बखर - आम्रबरफीचा क्रूर सूड

कांदोजीची बखर
.
बखर राघोभरारीची
.
राणी विडिंबाबाईंची सखी मूळस्फूर्ती,चातुर्यकलिका,महामाया आम्रबरफी हीस श्री बल्लवाचार्य, राघो यांचे दरबारची बखर, दफ्तर क्र. ५२१ रुचते तरच महदाश्चर्य होते. कांदोजीचे बखरीतूनी विडिंबा बाईचा जो कवतिक, स्तुती चा सूर्य उदेला त्यासी राघोभरारी यांचे बखरीने बाण मारीला, ग्रहण लाविले, छिद्र पाडीले. हे आम्रबरफीस कैसे रुचावे. आम्रबरफीने तात्काळ मनाशी काही एक खूणगाठ बांधोनि विडिंबाबाईचे कर्णभरण करण्याचे, कर्णी विष ओतण्याचे योजिले. नक्षत्र पुष्य, वार बृहस्पतीवार, तीथी पौर्णिमा, दिसी तिने विडींबाबाईंशी कथिले - सखे तू तर रणरागिणी, गुणशालिनी, विदुषी, विडंबनासम्राज्ञी, फेमिनिष्ठ. तुझी कीर्ती दिगंत. परंतु या तर्कट स्वभावास विपरीत तुझे अन्य रुपही मोहक.तू मनाने, कोमल जैसे विकसित कमल, तुझे मानस अतिनिर्मळ धवल जैसे चंद्रम्याचे शुभ्र तेज कोंदाटून प्रभा फांकतसे चहुदिशी. तुज कैसी आकळावी राघोची कृष्णमती! लोटाभूषण राघो यासी तुझा मत्सर जाहला असे. पुरुषची तो, अपेक्षा तरी कशी करावी अन्य त्यांजकडोनी! स्त्रियांचे दमनाची व्यतिरिक्त त्यासी काय ठावे! मी काय सांगते ते सत्वर ध्यानी घेऊन त्यावरी अंमल करशील तर तरशील नही तो पस्तावणे व्यतिरिक्त अन्य मार्ग मज न दिसे. राघो तुज क्षती पोहोचविण्यास समर्थ होउनी बसे. तेलही गेले तूपही गेले करी राहिलासे धौपाट्या असे न व्हावे इतुकीचं माझे मनीची तळमळ." विडिंबाबाई महाचतुर, धूर्त राजकारणी पण फेमिनिष्ठही तितुकींच बरवी . करते काय स्त्रीच ती, जैसे पाणी उतारासी वाहावत जावोनि, समुद्राचिये लागी मिळते तितुकेच नैसर्गिक,कोमल स्त्रीमन - सखीचे शब्दाने वाहावत जाणे हाचि स्त्रीमनाचा गुणधर्म. विडिंबाबाई भय-आश्चर्य-नवलमिश्रित भावे पुसशी "आमरू ,मग कसे करावे ते सत्वर सांग आमुचे कानी.आम्ही या कानाचे त्या कानी न कळों देई. झणकरी उपाय शोध बाई."
.
मग आम्रबरफी मनाशी काही एक योजोनि राणीचे कर्णी कुजबुजीतसे, जे बखरकर्त्यास कसे असावे ठावे? राणी खूश होवोनि गळ्यातील मौक्तिकहार आम्रबरफीस देऊ करे परंतु स्वाभिमानी, महत्वाकांक्षी आम्रबरफी विनयेन तो न स्वीकारे इतुकेच नाही तर ती राणीस वदे - "योग्य समयी आम्ही यथोचित मागणी करुनी हा मान प्राप्त करून घेऊ. विडिंबे, मात्र हे तुझे ध्यानी सदा राहो."
.
श्रोतेहो,काय उपमा द्यावी आम्रबरफीस, कैकेयी की मंथरा हे बखरकर्त्यास नकळे. स्त्रियश्चरित्रं, पुरुषस्य भाग्यम .... असो.
.
मग असेच काही पक्ष लोटिले. विदेश्वर राघो निश्चित मनाने नाट्यशाळा , नृत्यादीक कलासक्त होओनी गाफील, बेखबर विलासमग्न होओनी कैफात काळ कंठे. मनात स्वतः:चे स्वतः:वरच अतिअनुरक्त की कसे खवचट खान गारदीस गारद केले. परंतु जेहत्ते काळाचे मनी काय हे भल्याभल्यासी नाकळले ते मर्त्य राघोने कैसे जाणावे. इकडे विडींबाराणीने खवचटाखानासी हस्ती धरोनी महायुद्धाची सज्जता लाविली. आणि काही मासांतच अतोनात घोर संग्राम होणे घातले. असो ते पुढे कधीतरी.
.
आता श्रोतेहो, वाचकहो तुम्हांसी प्रश्न पडिला आम्रबरफीचा राघोवारी दंत का? राघोचा काय अपराध जेकी बरफी मातली, पातली, राणीच्या कर्णी लागली? तर ऐका श्रोतेहो, प्रकांडविदापंडित राघो यासी सुलभ आलेखनिर्मिती न साधे केवळ एकाची कारणे कि आम्रबरफी नानाविध आय डी ने संस्थानी प्रवेशितसे. बहुधागे सामान्य प्रसवुनीही आलेखी ती कधी न सापडे कारण एकचि - प्रत्येक 2 दिसांमाजी एक आय डी, प्रत्येक २ दिसांमाजी नूतन आय डी, बॅन्डविड्थ ची ना पर्वा ना सोयरसुतक संस्थानाने दिधल्या सुविधेचे. मग राघोस आडून आडून टोमणे माराणेव्यतिरिक्त काय उपाय शेष राही तुम्हीच सांगा श्रोतयेहो. या टोमण्यांनी जेरीस येऊन ती हा क्रूर खेळ खेळीतसे. अपुले ठायी सुधारणा शून्य, "तस्कर उलटोनी कोतवालास पृच्छा करे जसा काही"
.
परंतु बरफीचे कृष्णकारस्थान विजयी जाहले अथवा नाही ते पुन्हा: कधीतरी निश्चित कथेन हे बखरकर्त्याचे वचन श्रोतयांसी, संतसज्जनांसी असे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

राघो तुज पूर्णपणे ओळखोनि आहेत हे ध्यानी असू दे, आम्रबर्फिके. उन्हाळ्यात सुमधूर ताजा हाप्पुस आम्र जिव्हेस रसाळ लागणारा असतो. मात्र ग्रीष्माची चाहूल लागतां ते फळ कोठे मिळायचे? तीच गोडी चाखण्यासाठी त्यांस आपले रूप बदलोन, खवातुपादी पदार्थांशी संगनमत करोन यावे लागते. तैसेच येथेही घडते हे राघोंस पूर्णपणे ठावे असल्यामुळे ते पळे, घटिका, दीस, मास प्रतीक्षा करण्यात मग्न आहेत. आपले हेरऐयार मात्र तिजवर लक्ष ठेववोन, तिचे रूप कसकसे बदलते हे तीक्ष्ण नजरेने पाहात आहेत.

तूर्तास येवढेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी लेट करंट सरदारजी आहे
मला आत्ता कुठेशी कळल यातला "राघो" म्हणजे
राजेश घासकडवी
आहे.
आता यानंतर वरील घासकडवी यांच्या या वाक्याचा गहन अर्थ लागत जातो....
राघो तुज पूर्णपणे ओळखोनि आहेत हे ध्यानी असू दे, आम्रबर्फिके.

यानंतर या ओळी काळजीपुर्वक पुन्हा वाचा

आपले हेरऐयार मात्र तिजवर लक्ष ठेववोन, तिचे रूप कसकसे बदलते हे तीक्ष्ण नजरेने पाहात आहेत.

ध्यान से देखो
यही है वो आदमी
रा जे श घा स क ड वी
सन्नाटे को दुसरी बार चिरती हुई सनसनी सुन कर देती है दिमाग को.
चैन से समझना है
तो जाग जाओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

अस जुन्या बखरच्या शैलीत वाचायला मजा येते.
पण लिहायला किती कठीण असेल.
प्रतिसाद पण भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

बफ्फी.
मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आतील गोटातील मनसबदार-सरदार-दरकदार ह्यांच्या मनीचा गुप्त अर्थ आणि मसलत आम्हा बाजरबुणगियांस कशी कळणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रीयुत कोल्हटकर यांजप्रती, सा.न.वि.वि.
लेखाचे ऊपरी संदर्भद्विपदी पाहणेचे अगत्य करावे. द्विपदीवरती मूषकनृत्य करिता काहीएक धागे उघडिता यावे ज्यांचे अभ्यास करोनि हे सहजचि आकळों यावे हेच की आम्रबरफीचा अंतस्थ हेतू तसूभरही गंभीर नसे. मनोरंजनात्मक मौल्यवान साहित्य प्रसववेणा लागिल्या असता असे शुद्ध आणि परम औथल्यपूर्ण लेखन सहजसाध्य व्हावे. कृपा करोनि मनी यत्किंचितही किंतु न धरिता, अढळ बुद्धी-निष्ठायुक्त अंत:करणे ,साहित्यानंदसेवन करोनि तृप्त व्हावे.
येथे सर्वची सरदार दरकार ; कोणीही नसे बाजारबुणगे. ज्याने त्याने विशुद्ध साहित्यामकरंद सेवन करावे, करो घालावे.

कळावे लोभ असावा,
- सौभाग्यवती, वज्रचूडेमंडीत, मंथरेसम अतिकुटील राजनीतीज्ञ आम्रबर्फी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झक्कास.

(स्वतःचं कपोलकल्पित वर्णन वाचून आणखी मजा आली.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला (पुण्यातल्या चितळ्यांची ) आंबाबर्फी फार आवडते.
--- आणि ती अशी मंथरेसारखी कटकारस्थाने करून रामायण घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे वाचून, मनास यातना झाल्या.

बखरीतील यापुढील रुमाल फडकणार, प्रदर्शित, प्रकाशित होणार आहे का?

पुढील घटनाक्रम जाणुन घेण्यास उत्सुक ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
विवेकाची ठरेल ओल - ऐसे की बोलावे बोल |
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे ||