प्रेमाचे आर्जव - एक हुकणे

किंवा असेही होत असेल
की माझे शीळ घालणे
गाण्याची ओळ गुणगुणणे
वाटत असावे तिला
प्रमाणीकृत, पाकिटबंद!
(तिच्या भावनांचा नसेल असा
आकृतिबंध.)

इतिहासाने शिकविलीय
एव्हढीच तंत्रे, असलीच भाषा !
सोडली तर काहीच नाही उरत
(परिस्थितीत या बसावे झुरत!)

"मी एक चालती-बोलती जखम"
पाकिटबंद कॅडबरी मुद्दा ठरतो !
डार्क चॉकलेट, काजू घातले
तरी काय फरक पडतो ?

किंवा नुस्तेच तिच्यासमोर ठाकणे
मूकनाटकातील शोकनायकाप्रमाणे
अटळ आहे अयशस्वी ठरणे!

"सद्यस्थितीत" काहीही केले
तरी तिला ते कसे कळणार ?
प्रचलित अर्थाच्या गुलाम स्त्रिया
माझ्यावरती कशा भाळणार ?
---

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मला ही कविता आवडली. मला या

मला ही कविता आवडली. मला या गाण्याची आठवण झाली -
.
Paint my love you should paint my love
It's the picture of thousand sunsets
It's the freedom of a thousand doves
Baby you should paint my love
.