फेमिनाझी यमराज

हे पुण्य काय भानगड आहे ब्वॉ. ऐसीचा मालक यमराज तर नही ना? नाहीतर उगीच मेल्यावर कळायचे कि वर गेल्यावर पाप-पुण्याचा घडा बघतात तो हाच होता म्हणून.

ऐसीचा मालक का हो ऐसीची मालक नसू शकते का? MCP कुठचे (डोळा मारत) आता गेट युझड टू बीइन्ग कॉल्ड MCP ऊठ्सूठ (लोळून हसत)

Reference साठी हा पोस्ट बघा

पुण्य वैगेरे वाचून ही साईट यमराज तर चालवत नाही ना हा विचार मनात तरळला
तरळला तो तरळला, आम्ही तो सरळ “मनातले छोटे-मोठे विचार” धाग्यावर बरळला

पण तिथे तर एम.सी.पी आणि फेमिनाझनी यांचे जंगी युद्ध पेटलेले
आणि आम्ही तिथं नवख्या फेरीवाल्या सारखे उपटलेले

यमाचा उल्लेख केल्याबद्दल आम्हाला फेमिनाझनींनी आडवे पाडले
मी कोण कुठचा पामर, नाझनींनी तर यमाला पण नाही सोडले

नाझनींनी मोर्चे काढून, बदडून बिद्डून मला पटवून दिले छान
कातील अदाओ से घायाळ करते ती, जीव घेणे हे तर स्त्रीचेच काम

मी मग काबुल केले, यम बाप्या नाहीच, ती आहे एक बाई जाडी
बसते ती ज्याच्यावर तो रेडा नसून आहे ती काळी ठुस्स रेडी

यमाबाई यमराणी यमकुमारी कडे जेव्हा आली पावर
तिने पण करून घेतला हळू हळू तिचा मेकओवर

धोतर जाऊन शालू आला, माळे ऐवजी साज कोल्हापुरी
गदा बदलून लुई व्हीटॉची पर्स गुलाबी शोभली भारी

प्राण न्यायला जाताना जाते नटून-थटून मस्त
मेलेल्याच्या नातेवाईकांपेक्षा हीच मात्र रडते जास्त

धाडते स्मशानात ती लोकांना बड्या-बड्या
मागाहून मात्र करून येते त्यांच्या चाड्या

जन्म-मरणाचा हा धंधा चालतो महिनो्महिने एकदम मस्त
दर २८ दिवसातून एकदा मात्र होतो मामला फस्त

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

:)

हा हा हा.. (स्माईल)

actions not reactions..!...!

शुची चांगली लिहिते हे माहितीच

शुची चांगली लिहिते हे माहितीच आहे पण तुम्ही पंगा घेण्याइतके योकुझोना ( सुमो )आहात. दोन्ही काव्य आवडली.

हाहाहा

हाहाहा

प्रतिक्रिया

फेमिनाझनी

कम

...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
टिकलू meanwhile...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...

तीक्ल्लू

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

बच्चमजी!!!

टिकलुकाका तुम्ही मी डीलीट केलेली पोस्ट अशी चव्हाट्यावर आणली आता तुमची खैरच नाही.
____
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
सार्‍या भातुकलीचा तुम्ही केला चट्टामट्टा
च्या चालीवरती ........
____
(सरोज खरे)
.
टिकाकाका टिकाकाका आवरा आता आवरा
नाहीतर आम्ही तुमचा बनवुन टाकू बकरा
यमशीपी कुठचे तुम्ही सगळे पुरुष सारखे
करायाला पाहीजे तुम्हास आनंदा पारखे
येईल आता टोळधाड लपणार कुठे सांगा
घेतलात ना आम्हा "नाझनीन"शी पंगा
इन्श्युरन्स काढा नाहीतर होइल अ-न-र्थ
यमाच्या रेड्याचा कळेल मग जवळून अर्थ
जागे व्हा गडे बास झाली बागडाबागडी
लागले बघा पंख आता तुमच्या आयडी
म्हणुन म्हणत होते वेळीच जागे व्हा जागे
नका घेऊ आम्हा शक्तीमानांशी पंगे
आलीया भोगासी आता असावे सादर
नाहीच मुळी फुटणार आम्हास पाझर
३_१४, अनु, शुचि सगळे तुटुन पडणार
बघाच आम्ही तुमची पार सालटं सोलणार
.
(सरोज खरे)
____________

तरळला तो तरळला, आम्ही तो सरळ “मनातले छोटे-मोठे विचार” धाग्यावर बरळला

वाहवाह वाहवाह! सुभानल्ला!

मस्त

शेरास सवाशेर...

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

(No subject)

(स्माईल)