मराठी फाँट : मदत हवी

माझ्या विंडोज संगणकावर, फायरफॉक्स मधे ऐसीअक्षरेचा स्क्रीन शॉटः

चित्र नीट दिसत नसले तर येथे पाहावे:

हा फाँट अजिबात आवडत नाही; पण माझ्या मशीनवरचे बाकीचे नागरी फाँट ही काही खास नाहीत. जालावर अनेक चांगले मराठी फाँट आहेत, पण ते उतरवून घेतल्यावर त्याच फाँट मध्ये एखादे स्थळ बघता येते का? वरील चित्रात लेखन अगदी गच्च गिचमिड दिसते, परिच्छेदांमध्ये जागा फारशी नाही. हे देखील चांगल्या, अधिक सुवाच्य फाँट ने सुधारता येते का? फाँट चा आकार वाढवला तरी फारसा फरक पडत नाही. या साठी काय करावे?

ऐसीअक्षरे साठी ऑप्टिमल असा "फाँट परिवार" आहे का?

तज्ञांनी कृपया या लड्डाइटची मदत करावी!

प्रतिक्रिया

विंडोजवर (बहुधा एक्सपी, व्हिस्टा आणि सेव्हन) एरिअल युनिकोड एम एस हा युनिकोड फाँट आपोआप असतो. मला स्वतःला (तुमच्या स्क्रीन शॉटमधल्या) 'मंगल'पेक्षा तो आवडतो. तुम्ही म्हणता ती गिचमिड मंगलमध्ये जाणवते, पण एरिअलमध्ये (मला तरी) जाणवत नाही.

फायरफॉक्समध्ये डीफॉल्ट फॉन्ट सेट करता येतो तो असा:

टूल्स->ऑप्शन्स->कन्टेन्ट->फाँट्स->अ‍ॅडव्हान्स्ड इथे जाऊन 'फाँट्स फॉर' मध्ये 'देवनागरी' निवडा आणि हवा तो फाँट हवा तिथे निवडा. डीफॉल्ट एन्कोडिंग युनिकोड-यूटीएफ-८ करा.

याशिवाय तत्त्वतः कोणताही युनिकोड फाँट इन्स्टॉल केला तर तो डीफॉल्ट म्हणून वापरता यावा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे वा, हे अगदीच सोपे निघाले. या फाँटच्या वेलांट्या जरा मोठ्या आहेत, आणि किंचित पसरट असता तर चाललं असतं, पण मंगल आणि उत्साह वगैरे पेक्षा पुष्कळ चांगला दिसतो.
जंतूंचे अनेक आभार!

+१

मी डिफॉल्ट म्हणून सी डॅक टी टी योगेश वापरतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

अरे वा जंतूचे आभार!
ही सुचना टंकलेखन मदतीच्या धाग्यावर पण अपडेटावी असे वाटते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या विण्डोजमधे फॉण्ट असाच दिसतो. पण मी विण्डोज फारसं वापरत नाही त्यामुळे या फंदात पडलेले नाही. मिक्रोसॉफ्टचा डीफॉल्ट फॉण्ट, मंगल अगदी काहीतरीच आहे. लिनक्समधून फॉण्ट असा दिसतो. त्यात र्‍य आणि र्‍ह विचित्र दिसतात, पण बाकी सर्व सुबक दिसतं त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष करते.

------

------

माझ्या संगणकावर विशेष कोणताच फॉण्ट टाकलेला नाही, कुबुण्टूबरोबर जे आले तेच वापरते आहे. ऐसी अक्षरेवरही कोणताही वेगळा फॉण्ट टाकलेला नाही. देवनागरी फॉण्ट फाफॉवर कोणत्याही संस्थळावर मला असाच दिसतो. माझ्याकडे असलेल्या फॉण्ट्सपैकी गार्गी, लोहित, रेखा, रचना, उत्कल यांच्यापैकी एखादा फॉण्ट डिस्प्लेसाठी वापरला जात असावा असं वाटतं. हे सर्व फॉण्ट्स जालावर फुकटात उपलब्ध असावेत. हवे असल्यास मी इमेलही करू शकते.

ट्रूटाईप फॉण्ट्सची नावं नितिनने उल्लेख केल्याप्रमाने 'टी टी योगेश' अशी असतात. स्टीव्ह जॉब्ज आणि अ‍ॅपल कंपनीची ही देणगी. ही त्याबद्दलची विकीपिडीया एंट्री.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मॅकबुकवर देवनागरी एमटी (एन-टी?) म्हणून होता, तो इतके वर्ष मी डी-फॉल्ट सगळी मराठी स्थळे वाचायला वापरत होते. तुझ्या स्क्रीनशॉट मधल्या सारखाच आहे, बर्‍यापैकी. अगदी स्वच्छ आणि सुवाच्य.
पण आता खूप वर्षांनी मेलं विंडोज पुन्हा वापरतेय.
थत्त्यांनी सुचविलेला योगेश मस्त आहे! वर उल्लेखिलेला "पसरटपणा" छान आहे. आत्ता तोच उतरवून लावलाय.

योगेश फॉण्ट इथे दिसला. तो ही व्यवस्थित दिसतो आहे.

माझ्याकडे तो उतरवून घेऊन र्‍य आणि र्‍ह ची अडचण सुटते का पहाते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फाफॉवर जसा फॉण्ट सेट करता येतो तसा आय ई वर करता येत नाही. परंतु उपक्रम आणि मिपावर तोच वापरला जात असावा. कारण आयईवर काहीच न करता हा (योगेश) फॉण्ट दिसतो.

ऐसी जर आयईवर पाहिले तर मंगल फॉण्ट (वर मूळ लेखात दाखवलेला) दिसतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

माझा संगणकवर परवा सी ड्राईव्ह फॉरमॅट केला तेव्हा पासून ब्राउझर शिवाय देखील अक्षरे तोडकी मोडकी दिसतात. अगोदर व्यवस्थित दिसत होते. नितीन यांच्या प्रमाणे माझा अगोदर डीवी टीटी योगेश हा डिफॉल्ट केला होता फा फॉ मधे.
आता वाचावेसे देखील वाटत नाही. काही तरी आयडिया सुचवा बुवा!

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विन्डोज वापरत असाल तर कोणती आवृत्ती वापरता त्यानुसार भारतीय भाषा दिसण्यासाठी काही गोष्टी कदाचित कराव्या लागतील. अधिक माहिती इथे आहे. त्याचा फायदा होतो का पाहा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझा संगणकवर परवा सी ड्राईव्ह फॉरमॅट केला तेव्हा पासून ब्राउझर शिवाय देखील अक्षरे तोडकी मोडकी दिसतात.

त्यांच्या म्हणण्यावरून मला असं वाटतंय की त्यांच्या विंडो डिस्प्ले सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. माझा (अंधारातला दगड) असा आहे कि फॉन्ट्स डिलीट झाले(ला) असावेत(वा). माझे म्हणणे जर बरोबर असेल तर हा प्रयत्न करून पहा: http://superuser.com/questions/39847/how-to-reset-windows-7-to-its-defau...

प्रकाशकाका, तुमच्या कंप्युटरचह स्क्रीनशॉट घेऊन टाकलात तर कदाचित संभ्रम कमी होईल.

सगळ करुन थकलो बुवा आता!

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमचा स्क्रीनशॉट पाहून मलाही असंच वाटतंय की तुम्हाला फॉंट पुन्हा इन्स्टॉल करावा लागेल. या धाग्यातच वर योगेश फाँटचा दुवा आहे. तिथून डाउनलोड करून इन्स्टॉल करून पाहा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रिन्स्टॉल करुन झाले. प्रथमच डीवी टीटी योगेश डिफॉल्ट केला होता. त्यानंतर एरियल युनिकोड एम एस करुन झाला, मंगल् झाला. पण काही फरक नाही. माझ्या कडे फाफॉ १०.०.२ आहे. निळे नी सांगितल्या प्रमाणे डिस्प्ले प्रॉपर्टी सेटिंग मधुन, अ‍ॅपिअरन्स- अडव्हान्स्मधे जाउन फॉन्ट ताहोमा होता तोही बदलून पाहिले. पण काही अपेक्षित बदल होईना! Sad

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी तुम्हाला दिलेल्या पहिल्या प्रतिसादात जो दुवा दिला होता त्यावरच्या सूचना अंमलात आणल्या का?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याप्रमाणे सूचना अमलात आणल्या होत्या.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अनेक ठिकाणी काड्या करुन झाल्यावर एका ठिकाणी सेटिंग सापडले
डिस्प्ले प्रॉपर्टीज- अ‍ॅपिअरन्स- इफेक्ट्स- युज द फॉलोविंग मेथड तो स्मूथ एजेस ऑफ स्क्रीन फॉन्टस - क्लिअर टाईप

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

डिस्ले सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅपिअरन्स बदलून पहा असे सांगणार होतो पण तुम्ही बर्‍याच गोष्टी केल्यात म्हणल्यावर ते पाहिलेच असेल असं वाटलं. Smile