नदी

अल्लड नवथर खळाळून वाहणारी मी जेव्हा येऊन मिळाले तुला,
तेव्हा माहितीच नव्हतं समुद्र काय असतो ते.
कधी भरती, कधी ओहोटी, तर कधी खवळलेला दर्या
कधी निळी भोर, कधी शुभ्र शांत तर कधी मातकट उग्र चर्या.
शाश्वत असतात मात्र आंदोलनं कधी भिववणारी तर कधी नादधुंद
जमतं कसं बरं तुला सतत आपल्याच मस्तीत राहाणं ?
मी वाहात राहाते शांत तृप्त लयीत, तुझा पाऊस मात्र करतो जीव कासावीस
सारी तगमग, उदासी खेचून आणतो वर ,
जाणीव करून देतो मतलबी, अपकारी जगाची.
मग सुटतं माझं भान आणि वाहते मी बेफाम
वाटेतले सगळे अडथळे उधळून लावत.
विचारायचा असतो जाब तुला उसळत्या वादळांचा आणि
घ्यायचा असतो सूड जिव्हारी लागलेल्या अपमानांचा.
पण तूच बुडवत सुटलेला असतोस अश्राप बिचारी जहाज आणि तरंगती बेटं
आणि भयचकीत झालेल्या जगावर सांडत राहतोस पश्चात्तापाचे अश्रू.
मग समजून चुकते पुन्हा एकदा मी माझीच मर्यादा
कितीही कृध्ध असले तरी मी जीवनदायिनी सर्वदा.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

समुद्र हा ईश्वर असावा. असे सजीवांचे गुण निर्जीव किंवा मे बी मानवेतर वस्तूंवरती आरोपित करण्याच्या अलंकाराला चेतनागुणोक्ती म्हणतात असे वाचलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतनागुणोक्ती ची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0