बीटल्स बद्दल थोडेफार

१९५७ -५८ सुमारास लिव्हरपूल सारख्या कला प्रांतात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या शहरात ४ टीनएजर पोरं ( १४-१७ वयोगटातील ) एकत्र आली आणि त्यांनी एक बँड काढला . बरीच नावे बदलत अखेर त्यांनी बीटल्स हे नाव घेतले . पहिली ४-५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी घासूगिरी करत करत ( ज्यात हॅम्बर्ग मधल्या रावडी बार्स मध्ये मद्यधुंद सेलर्स समोर मध्ये दररोज रात्री ८- ८ तास गाणे वाजवणे वगैरे सुध्दा आले ) ते एक घट्ट परफॉर्मिंग बँड बनले .या घासू पणाचा फायदा त्यांना नंतर ,(तेव्हा पर्यंत फारश्या प्रचलित नसलेल्या ) स्टेडियम भर फॅन्स समोर बिनधास्त आरामात परफॉर्म करण्यात झाला . योगायोगाने त्यांना १९६२ मध्ये एक रेकॉर्ड ची संधी मिळाली . आणि ब्रिटन मध्ये ते तुफान लोकप्रिय झाले . त्यांना ' फॅब फोर ' अश्या नावानी ओळखले जाऊ लागले . हे चार जण म्हणजे जॉन लेनन , पॉल मॅककर्टनी , जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार . त्यात जॉन आणि पॉल हे थोरले ... बीटल्स ची प्रसिद्धी अमेरिकेत पोचलीच होती , पण ती किती जास्त होती याचा अंदाज कोणालाही नव्हता .( तोपर्यंत संगीत क्षेत्रात ब्रिटन मधील संगीतावर अमेरिकेतल्या कलाकारांचा प्रभाव असे. )पहिल्याच दौर्यातील सर्व शोज अति हिट झाले आणि ते अमेरिकेतलेही टॉप बँड बनले . ( इतके कि त्यांच्या येण्याला ' ब्रिटिश इन्व्हेजन 'असे संबोधले जाऊ लागले ) पुढची तीन वर्षे जगभर त्यांचे तुफानी दौरे झाले . हे दौरे चालू असतानाच नवं नवीन गाणी रचून ती लोकप्रिय होतंच होती आणि सगळ्या जगाला या तरुण , देखण्या कलाकारांच्या संगीत व इतर सर्व ( कपड्यांपासून केसांच्या स्टाईल पर्यंत सगळ्याची ) मोहिनी पडली .*( अवांतर : अगदी आमच्या सदाशिव पेठेतल्या कला हेअर ड्रेसर्स च्या वाळुंजकराना बीटल्स हि माणसे आहेत हे माहित नव्हते , पण बीटल्स हेअर कट ते परफेक्ट करायचे ) या जगभरच्या वेडाला ' बीटलमेनिया ' म्हणून संबोधले जाऊ लागले लोकप्रियता , आणि कमर्शिअल यश याच्या पूर्वी सर्वोच्च शिखरावर ते जाऊन बसले .
१९६० च्या दशकात दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेल्या पिढीला आपल्या बापाच्या पिढीतली धट्टीकट्टी शिस्तबद्ध कर्मठ गरिबी ( जी कपड्यांपासून संगीतापर्यंत सगळीकडे झिरपलेली होती ) आणि साधेपणाचा कंटाळा आलेला होता. सगळ्या क्षेत्रात माफकसे बंड चालू होते . रॉक अँड रोल , ड्रग्स , ओरिएंटल मिस्टिसीसम आणि तत्वज्ञान आणि अश्या अनेक गोष्टींबद्दल माफकसे आकर्षण चालू झाले होते . या सगळ्याला वाट करून दिली बीटल्स नि , ज्यांच्या संगीतात , कपड्यात , वावरण्यात , बोलण्यात आणि असण्यात एक तारुण्य सुलभ देखणा बंडखोर ताजेपणा होता .
बीटल्स प्रसिध्धीला आले तेव्हा पहिली ३-४ वर्षे त्यांच्या संगीतात मुख्यतः सिली लव्ह सॉंग्स आणि पूर्व प्रसिद्ध रॉक अँड रोल यांचा भरणा असायचा . त्यानंतर मात्र त्यांच्या संगीतात एक प्रगल्भ सूर आला . यात तेव्हाच्या सामाजिक परिस्थिती चा प्रभाव होताच .
साधारण पणे १९६५ -६६ च्या सुमारास बीटल्स नि दौरे बंद करून स्टुडिओ मध्ये बसून संगीत जमवायला सुरुवात केली . हि होती त्यांच्या एक्सपेरीमेंटेशन ची सुरुवात . सिली लव्ह सॉंग्स मधून बाहेर निघून कधी ना हाताळले गेलेले विषय आणि टेक्निक्स त्यांनी आणायला सुरुवात केली ' रिव्हॉल्व्हर ' आणि ' रबर सोल ' अल्बम्स हे संगीतिकदृष्ट्या अतिशय सुरेख होते . पण त्यानंतर आलेले 'सार्जंट पेपर .... ' आणि 'व्हाईट अल्बम ' हे प्रायोगिकदृष्ट्या अति उच्चं म्हणावे असे निघाले . या मध्ये वेडेवाकडे सांगीतिक प्रयोग होते आणि हे चारही अल्बम्स जबरदस्त गाजलेच .
चारही बीटल्स ची व्यक्तिमत्व अत्यंत वेगळी होती . जॉन होता मूळचा बंडखोर . प्रसिद्धी आणि पैसे याचे तमा न बाळगता स्वतःला जे योग्य अयोग्य वाटेल त्याची व्यावसायिक भीडभाड न बाळगता ठोकणारा होता . ( तो अँटी वॉर , अँटी गन लॉबी , peace activist होता आणि त्याने ब्रिटिश सरकार आणि अमेरिकन सरकारला कडू वाटणारे स्टॅन्ड तो कायम घेत आला ) पण बीटल्स ची जागतिक लोकप्रियता इतकी होती कि या सरकारांना हा कडू डोस गुपचूप गिळायला लागे . पॉल होता देखणा , व्यवहारचतुर , जॉर्ज हॅरिसन ला भारताचे वेड होते . रवी शंकरांकडून तो सतार शिकला . त्याच्या नादाला लागून इतर तिघे त्याच्याबरोबर महर्षी महेश योगी च्या ऋषिकेश च्या आश्रमात राहिले . तिथे एकसे एक अफलातून गाणी रचली , आणि जॉर्ज सोडून इतर तिघे महर्षी योगी च्या भंकस बाबागिरीने उद्विग्न होऊन परत गेली . ( जॉन नि ऋषिकेश मध्ये रचलेले ' अक्रोस द युनिव्हर्स .. ' जरूर ऐका , पण परत गेल्यावर भडकलेल्या स्थितीत जॉन ने महेश योगी च्या गंडवा गंडवी वर तितक्याच ताकदीचे ' सेक्सि सेडी ' रचले ) रिंगो मात्र साधाभोळा happy go lucky होता. व्यक्तिमत्वे कशीही असली तरी सांगीतिक दृष्ट्या सगळेच थोर होते आणि म्हणून पुढच्या सगळ्या अल्बम्स मध्ये त्यांची पेर्सोनालिटी जास्त दिसायला लागली , जॉन ची बंडखोरी , जॉर्ज ची भारतीय संगीताचा प्रभाव असलेली , आणि पॉल ची पूर्वीसारखीच गोड गोड ...

या नंतर हि Abby road आणि लेट इट बी हे दोन मोठे आणि लोकप्रिय अल्बम निघाले , पण त्यात बीटल्स दिसत नव्हते , दिसत होते ते वैयक्तिक जॉन , पॉल , जॉर्ज आणि रिंगो . हे ग्रुप फुटण्याच्या काळातील अल्बम्स हि पण सांगीतिक दृष्ट्या उत्तमच होते

असा हा जागतिक संगीत क्षेत्रावर जवळजवळ १० वर्षे राज्य करणारा ग्रुप १९७० ला फॉर्मली फुटला. नंतर त्यांचे सोलो अल्बम काढणे चालू राहिले
त्यानंतर आजतागायत सांगीतिक प्रगल्भता , लोकप्रियता , यश या सगळ्याचा मापदंड अजूनही बीटल्स च आहेत . एक दोन पिढयांना त्यांनी मंत्रमुग्ध केले . प्रायोगिक संगीत , रॉक या तेव्हा नव्या असणाऱ्या संगीत प्रकारांना त्यांनी समृदध केलं .

त्यांच्या कुठल्याच गाण्याबद्दल मी उल्लेख केला नाहीये कारण हे सगळं फार लांबलचक होईल . खाली विकी ची डिस्कोग्राफी ची लिंक देतो आहे . त्यातून एक एक घेऊन यू ट्यूब वर बघा किंवा ऎका ,जरूर एका , संपूर्ण एका , चवीचवीने ऐका .

https://en.wikipedia.org/wiki/The_Beatles_discography

( या काळात त्यांनी काढलेल्या फिल्म्स , स्थापलेली कंपनी , त्यांची वैयक्तिक आयुष्ये व इतर अनेक गोष्टींबद्दल मी फार लांबलचक होईल म्हणून काही लिहिलेले नाहीये. कोणी प्रतिसादात विचारल्यास लिहू )

जॉन ची १९८० साली एका यडपटाने हत्या केली , जॉर्ज २००० च्य दशकात कॅन्सर ने गेला , पॉल अजूनही गाणी रचतो , अजूनही लोकप्रिय आहे . रिंगो नि नंतर बराच उडाणटप्पू पणा केला , picture मध्ये कामे केली वगैरे . तो आरामात जगतो आता .

एकहाती न थांबता लिहून काढलंय . कसे वाटले ते मोकळेपणाने सांगा , म्हणजे सुधारणा करता येईल . बरे वाटल्यास कळवा मग , माझा आवडता बीटल जॉन लेनन याच्याबद्दल आणि त्याच्या सांगीतिक कारनाम्यांबद्दल , त्याच्या in your face बंडखोरी बद्दल ,पुन्हा केव्हातरी !!!! हुश्श

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कॉलेजात व नंतर नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात बीटल्सची गाणी आवर्जून ऐकत होतो. पुण्यात कँपातल्या बर्गरकिंगमध्ये बीटल्सची गाणी कायम ऐकायला मिळत. मात्र नंतर आवर्जून ऐकावी असे कधी वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

's been a hard day's night,
And I've been working like a dog.
It's been a hard day's night,
I should be sleeping like a log.

या ओळी कॉलेजमध्ये कुठेतरी वाचल्या आणि मग गाणं शोधत बीटल्स चे "A Hard Day's Night" हे गाणे ऐकले. नवरा जहाजावरती होता व पत्रातून जहाजावरती इंजिन रुममध्ये किती प्रचंड काम असते ते कळत असे. हे गाणे ऐकताना त्याची हटकून आठवण येई Smile
त्याच्याकरता मस्त मस्त इंग्रजी गाणी शोधलेली होती. पैकी एक फोक सॉन्ग (लोकगीत) "अँजेलिना अँजेलिना ..." गोवन संगीत होते वाटते. मुद्दाम टेप करुन त्याला ऐकवले होते. त्यात काहीतरी सी-फेअरर गावात त्याच्या प्रेयसीकडे येतो जी उत्सुकतेने वाट पहाते आहे अशा प्रकारचे गाणे होते.
एवढे परिश्रम घेतल्यावरती कळले त्याला ते गाणे विशेष वाटलेच नव्हते. तरुण था वो भी, अननुभवी. बायकोला अ‍ॅप्रिशिएट करायचे धडे अजुन त्याने गिरवलेले नव्हते. असो.
.
त्याला "प्रेटी वुमन वॉकिंग डाऊन द स्ट्रीट ...." हे गाणे आवडते कळल्यावरती मग ते शोधुन ऐकले होते. "आय बेग युअर पार्डन ...." हे गाणेही त्याचे आवडते आहे हे कळल्यावर शोधून काढलेले होते. किंबहुना त्याच्याबरोबर शेअर करता यावीत म्हणुनच इंग्रजी गाण्यांकडे वळले.
.
ही वरील गाणी (हार्ड डेज नाईट सोडता) बीटल्स ची नाहीत पण त्या दिवसांची आठवण आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त !!!शुचि मामी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मस्त आहे बापटजी. अजुन रसभरीत करावा, वैयक्तिक आयुष्य , ध्वनीमुद्रणाचे किस्से टाकून रंग आणावा ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त!

' रिव्हॉल्व्हर ' आणि ' रबर सोल ' अल्बम्स हे संगीतिकदृष्ट्या अतिशय सुरेख होते . पण त्यानंतर आलेले 'सार्जंट पेपर .... ' आणि 'व्हाईट अल्बम ' हे प्रायोगिकदृष्ट्या अति उच्चं म्हणावे असे निघाले . या मध्ये वेडेवाकडे सांगीतिक प्रयोग होते आणि हे चारही अल्बम्स जबरदस्त गाजलेच .

यात नेमकं वेगळेपण / प्रयोग काय होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

या अल्बम्स पूर्वी बीटल्स चे संपूर्ण यश हे त्यांच्या ( लिरिकली आणि संगीतिकदृष्ट्या )साध्या रोमॅंटिक लव्ह सॉंग्स आणि रॉक न रोल मुळे होतं . या अल्बम्स मध्ये त्यांनी हा त्यांना अत्यंत यश आणि पैसा दिलेला फॉर्मुला झटकून टाकून पुढे सरकण्याचं धैर्य दाखवलं ( वयाच्या चोवीस पंचविशीत दाखवलेले हे धैर्य अत्यंत risky आणि थोर होतं . बऱ्याच कलावंतांना स्वतःचा सेट यशस्वी फॉर्मुला मरेपर्यंत सोडवत नाही . ) हा पहिला प्रयोग ." रबर सोल" मध्ये या रोमॅंटिक लव्ह सॉंग्स ला मागे टाकून नवीन विषय हाताळायला सुरुवात केली . या अल्बम पासून संगीतामध्ये आफ्रिकन अमेरिकन संगीताचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली . यातल्या जॉन नि गायलेल्या नॉर्वेजिअन वूड्स ( जरूर ऎका ) मध्ये जॉर्ज हॅरिसन नि नवीन नवीन शिकलेली सतार वाजवली , गिटार ऐवजी . जॉर्ज च्या " If I needed someone ' मध्ये मेलोडिक एलिमेंट कायम ठेवून तालाशी इतकं खेळणं आहे कि हे गाणं लाईव्ह म्हणणं काही वेळा मूळ गायकाला सुध्दा अवघड पडे . जॉन च्या nowhere man मध्ये आधीच्या पूर्णवेळ टुरिंग च्यामुळे आलेले बिनपत्याचे असणे , हे 'न ' त्वं हसत खेळत मांडले आहे . गाणी सिम्पलीस्टीक कडून जास्त सोफेस्टीकेटेड आणि ऍबस्ट्रॅक्ट होऊ लागली .

या नंतर चा रिव्हॉल्वर हा अल्बम एक टप्पा पुढे होता . सायकेंडलिक प्रभाव जास्त होऊ लागला होता . असिड रॉक , चेंबर म्युझिक अशी दोन टोकं ,शिवाय R & B डोकावू लागले . Love you to मध्ये तर जॉर्ज नि चक्क सतार , तबला ( जो लंडन मधल्या कुणी भागवतांनी वाजवला ), आणि तंबोरा घेतला . शून्य पाश्चात्य वाद्ये . Got to get you into my life मध्ये आला motown influence आणि ब्रास सेक्शन्स जे आधी फारश्या बीटल्स च्या पॉप्युलर संगीतात नव्हते . Dr Robert मध्ये तर चक्क आडून आडून ड्रुग्स चा उल्लेख आला .

आदूबाळ , हे सगळं लिहिणं अवघड पडतंय याला एखादा जॉईंट ( म्हंजे एकत्र ' तो ' जॉईंट नव्हे ) सेशन मध्ये हे संगीत ऐकून एन्जॉय करणे म्हणजे एकदम सुख असते
सार्जंट पेपर्स लोनली हार्ट्स क्लब बँड या अल्बमवर तर खरे एक वेगळाच लेख पाहिजे . पण सार्जंट पेपर आणि व्हाईट अल्बम वर आता संक्षिप्त उद्या सकाळी लिहितो . Good night . हा प्रतिसाद आबा ना आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

' हार्ड डेज नाईट' मधले गिटारचे पीसेस मस्त आहेत. कमालीचे सुरेल गायचे हे लोक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

स्वगत -

वी आर ऑल इन अ यलो सबमरीन बहुतेक बीटल्स चे आहे (९८%). ते एवढे प्रसिद्ध का झाले? संगीतामुळे की काही भावार्थ आहे की काही किस्सा आहे कोणास ठाऊक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीत नाही. गरीब गाणं वाटतं उरलेल्याच्या पेक्षा .या नावानी एक अनिमेशन फिल्म काढली होती त्यांनी , त्याचा काही संबध आहे का माहित नाही. गायक हि या चौघानमधला सगळ्यात गरीब रिंगो स्टार उर्फ रिचर्ड स्टारकी आहे.( हा प्रतिसाद शुचि मामी ना होता , येलो सबमरिंन बद्दल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक सुधारणा/ अ‍ॅडिशनः रिंगो स्टार हा बीटल्सचा प्रथमपासूनचा ड्रमर नव्हता. तो होता पीट बेस्ट.
नंतर बीटल्सनी पीटला डिच करून रिंगो स्टारला घेतलं. पुढचा इतिहास सग़ळ्यांना माहिती आहेच...

बाय द वे, पीट बेस्टचा जन्म भारतात, चेन्नईमध्ये झाला होता...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिट बेस्ट ला सुरुवातीला डीच केले , कारण त्याचे ड्रम वाजवणे जरा कमी चांगले होते म्हणे. म्हणून सेशन ड्रमर रिंगो ला आणले. ( पिट बेस्ट जास्त देखणाही आणि मुलींमध्ये जास्त फेमस होता म्हणे , म्हणून का काय कुणास ठाऊक)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त ल्लिहिलेत हो आण्णा.
बीट्ल्स म्हण्जे 'होते बाबा कोणतर' एवढेच माहीत. तो जॉर्ज हॅरिसन रविशंकरांकडे सतार शिकला एवढीच अ‍ॅडिशनल माहीती.
आता हळूहळू जाईल समजत तुम्ही लेखमालाच चालवली तर. बादवे ह्याचा शेवट आमच्या जॅक्सनआण्णापर्यंत आणणार आहात ना?
तेथून पुढे थोडीफार माहीती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या शेठ ,धन्यवाद ... जॅक्सन अण्णा १९८४ -८५ ला आवडायचा . नंतरही अधून मधून . पण त्यानंतर आमच्या ' प्रातः स्मरणियांमधून ' तो उतरला . आणि शिवाय त्याच्यावर खूप भलं बुरं लिहिलं गेलंय , संगीत आणि संगीताव्यतिरिक्त .. म्हणून अजून लिहीणं थोडं कठीण वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे कसंय ना आण्णा. रॉक, मेटल, पॉप वगैरे ऐकायचं वातावरणच नव्हतं हो. कॅसेट रेकॉर्डर म्हणाले कि एकतर रुतु हिरवा नायतर डैरेक्ट अजित कडकडे. आमच्या आत्याचे मिस्टर एअरफोर्सात. त्यांची पोरे पार इंग्लिश बिंग्लिश बोलायची. ते पठाणकोट अंबाला असल्या शाळेत शिकलेली. त्यांच्या घरी अशी अब्बा, बोनीएम, जॉर्ज मायकेल असल्या कॅसेटी पाह्यलेल्या. आयुष्यातले पहिले पॉप त्यांच्याकडून ऐकले ते म्युझिकल युथचे पास द डोचिपाला त्यानंतर मायकेल जॅक्सन. तेव्हा काही कळतही नव्हते. नंतर गोडी लागली ती रहमानचीच. मधली काही इंडीपॉप माहीत असायच्या पण एवढा नाद नव्हता. बाहेरच्यांचे माहीत अस्लेले आणि ऐकलेले संगीत एकतर केनीजी, इनिग्मा, एन्रिक, क्रिस्टिना, ब्रिटनी नायतर जेलो. इतक्या भांडवलावर आम्ही काय बोलणार आणि काय लिहिणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या शेठ >>>रॉक, मेटल, पॉप वगैरे ऐकायचं वातावरणच नव्हतं हो. त्यांनी काही फरक पडत नाही . , तसं कुणाकडेच नसायचं हो . ( आमच्या घरी तर कट्टर शास्त्रीय आणि नाट्य होतं .. म्हणूनच वेगळी वाट पकडली )
इन फॅक्ट गम्मत म्हणून सांगतो , १९८० च्या दशकात पुण्यात रॉक म्युझिक चा सीन एकदम भारी होता , पण त्यात थोडे कॅम्पातले ड्रॅगोनेट , मेंडोंका , लॉयर वगैरे मंडळी सोडली तर बाकीचे सगळे मुळीक, जोशी , कुलकर्णी , देशपांडे , पुरोहित, बारावकर वगैरेच होते !!! ( हुच्च्ब्रु भाषेत सांगायचं तर " या व्यक्तींची अभिरुची आणि अभिव्यक्ती विदेशी असली तरी संवेदना देशीच होती !!! हुश्श )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायला! मग कोणाला मराठी रॉक काढायचं नाही का सुचलं?

मागे कोणीतरी मराठी रॅप ऐकवलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मराठी रॉक... हम्म
नंदू भेंडे आणि अजून एक नाव वाचल्याचं स्मरतं. गाणीबिणी आठवत नाहीत कारण कधी ऐकलीच नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंदू भेंडे बहुधा मराठीच नाही तर इन-जनरल भारतातच रॉक सुरू करणारा होता. अलिकडेच त्यांची गाणी शोधत होतो. अलेक पदमसींच्या आत्मचरित्रात जिसस क्राइस्ट सुपरस्टार नाटकाचा उल्लेख आहे. त्यात नंदू भेंडेने रॉक गायलं होतं. हे ते गाणं. खतरनाक आवाज आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ढेरे शास्त्री ,,, सिक्सर !!! लय भारी !!!! धन्यवाद !!!!!!!

तीन पैशांचा तमाशा चे संगीत गूढ कारणांनी THEATRE अकॅडमि नि बाजारात आणले नाही . कोणाकडे असल्यास मी शोधात आहे . डेस्परेटच आहे म्हणा ना . कळवा !!! नंदू ची इतर काय सापडलेत गाणी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आक्खं चॅनेल आहे.

https://www.youtube.com/user/InSyncStudios/videos

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

धन्यवाद !!! अरे , इंसिन्क म्हणजे नंदू चाच स्टुडिओ ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय! वागळेकाकांनी मुलाखत घेतली होती त्यांची. त्याचा व्हिडोदेखील आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एक गाणं सापडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अनुपशेठ ,हि मुलाखत बघितली होती. पण नंदू च वय आणि तब्येत यांचा परिणाम दिसत होता. ओरिजिनल नंदू आणि माधुरी च फारच भारी होतं. तुम्ही ती पै त बघितला होतात का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही ती पै त बघितला होतात का ?

नाही. मला अ‍ॅक्चुअली समजल नाहिये तुम्ही काय विचारताय ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तीन पैशांचा तमाशा !!!! ज्यात नंदू होता , आणि रॉक , गण, गवळण, इतर लोकगीतं , उपशास्त्रीय ,गजल , कव्वाली अश्या अनेक संगीत प्रकारांची लयलूट होती त्यात. दादा गायक मंडळी होती नंदू , चंद्रकांत काळे , रवींद्र साठे , अन्वर कुरेशी , माधुरी पुरंदरे. स्टेज वर फुल्ल धमाल असायची. १९९१ साली का कुणास ठाऊक बंद केलं TA नि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह, नाही. शोधत आहे. यु ट्यूब वर एक ४२ मिनिटाचा व्हिडो आहे. बघितला नाही अजून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तुम्ही 'कलेक्टर' दिसता ... शोधा शोधा .मिळवाच . मी बालगंधर्व मध्ये चोरून टेप रेकॉर्डर नेऊन रेकॉर्ड केलं होतं . आता खराब झालंय . किंवा TA मध्ये तुमचा काही वट असेल तर बघा. मिळालं तर माझ्याकडून पार्टी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवधुत गुप्तेवर रॉकचा मोठा प्रभाव जाणवतो
आयुष्य हे चुलीवरल्या वगैरे गाणी तर मराठी रॉक म्हणता यावीत (तुका म्हणे त्यातल्या त्यात Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>>आयुष्य हे चुलीवरल्या वगैरे गाणी तर मराठी रॉक म्हणता यावीत (तुका म्हणे त्यातल्या त्यात (डोळा मारत) )

ऋषिकेश , एकदम सहमत !! त्याची इमेज जरी वरवरची आणि उथळ असली तरी नवीन संगीतकारांमध्ये रॉक ज्याला कळत असावं असं वाटतं ते फक्त अवधूत गुप्ते ला .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>>आयुष्य हे चुलीवरल्या वगैरे गाणी तर मराठी रॉक म्हणता यावीत (तुका म्हणे त्यातल्या त्यात (डोळा मारत) ) >>>ऋषिकेश , एकदम सहमत !! त्याची इमेज जरी वरवरची आणि उथळ असली तरी नवीन संगीतकारांमध्ये रॉक ज्याला कळत असावं असं वाटतं ते फक्त अवधूत गुप्ते ला .

याच्याशी मात्र सहमत नाही. गुप्तेंचे म्हणजे कॉपी रॉक आहे. (उदा. समर ऑफ ६९ - जय जय महाराष्ट्र)
रॉकमधे अपेक्षित असलेली मुक्तता तरीही श्रवणीयता मराठीमधे, अजय-अतुलच्या गाण्यात सापडते - त्यांना रॉकचा इसेन्स सापडला आहे असे वाटते.
अर्थात वैयक्तिक मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी. गुप्तेचे रॉक टाईप असे कोणता झेंडा एवढेच वाटले.
अजय अतुल ला बहुतेक सापडावे तो इसेन्स. खेळ मांडला सारखा खुल्लापण येईल तेव्हा मजा येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या आणि लोळगे , मुक्तता हा criteria धरला तर तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत !!!

पण ऋषिकेश नि सांगितलेले गाणे " आयुष्य हे ....." हे रॉक च्या चौकटीत त्यातल्या त्यात बसणारे गाणे आहे याच्याशी मी सहमत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ आदूबाळ आणि अभ्या शेठ

>>>>>नंदू भेंडे आणि अजून एक नाव वाचल्याचं स्मरतं

>>>>हायला! मग कोणाला मराठी रॉक काढायचं नाही का सुचलं?

एक तर ते कोणाला सुचलं नसावं. , दुसरं म्हणजे खपले नसतं . कारण हे वेड फक्त नागरी तरुणांपुरतं मर्यदित होतं . आणि लोकप्रिय संगीतात मराठीत तो काळ हृदयनाथ वगैरे ना अजून नवीन प्रकारचं वगैरे म्हटलं जाणारा होता . अजून बाबूंजींचं in vogue होते. म्हणून आणि हिंदी सिन अजून " आवाज कि दुनिया के दोस्तो .... छाप मधेच होतं

तशी आनंद मोडक यांनी संगीत दिलेली एक मराठी पॉप नावाची कॅसेट निघाली , , नंदू भेंडे , रवींद्र साठे , माधुरी पुरंदरे वगैरे , पण ती ना पॉप होती ना रॉक ( फार नंतर मी एकदा नंदू भेंडेंना ' तुम्ही हि ( चूक ) का केलीत असं विचारलं होतं . त्याला त्यांनी ओशाळून , काही वेळेला फसतात प्रयोग वगैरे असं उत्तर दिलं . आनंद मोडक , नंदू भेंडे , रवींद्र साठे आणि माधुरी पुरंदरे हि खरं म्हणलं तर दादा माणसं . ( कै आनंद मोडकं , हे संगीतकार तसे अति प्रसिध्ध झाले नाहीत तरी संगीत समज , जाण , कुवत आणि व्यासंग यात अति थोर होते .बिचारे बाबूंजीं /हृदयनाथ आणि लब्बाड सलील यांच्या दोन पिढ्यांमध्ये घुसमटून गेले असे माझे वैयक्तिक मत. )

नंदू भेंडे ( आत्माराम आणि आशा भेंडेंचा मुलगा ) रॉक मधलं मुंबई मधलं मोठं नाव . वेलवेट फॉग , savage encounter वगैरे ग्रुप्स , शिवाय अलेक पदमसी च्या jesus christ superstar या म्युसिकल मधला जुडास वगैरे वगैरे पण हे सगळं इंग्रजीमधलं .. मराठीत आला ते "तीन पैशाचा तमाशा " मधला अंकुश नागावकर म्हणून . काय साला आवाज होता . मेनस्ट्रीम मराठीला रॉक चा आवाज म्हणजे काय हे पहिल्यांदा ( आणि बहुधा एकदाच ) नंदू च्या आवाजांनी कळले नंदू गेल्या वर्षी गेला

आनंद मोडक , नंदू भेंडे हे मंडळी काळाच्या फार आधी आली ...

anyway , to answer your question , खपलं नसतं म्हणून झालं नाही ( तरुणांमध्ये उत्साह भरपूर असला तरी खिसे रिकामे होते )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह. आत्ताच वर याचा उल्लेख केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नंदू भेंडे, रविंद्र साठे, महालक्ष्मी अय्यर वगैरे मंडळींनी काढलेली एक 'अस्वस्थ वारे' नावाची क्यासेट होती. मी सातवी-आठवीत असताना आली होती बाजारात. 'सकाळ' पेपर त्याचा स्पॉन्सर होता बहुतेक. कारण मला आठवतंय मी मोठ्या भावासोबत जाऊन सकाळ ऑफिसमधून ती क्यासेट विकत आणली होती. समहाऊ ती हरवली. कोणाकडे त्यातली गाणी मिळू शकतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णासाहेब, मस्त लिहिलेत. माझेही अभ्यागतच- होते कोणीतरी इतपतच माहिती. तुमच्या लेखामुळे दीक्षा मिळेलसे वाटते.

अवांतरः कुणीतरी बोनी एम आणि आब्बा यांच्याबद्दलही लिहा की. अण्णासाहेब, जमल्यास तुम्हीच लिहा बीटल्सनंतर. तीर्थरूप ती गाणी अजूनही ऐकतात, त्यांच्यामुळे ती गाणी मलाही आवडू लागली, उदा. वन वे टिकेट टु द मून, रा रा रासपुटीन, बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन, डॅडी कूल, बहामा मामा, मा बेकर, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन , आमची गाडी बोनी एम आणि आबा च्या रस्त्यावर कधी गेली नाही . ऐकली आहेत भरपूर . पण त्यावर अधिकारानी काही लिहावे इतपत माहिती नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचे ' प्रातःस्मरणीय ' जॉन लेनन यांचे बीटल्स सोडल्यानंतर उत्तरायुष्यात केलेले आणि लै गाजलेले गाणे . बघा व ऐका

https://www.youtube.com/watch?v=XLgYAHHkPFs

जॉन हा बंडखोर पण स्वप्नाळू कविमनाचा होता . ( बरीच लोकं फेमस आणि श्रीमंत झाल्यावर या दोन गोष्टी अल्लद विसरतात ) जॉन च्या बाबतीत उलट होते .
हे गाणे " ऑलटाइम बेस्ट सॉंग्स ' च्या सर्व लिष्टीत कायम असते , पहिल्या पाच दहात .
lyrics इथे

Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people
Living for today... Aha-ah...

Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion, too
Imagine all the people
Living life in peace... You...

You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will be as one

Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people
Sharing all the world... You...

You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will live as one

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गाण्यातली काही वाक्य जशीच्या तशी 'फॉरेस्ट गम्प' सिनेमातल्या टॉम हॅङ्क्स आणि जॉन लेननच्या मुलाखतीच्या सीनमध्ये जॉन लेननच्या तोंडी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ? म्हणजे आता फॉरेस्ट गम्प बघणे आले . काय संदर्भात आहे हे ? जॉन लेनन ची १९८० डिसेंबर मध्ये हत्या झाली . ( एक मनोरुग्ण तरुण जो स्वतःला च खरा जॉन लेनन समजत होता , त्याने जॉन च्या राहत्या अपार्टमेंट खाली त्याची गोळ्या झाडून हत्या केली ) हे कथानक त्याच्या आधीचे असणार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेननला इमॅजिन गाण्याची प्रेरणा गंपकडून मिळाली हे दर्शवलं आहे त्यात. लेननचीच बहुधा एक जुनी मुलाखत हँक्सच्या सीनबरोबर मिक्स करून तो सिनेमातला सीन बनला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सुंदर लेख
आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

आवडलं.. आता घाईत एवढ्यात वेळ झाला तर सवडीने उत्तरेन
तोवर तुम्ही लिहित रहा मात्र

त्यांच्या कुठल्याच गाण्याबद्दल मी उल्लेख केला नाहीये कारण हे सगळं फार लांबलचक होईल .

माध्यम जालाचं आहे, कुठे पानं छापायची आहेत. होऊ दे ब्यांडविड्थ खर्च!
एकाच लेखात नाहि लिहिलंत हे योग्यच, लेखमालिका मात्र येऊ दे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@ मारवा जी : धन्यवाद
@ ऋषिकेश : धन्यवाद !! सवडीने .... लिहा मात्र नक्की

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली ओळख. अजून लिहा जमेल तसे. आवडेल वाचायला.

वरती अभ्या ची पोस्ट पाहून रॉकपॉपअशिक्षित मी एकटाच नाही हे जाणवून बरे वाटले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अण्णा, होऊ दे खर्च संस्थळ आहे घरचं. मोठी लेखमालाच लिहा. छान सुरुवात केली आहेत.

ढेरेशास्त्री, फीतीबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय सुंदर लेख आहे. बापटकाका, ब्रिटिश एन्वेजनचा विषय निघालाच आहे तर, इथेच न थांबता रोलिंग स्टोन्स, हू यांचीही रयतेला ओळख करून द्यावी ही विनंती.
झालच तर, लेड झेपलीनची महतीपण सांगा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोळगे सायकल कंपनी , अहो मी दगड व दगड आणि लोळ प्रेमी आहे फक्त , कोणी मोठा तज्ञ् अथवा chronicler नाही !!!
तुम्ही पण दगड आणि लोळ प्रेमी आहात , तुम्ही लिहा ना काही !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख. बीटल्सची गाणी अतिशय आवडतात. बीटल्सनी रिव्हर्स टेपचेही बरेच प्रयोग केले होते असं वाचलंय. काही काही गाण्यांत प्रयोग म्हणून कसलीकसली वाद्ये कर्कश्शपणे वाजतात ते आवडत नाही. उदा. हे गाणे. मधला गोंगाट वगळून असतं तर अधिक आवडलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिहीर , ( आणि आदूबाळ ) : बीटल्स ना १९६५- ६६ च्या आसपास आपल्या नॉन स्टॉप दौऱ्यांचा कंटाळा आला होता . त्यांना हेही जाणवायला लागले होते कि आपण या स्टेज शोज मध्ये प्रचंड पाट्या टाकतोय . आपला सांगीतिक दर्जा पण खालावायला लागलाय . म्हणून त्यांनी दौरे बंद करून पुन्हा संगीत व त्यातील अनेक प्रयॊग करायला सुरुवात केली . रिव्हॉल्वर अल्बम पासून यात सुरुवात झाली आणि व्हाईट अल्बम पर्यंत ती चालू राहिली . ( त्यानंरच्या Abby Road आणि लेट इट बी मध्ये प्रयोग जरी दिसले नाहीत तरी तेव्हापर्यंत त्यांचे संगीत ( lyrics as well as musical style ) मध्ये खूप फरक पडलेला होता )

या प्रयोगांमध्ये नवीन वाद्ये , नवीन म्युझिकल स्टाईल्स ( उदा. भारतीय संगीताचा थोडा प्रभाव) आलाच , पण त्याबरोबर रेकॉर्डिंग टेक्निक्स किंवा इतर टेक्निकल प्रयोग पण आले. त्यातील एक म्हणजे रिव्हर्स टेपिंग .
रिव्हर्स टेपिंग मधे त्यांना अपेक्षित असलेला ' सायकेंडलिक फील ' आणायला मदत झाली ( असावी) 'रिव्हॉल्वर 'अल्बम मधील टुमॉरो नेव्हर नोज आणि आय एम ओन्ली स्लीपिंग मध्ये रिव्हर्स टेपिन्ग दिसते . नंतरच्या स्ट्रॉबेरी फिल्ड्स फोरेवर मध्ये तर रिव्हर्स टेपिंग डिस्टिंक्टली दिसते .

आता तू उल्लेख केलेल्या ' अ डे इन द लाईफ ' मधल्या गोंगाटाबद्दल ... मला वैयक्तिक रित्या तो गोंगाट न वाटता त्या गाण्याच्या ' स्पिरिट ' ( pun not intended ) शी सुसंगत अशी रचना interlude म्युसिक मध्ये जाणवते . एकीकडे फुल ऑर्केस्ट्रा चा structured crescendo आणि त्यात वाइल्ड वाटणारी trumpet ... अरे बाबा हे एक ऑल टाइम ' विशेष ' असे गाणे आहे ... ते ज्या अल्बम मधील आहे ' सार्जंट पेपर्स ..... ' प्रमाणेच . मला हे गाणे खूप आवडते . असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरुवातीच्या काळातील( १९६१-६२ ते १९६४-६५) बीटल्स ची गाणी हि साधी सोपी , तारुण्यसुलभ, गोग्गोड पण नव्या पध्धतीची कॅची प्रेम गाणी होती .. Silly love songs . त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीत ( म्हणजे महा युध्धकालीन ओझं घेतलेली , रेशन च्या दिवसांमधली , साधी व कडक आई बापाची पिढी आणि ह्या सगळ्याचं बॅगेज नको असलेली , व त्या बॅगेज ला वैतागलेली तरुण पिढी ) बीटल्स व त्यांचं ताजे संगीत आणि त्यांची माफकशी बंडखोर , माफकसे रॉक अँड रोल हे तरुण पिढीला अपीलिंग होणं हे अतिशय स्वाभाविक होतं . खूप लोकप्रिय अशी या काळातील खूप गाणी आहेत . पण मला जी रेप्रेसेंटेटिव्ह वाटली अशी चार गाणी इथे देतोय . जरूर ऐका :

१. Please Please me :

https://www.youtube.com/watch?v=Dt7znOx90Fk

२ She Loves You :

https://www.youtube.com/watch?v=BOuu88OwdK8

३ I Want to Hold Your Hand

https://www.youtube.com/watch?v=jenWdylTtzs

४. "I Saw Her Standing There"

https://www.youtube.com/watch?v=uZMQU4c1pEg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माझं आवडतं गाणं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे उत्तम आहेच . पण हे शेवटच्या अल्बम मधले .1969 मधल्या. त्याकडे येईनच नंतर . त्यांच्या स्वतःच्या ऑफिस च्या छतावर केलेले रेकॉर्डिंग . गातोय तो पॉल .बाकी नंतर लिहितो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0