आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ३

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.

---

पुण्यात फ्रेंच शिकवणारी 'आलिऑन्स फ्रॉन्सेज' ही संस्था अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. फ्रेंच अ‍ॅनिमेशन सिनेमांचा एक महोत्सव त्यांनी आयोजित केला आहे. तो उद्यापासून सुरू होतो आहे. सिनेमांचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर इथे पाहायला मिळेल. प्रवेशमूल्य नाही.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

डोंबिवली साहित्य सम्मेलन ,२-३

डोंबिवली साहित्य सम्मेलन ,२-३ फेब्रु।
कोणी येणारे?

मिनी कट्टा निवेदन :

मिनी कट्टा निवेदन :
हा होणार मिनी कट्टा ..
उद्या कट्टा आहे . सकाळी ११ ते ३ कार्ला MTDC रेस्टॉरंट .
नक्की येणार आहेत : आचरट , अरुण जोशी , मनोबा , बापट .अभ्या .
कळवणार म्हणाले बॅटमॅन.
सर्व मंडळींना आमंत्रण आहेच... येणे करावे .

जागा : कार्ला/लोणावळा MTDC

जागा : कार्ला/लोणावळा MTDC

कट्टा २०१७ अपडेट

कट्टा २०१७ अपडेट :
२२ जानेवारी , MTDC कार्ला

नक्की येणार :
आचरट , मन , अरुण जोशी , अभ्या , बापट , अभिजित अष्टेकर , नील लोमस ( आणि ते मिपाकर वल्ली प्रचेतस ?)

थोड्यावेळ तरी येऊन जाणार : राहुल बनसोडे ...

बहुतेक येणार :
बॅटमॅन , ऋषिकेश , ढेरेशास्त्री ( जरा वरच्या रो मध्ये व्हा आता , या नक्की )

प्रयत्न करू असा आशीर्वाद :
चिंतातुर जंतू ( या हो जंतू , तुमचा पिफ मध्ये येत नाहीये याच्या )

इच्छा आहे पण येऊ शकत नाही :
आदूबाळ , अतिशहाणे, अदिती .

कोणाची नावे अनवधानाननी राहिली असतील तर त्यांनी कृपया कळवणे.

व्हीजुवलायजिंग अँड लूकिंग फॉरवर्ड टू ... चर्चासत्र :
१. अरुण जोशी आणि बॅटमॅन
२. अभ्या/ऋषिकेश आणि मनोबा

( रिलक्टंट मॉडेरेटर : हू एल्स , कपाळावर आश्चर्य भाव घेऊन जंतू )

३. प्रतिगामी पुरोगामी वाद : अरुण जोशी आणि बॅटमॅन ( चक्क एका पार्टीत ) विरुध्ध बापट आणि जंतू
मॉडेरेटर : कधी या तर कधी त्या पार्टीत असलेला न्यूट्रल अंपायर : ऋषिकेश !!!!

PPT प्रेसेंटेशन बाय स्टार अट्रॅक्शन : अभ्या शेठ सोलापूरकर
दिलखुष जगिरा , चैनगेट वरील रोचक कहाण्या , ( अभ्या , मी पत्रिकांचा विषय लिहिला नाहीये , पण कोणीतरी तो काढेलच )व इतर ( बार वगैरे फिकट प्रिंट मध्ये छापा )

तत्वज्ञानी सत्संग : आचरट बाबा ,राहुल बनसोडे आणि निल लोमस

( खाजगीत चर्चासत्र , तुमचं का माझं कर्वेनगर खरं ? अभिजित अष्टेकर आणि मनोबा . )

असं झालं तर काय मजा येईल राव ?
वरील मेन्यू न आवडल्यास मी जबाबदार नाही . हवा तसा बदलू शकता .

सर्वाना आमंत्रण !!!
अहो स्वप्नील घनोबा , काही उत्तर नाही तुमच्याकडून , आम्हाला भेटायला नाही तर निदान MTDC च्या फूड मेन्यू च उदरभरण लिहायला तरी या !!! (बुक्की पासून सेफ डिस्टन्स राहायला पाहिजे मला )

च्यामारी, पीपीटी आणि मी.

च्यामारी, पीपीटी आणि मी. नेव्हर
पीपीटीचा अन तो प्रकार आवडणार्यांचा मी तर जानी दुश्मन.
चांगली पीपीटी बनवणारे कधीच चांगले आणि यशस्वी बिजनेसमन होऊ शकत नाहीत.
फारतर ते चांगले पॅकेज मिळवतील.

अभ्या शेठ ,माध्यम महत्वाचे नाही,संदेश महत्वाचा

अभ्या शेठ ,
माध्यम महत्वाचे नाही , संदेश महत्वाचा ( साधन आणि साध्य च्या धर्तीवर !!!) तेव्हा अभ्याशेठ कस बी सांगा , पण तुमचे अणभव मांडा ... वाट बघतोय !!!

>>>फारतर ते चांगले पॅकेज मिळवतील.<<<
या एका दगडात किती पक्षी घायाळ केलेत हो ....

कट्टा २०१७ !!!!!आचरट राव आणि

कट्टा २०१७ !!!!!

आचरट राव आणि मनोबा यांच्या सजेशन नि मळवली इथे पुणे ठाणे मुंबई एकत्र कट्टा होईल असे दिसत आहे ... जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ... एखाद्या रविवारी .....
गेल्या कट्ट्याचे यशस्वी कलाकार सर्वश्री : चिंतातुर जंतू , मनोबा , ढेरे शास्त्री , घनु, ऋषिकेश , आबा, गंबा , ढेरेशास्त्री याना आग्रहाचे निमंत्रण !!!
खास आकर्षण : सोलापूरचे अभ्या शेठ आणि ठाण्याचे अच्च्यु काका
गुप्त बातमी : कट्ट्याकरिता विलायतेहून आदूबाळ येणार ... बहुतेक .....

अमेरिकेहून अदिती आणि राजेश गुर्जी आणि तिसरे गुप्त जे कोण असतील ती मालक चालक मंडळी या वेळी येण्याचे मनावर घेतील काय ? ( बघा तरी तुमच्या राज्यात काय काय गॉसिप चालतं ते )
बॅटमॅन ... गेल्या वेळ सारखी कारणे न काढता येणे ( मनोबा येणार आहे , अभ्या येणार आहे , आम्हाला बॅटमॅन मनोबा चर्चेचे रोचक ग्राफिक चित्र मिळेल अशी आशा )

अच्चू काका नि थत्ते ना निरोप पाठवला आहे ...

इतर सर्वे ... येणे करावे .... धाग्यांवरची भांडणे समोरासमोर करण्याची सुवर्णसंधी सोडू नये !!!!
आपापल्या सोयीच्या तारखा कळवा हो पब्लिक !!!!

(संपादक : प्रतिसाद योग्य धाग्यावर हलवला आहे.)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७

यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (पिफ) १२ ते १९ जानेवारीदरम्यान होणार आहे. ऑनलाईन सदस्यनोंदणी महोत्सवाच्या संकेतस्थळावर चालू झाली आहे. २९ तारखेपासून सिटीप्राईड (कोथरूड आणि सातारा रस्ता), मंगला आणि आयनॉक्स (बंडगार्डन) इथेही नोंदणी करता येईल (सकाळी ११ ते सायंकाळी ६.३०).

विद्यार्थी आणि फिल्म क्लब सदस्य तसंच ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांच्यासाठी नोंदणीशुल्क - ६००. इतरांसाठी नोंदणीशुल्क - ८००. रोख रकमेबरोबरच क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.

अधिक माहिती मायबोलीवर आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेळापत्रक

महोत्सवाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. ते इथे पाहता येईल.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उद्घाटनाचा कार्यक्रम

उद्घाटनाचा कार्यक्रम अजिबात चुकवू नका. स्पेनहून आलेल्या कलाकारांचं फ्लॅमेंको नृत्य आणि त्यानंतर Thank You for Bombing हा चित्रपट आहे. युद्धसदृश परिस्थितीत काम करणाऱ्या तीन वार्ताहरांच्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रपटांची यादी

PIFFमधल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. ती इथे पाहता येईल.
मराठी स्पर्धा विभाग आणि उद्घाटनाचा चित्रपट काल जाहीर झाला आहे. बातमी

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ

यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ नावाने फेस्टीव्हल होतोय.

30 सिनेमे दाखवणार आहे म्हणे. बघूया.

ओसीआयएफएफ फिफ नंतर आहे त्यामुळे पिफला जाणार्‍या ऐसीकरांना विनंती आहे की त्यातले चांगले सिन्मे कोणते याची इथे नोंद करावी म्हणजे ते नागपूरात आले तर आम्हाला चूझ करणे सोपे जाईल व मनस्ताप टाळता येईल.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

नागपुरात ऐसीकरांशी भेट

>> यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ नावाने फेस्टीव्हल होतोय.

30 सिनेमे दाखवणार आहे म्हणे. बघूया. <<

वाघमारे यांची महोत्सवादरम्यान भेट झाली. ऐसीसदस्य उसंत सखूदेखील उपस्थित होत्या. वेळेअभावी कट्टा, गप्पा, चर्चा वगैरे शक्य झालं नाही. वाघमारे आणि सखूबाईंनी महोत्सवाविषयीचा अभिप्राय ऐसीवर जरूर कळवावा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महोत्सवाविषयीचा अभिप्राय ऐसीवर

अवश्य्..थोडा वेळ द्या मालक!

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पुण्याबाहेर

पुण्याबाहेर चार शहरांत निवडक फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. त्याच्या तारखा मायबोलीवरून -

पुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -

१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७

२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७

३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७

४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यात सोलापूरचे नाव आहे म्हणून

यात सोलापूरचे नाव आहे म्हणून विचारतो,
या फिल्मा कुठल्या थेठरात असतात? आणि त्याचे तिकीटदर व वेळा कशा चेक कराव्या?

अपडेट

>> या फिल्मा कुठल्या थेठरात असतात? आणि त्याचे तिकीटदर व वेळा कशा चेक कराव्या? <<

उमा मंदिर आणि प्रभात टॉकिजमध्ये सिनेमे दाखवले जाणार आहेत. महोत्सवाचं फेसबुक पान (Solapur International Film Festival - SIFF) इथे माहिती मिळावी.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तपशील

>> या फिल्मा कुठल्या थेठरात असतात? आणि त्याचे तिकीटदर व वेळा कशा चेक कराव्या? <<

मला सोलापूरविषयी माहिती नाही. साधारणत: सर्व् फिल्म्स मल्टिप्लेक्समध्ये दाखवतात. अख्ख्या महोत्सवासाठी एकच पास असतो. वेळा वगैरे स्थानिक वृत्तपत्रात याव्यात.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद जंतूराव. दोनच

धन्यवाद जंतूराव.
दोनच मल्टीप्लेक्स तेही जवळजवळ असल्याने सोपे जाईल.
पाहावाच यंदा. इथल्या सृजन संस्थेकडे म्यानेजमेंट नसावी म्हणजे बरे. (डोळा मारत)

पिफ मधे दाखवल्याजाणार्‍या

पिफ मधे दाखवल्याजाणार्‍या सिनेमांचे वेळापत्रक कधी येणार? २९ डिसेंबरला कॅटलॉग मिळणार आहे, त्यात वेळापत्रक पण असतं बहुदा पण खात्री नाही.ऑनलाईन साधारण कधी उपलब्ध होईल हे वेळापत्रक? त्याप्रमाणे सुट्ट्या/हाफ-डे वगैरे प्लान करायला (स्माईल)

वेळापत्रक

वेळापत्रक कधी येईल काही कल्पना नाही. महोत्सवाच्या फेसबुक पानावर काही चित्रपटांचे ट्रेलर वगैरे शेअर झालेले आहेत. कॅटलॉगमध्ये वेळापत्रक नसतं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद, फेबू बघतो आज.

धन्यवाद, फेबू बघतो आज.

पिफ वाले शेवटपर्यंत (म्हणजे

पिफ वाले शेवटपर्यंत (म्हणजे रेग्यूलर स्क्रीनिंग सुरू होईस्तोवर) कॅटॅलॉग देत नाहीत !(अ‍नुभव)

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

हो, अगदी हाच (माझाही )अनुभव,

हो, अगदी हाच (माझाही )अनुभव, असं ऐनवेळी दिल्यामुळे सुट्ट्यांचं निट नियोजन करताच येत नाही. शिवाय बरेचदा कॅटलॉग मिळेपर्यंत काही चांगले सिनेमे होऊन गेलेले असतात. २०१४ ला र्‍हायनो सिझन असाच निसटला हातातून, नंतर समजलं आयनॉक्सला शेवटचा शो म्हणून धावत पळत गेलो तर ऐनवेळी तिथे वेगळाच सिनेमा दाखवला (लव्ह-स्टीक्स), म्हणे प्रिंट पोहचलिच नाही. व्यवस्थापनाचा सावळा-गोंधळ.

रात्री ९.३०,पुणे

रात्री ९.३०,पुणे -अशक्य.
संकलन: चिन्मय दामले -मायबोलीवरच्या अन्नं वै प्राणा: चे लेखक चिनुक्स.त्यामुळे संधी सोडता कामा नये.
//जाहिरातीतलं चित्र: लज्जागौरी शिल्प, बदामिच्या वस्तुसंग्रहालयात आहे.तिथे कोणी जात नाही. तलावाच्या दुसय्रा कडेच्या बदामि गुंफांकडे मात्र अतोनात गर्दी असते.

हा मागे सुदर्शला झालेलाच

हा मागे सुदर्शला झालेलाच कार्यक्रम असेल तर जाणं मस्ट आहे. तिथे मी आणि अनुप गेलो होतो. चांगलं संकलन, सादरीकरण. (त्याबद्दल अनुपने लिहिलं होतं)

अचरटराव मूळ शिल्पही पाहिले आहे (स्माईल) मात्र पट्टडकलच्या म्युझियममध्ये

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येस, हाच तो कार्यक्रम! खूपच

येस, हाच तो कार्यक्रम! खूपच छान आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

लौकिक आणि अलौकिक

रा. चिं. ढेरे यांच्या निवडक साहित्याचं अभिवाचन - १ जानेवारी, रात्री ९:३०, भरत नाट्यमंदिर, पुणे.
 रा चिं ढेरे

तिकिटं ऑनलाइन काढायची असली तर इथे मिळतील.

--
माहितगार

Je suis desole. मला येता

Je suis desole. मला येता येणार नाही. (डोळा मारत)

pourquoi etes vous desole?

pourquoi etes vous desole?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मस्त!!! मग तू कशाला सॉरी

मस्त!!! मग तू कशाला सॉरी म्हणतेस्/माफी मागतेस? बरोबर???

________________________________
जो कुछ उसने कहा, मना उससे नहीं हमें,
जिस नीयत से कहा, गिला तो उससे है.
(शिखा वार्ष्णेय)
________________________________

उइ उइ उइ

उइ उइ उइ

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.