/अन्यराज्यीय, देशी वा विदेशी - म्हणून मराठी साहित्याची वाटचाल आणि त्यातील आधुनिक घडामोडी यांचा लेखाजोगा मी कायम ठेवून असलोच पाहिजे, ही अपेक्षा नेमकी कशासाठी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी निरिक्षणे ही मी ज्या पर्यावरणामधे रहाते त्या पर्यावरणाबद्दलची आहेत. मी जे आजूबाजूला घडताना पहाते ते अन्य संदर्भात लागू होत नसेल असा माझा दावा नाही. वर एके ठिकाणी "हे इतर ठिकाणीही घडत असणार" अशा अर्थाचं विधान मी केलेले आहेच.

बाकी डहाक्यांबद्दल : कुणाला काय माहिती असायलाच पाहिजे याचा उहापोह मी केलेला नाही. मी ज्या व्यक्तीशी संवाद करू पहात होते त्या व्यक्तीची प्रतिमा वाचनलिखाणात रस असलेली व्यक्ती अशी आहे. म्हणून डहाक्यांचा किस्सा तिथे लागू होतो. डहाके प्रत्येक मराठी माणसाला माहिती पाहिजेत , किंवा प्रत्येक एनाराय मराठी माणसाला माहिती हवेत असं सूचित झालं असेल तर तसं मला म्हणायचं नाही हे स्पष्ट करते.

शेवटी सांगायलाच हवं म्हणून सांगते : मुद्दा निव्वळ डहाक्यांचा नाही की कुठल्याही एकच एक व्यक्ती/घटना/कलाकृती/पुस्तक/इत्यादि इत्यादि गोष्टीच्या संदर्भातला नाही. गोष्ट आहे ती एकंदर सांस्कृतिक वातावरणाची. जी अपेक्षा व्यक्त झाली आहे (असे वर म्हणण्यात आलेले आहे ) ती अपेक्षा व्यक्तीकडून नाही तर एकंदर community कडून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी निरिक्षणे ही मी ज्या पर्यावरणामधे रहाते त्या पर्यावरणाबद्दलची आहेत. मी जे आजूबाजूला घडताना पहाते ते अन्य संदर्भात लागू होत नसेल असा माझा दावा नाही.

मीही त्याच पर्यावरणाबद्दल बोलतोय. याच पर्यावरणाकडून या अपेक्षा का?

मी ज्या व्यक्तीशी संवाद करू पहात होते त्या व्यक्तीची प्रतिमा वाचनलिखाणात रस असलेली व्यक्ती अशी आहे. म्हणून डहाक्यांचा किस्सा तिथे लागू होतो. डहाके प्रत्येक मराठी माणसाला माहिती पाहिजेत , किंवा प्रत्येक एनाराय मराठी माणसाला माहिती हवेत असं सूचित झालं असेल तर तसं मला म्हणायचं नाही हे स्पष्ट करते.

एखाद्या मनुष्यास वाचनात - अगदी मराठी वाचनात - रस आहे, म्हटले, तरी त्याला महाराष्ट्रात होणार्‍या मराठी साहित्यसंमेलनाचा चालू (म्हणजे 'करंट') अध्यक्ष कोण, हे माहीत असलेच पाहिजे, ही अपेक्षा का? मला कागदावरची मराठी छापील अक्षरे वाचायला आवडत असतील, कदाचित पु.लं.नी लिहिलेले काही वाचण्याबाबत मी उत्सुक असेन, अत्र्यांनी लिहिलेले काही वाचायला आवडत असेल, किंवा तेंडुलकरांनी लिहिलेले काही - वाचल्यावर - आवडत नसेल. कदाचित मराठीतील एखाद्या नवोदित साहित्यिकाने लिहिलेले काही जर कोणी माझ्यासमोर आणून टाकलेच, तर मी ते किमानपक्षी आवर्जून वाचून पाहण्यात कदाचित रस दाखवेनसुद्धा, आणि आवडले, तर कदाचित एका बैठकीत शेवटपर्यंत वाचून काढीन, नाहीतर नाही आवडले, तर कदाचित दुसर्‍या पानानंतर किंवा वरवर चाळूनसुद्धा फेकून देईन. मला मराठी वाचनाची आवड आहे म्हटले तर याचा अर्थ मला मराठीत लिहिलेले साहित्य - मला आवडण्यासारखे वाटले तर - वाचायला आवडते. (मला आवडण्यासारखे वाटले नाही, तर केवळ मराठीत आहे म्हणून, आणि लिहिणारा साहित्यिक कितीही प्रसिद्ध असला तरीही, मुळीच वाचणार नाही.) पण पर्यायाने मला 'महाराष्ट्र साहित्य परिषद' नामक एंटिटीच्या कामगिरीशी, त्यांच्या मेळाव्यांशी आणि त्या मेळाव्यांच्या अध्यक्षांशी घेणेदेणे असलेच पाहिजे, ही अट का? मला मराठी वाचण्यात रस आहे, डहाक्यांच्या लिखाणात असेलच, किंवा असलाच पाहिजे, असे नाही, आणि मराठी साहित्यसंमेलनांत (नि त्यांच्या अध्यक्षांत) असलाच पाहिजे, असे तर नाहीच नाही.

शेवटी सांगायलाच हवं म्हणून सांगते : मुद्दा निव्वळ डहाक्यांचा नाही की कुठल्याही एकच एक व्यक्ती/घटना/कलाकृती/पुस्तक/इत्यादि इत्यादि गोष्टीच्या संदर्भातला नाही. गोष्ट आहे ती एकंदर सांस्कृतिक वातावरणाची. जी अपेक्षा व्यक्त झाली आहे (असे वर म्हणण्यात आलेले आहे ) ती अपेक्षा व्यक्तीकडून नाही तर एकंदर community कडून आहे.

कम्युनिटीकडून अपेक्षा तरी काय म्हणून? कम्युनिटीला कशात रस आहे, ते ठरवायला कम्युनिटी समर्थ आहे. आणि तो रस तुमच्या रसांशी मिळताजुळता असलाच पाहिजे, असे काही कम्युनिटीवर बंधन नाही. हं, तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटते, तर तुमच्यासारख्या समरसिकांना शोधून काढून त्यांच्याबरोबर एकत्र जमण्याचा प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. किंवा, तुमची तितकी ताकद असेल, तर त्या गोष्टीत इतरांना रस निर्माण होईल यासाठी प्रयत्न करण्याची मुभाही तुम्हाला आहे. पण, तुम्हाला ज्यात रस आहे, त्यातच कम्युनिटीला रस असावा अशी अपेक्षा करण्याचा तुम्हाला नेमका काय अधिकार?

एवढेच असेल, तर काढा स्वतःची कम्युनिटी शोधून. किंवा, जमण्यासारखे असेल, तर करा स्वतःची कम्युनिटी स्थापन. (इंग्रजीतः "Go find a community of your own. Or, if you can, go found a community of your own.")

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा आमच्या इथे एक महाराष्ट्र मंडळ होतं. मोठ्या शहराच्या आसपासच्या पन्नास मैलाच्या परिसरातल्या सबर्ब्समध्ये मिळून चांगली साडेपाचशे कुटुंबं होती. मी कौतुकाने कार्यक्रमाला गेलो होतो पण माझी निराशा झाली. अनेक लोक आले होते. पण त्यात मराठी म्हणून काहीतरी एकत्रित नवीन करण्यापेक्षा एकमेकांना भेटणं हाच मुख्य हेतू होता. म्हणजे एखाद्या लग्नसमारंभाला जावं आपण, आपले लांबचे नातेवाईक, मित्र, ओळखीचे भेटावेत यासाठी, तसं. मग त्यात जेवण हाणणं, गप्पा मारणं, गॉसिप ताजं करून घेणं, पुढच्या वेळी भेटण्याचे कार्यक्रम ठरवणं अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष साधता येतात. प्रत्यक्ष समारंभ, कार्यक्रम यातून थोडाफार आनंद होतो तो साइड बेनिफिट.

माझी निराशा होण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या अपेक्षा. (हे थोडंसं बुद्धाचं तत्त्वज्ञान वाटेल - तृष्णेतच साऱ्या दुःखाचं मूळ आहे वगैरे... पण ते खरं आहे) मला वाटलं होतं की महाराष्ट्र मंडळ हे मराठी वाङमय मंडळासारखं असेल. पण जनसंपर्काची (अत्यंत महत्त्वाची) गरज भागवण्यासाठी ते बनलेलं होतं. त्यातून जुन्या ओळखीच्या परंपरा पाळून संस्कृतीही जपली जात होती. पण नवीन काही घडवण्यासाठी वेगळ्या स्वरूपाच्या मंचांची आवश्यकता असते. ते होताना फार थोड्या ठिकाणी दिसतं. बे एरियामधली 'कला' www.calaaonline.com ही संस्था व इतर काही तुरळक अपवाद सोडले तर एकमेकांना भेटण्यासाठी तयार केलेल्या सबबीत्मक कार्यक्रम यापलिकडे काही मराठीत होताना दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग ह्या नैराश्यावर काय उपाय केलात. खास अमेरिकन ष्टायलीत लगेच प्रोझ्याक वगैरे खायला सुरुवात केलीत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान चर्चा चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

उगाचच अमेरिकेला झोडपणं सोडा राव.

दरच वेळी अमेरिकेला किंवा अमेरिकास्थितांना, स्वत: अतिशय सुमार असणारे नियमित पणे झोडपणारे खूप बघितले आहेत. एवढेच काय तर येथे सुट्टीसाठी किंवा अल्प काळासाठी येणारा सुद्धा मीच कसा हुशार हे दाखवायच्या प्रयत्नात असतो सतत. हुशार माणसे ( सध्याच्या चर्चेत मराठी ) भारतात आणि अमेरिकेतही त्याच प्रमाणात असावित.

तांत्रिक विषय अभ्यासक्रमात शिकणार्‍या, ठरलेल्या रूळावरून जाणार्‍या किती लोकांना अभ्यासक्रमाबाहेरच्या वाचनाची गोडी असते?

इंग्लिश माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मराठी वाचनाची सवय नाही, म्हणून गोडी नाही, म्हणून सवय नाही असं दुष्टचक्र आहे. असे अनेक लोकं मला निदान मुंबई-पुण्यामधे दिसतात. अमेरिकेत येणार्‍या मराठी लोकांमधे या मुंबई-पुण्याच्या लोकांचं प्रमाण बरंच असेल असं मला वाटतं; तुमचा अनुभव वेगळा असल्यास जरूर सांगा.

या अदितीच्या विधानांचा कडाडून निषेध ( आणि प्रचंड असहमती)
बुद्धिमत्ता, वाचनाची आवड, विचारांची प्रगल्भता हा जगातल्या कुठल्याही एका प्रदेशाचा मक्ता नाही. ( तो तसा आहे असे मत केवळ विचारांची अपरिपक्वता दाखवते.)
असल्या चर्चांमध्ये मी सहसा भागच घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही ..पण वाचणार्‍याच्या सहनशीलतेची ही कसोटी मी पार करू शकले नाही ( संयम राखू शकले नाही याबद्दल मला खेदच आहे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढेच काय तर येथे सुट्टीसाठी किंवा अल्प काळासाठी येणारा सुद्धा मीच कसा हुशार हे दाखवायच्या प्रयत्नात असतो सतत.

किंवा, अमेरिका कशी भिकार.

अगदी!

सुट्टीसाठी अमेरिकेत आपल्या मराठीभाषक आप्ताच्या घरी येऊन, त्याचीच बियर ढोसताढोसता, (अमेरिकन राजकारणाविषयीं अमेरिकन पेपरांत काहीतरी अर्धवट वाचून किंवा अमेरिकन टीव्हीवर काहीतरी अर्धवट पाहून त्यावर फुटकळ चर्चा करताना) 'अमेरिका कशी छान खड्ड्यात जाते आहे आणि अमेरिकेने केलेली पापे अमेरिकेला कशी मस्तपैकी बुडवत आहेत' यावर चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारा असुरी आनंद आणि तोंडातून ओसंडून वाहणारी लाळ यांसहित रसभरित (आणि उघडउघड हर्षभरित) मतप्रदर्शन करताना, आपण ज्याच्या घरी राहतोय आणि ज्याची बियर ढोसतढोसत हे बोलतोय, तो आपला मराठी आप्तेष्ट हा एक अमेरिकन असेल, त्याच्या आपल्या (म्हणजे स्वतःच्या) देशाबद्दलच्या भावना (देशाचे सर्व दोष मान्य करूनसुद्धा) कदाचित वेगळ्या असू शकतील, एवढेच नव्हे, तर अमेरिकेच्या खड्ड्यात जाण्याने या आपल्याच आप्तेष्टाचे आयुष्याचे (बाकी काही नाही तरी आर्थिक) नुकसन होत असेल, हे (माहीत असूनही) गावीही नसल्यासारखे वागणार्‍या इंडियन्सच्या खुट्झ्पाचे मला केवळ कौतुक वाटते.

'आपलेच आप्तेष्ट' म्हणून (आणि वयाकडे पाहून) सांभाळून घ्यावे लागते कधीकधी, झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिका कशी रसातळाला चालली आहे ह्याची रसभरीत वर्णने असणारी अमेरिकनांनीच लिहिलेली डझनावारी पुस्तके अ‍ॅमेझॉनला सापडतील.

पण हेच तुमच्या आप्तेष्टाने म्हंटले की तुमच्या एनाराय सुखवस्तु कुल्ल्याला फोड येतो. कारण तो आप्तेष्ट बिचारा भारतीय आणि त्यातुन त्याने तुमच्या पैशाची वियर प्यायलेली, त्यामुळे त्याने अर्थातच तुमच्या इगोला गोंजारले नाही तर तुमच्या काळजाला घरे पडणारंच की.

बाकी तुमचे विव्हळणे चालू द्या पण तो बिचारा आप्तेष्ट बरळाला म्हणून तुमचा लेऑफ होणार नाहीये तेव्हा रोजच्या पाट्या टाकत राहा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भडकाऊ? न'वी बाजू चिडली की काय?? अरेरे ह्यांच्या बियरचे पैशे परत करा रे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निषेध का ते समजलं नाही, असहमती समजू शकते.

अमेरिकेत येणारे (किंवा येऊन जाणारे) माझ्या ओळखीतले बरेच लोकं मुंबई-पुण्याचे आहेत, मराठी आहेत, आयटीवाले आहेत आणि निदान शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने या दोन शहरांत काही काळ घालवलेला आहे. (माझा मनुष्य संपर्क फार कमी आहे हे मला मान्य आहे.) पण "बुद्धिमत्ता, वाचनाची आवड, विचारांची प्रगल्भता" यांचं प्रादेशिक विभाजन मी कुठे ब्वॉ केलं?

मराठी आंजावर तांत्रिक किंवा विज्ञान विषय शिकलेल्या लोकांची गणना बरीच जास्त असेल, नव्हे सध्यातरी असणारच. माझ्या माहितीप्रमाणे मराठी संस्थळं सुरू करणार्‍या लोकांमधेही विज्ञान-तंत्रज्ञान विषयांत उच्चशिक्षण घेणारेच जास्त आहेत. पण अभियांत्रिकी, वैद्यक, विज्ञान, वगैरे विषय शिकणारे लोकं (अगदी स्वतःचाही अपवाद मी करत नाही) खूप कमी प्रमाणात दर्जेदार वाङ्मय, कोणत्याही भाषेतलं, वाचतात असं मला दिसतं. व्यवसाय, आंजावगळता इतर छंद आणि सटरफटर कारणांमुळे ज्यांच्याशी ओळख झाली आहे अशा अनेक लोकांच्या विज्ञान विषयात पदव्या आहेत हे मला माहित आहे. आणि ते लोकं विचारपूर्वक दर्जेदार वाङ्मय वाचताना, त्याबद्दल चर्चा करताना आढळत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरील अनेक प्रतिक्रियांना एकत्रित प्रतिसाद इथे देत आहे

उगाचच अमेरिकेला झोडपणं सोडा राव.

इथे मी अमेरिकेला झोडपले कसे आहे? - झोडपलेले नाही - तसा उद्देशही नाही. जर माझा प्रतिसाद नीट वाचलात तर माझी 'संदिग्धता' लक्षात यावी आणि ती संदिग्धताच मांडली आहे.

न्यूयॉर्क च्या गणेशोत्सवात "आफ्टर आय से XXX, यु हॅव टु से 'मम'" अशी पूजा सांगितलेली ऐकल्यावर त्या एलिफंट गॉडला 'नॉलेज' ऐवजी 'ज्ञान' अन 'विसड्म' ऐवजी थोडी 'बुद्धी' दे अशी प्रार्थना करावी की नाही या विचारात पडलो होतो.. अजूनही विचारातच आहे!

तिथे जे चालु आहे ते चांगले की वाईट, योग्य की अयोग्य, मला रुचले की नाही यावर ना मी कोणतीही टिपणी केली आहे किंवा कोणालाहि कमी लेखलेले नाही किंवा सकारात्मक/नकारात्मक सूरही नाही. मात्र माझ्या सवयीच्या विपरीत (व काहिशी विरोधाभासाने भरलेली) बघितलेली गोष्ट (इंग्रजीत पूजा सांगणे - तेही महाराष्ट्र मंडळात!!) योग्य आहे की अयोग्य यावर माझे मत मी अजूनही बनवू शकलेलो नाही.. आणि ते इतक्या घाईने बनविण्याची गरजही वाटत नाही.

मी मांडली होती ती अमेरिकन संस्कृतीचे अंग असणार्‍या क्षणिक घटनांना आलेल्या महत्त्वा संबंधीची व्यथा. अनेक उत्तम घटकांसोबत हा क्षणभंगूरपणा (व एकसूरी-ठोकळेबाज-पणा) हा या संस्कृतीचा साईडइफेक्ट आहे की व्य्वच्छेदक लक्षण झाले आहे यावरही विचार व्हायला हवा.

रहाता राहिला प्रश्न अमेरिकेच्या तथाकथीत 'हितचिंतकांचा' त्यांची (अमेरिकेबद्दलची) चांगली-वाईट मते त्यांना लखलाभ!
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूळ मुद्दा भाषा आणि कला जपण्याचा आणि संवर्धनाचा दावा केला जाणे आणि त्या अनुषंगाने दर्जेदार काम न करणे यावर आहे, पण चर्चेत अमेरिकेला झोडपणे किंवा गणपतीला गॅणफॅटी म्हणणे वगैरे अनावश्यक मुद्दे आलेत असे मला वाटते.
मुळात या संस्थळावर देव नाही असे मानणारे बहुसंख्य असतील असे मला वाटते, त्यामुळे पूजा वगैरे पुर्वीच्या खुळचटपणावर चर्चा करण्यात अर्थ नाही. अमेरिकेत (किंवा कुठेही) अगदी शुद्ध संस्कृतमध्येही पूजा केली तरी तो एक हास्यास्पदच प्रकार म्हटला पाहिजे. असो.
मूळ मुद्द्याच्या समर्थनार्थ चर्चा प्रस्ताविकेने काहीच अपेक्षा मांडलेल्या नाहीत. दर्जेदार म्हणजे कसे तेही स्पष्ट केले नाहीय. भाषाच जपायची असेल तर समभाषिकांनी दर महिन्याला भेटून बीयर ढोसत स्वभाषेत गावगप्पा केल्या, बॉसला शिव्या घातल्या आणि अशीच भंकस केली तर काय हरकत आहे?
चला भाषा संवर्धन करू या म्हणून लांब तोंडाने काहीतरी केलं म्हणजेच दर्जेदार की कसे?
अमेरिकेत एखाद्या माणसाला डहाके माहित नाहीत यात काहीच आश्चर्य नाही कारण खुद्द महाराष्ट्रात किती लोकांना ते माहित आहेत ते पाहणे उद्बोधक ठरेल.
माझ्यामते परदेशातल्या (मी ही परदेशात राहतो. अमेरिकेत नाही.) मंडळांनी भाषा संवर्धन करण्याची अधिकृत भूमिका घ्यायची गरज नाही. मराठी भाषेला अजून काही धाड भरलेली नाही. खेडोपाडी लोक मस्त मराठी बोलत असतात. मुंबई,पुण्यातही इतर भाषांची सरमिसळ करून का होईना बोलत असतात.
आणि शास्त्रीय संगीताचं म्हणाल तर मला ते समजत नाही आणि न समजणारे खूप लोक असतात असा माझा अनुभव आहे. ते समजून घेण्याची खूप इच्छा असूनही आणि माझ्या संपर्कात आलेल्या तथाकथित जाणकार व दर्दी लोकांना अनेकदा विनंती करूनही त्यांनी मला ते समजावून सांगितले नाही. उलट आपापसांत त्यातल्या अगम्य संज्ञा (jargon) वापरून स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजण्यातच आनंद घेताना दिसले. असं असल्यावर आणि संगीत शिकण्यासाठी कोणताही फायदा (economic incentive) नसल्यावर कोण मरायला पैसे घालून ते शिकायला जातेय? ज्यांना समजते ते आपापला कंपू करून स्वत:चेच गाण्याचे कार्यक्रम करत असतात आणि आपापल्या मुलांनाही यथाशक्ती शिकवायचा प्रयत्न करत असतात. काळजी नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

हे सर्व वाचताना अरुण खोपकरांच्या नुकत्याच वाचलेल्या एका लेखाची आठवण झाली. त्यातलं एक उद्धृत देतो:

एखादी विहीर मौजे बुरकुटे या गावी बांधली काय किंवा न्यूयॉर्कमध्ये बांधली काय, तिच्यातला बेडूक हा कितीही अंग फुगवलं तरी बेडूकच राहतो. मग तुम्ही विहिरीला वैश्विक विहीर किंवा जागतिक मराठी विहीर काहीही म्हणा, त्याला जागतिक प्रतिष्ठा येण्याची तिळमात्र शक्यता नसते. त्याच्या मौजे बुरकुटेतल्या डराव-डरावला न्यूयॉर्कला गेल्यावर अचानक रसवंती कशी प्राप्त होईल?

मूळ लेख वाङ्मय वृत्ताच्या फेब्रुवारी २०१२च्या अंकात इथे वाचता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझा अनुभव असा आहे की अमेरिकेत माझ्या आजुबाजुला रहाणार्या मराठि लोकाना एकन्दर मराठि पुस्तकान्बबद्दल काडिचा इंट्रेस्स्ट नसतो.
मग तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदलण्याची गरज आहे. तुम्ही कुठल्या शहरात रहाता ते माहिती नाही पण माझ्या गेल्या २२ वर्षांच्या आणि पाच वेगवेगळ्या शहरातील अनुभवानुसार सर्वसाधारण अनिवासी मराठी माणसाच्या घरात सर्वसाधारण निवासी मराठी माणसापेक्षा जास्त मराठी पुस्तके असतात. कारणे...
१. निवासी मराठी माणसाला लायब्ररीवगैरे मधनं पुस्तके आणून वाचता येतात. अनिवासी माणसाला मराठी पुस्तकांसाठी ती सोय नसल्याने आपल्या प्रत्येक भारतवारीच्या वेळेस हावरटासारखी पुस्तक खरेदी होते.
२. आंतरजालावर मराठी वृत्तपत्रे येण्याअगोदर अनिवासी माणसाकडे त्याची आणि त्याच्या मित्रांकडची मराठी पुस्तके हाच एक सोर्स होता. निवासी मराठी मणसांप्रमाणे वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक वगैरे सहजी उपलब्ध नव्हते.
३. आर्थिक उपलब्धता हेही एक कारण आहे पण मुख्य कारण नाही. कारण पैसे पुस्तकांवरच खर्च केले पाहिजेत असं बंधन नसतं, इतरही गोष्टींवर खर्च करता येतो...

लोकल मंडळामधे एकन्दर बोलिवुड गाण्यावर नाच होतात, लोक भावगीताचे कार्यक्रम ऐकतात , स्किट वगेरे बसवली जातात पण शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम मन्डळात क्वचितच केले जातात. एकंदर सर्व ओढा सोपे करण्याकडे आहे.
शास्त्रीय गाणी वाजवली म्हणजे मराठी संस्कृती जपली असं मानणं म्हणजे तर शुद्ध अज्ञान आहे. "ऐसी ना मारो पिचकारी' वरील ख्याल हा मराठी आणि "शुक्रतारा मंदवारा" अमराठी? लेखिकेला भावगीतगायनाचा कार्यक्रम जर अमराठी वाटत असेल तर तिलाच मराठी संस्कॄती म्हणजे काय हे माहिती नाही हे सिद्ध होतं...
सर्व सोपं कारण्याकडे ओढा वगैरे शुद्ध बकवास आहे. तुम्ही तासभर चक्रीलेझिम खेळून दाखवा, तद्दन मराठी प्रकार आहे ना तो? उगाच आपल्याला आवडतं ते खरं, शुद्ध आणि कठिण आणि आपल्याला जे आवडत/ येत नाही ते सोपं मानायचं अशी भंपक विचारसरणी आहे ही....

सर्व काही कठिण करावे , कन्टाळवाणे करावे असे मला म्हणायचे नाही, पण मराठि भाषा जपण्याच्या आणि तिच्या सन्वर्धनाचा दावा जिथे केला जातो, किन्वा कुथल्याही कलेला आश्रय दिला जातो असे सान्गितले जाते तेथे निदान काही प्रमाणात तरी दर्जेदार काम केले जावे ही अपेक्शा चुक आहे काय ?
दर्जेदार कामाची अपेक्षा चूक नाही पण तुम्हाला जे दर्जेदार वाटतं तेच दर्जेदार आणि इतर सगळं दर्जाहीन (आणि सोप्पं!!) ही अपेक्षा चूक आहे असं मला वाटतं.
हल्लीच्या मराठी माणसांनी, मग ते निवासी असोत की अनिवासी, जर कुंकू, श्यामची आई यासारखे चित्रपट सदोदित पाहिले तर ते दर्जेदार आणि जर अगबाई, अरेच्चा सारखे चित्रपट पाहिले तर दर्जाहीन हे लॉजिक अजब आहे...
आजही माझ्या पहाण्यात जर नवरा-बायको तद्दन मराठी असतील आणि भारतात असतांना जर मराठी माणसासारखे वागत असतील तर परदेशांत आल्यावरही ते आपापसांत आणि मराठी मित्रमंडळीमध्ये मराठीच वागतात. आणि जे भारतात असतांनाच अमराठी (?) वागत असतील (आहेत, असेही काही नमुने आहेत!!) तर ते परदेशात आल्यावरही तसेच अमराठी रहातात असं माझं निरिक्षण आहे.

मी गेली काही वर्शे अमेरिकेत रहाते. या साइतवर ज्या प्रकारची चर्चा वाचन वगेरे गोष्टिन्वर केली जाते ते पाहुन आनन्द झाला. इथल्या चर्चेमुळे नवी पुस्तके कळली.
आपल्या काही वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्याबद्दल अभिनंदन! पण नवी मराठी पुस्तके कोणती हे कळण्यासाठी तुम्हाला ह्या (किंवा खरं तर इतर कोणत्याही) साईटचा आधार घ्यावा लागला असेल तर तुमच्या मराठी वाचनाचं कठीण आहे. ज्यांना मराठी नवनवीन पुस्तकं वाचायची खरीच ओढ असते ते महाराष्ट्रातल्या ज्या मुंबई, पुणं, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद इथल्या आपल्या घरी स्थानिक नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्थानिक पुस्तकविक्रेते यांच्याशी संबंध वाढवून कुठं काय नवीन मिळतंय याचा सतत शोध घेत असतात, सायटींवर अवलंबून रहात नाहीत.

तुमच्या इथल्या पदार्पणाबद्दल स्वागत! आणि माझ्या प्रतिसादात कठोरपणा आला असेल तर क्षमस्व. पण काय करणार? आजकाल आम्ही उगाचच अनिवासीबॅशिंग झालेलं सहन करायचं नाही असं ठरवलं आहे. पोतराजाची कॅरेक्टर कितीही मराठी असली तरी तिचा जरा जास्तच अतिरेक होतोय आजकाल...

आपला,
पिवळा डांबिस
एन आर नाय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

२२ वर्षामधे ग्रीन कार्डच काय सिटीझनशीपही कधीच झाली असेल. त्यावेळेस शपथ घेताना हात वर करुन वेळप्रसंगी (जुन्या)देशबांधवांना गोळ्या घालण्यास कचरणार नाही हे ही म्हणून झालेच असेल. मग कशाला डीवचले जाताय मराठी पुस्तके वाचली काय नाय वाचली काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे माठ्यांनो, ह्यात भडकाऊ काय आहे रे? हे वाचा - विशेषत: चौकटीतले
http://en.wikipedia.org/wiki/Oath_of_Allegiance_%28United_States%29
किंवा विचारा पिवळा डांबीसला घेतली होती की नाही शपथ खणखणीत आवाजात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां..खोडसाळ ठीक आहे. तुमच्या कोमल एनाराय मनांना रोखठोक विचार खोडसाळ वगैरे वाटणे ठीक आहे. पण भडकाऊ? मी काय इथे कुणाला मारा कापा असे सांगत होतो का? की मराठी एनाराय मराठी शब्दांचे अर्थ विसरले??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भडकाऊ-खोडसाळ-अवांतर चांगलीच प्रगती म्हणायची की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून कुठला शेरा शिल्लक आहे? तोही देता यावा म्हणून हा आणखी एक प्रतिसाद. करा ऐश तिच्यामारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयडी तर मारे 'रोखठोक' घेतलांत पण प्रतिसाद मात्र 'बिनडोक' दिलांत!!!
इथे या धाग्यावर मराठी असण्याबद्दल, मराठीपणाबद्दल चर्चा चालली आहे. मराठी असणं ही एक जीवनपद्धती आहे, नागरिकत्व नव्हे! जर असं वाटत नसेल तर तुमचा महाराष्ट्र सरकारने दिलेला, मराठीत असलेला पासपोर्ट इथे छापून दाखवा....
एरवी तुमची नागरिकत्वाबद्दलची मळमळ जरी परिचित असली तरी तो ओकण्याची ही जागा नव्हे. त्यासाठी वाटलं तर वेगळा धागा काढा. जर आमचा मूड लागला तर तिथेही येऊन 'ठोकाठोक' बॅटिंग करू....
-पीलाभाय बापू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जास्वंदीबाई यांच्याबद्दल मनात खुप्प आदर दाटुन आलेला आहे.
संजय"जी" यांचे या चर्चेबद्दल काय मत असावे बरें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला श्रेणी देण्याचा ऑप्शन दिसला नाही पण दिसला असता तर ह्या प्रतिसादाला मी +१०० मार्मिक असा शेरा दिला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सकाळी कामावर गेले की संध्याकाळी घरी येण्याची शाश्वती नसणे.
घरी आलोच तर खायला मिळेल की उपाशी झोपावे लागेल, झोपायला छप्पर असेल की नाही?
ह्या समस्या भेडसवाणारे जगात असंख्य लोक आहेत. तुम्हाला ह्यातले काही भोगावे लागते का?

नसल्यास...

शास्रीय संगीत का नाह?, मराठी पुस्तकं का वाचत नाही, शी बाई किती कंजस्टेड तो इकॉनॉमी क्लास...... वगैरे पादर्‍या कारणांवरुन विव्हळणे बंद करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय बाई पण चर्चा चालु आहे! आमच्या पुतण्या शिर्‍या तिथेच असतो.फोन आला की मुलीला फोन देवून शुभंकरोती म्हणायला सांगतो.सांगतो कसला, खेकसतोच्.त्यात त्याची बायको म्हणजे अगदी मराठमोळी.इकडून जाताना १० ते १५ तरी मराठी पुस्तके नेणार. सोबत आंबेहळद,पापड,मिरच्या,मसाले नेहमीचेच.हे सगळे करून फोनवर 'आम्ही इंडियाला मिस करतो' आहेच.
मी म्हणते-ज्याने त्याने त्याच्या आवडीनुसार वकुबानुसार वाचावे, लिहावे. वाद घालायचाच कशाला? मग तुम्ही पिट्सबर्गला असा वा पिंपळगावात. मराठी आहात्,मराठी रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जास्वंदीतैचे मत वाचून काही प्रश्न व विचार मनात आले आणि जरा वैचारिक गोंधळ झाला (माझाच).

माझा अनुभव असा आहे की अमेरिकेत माझ्या आजुबाजुला रहाणार्या मराठि लोकाना एकन्दर मराठि पुस्तकान्बबद्दल काडिचा इंट्रेस्स्ट नसतो. लोकल मंडळामधे एकन्दर बोलिवुड गाण्यावर नाच होतात, लोक भावगीताचे कार्यक्रम ऐकतात , स्किट वगेरे बसवली जातात पण शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम मन्डळात क्वचितच केले जातात. एकंदर सर्व ओढा सोपे करण्याकडे आहे.

ह्यावर

सर्व काही कठिण करावे , कन्टाळवाणे करावे असे मला म्हणायचे नाही

असे तुमचेच मत आणि उत्तर तुम्हीच दिले आहे की, मग प्रोब्लेम नेमका काय आहे?

पण मराठि भाषा जपण्याच्या आणि तिच्या सन्वर्धनाचा दावा जिथे केला जातो, किन्वा कुथल्याही कलेला आश्रय दिला जातो असे सान्गितले जाते तेथे

म्हणजे नक्की कुठे असे तुम्हाला म्हणायचे आहे? काही कळले नाही बुवा Sad

महाराष्ट्रातल्या गावात , शहरात आणि महाराष्ट्राबाहेर काय परिस्थिती आहे ? मला जे जाणुन घ्यायचे आहे.

हे असे विचारत आहात जणू काही तुम्ही इथे (महाराष्ट्रात) राहिलातच नाही. कितीही वर्षे तुम्हाला अमेरिकेत जाउन झाली असली तरीही तुम्ही इथुनच गेलात ना?
तेव्हा तुम्ही मराठी भाषा जपण्यासाठी आणि तिच्या सन्वर्धनासाठी काय करत होतात ते कळले तर ह्या चर्चेला आणखिन खोली प्राप्त होईलसे वाटते.

आणि समजा इथली परिस्थिती तुम्हाला कळली आणि ती अमेरिकेसारखीच आहे असे कळले तर मग तुम्ही नेमके काय करणार?

- (मराठी भाषा जपण्याची व सन्वर्धनाची अजिबात काळजी नसलेला ) सोकाजी

ता.क. : रोखठोक यांची प्रतिसादाच्या पद्धतीचे आणि भाषेचे समर्थन करीत नाही, पण त्यांच्या मताचा आदर आहेच. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0