रात्ररात्रभराची ही जागरणं

रात्ररात्रभराची ही जागरणं

नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय

अस्वस्थ मनाचं उनाड वागणं ...

स्वतःलाच पुन्हा पुन्हा काहीतरी मागणं...

चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ...

आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ...

चांदण्यांनी माझ्या नकळत हिरावून घेतलेली माझी झोप ...

आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ...

घेऊन जा ...

खूप वाढलंय

आणि दिवसेंदिवस अधिकाधिक

वाढतंच चाललय हे ...

रात्ररात्रभराची ही जागरणं ..

नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय .

- गजानन मुळे

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

कविता आवडली. विशेष करून

चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ...
आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ...

आसपास घुटमळणाऱ्या पोकळीतून ही सय सतत सतावते, हे छान सांगितलं आहे.

शेवटच्या ओळींबद्दल मला स्वतःला एक तुटकपणा वाटला. शेवटच्या दोन ओळी या पहिल्या दोनच पुन्हा आलेल्या आहेत, पण त्या आधीच्या कवितेला पुरेशा नीट जोडल्या गेल्या नाहीत असं वाटलं.

उदाहरणार्थ, असं काही केलं तर...?

खूप वाढलंय
आणि दिवसेंदिवस अधिकाधिक
वाढतंच चाललय हे ...
आणि वाढत आहेत
रात्ररात्रभराची ही जागरणं ..
नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय .

राजेशजी दोन ओळींपुर्वी थोडा पॉज ....मग पहा शब्दांची जादू.....

ऐसी अक्षरेवर स्वागत.

कविता आवडली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शीर्षक वाचून आयटी क्षेत्राच्या संदर्भात कविता असल्याचा अंदाज होता
तो चुकला

कविता आवडली.

.

धन्यवाद सर्वांचे ...राजेशजी .....शेवटच्या दोन ओळींपुर्वी थोडा पॉज हवा .....मग शब्दांची जादू बरोबर दिसेल....

आधी पहिल्या चारेक कविता 'यमक्या' वाटली होती.. मात्र हळूच सांधा बदलला.. आणि वाचुन संपली तेव्हा आवडली होती! Smile
छान कविता.. ऐसीअक्षरेवर स्वागत! येऊ द्यात काहितरी अजून सकस!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाव वाचून वाटलं लावणी असेल.
पण भलतंच निघालं.
आम्हीच मठ्ठ.
असो.

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ...
घेऊन जा ...

वा! छानच कल्पना आहे.

मस्त!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कविता आवडली. त्यातही
चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ...
आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ...

या दोन ओळी विशेष आवडल्या. लिहित रहा.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !