ऋणनिर्देश

संपादकीय

ऋणनिर्देश

- ऐसीअक्षरे

"नातं म्हणजे एखाद्या कवितेला पडलेलं तलम, अलवार स्वप्नच जणू... लाखो गुलाबांच्या पाकळ्यांवर जमलेले दवबिंदू मोत्यांत रूपांतरित व्हावेत आणि त्यांच्या सरी बनून एकमेकांत गुंफून जाव्यात तशी नात्यांची वीण असते... आपुलकीच्या तंतूंनी गुंफलेलं एक घनश्यामल, गर्भरेशमी वस्त्रच जणू... असं वस्त्र, जुन्या, माहेरच्या आठवणी ल्यालेल्या संदुकीच्या मोहरकोपऱ्यात वर्षानुवर्षं ठेवलं तरी त्याचा पोत, झळाळी, आणि ताजेपणाचा गंध जात नाही... पुन्हा हातात घेतलं की त्याची तलमउब, स्निग्धचांदणी स्पर्श तसाच लोभसवाणा असतो. एखाद्या कुशल कुंभाराने आपल्या चाकावर माती टाकावी, आणि सराईत हाताने पाहाता त्यातून एक घट घडवावा तशी नाती घडतात. दुःखांच्या आवीत तावून सुलाखून दृढ होतात. आणि अचानक एखाद्या धक्क्याने त्यांचे तुकडेतुकडेही होतात...."

असं काहीतरी वाचायला मिळेल अशी तुमची 'नातीगोती' असा विषय पाहून समजूत झालेली असेल तर त्या कल्पनेचं मडकं भाजण्याआधीच फोडून टाका. कारण ऐसीच्या दिवाळी अंकात अशा दवणीयतेला स्थान नाही. या अंकाचे लेखक-संपादक-वाचक त्यापलिकडे काही देण्याघेण्याची अपेक्षा ठेवतात हे आम्ही जाणून आहोत. त्यादृष्टीने अनेक लोकांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून हा ऐसीचा पाचवा दिवाळी अंक आम्ही सादर करत आहोत. तो बहुतेक वाचकांना आवडेल अशी आशा आहे.

या अंकासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आभार.

- संपादक

---

श्रेयनामावली

संपादक -
राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, जयदीप चिपलकट्टी

संपादन साहाय्य -
चिंतातुर जंतू, मुक्तसुनीत, साती

मुद्रितशोधन -
नंदन, साती, मन, मिहिर, अंतराआनंद

प्रसिद्धी -
संदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी

तंत्रसाहाय्य -
३_१४ विक्षिप्त अदिती

मुखपृष्ठ व सजावट -
संदीप देशपांडे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कारण ऐसीच्या दिवाळी अंकात अशा दवणीयतेला स्थान नाही. या अंकाचे लेखक-संपादक-वाचक त्यापलिकडे काही देण्याघेण्याची अपेक्षा ठेवतात हे आम्ही जाणून आहोत.

टोटली! नाती अजिबात दवणीय नसतात.मस्तपैकी कधी काटेरी तर कधी समृद्ध करणारी, आणि ९९% आपल्यासमोर आरसा धरुन आपला कुरुपपणा दाखवणारीही किंवा दाखवणारीच असतात.
____
ज्या ज्या कोणी हा अंक वाचकांपर्यंत पोहचविण्याचे कष्ट घेतलेले आहेत त्या सर्वांचे आभार. तुम्हाला उदंड पुण्य लाभो. अंक सणसणीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंक वाचतो आहे. आदुबाळ ह्यांची कथा नेहमीप्रमाणेच झकास. जरा धावपळीत असल्याने इकडे फिरकता आलं नाही. अंकाच्या मुद्रित शोधनात माझा सहभाग किरकोळ्/न-के-बराबर आहे. दिलेलं काम मला वेळेत पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0