प्राण

दुरस्थ कंदिलप्रकाशात

चालतोय आपण.

अंधार काजळीचं विश्वरुप

विद्ध करणारया,

प्रकाशकिरणाचं बोट पकडून.

दुतर्फा उभ्या पसरलेल्या,

आरशांच्या भिंतींतुन,

थरारताहेत आपल्या

भयाण, निश्चल

सावल्यांची प्रतिबिंबं.

त्या मानवीय नाहीत.

त्यांना पाय नाहीत.

त्या नीरव शोकावर्तात

कालबद्ध आहेत.

त्यांची काजळी

लावून घेऊ

आपल्या व्रणांना.

त्याने आपण एक होऊ?

निदान आपली प्रारब्धं?

आपण एकमेकांचे कोण?

ते माहित नाही.

तरी इथे नजरेत दिसतोय

तुझ्या अभावांना माझा चेहरा

नी माझ्या अभावांना तुझा.

तुच आहेस माझी पायवाट

म्हणून सांगतो,

या कंदिलापलिकडे आपण

अनादि नसु.

पण कंदिलच आहे आपल्या

ब्रम्हाची सीमा.

मर्यादेच्या काठावरुन

कलंडणारी अमर्यादा!

तसं आपणा दोघांनाही आहे,

त्या पुरातन शापाचं वरदान.

नी आपण समिधा आहोत.

आपण आर्त आहोत.

आणि आपण चालतोय

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

समजायला जड जात आहे. काहितरी निसटते आहे. कोणीतरी रसग्रहण करा रे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी हेच म्हणणार होते..
कळतेय असे वाटेपर्यंत निसटली!

त्यांची काजळी
लावून घेऊ
आपल्या व्रणांना.
त्याने आपण एक होऊ?
निदान आपली प्रारब्धं?

तरी इथे नजरेत दिसतोय
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.

या ओळींनी पार चकवलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काँलिग घासूगुर्जी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

every second is of infinite value. गोएथेचं हे वाक्य या कवितेचा मुख्य गाभा आहे. मुळतः ही कविता एक स्वप्न आणि एक विचार यांचा मिलाफ आहे. दुरस्थ कंदिलप्रकाशाच्या दिशेने आपण चालतोय आणि चालता चालता याचं ज्ञान होतं की तो कंदिल हातात घेऊन प्रत्यक्ष मृत्यू उभा आहे. संपूर्ण पायवाटेवर शाश्वत दु:खाचा अंधार आहे. स्वतःच्या मृत्यूचं ज्ञान झाल्यावर, आपण जीवनाकडे समरगतेने पाहू शकतोय. सम्रगते मध्ये दोघं आहेत. एकाच शरीरातले. मी आणि माझं प्रतिरुप.
तुझ्या अभावांना माझा चेहरा
नी माझ्या अभावांना तुझा.......कवीचं प्रतिरुप जरी त्याच्यासारखं दिसत असलं तरी ते संपुर्णतः वेगळं आहे. कवीकडे जे आहे, (त्याच्या मर्यादा,भावना,आवड-निवड्,ध्येय) ते या प्रतिरुपाकडे नाही. जे प्रतिरुपाकडे आहे ते कवीकडे नाही. कदाचित दोघंही एकमेकांची स्वप्नं आहेत. एकमेकांना मनात ठेऊन, एकमेकांशी संवाद साधत ते चालताहेत. यातलं कोण खरं आणि कोण खोटं मला माहीत नाही. मी ते वाचकावर सोपवतोय. एखाद्याला कदाचित प्रतिरुपाने हाडामासाच्या कवीला लिहीलेली कविता वाटेल. त्याला मी रोखत नाहीये.
त्यांच्या सावल्या म्हणजे त्यांचं घडून गेलेलं आयुष्य आहे. म्हणून त्या नीरव शोकावर्तात कालबद्ध आहेत. त्यामूळे या सावल्यांची मिश्र काजळी लावुन घेऊ आणि आपण व आपली प्रारब्धं एक करू अशी आशा कवीला वाटतेय.
यापुढे गोएथेचा विचार येतो. पण हा मी विस्त्रुत केला आहे. या आपल्या एकूण अस्तित्वाच्या सम्यक ज्ञानातुन मला या सर्व रुपांचे एक सत्य जाणवतंय. ते म्हणजे मृत्युचा सेकंद जगेपर्यंत आपली अमर्यादा. आपण जिवंतपणी कधीच मर्यादा अनुभवू शकत नाही. मृत्युनंतर आपण मर्यादित होऊ. पण त्याच्याशी तेव्हा आपलं काहीच घेणं देणं उरलेलं नसेल. आपल्याला या पुढे होणार्‍या मर्यादेचं आता ज्ञान होऊ शकेल पण आपण ती अनुभवू शकत नाही. म्हणुन या ओळी येतात. या कंदिलापलिकडे आपण
अनादि नसु.
पण कंदिलच आहे आपल्या
ब्रम्हाची सीमा.
मर्यादेच्या काठावरुन
कलंडणारी अमर्यादा!
पुढे येणार्‍या ओळी......
त्या पुरातन शापाचं वरदान.
नी आपण समिधा आहोत.
आपण आर्त आहोत.
आणि आपण चालतोय......म्हणजे मृत्युचा पुरतन शाप....आपलं आयुष्य समिधा आहे (स्व आणि समाजविकासा साठी)...आणि या अमर्यादित तेचा आनंद घेत उरलेलं जीवन व्यतीत करायचंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता परत वाचली, समजली, आवडली.
मृत्यू ह्या अंतीम सत्याच्या दिशेने वाटचाल करत असताना कवी तटस्थपणे गतआयुष्याकडे पाहत आहे, हे पहिल्या वाचनातही जाणवत होते, पण कवीचा संवाद कोणाशी चालला आहे, हे उमगले नव्हते.

छान विवेचन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेचनानंतर कविता नीट समजली आणि आवडलीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१ असेच म्हणतो
साधारणतः कवीला आपल्याच कवितेचे रसग्रहण करायला सांगितलं तर राज येऊ शकतो (असे अनुभवले आहे).. मात्र तुम्ही आनंदाने ते केलंत (अर्थात त्यामुळे आमच्यासारख्यांना कवितेचा अधिक आनंद घेता आला) हे अधिक आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुला आवडली म्हणजे मी खरंच काहीतरी चांगलं लिहुन गेलो वाटतं...:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कवीने विवेचन केलं आहे, हे आवडलं. नाहीतर अनेक दुर्बोध कविता लिहिणारे अर्थ वाचकावर सोपवून दूर होतात.

आपल्या ब्रह्माची सीमा असलेला, आपल्या प्रवास प्रकाशमान करणारा मृत्यूचा कंदील ही कल्पना आवडली. सामान्यपणे आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू हा लाइट ऍट द एंड ऑफ द टनेल न रहाता प्रकाशाचा नाश या स्वरूपात येतो. हातातली विझत चाललेली प्राणांची दिवटी... बिरबलाच्या एका गोष्टीत एक जण बक्षिसाच्या आशेने रात्रभर थंडगार पाण्यात उभा रहातो. आशेच्या किरणाप्रमाणे बादशहाच्या महालातला एक दिवा त्याला दिसत असतो, आणि त्या मानसिक उबेच्या जोरावर तो ती थंडी सहन करतो. इथे मृत्यू तसाच आपल्या प्रवासाला साथ देतो. आपल्या रस्त्यातला दुःखाचा अंधार उजळतो.

मात्र मी कविता वाचली तेव्हा कवितेतला तू हा मला आपला प्राण वाटला होता. विवेचनात मांडलेली आपलं प्रतिरूप ही कल्पना तितकीशी नीट कळली नाही. मी व माझं प्रतिरूप यांचं नातं नीट सांगितलेलं नाही. माझ्या अभावात तू व तुझ्या अभावात मी यावरून थोडीफार समसमान भागीदारीची जाणीव येते हे खरं आहे. पण ही प्रस्थापित संकल्पना नाही. म्हणून समजावून सांगितली नाही तर अर्थ लावताना चाचपडायला होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेला प्रान हे नाव द्यायचं कारण म्हणजे अस्तित्वाचं समग्र रुप म्हणजे प्राण. त्यामध्ये प्रतिरुपं, त्यांच्या भावना, विशेष हे सगळं आलंच.
याच प्रतिरुपावर मी अजुन काही लिखाण करतोय. तिथे ही स्पष्ट होईलच. तरीही इथे सांगतो, 'आपण असतो.' म्हणजे नेमकं काय? तर स्थलकालानुरुप घडत गेलेलो आपलं अस्तित्व (माहीत असलेलं आणि नकळत व्यक्त होणारं)....पण यापलिकडेही 'आपण अमुक अमुक असावं' अशी आपली प्रत्येकाची संकल्पना असते, ढोबळपणे स्वप्न म्हणुयात. ही स्वप्नं कुठुन जमा होतात? तर आपल्याशी संबंधित असलेले, आपल्याला रुचलेले पटलेले स्टील फ्रेम्स चे तुकडेच एक मुर्त स्वरुप घेतात. 'आपल्या अभावांचे चेहरे'...जे करायचं होतं पण जमू शकलं नाही (स्वभाव). पण शरीरभर मनभर ते वागवत आलो.
प्रतिरुप ठळक होत जाणं आणि त्याचं वास्तवावर सत्ता गाजवणं इथे खरा मी की माझं प्रतिरुप. ते माझं स्वप्नं की मी त्याचं. माहीत नाही. कितीही वेगळे असलॉ तरी आम्ही साफ वेगळे होऊ शकत नाही. मला आंजारणार्‍या, गोंजारणार्‍या,सुखावणार्‍या, दुखावणार्‍या माझा मत्सर जागवणार्‍या त्या प्रतिरुपाशिवाय माझा प्राण माझं समग्रपण साधता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

मी सुस्पष्ट वाटत नसेन, तर कोणीही या विचाराच्या धाग्याला पकडुन हा विचार पुढे विस्तृत करू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre