चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट

एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली.

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.

आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली.

एक होती चिव, एक होता काऊ. चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते). एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट ....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ह्या गोष्टीत काय रुपक आहे त्याचा शोध कोणी घेइल का?
मोदी कोण? पाकीस्तान कोण? काँग्रेसी कोण - ते कोणी सांगेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गोष्ट फॉर अ चेंज रुपक नसून, पर्यावरण प्रश्नावर ओढलेले घणाघाती कोरडे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, इतके खात्रीने सांगु नकोस. कदाचीत काऊ म्हणजे नवाझ शरीफ, फ्लॅट च्या खिडक्या बंद असणे म्हणजे भारत पाकीस्तान सीमेवरचे कुंपण आणि सोनुटली म्हणजे सोनिया गांधी असु शकतील. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खरय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काऊ-चिऊवरून एक गंमत सांगावीशी वाटते. आमचे एक नातेवाईक पुण्यात सिंहगड रस्त्यावर एका इमारत-संकुलात राहातात. त्यांच्या इमारतीचा जो आतला शाफ्ट आहे (जिथे सगळ्यांच्या ड्राय बाल्कन्या उघडतात, ड्रेनेजच्या लाईन्स आहेत वगैरे) तिथे कबुतरांचा जाम उपद्रव होत होता. नुसती घाण आणि दिवसभर शाफ्टमध्ये घुमणारा आवाज! मग त्यांच्या सोसायटीने तो शाफ्ट वरुन आणि खालून दोन्ही बाजूने जाळ्या लावून बंद करुन टाकला. आणि आश्चर्य म्हणजे ३-४ महिन्यांतच कबुतरांची जागा चिमण्यांनी घेतली. पण चिमण्या मुळात इतकी घाण करत नसल्याने चिमण्यांचं तिथे राहाणं कबुतरांच्या तुलनेत बरंच सुसह्य आहे (सध्या तरी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबाबत धन्यवाद. कुणाला तरी गोष्ट समजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाला तरी गोष्ट समजली.
हे लेखकाचे यश समजायचे की अपयश ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

रेड्बुल साहेब, यात यश अपशायाचा संबंध येत नाही. चिवताईची गोष्ट सोडा, उद्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची गोष्ट आपण आपल्या भविष्याच्या पिढीला कसे सांगणार? प्रत्यक्ष ते जीवजंतू असायला पाहिजे ना? गंभीर प्रश्नांवर चर्चा करायला कुणालाच आवडत नाही. बाकी रामदेव बाबांचे नाव घेतले असते तरी इथे प्रतिसादांचा वर्षाव झाला असतो, मानसिकता दुसरे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतकाका, गोष्ट सशक्त असली तर त्यातल्या वस्तू पाहिल्या आहेत/नाहीत याने फरक पडत नाही. स्कॉटिश किल्लेबिल्ले फारसे राहिले नाहीत तरी मॅक्बेथ अजूनही बघितलं जातंच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चिवताईची गोष्ट सोडा, उद्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची गोष्ट आपण आपल्या भविष्याच्या पिढीला कसे सांगणार?

का बुवा? भविष्यात यांपैकी नेमके काय नामशेष होणार आहे, अशी भीती तुम्हाला वाटते: भोपळा, की म्हातारी? (लांडग्याचे म्हणाल, तर 'लांडगा' हे श्वापद आजतागायत मीदेखील पाहिलेले नाही - लांडग्याबद्दलची माझी माहिती ही निव्वळ सांगीवांगीचीच आहे; 'विदा' नव्हे - आणि तरीदेखील 'चल रे भोपळ्या'ची गोष्ट लहानपणी मला छान कळली होती, असे आठवते. सबब, उद्या समजा जर लांडगा नामशेष झालाच, तर पर्यावरणवाद्यांना नि प्राणिशास्त्रज्ञांना त्याबद्दल काहीही वाटो, परंतु निदान मला तरी त्याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. असो.)

माझी चिंता भविष्यकाळात 'चल रे भोपळ्या'ची गोष्ट कशी सांगता येईल, याबद्दल नसून, भूतकाळात ती कशी सांगितली गेली असेल, याबद्दल आहे. कारण, भोपळा हे मुळातले अमेरिकेतील पीक आहे. कोलंबसाबरोबर (किंवा कदाचित त्याहीनंतर) 'जुन्या जगा'त (त्यातही मुख्यत्वेकरून युरोपात) पोहोचले. हिंदुस्थानात कधी, कसे नि कोणाबरोबर पोहोचले असावे, कल्पना नाही. पण म्हणजे, पाचशे-सव्वापाचशे वर्षांहून अधिक पूर्वीच्या काळात ते हिंदुस्थानात नि महाराष्ट्रात परिचित नसावे.

तर आमचा प्रश्न असा, की ज्ञानेश्वरांच्या आजीने ज्ञानेश्वरांस त्यांच्या लहानपणी 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' ही कथा नेमकी कशी सांगितली असावी? नि ज्ञानेश्वरांच्या बालबुद्धीस ती समजली असावी काय?

..........

कारण शेवटी आम्ही (पार्टली गिरगांवात नि मोष्टली पुणे-३०मध्ये वाढलेली) भटेच. त्याला काय करणार? (प्रेरणा: पु.ल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात.

Cowचा उच्चार 'काऊ' असा नसून 'क्यॅऽव' असा आहे. (निदान 'आमच्यात' तरी. आणि आजमितीस तरी 'आमच्या'च उच्चारांची जगात चलती आहे. पण इंग्रजी अंमल उठून सत्तरएक वर्षे होत आली, तरी इंग्रजानुकरणाचा पगडा हिंदुस्थानातून कधी उतरणार, हे तो एक परमेश्वरच जाणे.)

(अतिअवांतर: 'क्यॅव' छान लागते. यम्! यम्!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0