अस्थिर स्वप्नांच्या नंतर

अस्थिर स्वप्नांच्या
नंतर होणाऱ्या सकाळी
घेऊन जायला येतात पावलांचे ठसे
त्यातून उगवते रात्र
जी होत गेेली पावलापावलागणिक
स्वरांचे असते नियंत्रण
वाहून गेलेल्या नदीवर
घरात फुटतात वाटा
आलेल्यांसाठी
दिव्यांचा उजेड सावल्यातही पडत नाही
अशी सकाळ येते पायऱ्या चढून
हळू हळू हळू हळू
रस्त्यांवरल्या अंधाराला ऊन म्हणून हाक देतो आपण
झाडांवरल्या पानांचा रंग विसरतो वारा
वाहतो शहराच्या पुलांवरून
पुलाला पालवी फुटत नाही
खिडक्या घेतात गिरक्या
कवडसे भिंतींना राखता येत नाही
माणसांचा गलका
जातो दूर डोळ्यापासून
पसरतो आवईसारखा चौकांच्या कानात
पाय ग्रासतात जमिनीने
पावसाच्या पाण्यात नसतात थेंब
असतो गालांवरला ओलावा
नसतं कोणी सकाळी
जेव्हा पहाटे दोन पावलं निघून गेली

© निनाद पवार

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कळली नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0