१४ लाख कोटींच्या नोटांचं काय करायचं?

सरकारने नुकत्याच ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या असं कळलं. आम्हासारख्या गरीबांना ५०० च्या नोटा अधूनमधून दिसल्या तरी १००० ची नोट वापरण्याची वेळ फारशी येत नाही. म्हणून वाटलं की आख्ख्या देशात मिळून काय, असतील फारतर दीडदोन लाख नोटा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला लोक इतकं महत्त्व का देताहेत हेच कळत नव्हतं. अर्थात, हे फेसबुक-फुरोगामी आणि डावीकडे झुकलेला मीडिया काय कशालाही महत्त्व देतात. पण थोडीफार चौकशी केल्यावर कळलं ही एकंदरीत १४ लाख कोटी रुपये या नोटांमध्ये अडकलेले आहेत. शरीरात एखादा आत्मा अडकून राहावा, तसा एवढ्या मूल्याचा आत्मा अब्जावधी नोटांच्या कुडीत अडकलेला आहे. त्या सर्वच आत्म्यांना मोदीसरकारने मुक्ती दिलेली आहे. पापी आत्मे कुठेतरी पाताळात गाडले जातील आणि पुण्यात्मे दुधावरच्या सायीप्रमाणे तरंगून नवीन देहांमध्ये जन्म घ्यायला तयार होतील अशी काहीशी कल्पना आहे. जरी आत्मा मुक्त झाला तरीही मृत शरीर मागे राहातंच. त्याची काही ना काही विल्हेवाट लावावी लागतेच. आणि इतक्या शरीरांची व्यवस्था करायची तर एकाच वेळी कॉमन लग्नं मुंजी आटपून टाकतात तसंच सामुदायिक काहीतरी करावं लागेल.

पण या आहेत तरी किती नोटा? असला काही प्रश्न आला की एरवी आमचे डोळे लकाकतात. आम्ही काहीतरी गणितं करतो आणि ऐसीकरांना 'अंदाज करा - किती नोटा' वगैरे प्रश्न टाकून टीआरपी वाढवून घेतो. पण यावेळी थोडक्यात उत्तर लिहूनच टाकावं, म्हणजे ऐसीकरांना इतर कामं देता येतील.

सोयीसाठी समजू ४ लाख कोटी १००० च्या नोटांत आहेत, आणि १० लाख कोटी ५०० च्या नोटांत आहेत. म्हणजे सगळ्या मिळून झाल्या २४०० कोटी नोटा! आता यांचा नीट ढिगारा केला तर किती होईल? १०० नोटांसाठी सुमारे १० क्युबिक इंच. २४०० नोटांसाठी २४० क्युबिक इंच. असे साधारण सात गठ्ठे म्हणजे एक क्युबिक फूट. म्हणजे साधारण १२ बाय १२ बाय ८ च्या एका खोलीत सुमारे २ कोटी नोटा मावतील. म्हणजे या नोटा साठवायला असल्या १२०० खोल्यांची बिल्डिंग लागेल! किमान पन्नास मजली इमारतीएवढा ढीग होईल!

आता एवढ्या नोटांना भडाग्नि द्यायचा म्हटला तरी त्यावर प्रचंड पैसा खर्च होईल हे उघडच आहे. मग हा खर्च टाळण्यासाठी काय उपाय करावेत?

१. होळीसाठी नोटांचे गठ्ठे लोकांना फुकट वाटावेत. एवढ्या नोटांमध्ये देशभर लाखभर होळ्या तरी पेटू शकतील. ज्यांचे पैसे बुडलेले आहेत, त्यांना जाहीर बोंबा मारण्याचीही सोय होईल.
२. अभ्याने माणेगुर्जींना जसा नोटांचे शर्ट-पॅंट घातल्येत तसे शर्टपॅंट तयार करावे. एका शर्टासाठी जर १०० नोटा लागत असल्या तर २४ कोटी शर्ट तयार होतील! तसंही लोकांना सोन्याचे शर्ट वगैरे घालण्याची हौस असतेच. घ्या म्हणावं, सगळ्या देशासाठी नोटांचे शर्ट. सरकारला यातून दर शर्टामागे १० रुपये मिळाले तरी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचू शकतील!
३. सिगरेटसाठी कागद. तसेही हे फुकाडे लोक सिगरेटी ओढून पैसे जाळतातच. आता त्यांना बरेच जास्त पैसे जाळण्याचा माजही करता येईल.
४. नोटांचे बाण. सध्या आपण गरीब असल्यामुळे शाळा-कॉलेजातली मुलं साध्या कागदांचे बाण करतात. पण कल्पना करा, तुम्ही हजार रुपयांच्या नोटेचे बाण करून मारलेत तर किती तरुण-तरुणींची मनं विद्ध होतील!
५. नोटांच्या होड्या. पावसाळा संपलेला आहे. तलाव भरलेले आहेत. नद्यांमध्येही पाणी आहे. तेव्हा मुलांना होड्या करण्यासाठी ५०० रुपयांच्या नोटा दिल्यावर त्यांनाही आनंद होणार नाही का? आपले आईबाप श्रीमंत आहेत हे चार दिवस तरी त्यांना पटेलच की.
६. परकीय कर्जफेड. चीनी लोकांना काय कळतंय कुठच्या नोटा चालू आहेत आणि कुठच्या बंद झाल्या आहेत?
७. दौलतजादा. डान्सबारमध्ये जाऊन हजारांच्या शेकडो नोटा उधळण्याची हौस सामान्य मध्यमवर्गीयांना एरवी कशी पुरी करता येईल?
८. पायपुसणं. घरात शिरल्याशिरल्या तुमच्या पाहुण्यांना पाचशे आणि हजारांच्या नोटांचं पायपुसणं दिसलं तर तुमच्या शानोशौकतीत भरच नाही का पडणार?
९. नोटांचा हार. गळ्यात नोटांचे हार घातलेले फोटो फक्त मोठ्या मोठ्या नेत्यांचे दिसतात. सरकारने या नोटा विकल्या, तर सामान्य माणसालाही आख्ख्या कुटुंबाच्या गळ्यात हार घालून सेल्फी काढता येतील.
१०. टिश्यू पेपर. आपले इतके पैसे गेले हे कळल्यावर श्रीमंतांच्या डोळ्यांतून जे अश्रू येतील ते टिपायला काहीतरी नको का? त्या टिशूपेपरकडे बघत कदाचित अश्रूंचे उमाळे वाढतील, तेव्हा गरजेपेक्षा दुप्पटही घेऊन ठेवता येतील.

तुम्हाला आणखीन काही कल्पना सुचत असतील तर जरूर सांगा.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

ही एक आयडिआ.
a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नोटा या लक्ष्मी आहेत. मागच्याच आठवड्यात लक्ष्मीपूजनाला ज्यांची पूजा केली त्यांच्या सुरळ्या करुन शेंगदाणे. अच्छे दिन!!

(इति व्हॉट्सॅप)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसंही लोकांना सोन्याचे शर्ट वगैरे घालण्याची हौस असतेच.

शी!! तो बप्पी लहरी. याईक्स किती व्हल्गर! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शी!! तो बप्पी लहरी. याईक्स किती व्हल्गर!
बप्पीदा नाही. तो फक्त साखळ्या घालतो. हा सोन्याचा शर्ट बनवून घालणारा दत्तात्रय फुगे नावाचा पुण्यातला इसम होता. त्याचा काही महिन्यांपूर्वी कोणीतरी डोक्यात दगड घालून खून केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या पाचशे हजाराच्या जुन्या नोटा ( स्वकष्टाच्या वगैरे नसतील तर म्हणजे काळ्या असतील तर ) चलन म्हणुन खेळावयास
दयाव्या. थोडं रीअ‍ॅलीटीच्या ( चार दिवसांपुर्वीच्या ) रीलल चलना बरोबर व्यापार खेळण्याची मौज वाढेल.
अर्थात हल्लीची पोरं व्यापार वगैरे खेळत असतील तर.
याशिवाय जे सात्विक प्रौढ आहेत म्हणजे ज्यांना जुगार इत्यादी दुरितांचे आकर्षण आहे पण खेळता येत नाही. त्यांना रीअल जुगाराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा अनुभव देण्यासाठी हजार पाचशे च्या नोटा देऊन खेळु द्यावे.
अजुन एक राह्यल ज्यांच्या फॅन्टस्या शिल्लक असतील त्यांना हाताला गजरा बांधुन, मिशीवर ताव मारुन, तोंडात पानाचा तोबरा भरुन, वरच्या गुंड्या उघड्या ठेऊन दौलतजादा करण्यास या नोटा द्याव्यात. म्हणजे आपल ओरीजनल पेमेंट झाल्यावर म्हणतोय. एक आपल फॅन्टसी की खातिर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

वालपेपर होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरळी करुन गांडीत घालावे (दुसर्याच्या)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

-१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

त्या चौदा लाख कोटींतले थोडे पैसे खर्च करा. आणि आणखी थोडा विद्रटपणा करा. हे मुद्दे -
१. किती लोकांना बँकेत जाऊन पैसे बदलावे लागले
२. ह्या कामासाठी एका व्यक्तीला सरासरी किती वेळ लागला
३. कामाच्या वेळेत बँकेत जावं लागल्यामुळे किती उत्पन्न बुडलं
४. १४ लाख कोटी पुन्हा छापण्यासाठी किती खर्च येईल
५. एकूण उत्पन्न आणि खर्च या प्रमाणात व्यवहार आतबट्ट्याचा ठरला का

आणि हे सगळे कष्ट केल्यावर जी उत्तरं येतील ती सुरनळी करून ... योग्य ठिकाणी सारा. कारण शेवटी 'चाणक्य मासा काय म्हणाला', हेच वर्तमानपत्रांत छापून येणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि हे सगळे कष्ट केल्यावर जी उत्तरं येतील ती सुरनळी करून ... योग्य ठिकाणी सारा.

शी!!!!!!!!! SadSad
तू इतरांच्या फालतू सवयी उचलू नकोस Sad
_____________
विद्रटपणा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुंतागुंतीची विधानं लोकांना फारशी आवडत नाहीत; शिकलेल्या लोकांसमोरही चिक्कार डोकेफोड केल्यावर क्वचित, थोडासा काहीतरी बदल दिसतो; या गोष्टी गेली काही वर्षं आंजावर आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या वातावरणात आणि ८ नोव्हेंबरपासून फार दिवस उलटले नसताना 'विद्रट'पणाबद्दल आणखी किती आशावाद बाळगणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला थकवा आलाय. ८ नोव्हेंबरच्या निकालाचे पडसाद आता कुठे मनात उमटु लागले आहेत. ट्रंप फक्त कारणीभूत बाकी ही भुतावळ समाजात होतीच. त्याने फक्त पँडोरा बॉक्स उघडलाय. सिंडी अचानक बोलतच नाहीये. स्टिव्हनने ९ तारखेला डोनटस आणुन त्याचा स्टँड मौनातून दाखवुन दिला. मुलीला शाळेत काय अनुभव येत असतील ते तीच जाणे.
I am fucking tired.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरनळी करून, त्यात तंबाखू वगैरे भरून, एक टोक पेटवून योग्य ठिकाणी (बोले तो, तोंडातच, हं!) सारली तर?

किंवा, तंबाखूचे सोडा. सुरनळी करून, नंतर एका भांड्यात साबणाचे द्रावण घेऊन, सुरनळीचे एक टोक एका योग्य ठिकाणी (बोले तो, त्या साबणाच्या द्रावणात, बरे का!), नि ते सारून झाल्यावर दुसरे टोक दुसर्‍या एका योग्य ठिकाणी (बोले तो, पुन्हा तोंडातच, हं!) सारून, ब्लो केले तर?

एका कन्सेण्टिंग अ‍ॅडल्टचा प्रश्न आहे. आक्षेप घेणार्‍या आपण कोण? (सुरनळीच्या कन्सेण्टचा प्रश्न उद्भवत नाही.)

तसेही, पूर्वी (बोले तो, वैध चलन असताना) सुरनळी न करताच (टेबलाखालून वगैरे) सारली जात होती. तेव्हा कोणाचे काही म्हणणे नव्हते. (तेही बरोबरच, म्हणा. तेव्हा तो दोन कन्सेण्टिंग अ‍ॅडल्ट्सचा मामला होता. आणि तेव्हाही पूर्वाश्रमीच्या बिगरसुरनळीच्या कन्सेण्टला कोणी हिंग लावून विचारत नव्हतेच.) मग आता त्या कु. बिगरसुरनळीची सौ. सुरनळी झाल्यावरच तेवढा का आक्षेप?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकूण उत्पन्न आणि खर्च या प्रमाणात व्यवहार आतबट्ट्याचा ठरला का >> काहीही चूक नाही. It is cost of doing business.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती , माझी उत्तरे १. ATM बंद झाल्यामुळे मला पैसे काढावे लागले. बदलले अजून नाहीयेत कारण एवढा वेळ नाही आत्ता. 30 डिसेम्बर च्या आधी करू. Anyway फार नाहीयेत.२. एकूण तीन तास गेले ,अत्यंत चांगली सेवा बँकेने देऊनही .( बँकेचा हा सौजन्य सप्ताह किती दिवस टिकवू शकतील हे आता सांगणे अवघड )३.किती उत्पन्न बुडले : तासंदारी वर काम करत नसल्याने हे सांगता येणार नाही. आलिया भोगासी , या सदरात टाकले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक भारतभेटीत कुणाचं ना कुणाचं लग्न, मुंज, बारसं वगैरे जावं लागतं. ज्यांची मिस केलेली असतात त्यांनाही समारंभपश्चात आहेर हा करायचा असतोच.
तेंव्हा आपल्याकडला ष्टॉक संपेपर्यंत बंद पाकिटातून ह्या नोटा दिल्या तर? Wink
स्वीकारणार्‍या यजमानांना राग येईल पण देशासाठी त्यांनी तेव्हढा तरी त्याग करायलाच हवा, नाही का?
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी माझ्याकडील नोटा पोस्टाने किंवा मित्रमंडळींसोबत भारतात पाठवणार आहे. त्यांना जमले तर पैसे बदलून घ्यायचा प्रयत्न करतील, नाही तर जाऊ दे. नाहीतरी रद्दीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक भारतभेटीत कुणाचं ना कुणाचं लग्न, मुंज, बारसं वगैरे जावं लागतं. ज्यांची मिस केलेली असतात त्यांनाही समारंभपश्चात आहेर हा करायचा असतोच. तेंव्हा आपल्याकडला ष्टॉक संपेपर्यंत बंद पाकिटातून ह्या नोटा दिल्या तर?

घासू गुर्जी म्हणाले होते की नाईलाजाची नाती कमी होतील. ती प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी ह्याचा उपयोग करावा.

( पळा पळा )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला, म्हणजे तुम्ही नोटा संपवण्यासाठी आख्खी भारतट्रिप करणार तर! हा आतबट्ट्याचा व्यवहार नाही का होणार? कदाचित डांबिसकाका बसलेही असतील वीसतीस लाखांच्या नोटांच्या ढिगाऱ्यावर... तसं असेल तर मग वाटा नोटा. अगदी सुवर्णतुलेसारखी नोटतुला करा! होऊन जाऊदेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉलर, युरो वगैरे चलनात गुंतवणुक करण्याचा पूर्ण परवाना असतांना रुपयात कोण गुंतवणुक करील हो?
तेंव्हा ढिगारा वगैरे नाही पण जे काही हजार-लाख रुपये आहेत ते नव्या नोटांमध्ये चेंज करून घेण्यासाठी एनाराय/ ओसीआय साठी जरा जास्त मुदत (त्यांच्या नेक्स्ट वारीपर्यंत तरी) ठेवावी इतकीच आमची भारतीय सरकारपासून अपेक्षा होती.
आम्ही नोकरदार, आमचा काही ब्लॅक मनी नाही. व्हाईट डॉलर्स रुपयांत कन्व्हर्ट करून घेतलेले. भारतीय सरकार असा काही डिसिजन घेईल ह्याची कल्पना नसल्याने, आणि वेळोवेळी भारतात जायला लागतंच ह्या हिशोबाने रुपयांत ठेवलेले.....
आता भारत सरकार जर हे मान्य करणार नसेल तर नुकसान हे ठरलेलं आहेच. ते असो.
पण आता ते नुकसान भरून कसं काढायचं ते ठरवायला हवं, नाही का?
सारांशः नुकसान तर भरून येणारच! पण कुणाची मारायची, नातेवाईकांची की वर्षानुवर्ष आपण देणगी देत असलेल्या भारतीय चॅरिट्यांची, हाच काय तो एक प्रश्न आहे!!!!!
सोल्यूशन कसंही असलं तरी ते दु:खदायकच!!!
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...पेनाने दाढीमिशा (झालेच तर कपाळावर कुंकू) रंगविल्यास कायदा आड येऊ नये, नाही? बोले तो, 'राष्ट्रीय चलनाची विटंबना'-छाप काही कायदा अस्तित्वात असेल तर... तसेही हे बाद-चलन म्हटल्यावर तांत्रिकदृष्ट्या 'चलन' होऊ नये, नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दिवस हिमाचल मधल्या शून्य प्रदूषित वातावरणात राहून पुन्हा प्रदूषित दिल्लीत परतल्यावर शरीरावर परिणाम झालाच. बहूतेक दिल्लीतील प्रदूषण स्वच्छ करण्यासाठीच हे पाउल उचलले असावे. १४.६ लाख कोटी या नोटा जनते कडे आहे. आपण समजू त्यातल्या ४-५ लक्ष कोटी फिरत असतील. किमान ८ लाख कोटी तिजोरीत बंद पडून असतील. काहीही केले तरी किमान ३-४ लक्ष कोटी व्यर्थ होतील. बाकीची विल्हेवाट:
१. दिल्लीत कुटीर उद्योग सुरु झाले आहे, अनेक गरिबांना रोजगार मिळाला आहे. जनधन योजना आणि आधार कार्डचे महत्व कळले. ५०० रुपये रोज काही दिवस कमविता येतील (लाईनीत लाऊन स्वत:च्या आधार कार्डच्या सहाय्याने ४००० रुपये बदलाने) किंवा खात्यात ४९,००० रुपये जमा करणे (अर्थात कमिशनवर). पहा पैसा आला कि नाही लोकांच्या खात्यात.
२. सरकारी कर्मचार्यांना त्यांचे नातेवाईक फोन करीत आहे, तुम्ही लोक आयकर भरता. आमचे काही पैसे आपल्या खात्यात टाकता का? (एकच लफडा आहे, सरकारी कर्मचार्यांच्या मनात नमोची भीती आहे, अधिकांश कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत).
३. महाराष्ट्रात अनेक लोकांनी थकलेले सरकारी कर भरले, महानगर पालिकांची तिजोरी भरली. कर भरण्यात नेता लोक हि आहे (पैसा खोटा झाला आहे, सरकारवर मारा)- आपण भारीतीय चोर आहोत हि जाणीव अधिकांश लोकांना झाली असेल.
४. डेबिट कार्ड पेटीएम असल्यामुळे भाजीपाला, बटरी रिक्षा (१० रुपये वाला) सोडून मला कसला हि त्रास झाला नाही.
५. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान एकाच कंपनी कडून कागद विकत घेत होते. (माहित असूनही मागील वित्तमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे स्वामीजींचे म्हणणे आहे). किमान ३०-४० हजार कोटींची पाकी नोट बंद झाले - भलतीच अहिष्णुता- आता दाउद आणि हाफिज काय करितील
दगड फेकण्यासाठी मुले भाड्यावर कशी मिळतील.
६. १९७८ ते २०१६ पर्यंत कष्टाने जमविल्या काळाधन नष्ट झाल्यामुळे कित्येक लोक बरबाद झाले.- सत्तेवर नसल्यामुळे पुन्हा धन गोळा करणे मुश्कीलच.
७. अफवा पसरविणे, लोकांना भडकविणे इत्यादी घटना घडण्याची शक्यता - कालच मीठ गायब झाले हि अफवा उठली. अशी अफवा दिल्लीत १९९८ च्या विधान सभेच्या निवणुकी आधी पसरविल्या गेली होती. लोकांनी १० किलो मीठ विकत घेतले आणि नंतर मीठ विरघळून गेल्या मुले रडत बसले. पण अफवा पसरविणारे निवडणूक जिंकले.
७. शेवटी लोकांना digital कारेन्सीचे महत्व कळले, हे महत्वाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौजमजेच्या धाग्यावर फारच गंभीर प्रतिसाद दिलात. पण बरेचसे मुद्दे मान्य.

त्यात सुरू झालेला कुटिरोद्योग दर पाच वर्षांनी सुरू करायला हवा सरकारने. किंबहुना पंचवार्षिक योजनेतच याचा अंतर्भाव करावा. मग त्या काळात दिल्ली, मुंबई, कोलकाता वगैरे मोठ्या शहरांत टुरीझम वाढेल. तिजोऱ्यांत बंद पडलेला पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत खेळायला लागेल. शहरांतल्या लोकल दुकानदारांची चलती होईल. तसंच उरलेले पैसे बाळगून लोक गावांकडे परत जातील. एव्हरीबडी विन्स. मोठ्ठा इव्हेंटच होईल तो. आणि हे सगळं काळा पैसेधाऱ्यांनी स्पॉन्सर करून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या ओळखीत एकाने दहा लाखांची ऑपरेशनं स्पाँसर केली. कॅश पैसे देऊन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

गेल्या चार वर्षांपासून भारतात नोटांचा कागद बनवण्याची प्रक्रिया आकार घेते आहे. हे काम एरवीच्या कागदनिर्मितीइतके सोपे नसते. शिवाय आता नोटांची मागणी खूप वाढली आहे. वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे पाचशे-हजारांच्या अधिक नोटा वापराव्या लागतात आणि अधिकतर लोकांकडे पैसाही खेळू लागला आहे.. त्यामुळे मागणीइतका पुरवठा भारतातून होणे कठिण आहे. निदान काही प्रमाणात तरी दर्जेदार पेपर आयात करावा लागेल. जगात दर्जेदार चलनकागदनिर्मितीच्या काही मोजक्या कंपन्या आहेत आणि अनेक देश त्यांच्याकडून कागद घेतात. जर यामुळे पाकिस्तानला भारतीय चलनाची नक्कल छापण्याची संधी आहे तर तशी ती भारतालाही पाकिस्तानी चलन नकलण्याची आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देशकार्याची ही सुवर्णसंधी आयती चालून आलेली असताना लोकांना नोटा बदलून देण्याची थोर समाजसेवा करायची सोडून इथं ऐसीवर काथ्याकूट करणार्‍यांना पाहून शरम वाटली आणि डोळे पाणावले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या नोटांचा एकत्रित लगदा करून निळ्या विजारी शिवाव्यात असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

....

निळ्याच काय म्हणून?

तुम्ही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक आहात काय? (मी हा प्रश्न का विचारतोय त्याबद्दल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0