"अमेरिका द ब्युटिफुल"

एक मर्दानी, आक्रमक मेक्सिकन
गवत कापण्याच्या गाडीवर बसून गाडी
रिंग रिंग रिंग सर्वत्र फिरवीत असतो.
भिरभिरणारी सहा फुटी पाती बेडकांच्या , उंदरांच्या
पोटातून सफाईदारपणे जातात ,
व्हॅक्यूम होताना गवतावर
रक्ताचे थेम्ब उमटलेले दिसतात .
कॉर्पोरेट मैदानावर फिरताना कापलेल्या गवताचा
ताजा वास दरवळत रहातो.
अमेरिका रेखीव बनते .
मग सुंदर स्त्रिया येतात
नाजूक बोटांच्या चिमटीत
स्कर्ट उचलून
हिरवळीवर तरंगत फिरतात .
त्यांच्या ओठावरची लिपस्टिक
त्यांचे मॅचिंग लालचुटुक बूट
त्यांचे किणकिणणारे हास्य
नजर ठरत नाही.
---

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हिरवळीवर तरंगत फिरतात .

अमेरीकन स्त्रिया इतक्या हलक्या फुलक्या नसतात हो ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे न देखे रवी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दॅट इज मात्र ट्रू हां !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तुमच्या अशा अनेक कवितांमधे मला एक सुप्त कम्युनिस्ट जाणवतो. किंवा विद्रोही म्हणा फारतर, प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवणारा, त्यांच्याच देशात राहून.

तुमच्या बोधवाक्यावरुन सुचलेली नवी लाईनः कोणालाही उद्देशून नाही.
एक दिवस अमेरिकन बेडूक किंवा उंदीर होऊन जगण्यापेक्षा अनेक दिवस जगा भारतातल्या डबक्यांत वा धान्य-गोदामांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तुमचे निरीक्षण चुकीचे नाही . फक्त कम्युनिझमचे विसाव्या शतकात जे माकड असे स्वरूप केले गेले (कम्युनिस्टांकडूनच !) , त्यामुळे तो शब्द नकोसा वाटतो . "डावा" हा शब्द त्यामानाने बरा. आणि भारत किंवा अमेरिकेतही उच्चार-स्वातंत्र्य असल्यामुळेच मी असे बोलू-लिहू शकतो हे ऋणही मला मान्य आहे. तसेच सध्या जी भांडवली साम्राज्यशाही जगभर पसरत आहे त्यालाही सुयोग्य पर्याय दिसत नसल्यामुळे त्याविरुद्ध बोंब मारण्यातही फारसा अर्थ नाही असे मी मानतो . या सगळ्यातच (कधीतरी , चुकून) मानवाचाही विचार केला जाईल अशी माफकशी आशा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हे तुमचे निरीक्षण चुकीचे नाही . फक्त कम्युनिझमचे विसाव्या शतकात जे माकड असे स्वरूप केले गेले (कम्युनिस्टांकडूनच !) , त्यामुळे तो शब्द नकोसा वाटतो . "डावा" हा शब्द त्यामानाने बरा. आणि भारत किंवा अमेरिकेतही उच्चार-स्वातंत्र्य असल्यामुळेच मी असे बोलू-लिहू शकतो हे ऋणही मला मान्य आहे. तसेच सध्या जी भांडवली साम्राज्यशाही जगभर पसरत आहे त्यालाही सुयोग्य पर्याय दिसत नसल्यामुळे त्याविरुद्ध बोंब मारण्यातही फारसा अर्थ नाही असे मी मानतो . या सगळ्यातच (कधीतरी , चुकून) मानवाचाही विचार केला जाईल अशी माफकशी आशा आहे!

The God That Failed

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... त्यांच्याच देशात राहून.

'त्यांच्या' देशात राहून हे मला फारसं पटलं नाही. कागदोपत्री कुठलेही नागरिक असणं ही एक बाब आहे. पण वैध कागदपत्रं बाळगून एखाद्या देशात - त्यातही लोकशाहीत - राहणं, तिथे कर भरणं, ह्या गोष्टी काही वर्षं केल्यानंतरही त्या देशाला परका देश समजणं मला फारसं झेपत नाही. माझ्या ओळखीचे काही भारतीय, "इथे आपण कशा काय मागण्या करायच्या, त्यातून आपण इथले नाही", असं म्हणतात. मला तेही नीटसं समजत नाही. माणूस म्हणून सन्मानाने जगणं हा प्रत्येकाचा हक्क आहे; वैध कागदपत्रं घेऊन आलेल्यांना तर तसं बिनधास्त ठणकावून सांगता येतं अशी व्यवस्था अमेरिकेत, कोणत्याही प्रगत लोकशाहीत, असते. मग 'त्यांचा' देश का म्हणावं?

बाकी डावे/कम्युनिस्ट, विद्रोही, प्रस्थापितविरोधी विचार ह्याबद्दल सहमत. हे विचारही 'हिला के रख दूंगा' छाप नसतात; सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस म्हणून स्वतःच्या मर्यादा समजून लिहिलेलं असतं ह्याच्याशी सहमत. म्हणूनच मला पदकींच्या अशा कविता आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.