इस्रायलकडून भारताने धडे गिरवावेत का?
आज इस्रायल ने धरून हमास (पॅलेस्टिनी दहशतवादी गट) ला ठोकून काढलेले आहे.
इस्रायल अजिबात दयामाया न बाळगता निर्दय पणे ठोकून काढतो ... पॅलेस्टिनींना. दोन वर्षांपूर्वी तर इस्रायली हवाई दलाने आपल्या नागरिकांना आधी सूचना दिली की आम्ही पॅलेस्टाईन वर हल्ला करणार आहे. त्यानंतर लगेच इस्रायली लोक गेले व बियर वगैरे घेऊन आले. नंतर शांत पणे खुर्च्या टाकून बियर पीत त्यांच्या हवाईदलाने पॅलेस्टाईन वर केलेले हल्ले बियर चे घुटके घेत घेत बघत बसले होते.
असं पायजे.
भारतीय नागरिकांना शांतपणे बसून पाकिस्तानवरचे हल्ले बघता यायला हवेत. निर्दयपणा शिकायला हवा आपल्याला. पॅलेस्टाईन ची दैना दैना करून टाकलीये इस्रायलने. अर्थात पॅलेस्टिनी लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यात पटाईत आहेत तो भाग निराळा.
(रोचक चर्चेमुळे धागा वेगळा काढला आहे. - संपादक)
शुचि - मी ( आणि होपफुली
शुचि -
मी ( आणि होपफुली गब्बर ) सज्जन, सभ्य, कष्टाळु, हुशार लोकांच्या बाजुची असते. इस्त्राइल आणि ज्यु लोक ह्या कॅटेगरीत बसतात म्हणुन मी इस्त्राइल च्या बाजुची असते. ह्याच कॅटेगरीत गोरे क्रिस्चन/नास्तिक पण बसतात म्हणुन मी युरोप अमेरीकेच्या बाजुची असते.
पॅलेस्टाइन लोकांनी स्वताला आमुलाग्र बदलले आणि ते चांगले झाले तर मी त्यांच्यापण बाजुची होइन. खरच पॅलेस्टाइन लोक वर उल्लेख केलाय तसे चांगले झाले तर इस्त्राइल ला पण पॅलेस्टाइन वर बॉम्ब टाकावे लागणार नाहीत.
जगातल्या वाइट लोकांनी सज्जन झाले तर भारताचे भले च आहे ना. आणि जर ते सज्जन होत नसतील तर त्यांना ठोकुन काढणार्यांना पाठींबा देण्यात पण भारताचे लॉंग टर्म मधे भलेच आहे ना.
ता.क. मला चिनी लोक पण आवडतात थोडीफार.
इस्राएलने पॅलेस्टिनी अरबांची भूमी हिंसेने बळकावली आहे !
इस्राएलने पॅलेस्टिनी अरबांची भूमी हिंसेने, अन्यायाने बळकावली आहे हे आता इस्राएल (आणि थोडेफार अमेरिकन) सोडता सर्व जगास मान्य आहे . काँझर्व्हेटिव्ह ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा तसा ठराव नुकताच पास केला होता . तसेच युनोच्या आम-सभेनेही ! तेंव्हा पॅलेस्टिनींनी "चांगले" व्हायचे म्हणजे नक्की काय व्हायचे हेही एकदा स्पष्ट झाले पाहिजे . तुमच्या घरात बळाने ज्यू घुसले व त्यांनी तुम्हाला निर्वासित केले तर तुम्ही नक्की काय कराल?
पण अनु गब्बर आणि तू नेहमी
पण अनु गब्बर आणि तू नेहमी इझ्रायअलच्या बाजूने बोलता यात नक्की भारताचा व्हेस्टेड इन्टरेस्ट काय आहे? म्हणजे जर इझ्रायल जिंकले तर भारतावरती काय परीणाम होतो? का फक्त पॅलेस्टिनी मुस्लीम राष्ट्र आहे म्हणुन? तुला हे अवांतर वाटत असेल तर खव/व्यनि आहेतच.
मुसलमानांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस मधे दहशतवाद येतो.
मुस्लिमेतरांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस मधे प्रजातंत्र, तंत्रज्ञान, तयारी/सराव, विचार करणे, सेन्स ऑफ प्रपोर्शन वगैरे येते.
भारताचा व्हेस्टेड इंट्रेष्ट हा की हमास, हिझबुल्लाह, इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटनांपासून पाकी संघटना प्रेरणा घेतात. भारताने इस्रायल कडून घ्यावी.
What works !!! - याकडे भारताने लक्ष द्यावे. सेक्युलरिझम च्या लंब्यालंब्या बाता मारण्यापेक्षा.
भारताचा व्हेस्टेड इंट्रेष्ट
भारताचा व्हेस्टेड इंट्रेष्ट हा की हमास, हिझबुल्लाह, इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटनांपासून पाकी संघटना प्रेरणा घेतात. भारताने इस्रायल कडून घ्यावी.
यस.
इतकुसा देश असून वर्षानुवर्षे त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलंय. इतकंच काय तर बरेच देश (including india) त्यांचाकडून weapons import करतात. israel is a benchmark for India when it comes to fighting terrorism.
लोक इस्रायलचं इतकं कौतुक का
लोक इस्रायलचं इतकं कौतुक का करत असतात कळत नाही. अमेरिका त्यांना गेली अनेक वर्षं दरवर्षी ३ बिलियन डॉलर देते. (अमेरिकेच्या एकूण जगाला केलेल्या मदतीच्या एक तृतियांश!) त्यांची लोकसंख्या आहे ८०लाख. म्हणजे दरडोई हिशोब केला तर दरवर्षी पाचशे डॉलर. भारताला तितकीच दरडोई मदत मिळायची झाली तर सहाशे बिलियन डॉलर होतील. दर वर्षी! दशकानुदशकं जर इतके पैसे फुकट मिळाले तर कोणीही महासत्ता होईल. इतक्याशा पॅलेस्टाइनला त्यांना अजून संपवता आलं नाहीये हे तर खरं त्यांचं अपयश म्हणायला हवं.
त्यात त्याला अमेरिकेकडून एवढे
त्यात त्याला अमेरिकेकडून एवढे पैसे मिळतात. तरी त्याला या क्षुद्र चिलटाला मारता येत नाही.
क्षुद्र चिलिटाला मारण्यापेक्षा क्रूरपणे हळूहळू, बराच काळ छळणे जास्त न्याय्य आहे.
तसंच बघितलं तर अमेरिकेने क्युबा कधीच संपवायला हवा होता - असं तुम्ही (किंवा इतर कुणी) म्हणू शकाल. क्युबा अमेरिकेच्या मानाने फडतूसांमधले फडतूस आहे... पण ...
(गब्बर मोड सुरू)
दरवर्षी जीडीपीच्या १% रक्कम अमेरिका किंवा कोणाकडूनही फुकट मिळत असेल तर त्या फुकट पैशांचा जीडीपीत किती हातभार असेल? त्यामुळे इस्रायलचं जीडीपी गेल्या साठ वर्षांत किती फुगलं असेल! साधारण गेली १०० वर्षं इस्रायल किंवा त्या भागातल्या ज्यू लोकांना तत्कालीन जागतिक महासत्तांकडून फूस आणि पैसा मिळत आहे. एवढा पैसा ओतूनही त्यांना पॅलेस्टाईनला संपवता येत नसेल तर इस्रायलच फडतूस आहे.
इस्रायलचा आकार पॅलेस्टाईनच्या (सध्या) साडेतीनपट मोठा आहे; दोन वर्षांनी चौपटही असेल. तरीही संपवू नाही शकत. डफ्फर कुठले!!
वर पुन्हा इस्रायली आणि पॅलेस्टीनी अरब कलाकार-तंत्रज्ञ एकत्र येऊन इस्रायली युद्धखोरीविरोधी सिनेमे बनवतात; त्यांचा जगभर सन्मान होतो. एवढंसुद्धा थांबवता येत नाही इस्रायलला! डब्बल फडतूस इस्रायल.
पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलमध्ये शिरून, तिथे बाँब लावून, आपल्या एरीयातून मिसाईलं डागून इस्रायलला त्रास देणं योग्यच आहे. अमेरिकन करदात्यांच्या जीवावर उड्या मारणाऱ्या, फुकट्या, फडतुसांना जगण्याचा काही हक्क नाही. खरंतर पॅलेस्टिनी लोक अमेरिकन भांडवलशहांचे सच्चे सोयरे आहेत.
(गब्बर मोड बंद)
इस्रायलचा आकार पॅलेस्टाईनच्या
इस्रायलचा आकार पॅलेस्टाईनच्या (सध्या) साडेतीनपट मोठा आहे; दोन वर्षांनी चौपटही असेल. तरीही संपवू नाही शकत. डफ्फर कुठले!!
पाकिस्तान भारतापेक्षा लहान आहे. आणि संपूर्ण भारतात अधून-मधून आणि काश्मीरमध्ये सातत्याने पाकिस्तान दहशतवाद पसरवतो आहे. वरील लॉजिक लावून भारताबद्दल आपले मत काय?
दरवर्षी जीडीपीच्या १% रक्कम
दरवर्षी जीडीपीच्या १% रक्कम अमेरिका किंवा कोणाकडूनही फुकट मिळत असेल तर त्या फुकट पैशांचा जीडीपीत किती हातभार असेल? त्यामुळे इस्रायलचं जीडीपी गेल्या साठ वर्षांत किती फुगलं असेल! साधारण गेली १०० वर्षं इस्रायल किंवा त्या भागातल्या ज्यू लोकांना तत्कालीन जागतिक महासत्तांकडून फूस आणि पैसा मिळत आहे. एवढा पैसा ओतूनही त्यांना पॅलेस्टाईनला संपवता येत नसेल तर इस्रायलच फडतूस आहे.
इस्रायलचा आकार पॅलेस्टाईनच्या (सध्या) साडेतीनपट मोठा आहे; दोन वर्षांनी चौपटही असेल. तरीही संपवू नाही शकत. डफ्फर कुठले!!
वर पुन्हा इस्रायली आणि पॅलेस्टीनी अरब कलाकार-तंत्रज्ञ एकत्र येऊन इस्रायली युद्धखोरीविरोधी सिनेमे बनवतात; त्यांचा जगभर सन्मान होतो. एवढंसुद्धा थांबवता येत नाही इस्रायलला! डब्बल फडतूस इस्रायल.
पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलमध्ये शिरून, तिथे बाँब लावून, आपल्या एरीयातून मिसाईलं डागून इस्रायलला त्रास देणं योग्यच आहे. अमेरिकन करदात्यांच्या जीवावर उड्या मारणाऱ्या, फुकट्या, फडतुसांना जगण्याचा काही हक्क नाही. खरंतर पॅलेस्टिनी लोक अमेरिकन भांडवलशहांचे सच्चे सोयरे आहेत.
हास्यास्पद लिहायचा विडा च उचललायत का तुम्ही ?
पॅलेस्टाईन हे मान्यताप्राप्त राष्ट्र सुद्धा नाही. इस्रायलने त्यांची ओळखच निर्माण व्हायच्या आधी मारून टाकलेली आहे. इस्रायल इतका पॉवरफुल्ल आहे की पॅलेस्टाईन ला जन्माआधीच ठोकलेले आहे.
पुरावा इथे -
(१) http://www.un.org/en/member-states/
(२) http://www.un.org/ga/search/view_doc.asp?symbol=A/RES/67/19
याउलट इस्रायलची स्थापना संयुक्त राष्ट्रानेच स्वतः केली होती. केवळ या एका मुद्द्याच्या आधारावर पॅलेस्टाईन हा फडतूसांचा सम्राट मानला जाऊ शकेल. इस्रायल स्थापन होऊन अनेक दशकं लोटली तरी पॅलेस्टाईन चे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व संयुक्त राष्ट्राने मान्य केलेले नाही. ऑब्झर्व्हर एंटीटी असं काहीसं स्थान आहे त्यांचं. व ते सुद्धा २०१२ मधे मिळालेलं.
>>याउलट इस्रायलची स्थापना
>>याउलट इस्रायलची स्थापना संयुक्त राष्ट्रानेच स्वतः केली होती. केवळ या एका मुद्द्याच्या आधारावर पॅलेस्टाईन हा फडतूसांचा सम्राट मानला जाऊ शकेल.
हे गब्बर म्हणतोय?
दोन टाळक्यांनी ठरवायचं की तिसर्याकडून हिसकावून घेऊन चौथ्याला द्यायचं.....
आणि गब्बर या बेसिसवर ज्याच्याकडून हिसकावून घेतलं त्याला फडतूस म्हणतोय?
हे गब्बर म्हणतोय? दोन
हे गब्बर म्हणतोय?
दोन टाळक्यांनी ठरवायचं की तिसर्याकडून हिसकावून घेऊन चौथ्याला द्यायचं.....
आणि गब्बर या बेसिसवर ज्याच्याकडून हिसकावून घेतलं त्याला फडतूस म्हणतोय?
त्यावेळी तर पॅलेस्टाईन ला हे करणं अधिक शक्य/सोपं असायला पायजे होतं. किमान इस्रायलची स्थापना झाल्यानंतर तरी. त्यावेळी सोव्हिएत युनियन अस्तित्वात होती (समाजवादाची काशी). नुसती अस्तित्वातच नव्हती तर जवळपास ३० वर्षं झाली होती बोल्शेव्हिक क्रांती होऊन. बोल्शेव्हिक क्रांती ही A and B deciding what C should do for D या सेंट्रल प्लॅनिंग च्या तत्वावरच आधारलेली होती की.
मग पॅलेस्टाईन ला का जमलं नाही हे करायला (वातावरण अतिपोषक असतानासुद्धा) ??
इस्राएल जन्मकहाणी
थत्ते चाचा , तुम्ही कमीत कमी शब्दात* इस्राएल जन्माची कहाणी मांडली आहे . पण असे उपहासाने लिहिण्याऐवजी इस्राएल कसे अस्तित्वात आले , त्यातील विरोधाभास , लबाड्या , स्वार्थ वगैरे पैलूंवर जरा डिटेल लिहाल का ?
आपल्या इथे इस्राएल बद्दल फारशी माहिती नाही , जी आहे ती वेगळ्या , आणि अर्धवट पध्धतीने मांडली गेली आहे ( असे वाटते )
( त्याने इस्राएल प्रेमी लोकांवर फार परिणाम होईल असे नाही . कारण त्यांचे पॅरामीटर्स वेगळे असावेत , पण निदान उरलेल्यांचे तरी प्रबोधन होईल )
{* एकारान्त ना तुम्ही , कमीत कमी शब्दातच मांडणार ..... हळू घ्या }
याउलट इस्रायलची स्थापना
याउलट इस्रायलची स्थापना संयुक्त राष्ट्रानेच स्वतः केली होती.
आयला, म्हणजे हे आख्खं राष्ट्रच सेंट्रली प्लॅन्ड आहे तर!
माझा मुद्दा पॅलेस्टाइन फडतूस आहे की नाही हा नाहीच्चे. पॅलेस्टाइन आहेच फडतूस. पण या इस्राएलला या फडतूस चिलटाकडून इतकी दशकं आपले नागरिक मारले गेलेले पाहावे लागतात. म्हणजे इस्राएलच फडतूस.
माझा थोडक्यात मुद्दा असा आहे की अतिरेकी, दहशतवादी हल्ल्यांपासून इस्राएलपेक्षा भारताने आपल्या जनतेचं अधिक चांगल्या प्रमाणात रक्षण केलेलं आहे. या मुद्द्याला बगल देऊन इतर चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
चिलटाला मारणं जमत नसलं की
चिलटाला मारणं जमत नसलं की असली काहीतरी कारणं द्यायची.... भारताने शांतपणे पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि त्यांचा बोऱ्या वाजवून ठेवला. इस्राएलने अजून तो प्रश्न चिघळत ठेवलेला आहे. आपले नागरिक मोठ्या प्रमाणावर मरू देत पण आम्ही दशकानुदशकं हळूहळू मारणार म्हणे! झेपत नाहीत तर मारामाऱ्या कशाला कराव्यात? त्यापेक्षा आपण फडतूस आहोत हे कबूल करावं इस्रायलने.
चिलटाला मारणं जमत नसलं की
चिलटाला मारणं जमत नसलं की असली काहीतरी कारणं द्यायची.... भारताने शांतपणे पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि त्यांचा बोऱ्या वाजवून ठेवला. इस्राएलने अजून तो प्रश्न चिघळत ठेवलेला आहे. आपले नागरिक मोठ्या प्रमाणावर मरू देत पण आम्ही दशकानुदशकं हळूहळू मारणार म्हणे! झेपत नाहीत तर मारामाऱ्या कशाला कराव्यात? त्यापेक्षा आपण फडतूस आहोत हे कबूल करावं इस्रायलने.
हॅहॅहॅ.
मारून न टाकणे हा सुद्धा एक परार्थवादाचा प्रकार का गृहित धरला जाऊ नये ? जसं अनेक श्रीमंत/कॅपिटलिस्ट्स (पोस्ट टॅक्स प्राप्तीनंतर) स्वयंसेवी संस्थांना देणग्या देतात तसं.
-----
इस्रायल ची तुलना इजिप्त बरोबर करा ना. ते दोघे शेजारीशेजारी असलेली राष्ट्रे आहेत. भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर ते दोघे जास्त कंपेरेबल आहेत. खालील प्यारा पहा -
Following the peace treaty with Israel, between 1979 and 2003, the U.S. has provided Egypt with about $19 billion in military aid, making Egypt the second largest non-NATO recipient of U.S. military aid after Israel. Also, Egypt received about $30 billion in economic aid within the same time frame. In 2009, the U.S. provided a military assistance of US$1.3 billion (inflation adjusted US$ 1.43 billion in 2016), and an economic assistance of US$250 million (inflation adjusted US$ 275.7 million in 2016).[4] In 1989 both Egypt and Israel became a Major non-NATO ally of the United States.
आणि इथे पण पहा - http://www.bbc.com/news/world-middle-east-16949846
इथे सुद्धा - http://www.bbc.com/news/world-middle-east-27961933
आता इस्रायल व इजिप्त ची तुलना करा. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत.
तुलना इथे (दुवा) - https://www.google.com/publicdata/explore?ds=d5bncppjof8f9_&ctype=l&str…
तुलना इथे -
इस्राएलची तुलना इजिप्तशी
इस्राएलची तुलना इजिप्तशी करण्यात मला काहीही रस नाही. मला जे लोक दिसतात ते 'भारताने इस्राएलसारखं वागावं' असं म्हणणारे असतात. त्यांच्याशी बोलताना मी 'पण आधी ते इजिप्तवाल्यांना सांगा की' असं म्हणत नाही. ती तुलना 'ऐसी हायरोग्लिफे'वर इजिप्शियनांनी करावी.
माझं म्हणणं असं आहे की अतिरेकी व दहशतवादी हल्ल्यांपासून भारताने आपल्या जनतेचं रक्षण इस्राएलपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हे विधान तुम्हाला मान्य आहे की नाही ते सांगा.
माझं म्हणणं असं आहे की
माझं म्हणणं असं आहे की अतिरेकी व दहशतवादी हल्ल्यांपासून भारताने आपल्या जनतेचं रक्षण इस्राएलपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हे विधान तुम्हाला मान्य आहे की नाही ते सांगा.
कसं ते विशद करा मग सांगतो.
मला अजून तरी असं वाटलेलं, जाणवलेलं नैय्ये.
---
इजिप्त चा मुद्दा का आला ते पुन्हा सांगतो. अमेरिकन आर्थिक मदत हा फॅक्टर आणला गेला म्हणून मी इजिप्त चे उदाहरण दिले.
इतरत्र प्रतिसादांत मी
इतरत्र प्रतिसादांत मी आकडेवारी आणि संदर्भ दिलेले आहेत. थोडक्यात, दहशतवादामुळे इस्राएलची माणसं भारतातल्या माणसांपेक्षा सुमारे दहापटीने मरतात. आणि दरडोई खर्चही भारत इस्राएलपेक्षा कमी करतो. मग या निकषांवर भारत इस्राएलपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतो हे म्हणता येईल का?
थोडक्यात, दहशतवादामुळे
थोडक्यात, दहशतवादामुळे इस्राएलची माणसं भारतातल्या माणसांपेक्षा सुमारे दहापटीने मरतात.
हे असत्य आहे.
(१) This chart shows every person killed in the Israel-Palestine conflict since 2000
(३) Deaths in the Conflict, 1987-2014 - हा सगळ्यात जास्त रिलेव्हंट पिरियड आहे. काश्मिर मधला दहशतवाद १९८९ च्या आसपास सुरु झाला.
--
आता ही आकडेवारी काश्मिर मधल्या दहशतवादाशी तुलना करता खूप कमी आहे. http://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/data_sheets/…
इथे सरकारी आकडेवारी आहे - http://timesofindia.indiatimes.com/india/State-data-refutes-claim-of-1-…
अहो, तुम्ही रॉ आकडे घेताहात.
अहो, तुम्ही रॉ आकडे घेताहात. टक्केवारी पाहा. भारताची लोकसंख्या दीडशेपट आहे. आणि सिव्हिलियन मृत्यूंचं प्रमाण फक्त दहा ते पंधरापट आहे. म्हणून भारत आपल्या जनतेचं जास्त चांगल्या प्रकारे रक्षण करतो.
मुद्दा लक्षणीय आहे. आकडेवारी/टक्केवारी लक्षात घ्यायची तर दोघांच्या शत्रूंची सुद्धा घ्यावी लागेलच. तसेच मुख्यत्वे काश्मिर ची लोकसंख्या लक्षात घेणे जास्त रिलेव्हंट ठरेल. कारण पाकी पुरस्कृत दहशतवाद हा इतर राज्यात कमी व काश्मिर मधे जास्त आहे. इतर राज्यांत दहशतवाद घडवणारे इंडियन मुजाहिद्देन व इतर होमग्रोन दहशतवादी पण आहेत. व तरीही तुमचा मुद्दा लक्षणीय आहे. कारण इस्रायल चा काश्मिर शी पॅरलल शोधावा लागेल. इस्रायल विरोधी दहशतवादी कारवाया ह्या मुख्यत्वे तेल अवीव, जेरुसलेम मधे (उत्तर व मध्य इस्रायल) होतात असा माझा समज आहे. इतरत्र (दक्षिण इस्रायल मधे) कमी.
इस्रायल च्या शत्रू चे स्पेसिफिक उदा देतो -
पॅलेस्टाईन (PLO, IJ, HAMAS) हा इस्रायलचा एकच शत्रू नाही. हिझबुल्लाह सुद्धा इस्रायलविरोधी दहशतवादी कारवाया करतो. व लेबॅनॉन मधून आपल्या कारवाया करतो. लेबॅनॉन ची लोकसंख्या सुद्धा विचारात घ्यावी लागेल. हे फाटे फोडणे नसून रिलेव्हंट शत्रूंचा संच फॅक्टर इन करणे आहे. भारताला पाकिस्तान सोडल्यास असा कोणताही मोठा शत्रू नाही की जो भारतात दहशतवादी कारवाया करतो. चीन हा शत्रू आहे पण दहशतवादी कारवाया करतो असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. माओइस्ट/नक्षलवाद्यांचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो पण तो कंपॅरेबल नाही.
लक्षणीय? अहो, हाच मुद्दा आहे.
लक्षणीय? अहो, हाच मुद्दा आहे. बाकी तुम्ही मांडलेले मुद्दे पोकळ आहेत.
इस्रायलला शत्रू खूप आहेत म्हणून बिच्चाऱ्या इस्राएलचे नागरिक जास्त मरतात - आपल्या देशाला किती शत्रू ठेवायचे, त्यांना कसं मॅनेज करायचं हे इस्राएलला जमलेलं नाही.
भारतातला दहशतवाद फक्त काश्मीरमध्येच आहे म्हणून काश्मीरची लोकसंख्या लक्षात घ्या - तो दहशतवाद फक्त काश्मीरमध्येच आहे हे पाकिस्तानचे उपकार आहेत का? तो देशभर पसरू दिला नाही हे भारताचं यश आहे.
वरचे युक्तिवाद कसे वाटतात सांगतो. दोन माणसं, एकाच वेळी जन्माला आलेली - एक श्रीमंत आहे, एक गरीब आहे. कोणीतरी उठून म्हणतं की 'पैसे कसे मिळवायचे हे या श्रीमंताने या गरीबाकडून शिकायला हवं.' त्यावर श्रीमंत कोण आणि गरीब कोण हे दाखवून दिल्यावर म्हणायचं की 'हो, तो गरीब आहे पण त्याचं कारण म्हणजे त्याला बारा मुलं आहेत. मग पैसा खर्च होणारच ना. या श्रीमंत माणसाला एकच मूल आहे.' ऐपत नव्हती तर सांगितली होती कोणी पोरं काढायला?
(श्रीमंती = चांगलं टेररिस्ट मॅनेजमेंट = भारत
गरीबी = वाईट टेररिस्ट मॅनेजमेंट = इस्राएल)
गरीबाला गरीब म्हणा. फडतुसाला फडतूस म्हणा, कारणं नका देऊ. भारत इस्राएलच्या दहापट चांगली कामगिरी करतो आहे. इस्राएलकडून भारताने काहीतरी शिकावं म्हणणं थांबवा.
गरीबाला गरीब म्हणा. फडतुसाला
गरीबाला गरीब म्हणा. फडतुसाला फडतूस म्हणा
पटलं.
--
भारतातला दहशतवाद फक्त काश्मीरमध्येच आहे म्हणून काश्मीरची लोकसंख्या लक्षात घ्या - तो दहशतवाद फक्त काश्मीरमध्येच आहे हे पाकिस्तानचे उपकार आहेत का? तो देशभर पसरू दिला नाही हे भारताचं यश आहे.
नाय पटलं.
इस्रायलने सुद्धा आपल्या दक्षिण भागात (उदा. इलात) दहशतवादाचे लोण पसरून दिलेले नाही. हे इस्रायलचे यश आहे.
----
इस्रायलला शत्रू खूप आहेत म्हणून बिच्चाऱ्या इस्राएलचे नागरिक जास्त मरतात - आपल्या देशाला किती शत्रू ठेवायचे, त्यांना कसं मॅनेज करायचं हे इस्राएलला जमलेलं नाही.
अजिबात नाय पटलं.
-----
इस्रायल ने आपल्या शत्रूकडे अण्वस्त्रे नसायला पायजेत यासाठी जे यत्न केले ते पण लक्षात घ्या. ऑपरेशन ऑपेरा, ऑपरेशन ऑर्कर्ड यांकडे लक्ष द्या. ही दोन्ही महत्वाची आहेत. इराणकडे अण्वस्त्रे येऊ नयेत म्हणून इस्रायलने प्रचंड यत्न केलेले आहेत. ते पाकिस्तानच्या बाबतीत भारत करू शकला नाही. याचा रिलेव्हन्स, इंपॉर्टन्स वेगळा लिहायलाच हवा का ?
भारताचा आकार व लोकसंख्या ही लक्षात घेता पाकिस्तानला चिरडणे भारताला सहज शक्य व्हायला हवे होते. इस्रायल ची लोकसंख्या एक कोटी सुद्धा नाही. सगळी अरब राष्ट्रे त्यांच्या विरुद्ध आहेत. व नॉन अरब राष्ट्रे (उदा. इराण) सुद्धा. त्यातल्या अनेक अरब देशांकडे खूप पैसा सुद्धा आहे. १८६७ व १९७३ मधे इस्रायल वर अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन हल्ला केला होता. तरीही त्यांना इस्रायल पुरुन उरला. भारताची युद्धे एका वेळी फक्त एका राष्ट्राबरोबर झालेली आहेत. पाक किंवा चीन.
डिटेल्सबद्दल कितीही चर्चा
डिटेल्सबद्दल कितीही चर्चा करता येईल. बॉटमलाइन महत्त्वाची. आपल्या नागरिकांची रक्षा करण्यात भारत सरकार इस्राएलपेक्षा दहापट यशस्वी आहे. तेव्हा इस्राएलकडून भारताने ते शिकावं असं म्हणू नये.
यापलिकडे मला काहीही म्हणायचं नाही. हे सत्य आहे, आकडेवारीतून स्पष्ट आहे. ते स्वीकारायचं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. वैचारिक प्रामाणिकपणा असेल तर ते सत्य मान्य कराल. ते मान्य करायचं नसेल तर चर्चा इथेच थांबवू.
हे आकडेवारीतून स्पष्ट झालेले
हे आकडेवारीतून स्पष्ट झालेले नाही.
तुम्ही दिलेल्या दुव्यांवरून
२००० सप्टेंबर ते २०१४ मार्च दरम्यान ७४४ इस्राएली सिव्हिलियन्स मेले. दरसाली ५७.३३. दर लाख लोकसंख्येमागे दरवर्षी ०.७१ मृत्यू.
२००० ते २०१४ या १४ वर्षांत भारताचे ५२१६ सिव्हिलियन्स मेले. दरसाली ३७२.६. दर लाख लोकसंख्येमागे दरवर्षी ०.०३ मृत्यू.
This chart shows just the 1,101 Israeli deaths in the conflict since September 2000. Of those, 744 were civilians and 357 security forces,
इस्राएल = दरवर्षी प्रतिलाख ०.७१ मृत्यू
भारत = दरवर्षी प्रतिलाख ०.०३ मृत्यू
भारताची कामगिरी इस्राएलच्या दहापट नाही, वीस-पंचवीसपट चांगली आहे! हे पुरेसं स्पष्ट आहे का?
म्ही दिलेल्या दुव्यांवरून.
म्ही दिलेल्या दुव्यांवरून. २००० सप्टेंबर ते २०१४ मार्च दरम्यान ७४४ इस्राएली सिव्हिलियन्स मेले. दरसाली ५७.३३. दर लाख लोकसंख्येमागे दरवर्षी ०.७१ मृत्यू. २००० ते २०१४ या १४ वर्षांत भारताचे ५२१६ सिव्हिलियन्स मेले. दरसाली ३७२.६. दर लाख लोकसंख्येमागे दरवर्षी ०.०३ मृत्यू. This chart shows just the 1,101 Israeli deaths in the conflict since September 2000. Of those, 744 were civilians and 357 security forces, इस्राएल = दरवर्षी प्रतिलाख ०.७१ मृत्यू. भारत = दरवर्षी प्रतिलाख ०.०३ मृत्यू. भारताची कामगिरी इस्राएलच्या दहापट नाही, वीस-पंचवीसपट चांगली आहे! हे पुरेसं स्पष्ट आहे का?
ओह येस.
(इस्रायल-पॅलेस्टाईन, भारत-पाक या दोन्ही संघर्षांमधील) दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात - भारत व इस्रायल यांच्यातील दरडोई सिव्हिलियन मृत्यूचे प्रमाण पाहता भारताने २००० ते २०१४ या कालात आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी इस्रायलपेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्तम रितीने पार पाडलेली आहे.
सहर्ष मान्य. झक्कास.
हे पैशाचं माहित नव्हतं. युद्ध
हे पैशाचं माहित नव्हतं. युद्ध खर्चाचा हिशेब दरडोई करणं करेक्ट प्रमाण नाहीय.
पण समजा भारताला कुठूनतरी सिक्युरिटीचे पैशे मिळतील. तसं झाल्यावर तुम्हाला वाटतं कि भारत terrorism शी लढण्यात ते पैशे खर्च करेल? का ते रातोरात लंपास होतील?
थोडक्यात भारत terrorism शी लढू शकत नाहीय याचं पैशे हे एकच कारण आहे का? its a rhetoric question.
दरवर्षाला साडेसहाशे बिलियन
दरवर्षाला साडेसहाशे बिलियन लंपास करणं सोपं नाही. मदत करणारी राष्ट्रंही दूधखुळी नसतात. ती मदत योग्य ठिकाणी पोचते आहे याची खात्री नसेल तर ते मदत थांबवतात.
कल्पना करा, आता भारताचा विकासदर आठ टक्क्याच्या आसपास आहे. त्यासाठी आपल्याला फॉरीन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शंभरेक बिलियनच्या आसपास मिळवावी लागते. ही इन्व्हेस्टमेंट - गिफ्ट नाही! जर पुढची दहा वर्षं जर साडेसहाशे बिलियन फुकटात मिळाले तर आपली इकॉनॉमी महाप्रचंड होईल. आणि त्यातला कितीतरी मोठा खर्च टेररिझमवर ताबा मिळवण्यासाठी करता येईल.
आणि कोण म्हणतं इस्राएल भारतापेक्षा टेररिझमवर जास्त चांगली उपाययोजना करतो? या शतकात इस्राएलमध्ये दहशतवादापोटी दरवर्षी सुमारे १०० लोक मेलेले आहेत. भारतात ही संख्या आहे २५०० च्या आसपास. त्यात निम्मे किंवा अधिक अतिरेकीच आहेत. इस्राएलच्या आकडेवारीत टेररिस्ट कमी असावेत. मुद्दा असा आहे की लोकसंख्येच्या मानाने भारतात इस्राएलपेक्षा सहा ते दहापट कमी मृत्यू होतात. हेसुद्धा अत्यंत तुटपुंज्या बजेटमध्ये साधलं जातं. उगाच कशाला इस्राएलचं कौतुक करायचं?
आकडेवारी इथे तपासून पाहाता येईल.
http://www.satp.org/satporgtp/countries/india/database/indiafatalities…
http://www.johnstonsarchive.net/terrorism/terrisraelsum.html
मदत करणारी राष्ट्रंही दूधखुळी
मदत करणारी राष्ट्रंही दूधखुळी नसतात. ती मदत योग्य ठिकाणी पोचते आहे याची खात्री नसेल तर ते मदत थांबवतात.
इस्राएलला ती मदत थांबली नाहीय याचा अर्थ इस्राएल ती रक्कम efficiently वापरत आहे असं conclude करूया.
जर पुढची दहा वर्षं जर साडेसहाशे बिलियन फुकटात मिळाले तर आपली इकॉनॉमी महाप्रचंड होईल. आणि त्यातला कितीतरी मोठा खर्च टेररिझमवर ताबा मिळवण्यासाठी करता येईल.
yes, you are right "on paper". पाकिस्तानलाही अशी मदत बरीच वर्षं मिळत होती. पण त्याचा काही गुण दिसला नाही.
आणि कोण म्हणतं इस्राएल भारतापेक्षा टेररिझमवर जास्त चांगली उपाययोजना करतो?
इस्राएल मध्ये १०० लोक १०८ attacks मध्ये मेली. इंडियात किती attacks झाले याचा तपशील नाही. सांगायचा मुद्दा असा कि attempts पण लक्षात घ्यायला हवेत.
इस्राएलला ती मदत थांबली नाहीय
इस्राएलला ती मदत थांबली नाहीय याचा अर्थ इस्राएल ती रक्कम efficiently वापरत आहे असं conclude करूया.
लंपास केली नाही इतकंच म्हणता येईल. एफिशियन्सी किती हे आकडेवारीतून दिसतंच.
सांगायचा मुद्दा असा कि attempts पण लक्षात घ्यायला हवेत.
छे छे. शेवटी बॉटम लाइन महत्त्वाची. भारताच्या तुलनेने इस्राएलमध्ये दहापट लोक मरत असतील तर भारतात किती अटेंप्ट्स झाले वगैरे मुद्दा गौण ठरतो.
पाकिस्तानलाही अशी मदत बरीच वर्षं मिळत होती. पण त्याचा काही गुण दिसला नाही.
आकडेवारी तपासून पाहा हो. इस्राएलला जितकी मदत मिळाली तितकीच मिळायची तर पाकिस्तानला १०० बिलियन दर वर्षी मिळायला हवे होते. त्यांना फारतर एखादा बिलियन मिळाला असेल. आणि पाकिस्तानची इकॉनॉमी २००६-७ पर्यंत भारतासारखीच होती (दरडोई उत्पन्नानुसार). गेल्या आठदहा वर्षांत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि तेही पंधरावीस टक्क्यांनी. फार नाही.
चला बरे झाले , इस्राईल च्या
चला बरे झाले , इस्राईल च्या याही पैलू वर कोणीतरी भाष्य केलं !!
आणि इस्राएल ची स्थापना , त्यामागचे राजकारण , सोयीस्कर लॉजिक वगैरे या विषयावर बॅटमॅन सारख्या इतिहास अभ्यासकांनी लिहावे . रोचक आहे. त्र्ययस्थ म्हणुन वाचले तर.
आणि हे नक्की काय लॉजिक आहे ?
"पॅलेस्टाईन हे मान्यताप्राप्त राष्ट्र सुद्धा नाही. इस्रायल स्थापन होऊन अनेक दशकं लोटली तरी पॅलेस्टाईन चे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व संयुक्त राष्ट्राने मान्य केलेले नाही. "
UNO नि स्वतंत्र राष्ट्र घोषित केलेले नाही म्हणून ते आस्तीत्वातच नाही ? चीन (PRC ) हेही १९७१ पर्यंत अधिकृत स्वतंत्र राष्ट्र नव्हते . ( तैवान ROC होते), मग बुआ भारताला १९६२ ला कुणी बरं हरवले ? . तात्पर्य , .....
UNO नि स्वतंत्र राष्ट्र घोषित
UNO नि स्वतंत्र राष्ट्र घोषित केलेले नाही म्हणून ते आस्तीत्वातच नाही ? चीन (PRC ) हेही १९७१ पर्यंत अधिकृत स्वतंत्र राष्ट्र नव्हते . ( तैवान ROC होते), मग बुआ भारताला १९६२ ला कुणी बरं हरवले ? . तात्पर्य , .....
चीन हे संस्थापक सदस्य राष्ट्र आहे युनो चे. १९४५ पासून. पुरावा इथे - http://www.un.org/depts/dhl/unms/founders.shtml
त्यावेळी ते Republic of China म्हणून ओळखले जायचे. नंतर त्यांनी नाव बदलले.
लाल रंगातील मजकूर हा निष्कर्ष आहे की मत की गृहितक की निरिक्षण की इतर काही ?
राष्ट्र अस्स्तित्वात नाही असं मी म्हणालो नाही. महाराष्ट्र सुद्धा अस्तित्वात आहे. मुद्दा औपचारिक राष्ट्र असणे, इतरांकडून राजमान्यता असणे हा आहे.
"लाल रंगातील मजकूर हा
"लाल रंगातील मजकूर हा निष्कर्ष आहे की मत की गृहितक की निरिक्षण की इतर काही ?"
http://www.un.org/depts/dhl/unms/founders.shtml
याच लिंक मध्ये लिहिलेले संस्थापक सदस्य हे ROC ( रिपब्लिक ऑफ चायना )
आजचे स्वतःला ROC म्हणवून घेणारे तैवान
ज्याला चीन म्हणाले जाते ते आहे ते PRC !!!! निक्सन नि १९७१ साली मांडवली केल्यावर PRC ला UNO ची मान्यता मिळाली .
" विकी वरून :
The subsequent resumption of the Chinese Civil War led to the establishment of the People's Republic of China (PRC) in 1949. Nearly all of mainland China was soon under its control[a] ROC fled to the island of Taiwan. The One-China Policy advocated by both governments precluded dual representation but, amid the Cold and Korean Wars, the United States and its allies opposed the replacement of the ROC at the United Nations, although they were persuaded to pressure the government of the ROC to accept international recognition of Mongolia's independence in 1961. The United Kingdom, France, and other American allies individually shifted their recognitions of China to the PRC and Albania brought annual votes to replace the ROC with the PRC, but these were defeated since—after General Assembly Resolution 1668—a change in recognition required a two-thirds vote.
Amid the Sino-Soviet split and Vietnam War, American President Nixon entered into negotiations with Communist Chairman Mao, initially through a secret 1971 trip undertaken by Henry Kissinger to visit Zhou Enlai. On October 25, 1971, Albania's motion to recognize the People's Republic of China as the sole legal China was passed as General Assembly Resolution 2758. It was supported by most of the communist states (including the Soviet Union) and non-aligned countries (such as India), but also by some American allies such as the UK and France. Nixon then personally visited China the next year, beginning the normalization of Sino-American relations. Since that time, the Republic of China has softened its own One-China Policy and sought international recognition. These moves have been opposed and mostly blocked by the People's Republic of China, forcing the Republic of China to join international organizations under other names. These include "Chinese Taipei" at the International Olympic Committee and "Taiwan, Province of China", at the United Nations."
" मत की गृहितक की निरिक्षण की इतर काही ... " :) :) :)
धन्यवाद. इस्राएल आणि
धन्यवाद. इस्राएल आणि भारताच्या दहशतवादाकडे किंवा युद्धाकडे बघण्याच्या भूमिकेत फरक आहे. इस्रायला आपल्या शत्रूचा नायनाट करायची इच्छा आहे, त्यासाठी स्वतःचे कमीतकमी का होईना पण काही मृत्यू सहन करण्याची तयारी आहे. याउलट भारताला शांतता जपण्यात रस आहे. कारण इस्रायलप्रमाणे ०.७ प्रतिलाख मृत्यू म्हणजे दरवर्षी ८,००० नागरिकांचा मृत्यू, आणि सुमारे ४५०० सैनिकांचा मृत्यू सहन करावा लागेल. बरं पाकिस्तान हा काही पॅलेस्टाइनसारखा गरीब देश नाही. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आहेत, आणि त्यांचा वापर करून ते अनन्वित हानी करू शकतात. त्यामुळे युद्ध टाळणं आणि कमीतकमी लोक दहशतवादाला बळी पडू देणं ही भारताने स्वीकारलेली नीती उत्तम आहे. आणि त्या नीतीनुसार भारताचं सरकार, रॉ, आणि सैन्य यांनी मिळून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. इस्राएलचं डिफेन्स बजेट १८.६ बिलियन डॉलर्स आहे तर भारताचं बजेट ३५ बिलियन. म्हणजे फक्त दुप्पट बजेटमध्ये दीडशेपट लोकसंख्या आणि किमान शंभरपट सरहद्दीचं रक्षण भारत करतो. आणि आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर दहशतवादातून आणि युद्धातून झालेले मृत्यू अतिशय कमी ठेवण्यात नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. असं असतानाही 'स्साला, आपण इस्रायलसारखं आक्रमक होऊन शत्रूला चेचून काढायला हवं' वगैरे लोक म्हणत असतात. आपली ध्येयं वेगळी आहेत, आणि माझ्यामते जास्त चांगली आहेत. आणि आपली ध्येयं गाठण्यात आपण जितके यशस्वी झालो आहोत तितका इस्राएलची ध्येयं गाठण्यात इस्रायल यशस्वी झालेला नाही.
राघांशी पुनश्च सहमत. भारताने
राघांशी पुनश्च सहमत.
भारताने आपल्या ह्याच नेत्रदीपक यशाच्या जोरावर पुढची पाऊले टाकावीत. म्हंजे - (1) We need to be able to build upon our past successes. आणि शांति प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेऊन यत्न करावेत. आता प्रत्येक वेळी शांति प्रयत्न करताना पाकिस्तानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेलच असे नाही. जर नकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आपले उत्तर अत्यंत क्रूर असावे असं मला वाटतं. ही क्रूरता ही रॅशनल आहे. प्रचंड वेदनांचा इतिहास असेल तर त्यांची नकारात्मकता कमी होऊ शकते. जपान वर टाकलेल्या दोन्ही अणुबाँब्स चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. बाँब पडल्यानंतर जी हानी झाली त्याचा परिणामस्वरूप जपान ने पॅसिफिस्ट संविधानाचा अंगिकार केला. (२) दुसरे म्हंजे आपल्याला आपले सैन्यदल स्किल्ड ठेवणे गरजेचे आहे. व त्यासाठी प्रत्यक्ष कारवायांमधे आपला सहभाग असायला हवा. त्यातूनच कौशल्य निर्मीती होते. व ही कौशल्ये इतरत्र (उदा. चीन) वापरली जाऊ शकतील (नव्हे गरज पडू शकेल). म्हणून पाकिस्तान कडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला तर त्यांच्या विरोधी कोव्हर्ट कारवाया अवश्य कराव्यात ज्यातून आपल्या सैन्यदलांची कौशल्ये विकसित होऊ शकतील.
+१११११११ वो सुबहा कभी तो
+१११११११ वो सुबहा कभी तो आएगी.