मैफिल

संगीताची शक्कलं होऊन
त्यावर उगवलेल्या मैफिली,
ओठांना न सावरल्याने
भिजत गेल्या,पसरत गेल्या
कानात येणाऱ्या आवाजासारख्या,
ज्यांना कधीही कोंडलं आत,
थोपटली त्याची पाठ
हजार पिढ्यांसारखी,
बुडवून हात गायकाच्या स्वरात.
तसंच होत गेलं हे नगर या मैफिलीसारखं
ह्यात उगवलेली झाडं
निघून गेलीत पक्षी शोधायला
बाकांवरती फुटपाथ बसलंय,
वाट पावलांना पुरत नाही
वाट सुरांना उरत नाही
वाट जाते सोडून
वाट नेलिये ओढून.
मैफिलीचे प्रेक्षक होते उभे
दाखवत मार्ग रस्त्या रस्त्यांना,
बेजार आवाज घरातून येतात
गायकाकडून घेऊन व्याज.
बर्फाच्या लादीवर ठेवलाय हार्मोनियम
संगीत वाढलं जातय ताटात मैफिलीनंतर,
गच्च मनाने धरण भरलय शहराचं
वाहू लागलय नळातून, नद्यांतून
आलंय मैफिलीच्या उंबरायपर्यंत
दुसऱ्या सकाळी दिसते चौकट भिंत
चौकट खिडकीतून, पुन्हा.

© निनाद पवार

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

*बर्फाच्या लादीवर ठेवलाय हार्मोनियम
संगीत वाढलं जातय ताटात मैफिलीनंतर,*

हे पक्कं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0