रुईकर म्हणतात म्हणून.....

दिवाळी हा अाजकाल सण नसून निव्वळ तारीख पाहून झालेलं सेलिब्रेशनच निमित्त आहे त्यावर काहीसं

रुईकर म्हणतात म्हणून

अाज पुन्हा एक नवी दिवाळी अाली,
प्रत्येकाने ज्याची त्याची अानंदाची प्रात्यक्षिके
अादल्या दिवशीच बाजारातून विकत घेतली.
कोणी कपडे घालून सजले तर कोणी दिवे,माळा अाणि खोटं हासुन माजले.
बोनस मिळालेले ताठ उभे होते, न मिळालेले उगाच सणावारी निषेध कशाला म्हणून उभ्यातले बघे होते.
प्रत्येकाने स्वतःचं घर अातुन नाही तर बाहेरून सजवायला घेतलं होतं.

रोज उपाशी फिरणारे कार्यकर्ते आज अष्टगंध आणि एकाच रंगाच्या गणवेशात गल्लीभर अक्षरशः नांदत होते.
मी सुद्धा सकाळी उठलो,स्नानावेळी काठी टेकून चालायची आईला कमिटमेंट देऊन फराळ आटोपला आणि आता पुढे काय या प्रश्नात अडकायच्या अात मित्रांच्या अानंदात मार्गस्थ झालो.
अाज इथे प्रत्येकजण मराठी दिवाळीवर हॅपी नावाचा अंग्रेजी मुकुट चढवत अभिनंदन झेलत होता.
पण हे सगळे ढोंगी होते, कॅलेंडरवरची सुट्टी पाहून एकत्र आलेले, होऊ घातलेले अानंदी मुखवटे सगळे...

यांच्या कपड्यांपासून फराळा पर्यंत सर्वकाही विकत घेउन उसना आनंद साजरा करणारे लहान मोठे
अानंदाच्या कारणांपेक्षा तारखांवर सट्टा लावणारे लूजर्स
नव्या कपड्याची मिजास आणि झगमगत्या दिव्यांची आरास कुणाला सांगता ?
तुमच्या काॅस्मेटिक सुखांमागचं अभेद्य असमाधान लपवताना तुम्ही यशस्वी होता का?
मनिप्लांट परवडले, त्यांना निदान माहिती तरी असतं आपण खोटे आहोत ,त्यामुळे प्रकाशाच्या विरोधात सुद्धा वाढायचा ते प्रयत्न करत नाहीत,
माणूस अाणि त्याचं खरं खोटं प्रेस्टीज समजून घेताना तुमची गफलत होत आसेलच की ,

तुम्ही सुद्धा चुकत आसाल माणूस अोळखायला,

मी हे सगळं बोलतोय कारण मीही तुमच्या सारखाच बिनसलेले वेळकाढू सूर माझ्या घशाखाली उतरवतोय,
मीही रया गेलेल्या तावदानांवर रेशमी पडदे, असावेत म्हणून पांघरतोय
मला भिती आहे जेन्व्हा सोसाट्याचा वारा सुटेल तेन्व्हा पडदे आणि तावदानं दोघे उन्मळून पडतील,
तुमचे मुखवटे लपणार नाहीत तुमच्या चेहर्यांसारखे, तेन्व्हा काय कराल ??
वागालंच ना माणसाशी माणसा सारखं!

त्यावेळी मात्र सहानुभूती आणि आशीर्वाद दोघेही खरेच असतिल देवळातल्या घंटे सारखे, जेवढे वाजवाल तेवढेच वाजतील..
भटजी कळेल अशीच पूजा सांगेल,
उतारू रांगेत चढ उतार करतील,
फ्लॅट मध्ये कबुतर डोकावणार नाही आणि
हिजड्याला पैसे देताना कुणी दूवा मोजणार नाही

मग असेल प्रत्येक क्षण एक नवा सण,
कर्तृत्वच नशीब बनेल आणि लोक जुन्या कपड्यातही स्वच्छ दिसू लागतील
मग तारीख पाहून घडी मोडायची गैरसोय वाटेल,
प्रत्येक अवहेलना नवी मस्करी होईल
विरून जातील पूर्वग्रह आणि उरतिल ते फक्त निखळ संवाद....

!नाद!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा रुइकर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क ड क!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!