पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा

आमची प्रेरणा-पिवळ्या दिव्याला संग्रालयात पाठवा
हे विडंबन कृपया हलकेच घ्या. मूळ लेखाविषयी आम्हाला आदर आहेच.

काळ कुणासाठी थांबत नाही. त्याला पिवळी पुस्तकं कसा अपवाद असणार ?आजच्या डिजीटल युगात त्यांची रवानगी संग्रालयात व्हायला हवी. आजच्या संगणकाच्या जमान्यात भरमसाठ कागद खाणार्‍या पिवळ्या पुस्तकांची आवश्यकता नाही. या पिवळ्या पुस्त़कांवर सरकारने (बंदी असूनही) रितसर बंदी आणायला हवी. काळानुरुप बदलेल्या तंत्रज्ञानाने शून्य कागद जास्त मजकूराचा अवलंब करायला भाग पाडले आहे. कागदटंचाईच्या जमान्यात कागद बचतीचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. पण अजूनही स्वस्तात उपलब्ध होणारी पिवळी पुस्तके वापरली जातात. ही पुस्तके जास्त कागद खाउन अतिशय कमी वाचनानंद देतात. संगणकाची छोटीशी चिप काही जीबी जागा देते. अर्थात हे थोडे महागात बसते पण त्याने फारसा फरक पडत नाही. शहरी भागात रस्तोरस्ती आणि ग्रामीण भागातही काही ठिकाणी अजूनही ही पिवळ्या पुस्तकांची दुकाने मिरवत आहेत. त्यामुळे आजच्या कागद बचतीच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या काळात पिवळ्या पुस्तकांची रवानगी संग्रालयात जायला हवा. यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. आमच्या संगणकप्रिय बंधू- भगिनींनीसुद्धा थोडं समाजकार्य करावं अशी अपेक्षा आहे.

--पीतपुस्तक वाचनपुरे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अर्थात हे थोडे महागात बसते पण त्याने फारसा फरक पडत नाही.

या बाबतीत काही विदा उपलब्ध आहे का? एक सरासरी माणूस आपल्या आयुष्यात किती पिवळी पुस्तकं वाचतो? त्याने किती झाडं खर्ची पडतात?
पण तरीही तत्त्व म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहेच. सजीवसृष्टीतले अनेक प्राणी इतर जिवांना मारतात. पण ते केवळ पोट भरण्यासाठी. तो निसर्गनियमांचाच भाग झाला. मनुष्यच मात्र इतर जिवांची हत्या मौजमजेसाठी करतो. पीत पुस्तकं वाचण्यासाठी झाडं नष्ट करणं हे गंमत म्हणून शिकार करण्यासारखंच नाही का?
प्रत्येक पिवळ्या पुस्तकाच्या वाचकासाठी एक स्वतंत्र पुस्तक तयार करणं थांबून सर्वच मटेरियल डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल तो दिन पर्यावरणाच्या दृष्टीने सोन्याचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंग ढवळ्या पुस्तकांन्हला कुड पाठवायच? वातावरणाच्या परिणामाने आजची ढवळी पुस्तक उद्या पिवळी व्हतीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मंग ढवळ्या पुस्तकांन्हला कुड पाठवायच?

ढवळ्या पुस्तकांना पारदर्शक कव्हर घालून घराच्या दर्शनी भागात ठेवावे म्हंजे आपोआप दुसर्‍यांच्या नजरेस ती पडून त्यांच्या घरी जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

अहो,
उलटा असतो हा प्रकार. आज पिवळी समजली जाणारी उद्या ढवळी म्हणून मान्यता पावतात. बदलत्य वातावरणाच परिणाम..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विडंबन छानच! आवडलं! मात्र पुस्तके संग्रालयातच असतात. त्यांचा संदर्भसाहित्य म्हणून चांगला उपयोग होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि या संगणकांच्या चिपांच्या रिसायकलिंगचं काय? उगाच आमचं पर्यावरण नासवू नका तुमच्या या पिवळ्या चिपांनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या संगणकांच्या चिपांच्या रिसायकलिंगचं काय?

अहो, आजच्या या संगणकाच्या युगात चिपापण रिसायकलेबल निघाल्यात, आहात कुठं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

या बाबतीत काही विदा उपलब्ध आहे का?

एक २ जीबीचा फ्लॅश ड्राईव्ह साधारण २००/२५० रू. ला मिळतो तर पिवळे पुस्तक १५ ते २० रू. ला एक. अर्थात फ्लॅश ड्राईव्ह थोडा महागातच असला तरी अंतिमतः फायद्याचाच ठरतो कारण तो आपल्यात कित्येक पिवळी पुस्तके त्यांच्या चित्रमय हालचालींसह आपल्यात सामावून घेऊ शकतो.

एक सरासरी माणूस आपल्या आयुष्यात किती पिवळी पुस्तकं वाचतो?त्याने किती झाडं खर्ची पडतात?

एक सरासरी माणूस का एक माणूस किती सरासरी पुस्तकं? अर्थात याचा खात्रीशीर विदा उपलब्ध नाही पण एक माणूस निदान कमीत कमी एक तर पिवळे पुस्तक वाचतो असा अनुभव आहे. सुहास शिरवळकराचे 'कळप' तुम्ही वाचलेलेच असणार यात तुम्हाला पिवळ्या पुस्तकांचे सर्व अर्थकारण, समाजकारण समजून येईलच. वाचले नसले तर जरूर वाचाच. अर्थात किती झाडे नष्ट होतात हा मुद्दा नसून झाड नष्ट होणे हाच मुद्दा आहे.

सर्वच मटेरियल डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल

सध्यातरी बर्‍याचशा डिजिटल मटेरियलमुळे पीत पुस्तकांची संख्या हळूहळू का होईना प निश्चितपणे कमी होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

एक माणूस निदान कमीत कमी एक तर पिवळे पुस्तक वाचतो असा अनुभव आहे.

माझा असा अनुभव नाही. काही माणसं एकही पिवळं पुस्तक वाचत नाही असा माझा अनुभव आहे; ही सर्व बाईमाणसं आहेत.

तस्मात ही पुरूषांचा नेहेमीचा कांगावा आहे. आधी प्रश्न निर्माण करायचा आणि नंतर त्याचं समाधान शोधत बसायचं जेणेकरून आमच्यासारख्या करदात्यांचा पैसा त्यांना उडवता येईल. निषेध, निषेध, निषेध!

जगातील सर्व पाशवी शक्तींनो, एकत्र व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही माणसं एकही पिवळं पुस्तक वाचत नाही असा माझा अनुभव आहे; ही सर्व बाईमाणसं आहेत.

याचा काही विदा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? असल्यास जरूर द्यावा. आमच्याकडे याचा काहीही विदा उपलब्ध नाही हेही येथे सांगू इच्छितो. कदाचित एकापेक्षा जास्तही वेळा ही पुस्तके वाचली जातात असे रेल्वे स्टेशन, एस्टी स्टँड, पथारीवरील पुस्तकांच्या विक्रीच्या खपांनी निदर्शनास आलेले आहे. अधिक माहितीसाठी गेल्या वर्षीचे सुप्रसिद्ध संध्यानंद दैनिकाचे काही अंक चाळावेत.

जगातील सर्व पाशवी शक्तींनो, एकत्र व्हा.

पाशवी शक्तींनो एकत्र व्हा, तुमच्या समोर यावेळी असूर उभे ठाकले आहेत.( येथे आसुरी हास्याची स्मायली कल्पावी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

याचा काही विदा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? असल्यास जरूर द्यावा.

मी स्वतः बाईमाणूस असून मी एकही पिवळे पुस्तक वाचलेले नाही. विश्वास ठेवा हो, एकेकाळी मी फार निरागस होते. तसे माझ्या ओळखीतल्या अनेक स्त्रिया आणि मुलींनी (वय वर्ष २५ असले तरी मुलगीच) पिवळी पुस्तके वाचलेली नाहीत. माझ्या ओळखीतल्या सर्व स्त्रियांचा मी लवकरच एक सर्व्हे घेणार असून त्याचा विदा तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल.

आमच्याकडे याचा काहीही विदा उपलब्ध नाही हेही येथे सांगू इच्छितो. कदाचित एकापेक्षा जास्तही वेळा ही पुस्तके वाचली जातात असे रेल्वे स्टेशन, एस्टी स्टँड, पथारीवरील पुस्तकांच्या विक्रीच्या खपांनी निदर्शनास आलेले आहे. अधिक माहितीसाठी गेल्या वर्षीचे सुप्रसिद्ध संध्यानंद दैनिकाचे काही अंक चाळावेत.

जसे बोभाटा म्हणजे कीर्ती नव्हे तसेच विक्री आणि खप म्हणजे वाचन नव्हे. तेव्हा तुमची विदा घेण्याची पद्धत चुकलेली आहे असे मी नमूद करू इच्छिते.

पाशवी शक्तींनो एकत्र व्हा, तुमच्या समोर यावेळी असूर उभे ठाकले आहेत.( येथे आसुरी हास्याची स्मायली कल्पावी)

हा हा हा हा ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मीही वाचलेले नाही. बहुधा वाचणारही नाही.

आता किमान २ झाल्या.

तशी पिवळ्यापेक्षा काळी पांढरी पुस्तकं (की चोपडी) वाचायला मिळाली तर इतरांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवीन म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तशी पिवळ्यापेक्षा काळी पांढरी पुस्तकं (की चोपडी) वाचायला मिळाली तर इतरांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवीन म्हणते.

ते काम चित्रगुप्ताचं, की इथही स्त्रीमुक्तीवाल्या घुसखोरी करणार आता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

ते नाव चित्रगुप्त नसून चित्रा गुप्ते असावे असा मला दाट संशय आहे. पुरुषप्रधान संस्कृतीने पुढे त्यात ढवळाढवळ करून ते चित्रगुप्त बनवून टाकले. (अन्यथा, चित्रगुप्तला अर्थ काय? गाय आली आणि गवत खाऊन गेली टैप कै तरी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते नाव चित्रगुप्त नसून चित्रा गुप्ते असावे असा मला दाट संशय आहे.

स्वर्गात अथवा नरकात आडनावे प्रचलित असल्याचे आतापर्यंत कुठेच आढळांत आलेले नाही तस्मात ती चित्रा गुप्ते नसून असलीच तर चित्रगुप्तीण बाई असावी असे येथे आम्ही म्हणू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

अरेच्चा! हा बायकांवर अन्याय आहेच पण समस्त मराठी बांधवांवर अन्याय आहे.

सर्व स्वर्गस्थ देव नाहीत का?

इंद्र देव
वरूण देव
विष्णू देव
ब्रह्म देव

आणि आमची चित्रा गुप्ते

कालौघात गोष्टी बदलतात. कोणातरी चापलूसाने त्यांची आडनावे काढून इंद्रदेव, ब्रह्मदेव असं एकच जोडनाव केलं.

सर्व स्वर्गस्थ देव मराठी होते/आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंद्र देव
वरूण देव
विष्णू देव
ब्रह्म देव

नाही हो, आडनावे नसून जमाती होत असे आमचे मत. आमची असुर जमात पण त्यातलीच की. आम्ही गमतीने देवांना सुर असेही म्हणायचो कारण ते सुरापानही करत. आम्ही ते करत नसल्याने झालो असुर.

सर्व स्वर्गस्थ देव मराठी होते/आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.

आम्हाला राहुल देव नावाचा अभिनेता माहीत आहे, तो मराठी नसून पंजाबी आहे हे देखील माहित आहे. अर्थात तुमच्या मताप्रमाणे तो नरकात जाणार हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

नाही हो, आडनावे नसून जमाती होत असे आमचे मत. आमची असुर जमात पण त्यातलीच की. आम्ही गमतीने देवांना सुर असेही म्हणायचो कारण ते सुरापानही करत. आम्ही ते करत नसल्याने झालो असुर.

अहो, जमातींचीच आडनावे होतात. वंजारी, गुजर इ. इ. तसेच देव.

आम्हाला राहुल देव नावाचा अभिनेता माहीत आहे, तो मराठी नसून पंजाबी आहे हे देखील माहित आहे. अर्थात तुमच्या मताप्रमाणे तो नरकात जाणार हे नक्की.

नरकात जाणारच. मराठी माणसाच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा ठेकाच घेतला आहे या अमराठी भाषकांनी. आता तर आमच्या आडनावांवरही हक्क सांगू लागले.

बायदवे, अप्सरा आली... हे गाणे ऐकल्या पासून सर्व अप्सरांची आडनावे "कुलकर्णी" असावी यावरही मी विश्वास ठेवू लागले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, जमातींचीच आडनावे होतात.

म्हणजे या (मूळ का होईना पण) जमाती आहेत हा आमचा मुद्दा तुम्हाला पटला तर...:)

हे गाणे ऐकल्या पासून सर्व अप्सरांची आडनावे "कुलकर्णी" असावी यावरही मी विश्वास ठेवू लागले आहे.

हा हा हा हा हा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मीसुद्धा न वाचणार्‍यातली आहे... नोंद घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

घ्या, हा तिसरा विदा-बिंदू (डेटा पॉईंट हो!) आमचा. तुम्हा पुरूषांचीच फ्याडं आहेत ही. सर्व पाशवी शक्तींतर्फे या पीतप्रेमींचा निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घ्या, हा तिसरा विदा-बिंदू (डेटा पॉईंट हो!) आमचा.

कुठेय हो विदा बिंदू? काहीही दिसत नाही.

सर्व पाशवी शक्तींतर्फे या पीतप्रेमींचा निषेध.

निषेधास फाट्यावर मारले गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

पुन्हा एकदा निषेध.

याच धाग्यावर तीन स्त्रिया/मुलींनी नोंद केली आहे की त्यांनी एकही पिवळे पुस्तक वाचले/पाहिलेले नाहीत तरी तुम्ही त्याला नाही म्हणता! हाच तो पुरूषी कावा आहे. स्त्रियांवर होणार हा ढळढळीत अन्याय आहे. "औरतें खतरे मे" ही प्रियाली देवींनी दिलेली हाळी अतिशय योग्य आहे. तुमच्यासारख्या स्त्रीद्वेष्ट्यांचा निषेध फाट्यावर मारणं मी फाट्यावर मारते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याच धाग्यावर तीन स्त्रिया/मुलींनी नोंद केली आहे

याच धाग्यावर एका स्त्री आयडीने पण असले पुस्तक वाचल्याचे म्हटले आहे. तेव्हा निदान २५% स्त्री आयडी ही पुस्तके वाचतात असे गृहित धरण्यास हरकत नाही. Wink (हा विदा तुम्हीच दिलेला असल्याने पूर्णपणे शात्रीय गृहितकावरच आधारलेला असेल नाही का?)

औरतें खतरे मे"

औरतें खतरे मे हे नका म्हणू हो, हवं तर पाशवी शक्ती खतरे मे हैं असं म्हणा. आमचा फक्त स्त्रियांमधील पाशवी शक्तींवरच आ़क्षेप आहे. त्यामुळे आम्हाला फाट्यावर मारणे हे आम्ही क्षम्य समजतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

हा विदा तुम्हीच दिलेला असल्याने पूर्णपणे शात्रीय गृहितकावरच आधारलेला असेल नाही का?

होय तर! आता मी माझं नाव अदिती शास्त्री असंच लावणार आहे. Wink

औरतें खतरे मे हे नका म्हणू हो, हवं तर पाशवी शक्ती खतरे मे हैं असं म्हणा. आमचा फक्त स्त्रियांमधील पाशवी शक्तींवरच आ़क्षेप आहे. त्यामुळे आम्हाला फाट्यावर मारणे हे आम्ही क्षम्य समजतो.

छ्या! तुमचा अभ्यास कमी पडतो आहे. अहो, जुनी पुराणी टंकलिखितं वाचून काढा, स्त्रिया पाशवीच असतात हे तुमच्या लक्षात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय तर! आता मी माझं नाव अदिती शास्त्री असंच लावणार आहे.

अदिती(पाशवी) शास्त्री असे नाव लावा हो. ते जास्त शोभून दिसेल.

स्त्रिया पाशवीच असतात हे तुमच्या लक्षात येईल.

जुनी टंकलिखिते चाळून पाहता आमचे असे मत पडले की प्रत्येक स्त्री पाशवी नसते पण प्रत्येक पाशवी शक्ती मात्र स्त्रीच असते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मी देखील पिवळी पुस्तकं वाचलेली नाहीत.
साधीसुधी खाकी** पुस्तकंच वाचली आहेत Wink
** आमच्या शेजारच्या आंटीच्याकडे मिल्स अँड बून, सिल्हूवेट इ चा साठा होता. त्यांची मुलगी माझ्याहून जरा लहान आणि मुलगा जरा मोठा. त्यांच्या बालमनावर अनिष्ट परिणाम होऊ नयेत म्हणून ही पुस्तकं ब्राउनपेपरचं कव्हर घालून आणि आंटींच्या कपाटात लपवून ठेवलेली असत. मुलांच्या नकळत वाचण्याच्या बोलीवर ती मला वाचायला मिळत.**

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व स्त्रियांचा मी लवकरच एक सर्व्हे घेणार असून त्याचा विदा तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल.

धन्यवाद, विदाची आतुरतेने वाट पाहात आहे.

तेव्हा तुमची विदा घेण्याची पद्धत चुकलेली आहे असे मी नमूद करू इच्छिते.

पद्धत चुकलेली आहे हे मान्य, पण विदा चुकलेला नाही हे निश्चित. पिवळी पुस्तके ही फक्त निव्वळ वाचण्याचीच चीज नाही तर बघण्याची सुद्धा आहे. जेणेकरून निरक्षरांनाही ती सहजपणे आकलनता यावीत. अहो एक चित्र हजार शब्दांचे काम करते ते म्हणतात ना ते यासाठीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

तुमच्या आधीच्या प्रतिसादात हे वाक्य होतं: एकापेक्षा जास्तही वेळा ही पुस्तके वाचली जातात आणि आता म्हणत आहात, पिवळी पुस्तके ही फक्त निव्वळ वाचण्याचीच चीज नाही तर बघण्याची सुद्धा आहे.

याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही गोलपोस्ट बदलत आहात. हा ही एक पुरूषी कावा आहे, पण मी त्याला बळी पडणार नाही.

पद्धत चुकलेली आहे हे मान्य, पण विदा चुकलेला नाही हे निश्चित.

मुद्दलात पद्धतच चुकलेली असल्यामुळे विदा कसा मान्य करायचा? हे अशास्त्रीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही गोलपोस्ट बदलत आहात. हा ही एक पुरूषी कावा आहे

आम्ही गोलपोस्ट बदलणारे कोण हो, आमचे मत अजूनही कायमच आहे. निव्वळ वाचण्याचीच चीज नाही तर बघण्याची सुद्धा यात वाचन हा घटक समाविष्ट आहेच्, फक्त त्याला बघायची जोदही मिळालेली आहे.

हे अशास्त्रीय आहे.

अहो आईनस्टाइन पण आधीच चुकलाच ना जनरल थियरी लिहितांना, म्हणून मग त्याने नंतर स्पेशल थियरी लिहीली ना, पण त्याचा बहुतेक विदा तर समान होताच की अर्थात ही थियरी तुम्हास अधिक माहित आहे, आम्ही तर यात पामर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

आम्ही गोलपोस्ट बदलणारे कोण हो, आमचे मत अजूनही कायमच आहे. निव्वळ वाचण्याचीच चीज नाही तर बघण्याची सुद्धा यात वाचन हा घटक समाविष्ट आहेच्, फक्त त्याला बघायची जोदही मिळालेली आहे.

तुम्ही आता म्हणाला की फक्त वाचन आणि बघण्याची नाही, विकण्याचीही आहे, बोलण्याचीही आहे. फुटबॉलचा बॉल वापरून क्रिकेट खेळायला लागलात तर बोल्ड होणारच नाहीत तुम्ही. ही शुद्ध फसवणूक आहे.

अहो आईनस्टाइन पण आधीच चुकलाच ना जनरल थियरी लिहितांना, म्हणून मग त्याने नंतर स्पेशल थियरी लिहीली ना, पण त्याचा बहुतेक विदा तर समान होताच की अर्थात ही थियरी तुम्हास अधिक माहित आहे, आम्ही तर यात पामर.

नाही नाही, स्पेशल थिअरी कमी पडत होती म्हणून जनरल थिअरी लिहीली. तुम्हाला हे माहित्ये का त्याचं जनप्रसिद्ध वस्तूमान-ऊर्जेचं समीकरण, ते ही स्त्रीनेच लिहीलेलं आहे. का म्हणून विचारू नका, थोडा विचार करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही आता म्हणाला की फक्त वाचन आणि बघण्याची नाही, विकण्याचीही आहे, बोलण्याचीही आहे.

असे अजूनतरी आम्ही म्हणालो नाही तेव्हा हवेतल्या गप्पा मारण्यात काय हशील? अर्थात आम्ही पूर्णपणे सेट बॅट्समन असल्याने आम्हाला क्रिकेटचा चेंडूही फूटबॉलप्रमाणे दिसत असल्यात त्यात आमची काय चूक? आमचे कौशल्य तुम्हास फसवणूक वाटत असल्याचा खेद वाटला.

स्पेशल थिअरी कमी पडत होती म्हणून जनरल थिअरी लिहीली. तुम्हाला हे माहित्ये का त्याचं जनप्रसिद्ध वस्तूमान-ऊर्जेचं समीकरण, ते ही स्त्रीनेच लिहीलेलं आहे.

आम्ही आधीच म्हटलंय-त्यात आम्ही पामर. सबब हा मुद्दा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

काही माणसं एकही पिवळं पुस्तक वाचत नाही असा माझा अनुभव आहे; ही सर्व बाईमाणसं आहेत.

अरेरे, म्हणजे स्त्रीमुक्तीची चळवळ इथे मागे पडली तर. स्त्री-पुरुष समानता हवी तर सगळ्याच आघाड्यांवर सारखंच पुढे नको का रहायला?

जगातील सर्व पाशवी शक्तींनो, एकत्र व्हा.

एकत्र होऊन खालील प्रश्नाचं उत्तर द्या.
प्रश्न - जॉन अब्राहामच्या फोटोंना कलात्मक म्हणावं की पीत म्हणावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे, म्हणजे स्त्रीमुक्तीची चळवळ इथे मागे पडली तर. स्त्री-पुरुष समानता हवी तर सगळ्याच आघाड्यांवर सारखंच पुढे नको का रहायला?

छ्या, त्यापेक्षा पुरूषांची पाय खेचण्यात बरोबरी करण्यात आम्हाला जास्त रस आहे. पिवळ्या पुस्तकांवर बंदी आणलीच पाहिजे.

एकत्र होऊन खालील प्रश्नाचं उत्तर द्या.
प्रश्न - जॉन अब्राहामच्या फोटोंना कलात्मक म्हणावं की पीत म्हणावं?

त्यासाठी एकत्र कशाला व्हायला पाहिजे? त्याचं उत्तर आम्ही एकेकट्याही देऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिवळ्या पुस्तकांवर बंदी आणलीच पाहिजे.

तेच म्हणतोय हो, तुम्ही लेख नीट वाचलेला दिसत नाही. आम्ही स्पष्टच म्हणतोय, आजच्या डिजीटल युगात पुस्तकं कशाला हवीत. तेव्हा बंदी आणल्यास आमचे काहीच म्हणणे नाही.

त्याचं उत्तर आम्ही एकेकट्याही देऊ शकतो.

मग द्या की उत्तर. आम्ही त्याला पीतकलात्मक फोटो असेही म्हणू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

तेच म्हणतोय हो, तुम्ही लेख नीट वाचलेला दिसत नाही. आम्ही स्पष्टच म्हणतोय, आजच्या डिजीटल युगात पुस्तकं कशाला हवीत. तेव्हा बंदी आणल्यास आमचे काहीच म्हणणे नाही.

तसे नव्हे, उद्या तुम्ही म्हणाल की पिवळ्या चिपांनी हरित गृह परिणाम होतो. मग त्यांवर उपाय शोधा. त्यापेक्षा पिवळी पुस्तकं, पिवळ्या चिपा सगळंच बंद करा. कशाला हवी आहेत ही नाटकं? ही सगळी पुरूषी निरूपयोगी फ्याडं आहेत.

मग द्या की उत्तर. आम्ही त्याला पीतकलात्मक फोटो असेही म्हणू इच्छितो.

तुम्हाला मेली सौंदर्याची कदरच नाही त्याला आम्ही काय करणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिवळ्या चिपांनी हरित गृह परिणाम होतो.

आता उद्याचं कोणी बघितलय, पण चिपा एकतर रिसायकलेबल आहेत शिवाय आजकाल जैविक विघटनशील चिपा पण निघाल्यात म्हणे.

ही सगळी पुरूषी निरूपयोगी फ्याडं आहेत.

निरुपयोगी काय हो, नित्योपयोगी म्हणा हवं तर.

तुम्हाला मेली सौंदर्याची कदरच नाही त्याला आम्ही काय करणार!

आता आम्ही विद्या बालनचे डर्टी पिक्चर मध्ये फोटू पाह्यचे का जॉनरावाचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

संग्रहालयात पाठवल्याने चांगली जीनबँक तयार होईल का? यावरही ऊहापोह व्हावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिवळे पुस्तक म्हणजे काय हेच कळले नसल्याने धागा फाट्यावर मारला होता नंतर बरीच चर्चा वाचनात आली. पीतपत्रकारीता म्हणतात ते म्हणायचय का? ते म्हणजे तरी काय Sad
एकंदर पिवळी पुस्तके, पीतपत्रकारीता याबाबात घोर अज्ञान आहे तेव्हा पिवळे पुस्तक वाचले आहे की नाही हे सांगू शकत नाही.

बाकी चर्चा वाचून शंका येते की "चावट" पुस्तकांना पिवळे पुस्तक म्हणतात की काय? मग तसे एक पुस्तक वाचले आहे. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी चर्चा वाचून शंका येते की "चावट" पुस्तकांना पिवळे पुस्तक म्हणतात की काय? मग तसे एक पुस्तक वाचले आहे.

एकच? का?
पण असो, एक तरी पुस्तक वाचणारी एक स्त्री (आयडी) इथं आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामान्यत: स्टेशनवरच्या पेपरवाल्याकडे तिकडल्या कोपर्‍यात दडवून ठेवलेल्या, पिवळ्या जिलेटिन पेपरात गुंडाळून ठेवलेल्या 'आकर्षक' पुस्तकांना पिवळी पुस्तके म्हणतात. युक्ती अशी की विकत घेऊन रॅपर उघडल्याशिवाय आत काय लिहिले आहे, हे समजू नये. आत बहुधा विर्यनाश म्हणजे मृत्यू व तत्सम तारे तोडलेले असतात.
याच धरतीवर, दोन्ही बाजूंना पिना मारलेली पुस्तके असतात. दोन्ही म्हणजे 'स्पाईन' च्या बाजूनेही अन जिकडून पुस्तक उघडायला हवे तिकडेही. बहुधा बॉईज होस्टेल वर गाद्यांखाली ही पुस्तके लपविलेली असतात.

आता 'फाट्यावर मारणे' हा वाक्प्रचार येतो अन पिवळी पुस्तके म्हणजे काय ठाउक नाही हे पचायला जरा जड जातंय.. *दिवे घ्या*
रच्याकने.. पिवळ्या पुस्तकांवरून इथं इतका हैदोस होईल अन होऊ दिला जाईल याची कल्पना नव्हती. नायतर पैला प्रतिसाद टाकला अस्ता. उग्ग लिव्लेला खोडून टाकला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नॅन्सी फ्रायडे उमेदीच्या काळात जी पुस्तके लिहीत असत, त्यांना चावट पुस्तके म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>

आता खाली दिलेली चित्रे पाहा. त्यात दाखविली आहेत तशी पुस्तके तुम्ही कधी वाचली आहेत का?

P1

P2

P3

अशा पुस्तकांची पाने पिवळी असतात. आता बहुतेक ही सर्व मोडीत निघाली आहेत. त्याऐवजी यातील माहिती संकेतस्थळ, तबकडी यावर साठविली जाते. तसेच टेलिफोन कॉल सुविधेवरही ही माहिती उपलब्ध होते. जस्ट डायलविषयी ठाऊक असेलच. नसल्यास कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अमिताभ बच्चन त्याची जाहिरात करतात ती पाहावी.

>

होय, तशा पुस्तकांना देखील पिवळे पुस्तक म्हणतात. त्याविषयी जास्त काही इथे मांडत नाही. फारूक शेख, दीप्ती नवल यांचा साथ साथ चित्रपट पाहावा. अजून तपशील कळतील.

हा धागा ज्या धाग्याचे विडंबन आहे तिथेच शीर्षकात मोठी गफलत झालीय. हे मान्य की पारंपारिक दिवे पिवळ्या रंगाचा प्रकाश देतात पण म्हणून त्यांचा उल्लेख पिवळा दिवा करू नये. इन्कॅन्डेसन्ट लॅम्प असे त्याचे शास्त्रीय नाव असून ते दुधी रंगात देखील उपलब्ध असतात. शिवाय १५ वॅट मध्ये घेतल्यास काळा सोडून इतर सर्व रंगात उपलब्ध असतात.

जर मूळ धाग्यात योग्य शीर्षक वापरले असते तर हा धागा काढण्याची वेळच आली नसती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

pivale pustak

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे गंडवतात असं दिसतं. मुखपृष्ठच बोलतंय की आत काही असणार नाही. Wink
पुस्तकांचं कव्हर पुस्तक झाकण्यासाठी नसतं, तर त्यातून पुस्तक उलगडलं पाहिजं, असं कोणी प्रकाशक कधी काळी मुखपृष्ठकाराला सांगत होते म्हणतात. मुसु, घासु, चिंतु यांनी अधिक प्रकाश टाकावा, ही नम्र विनंती. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅमेझॉनवाले ही पुस्तके पिवळ्या जिलेटन पेपरमध्ये र्‍याप करून शिप करतात का?

अशीच आपली चौकशी... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीतपुस्तक हा शब्दच आज पहिल्यादा वाचला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

एरॉटिक वाचण्याची आवड सर्वांनाच असते ब्वॉ.बर्‍याचश्या बायका "मी नाही त्यातली कडी लावा आतली" प्रकारात मोडतात असे माझे निरिक्षण आहे. म्हणजे एकट्या असतील तर सगळे वाचतील .आणि नवरा आला तर दासबोध उघडतील.मला ईरॉटिक वाचायला आवड्त नाही म्हणणारी व्यक्ती फक्त संट कॅटॅगरीतली असू शकते असे आमचे ठाम मत आहे ब्वॉ.

ईरॉटि़क टार्‍या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

कधीकाळी ऑर्कूटवर नांदत होतो त्यात प्रोफाइलमधे टर्न ओन्स मधे एरोटीका ओप्शनही सिलेक्ट केला होता तर केव्हडं काहूर माजलं होतं. खरडींना वैतागलो होतो की मी असे कसे काय लिहू शकतो म्हणून... मग काय एरोटीका काय टर्न ऑफ लिहायचे ? अर्थात ऑर्कूटने तो ओप्शन टर्न ऑफ मधे घूसडला न्हवता यातच सर्व आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्या जमान्यातील चर्चा वाचून मजा आली. पिवळे पुस्तक हा प्रकार वाचनात आला नाही. पण एक प्रश्न आहे जर निळ्या चित्रफितीला पिवळी चित्रफीत का बोलत नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाक्यरचना - 'जर'ची गरज काय आणि बोलत म्हणत नाहीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिवळे साहित्य या शब्दशः भाषांतरामागे 1894-97 या काळात The Yellow Book नावाचे त्रैमासिक होते https://en.wikipedia.org/wiki/The_Yellow_Book
त्यातील provocative हा भाग मराठीत उद्दिपीत या अर्थानेच वापरला जातो असे दिसते.
फ्रेंच साहित्यात अशा लेखनाची परंपरा थोर आहे. मात्र त्याची संभावना तुच्छतेने होत नाही.
1782साली प्रसिद्ध झालेल्या ले लिएझों दांजरझ या पत्ररूपी कादंबरीने त्या समाजाला आरसाच दाखवला असं मानलं जातं. मी त्याच्या काही लिंक्स शोधू पाहिल्या. विकिपिडियाची तेवढी लगेच उघडली.
http://en.wikipedia.org/wiki/Les_Liaisons_dangereuses
पत्र क्र. 52 अफलातून (दुस-याचे मुद्दे highjack करून वर त्यालाच फशी पाडणं). त्यावर 2-3 चित्रपटही निघाले. मी पाहिला त्याचं नाव त्यातल्या एका पात्राचं आहे – Valmont - व्हालमों - त्याला इंग्रजी सबटायटल्स होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, हे माहिती नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं