नोटा व्हाईट...दारु वाईट.....

दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५
मन्याचा व्हाटसपवर मेसेज
५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या.
मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते.
.
अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे.
च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही.
खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त.
रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला.
जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण.
जास्त विचार करण्यात अर्थ नाही.
.
रात्री कन्फर्म मिळाली बातमी.
वाचून निवांत झोपलो विचार न करता.
.
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.
आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या.
.
रस्त्यातून येताना पाहिले.
बँकासमोर जत्रा भरलीय.
गर्दीशी आपली सख्त नफरत.
मुदत पण आहे भरपूर.
बघता येईल नंतर.
.
लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते.
टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही.
आज परगावचा चक्क फोन. पाठव रे रिसिट घेऊन. देतो पेमेंट.
नेहमी अर्धे चेकने अर्धे कॅश देणारा भाद्दर शुअर ५०० चा गट्ठा देणार.
अजून असेच तीन चार कॉल.
देऊ दे. सीए दोस्त म्हणलाय. घे बिनधास्त. लगेच बँकेत भर मात्र.
.
माझ्या हपिसात कामाला चक्क ईश्वर आहे. म्हणजे नावच त्याचे ईश्वर.
ईश्वर निघालाय. त्याला प्रवासाला द्यायला सुट्टे नाहीत माझ्याकडे.
इकडून तिकडून करुन जेमतेम दिलेत.
.
दुपारी चहा प्यायचे वांदे. ४०० चे पेट्रोल भरले.
१०० वापस मिळाले.
दिवसभर नेमका कामाचा लोड. डोकं फिरण्याइतपत कामे.
नवीन कामे अ‍ॅडव्हान्ससहीत येताहेत. मज्जाय.
त्या खुशीत उगीच मेसेज एंजॉय केले. एकही फॉर्वर्ड नाही केला.
रात्र होऊ लागली तसे डोके जाम होतंय.
ईश्वर वसूलीला गेला तिकडं इलेक्षन चालु आहेत. त्याची वेगळीच चिंता
संध्याकाळी आला बंडले घेऊन.
रुमालात गुंडाळून बॅगेत ठेवले लॅपटॉपच्या.
त्याला सोडले घरी.
.
अक्काबाई का आठवू नये.
शकीलला फोन केला.
"शकल्या ९० पायजे बे, आणि..."
"या मालक, माहीती आहे पुढचे. देतो उरलेले चिल्लर"
.
बारमध्ये प्रत्येक टेबलावर तीच चर्चा.
सायराबानूची गाणी बघत बघत नाईन्टीची क्वार्टर झाली.
एक मोट्ठी देऊन देऊन, शंभराच्या थोड्या घेऊन बाईक हलवली.
.
पुढचे मला आठवत नाही.
मी घरी कसा आलो. दीड कीमीवर तर बार. मोकळाय रस्ता.
मी घरातल्या खुर्चीवर आहे. कधी बसलो येऊन?
बॅग आहे जागेवर. रुमाल उघडा पडलाय बॅगवर.
पैसे?
नाहीत बॅगेत. आक्क्खी उलटी पालटी केली.
कपड्याच्या खिशात?
कुठला होता बाबा ड्रेस?
सगळे चेक केले. नाहीत.
जॅकेटात? नाहीत.
वॅलेटात?
एवढे बसणे शक्यच नाही.
तरी गायब सगळे.
.
मधल्या एक दोन तासभरासहीत पैसे गायब आहेत.
ज्यात बांधले तो रुमाल आहे. पैसे नाहीत.
आकडा मोट्ठाय. दुनिया फिरली घप्पकन.
सध्या तर एवढा फटका खायची ताकद नाही.
नोटा जरी बंद झाल्यात तरी त्या भरता येणार आहेत आप्ल्याला.
आपल्या कामाचे पैसे आहेत ते. पण आता आपल्यापाशी नाहीत.
.
घर तर आतून प्रॉपरली बंद आहे.
बाल्कनी बंद आहे.
बाहेर गेटला कुलूप लावलंय
गाडी नेहमीप्रमाणे सेंटरस्टँडला लावलेली आहे.
मी घरी येऊन शूज कधी काढले?
अंगावरचे कपडे कसे बदलले गेलेत?
च्यायला.. भुताटकीच.
.
काय केले दीडेक तासात मी?
डोके दुखायले. काही आठवेना.
फोन बंद आहे. कसा काय?
लास्ट कॉल....शकील.
.
दि. १० नोव्हेंबर २०१६ वेळ रात्री. १२.४५
"शकील, भाई. एक प्रॉब्लेम झालाय यार"
"बोला की मालक, आत्ता जेवायलो बघा. अजून पाहिजे का?"
"नाय बे. माझे बंडल पडलेय का हॉटेलात बघतो का जरा."
अर्ध्या तासाने शकीलचा नकार. "नाही ओ इथे काही."
"बघ यार, मोट्ठी अमाउंट आहे माझ्यासाठी."
"नाही ओ, तरी सकाळी परत चेक करतो"
.
काय म्हणू?
दारुच्या नशेत पडले पैसे.
इतके?
लैच फालतूपणा झाला.
औकात नाही धंदा करायची राव.
इतक्या वर्षात एक नवा रुपया हरवला नाही आपल्याकडून.
इतका मोट्ठा आकडा. चक्क हरवले.
मिळणे शक्य नाहीच म्हणा.
लै प्लान्स बदलावे लागतील.
एवढा मोठा बफर नाही आपला.
.
परत बाईक काढली. १० च्या स्पीडने तीन चकरा झाल्या त्या रोडवर.
काही मागमूस नाहीये. रस्ता नेहमीप्रमाणेच सुना.
डोकं आता हळूहळू रिकामं होतंय.
.
पूर्ण ब्लँक आता मेंदू.
शांत बसणे एकमेव पर्याय.
रिवाइंड होतंय बहुधा.
हळूच आठवतेय दार उघडताना हेलमेट पडल्याचं.
मग काय केलं मी?
तिथेच शूज काढले.
आत आलो, लाईट लावली.
बॅग कशी ठेवली?
अर्रर्रर्र...
नोटा ठेवलेला रुमाल काढलेला मीच बाहेर.
नोटा कुठे ठेवल्या?
तीन चार विस्कळीत गट्ठे होते.
सीडीएमला भरावे लागतील म्हणून सरळ करुन ठेवायला पाहिजेत.
पेपरच्या गट्ठ्याखाली आपण तर ठेवले.
.
आहेत का तिथे?
हो. जसे ठेवले तसेच.
शकल्याला मेसेज केला. सापडले रे भावा. सॉरी त्रास दिला रात्री.
शकल्या म्हणला ओके साह्यबा.
.
मुद्दा काय....दारु वाईट.
कामाच्या टायमात तर लैच वाईट.
आधी प्यायचोच की.
एकाच वेळी इतके नसायचे पैसे खिशात.
आधी कधी इतकी चढलेली आठवत नाही.
आजच कस्काय?
टेन्शन.. टेन्शन....बाकी काय नाय.
ह्यापुढे मापात.
खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता.
पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे.
दरवाजा लावून पिणे.
सकाळी शांतपणे कामाला लागणे.
.
बाकी काही म्हणा...
मोदीकाका हुशार.
शिस्तीत वाजवली गेम.
यंदा लोन इंटरेस्ट कमी झाला,
प्रोसेस इझी झाली तरी बरंय.
काय नाय, निदान चेक आणि कार्डं बाळगायची सवय लागली तरी बरंय.
.
हवीय कुणाला कॅश ढिगभर नोटात?
.
(शुध्दीवर असताना लिहिलेली सत्यकथा)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

ल ई भा री!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनःपूतम समाचरेत्|

Biggrin लय भारी लिव्हलयं, पर दारु लय वंगाळ ( आसं म्हणायचं आसतं दुसर्‍या दिशी Biggrin )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकासच!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या लगा वढ पाच्ची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त आहे हो अभ्या शेठ !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त. जीपीएस चिपवाल्या नोटांची किती गरज आहे हे आता कळतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या लेका जिकलाईस कंप्लीट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढचं शीर्षक :

मी नाही त्यातला, गलास काढा आतला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय फास्ट लैफ हाय तुमचं!!
तुमचं जळतंय पण श्टोरी झकास.
("मी नाही त्यातला~~~~~
बदलून " मी आहे त्यातली, बाटली काढा धाकली ।
( याच्याकडे बाटल्या आत बाहेर नसतात. थोरल्या आणि धाकल्याचाच ओप्शन असतो )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा SadSadSad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

डब्बल प्रतिसाद कसा काय पडला काही कळले नाही.
आपली 90 च बरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चोरी गेलेले दोन लाख प्रकट होतात तेव्हा...

शैलेश कर्पे सिन्नर
वार : शनिवार.. वेळ : दुपारी १ वाजेची.. सत्तरी पार केलेला एक वयोवृद्ध नागरिक रडवलेल्या चेहऱ्याने पोलीस ठाण्याची पायरी चढतो.. हातातले पासबुक दाखवत म्हणतो.. साहेब, माझे बॅँकेतून दोन लाख रुपये लंपास झाले.. आता मी म्हातारा काय करू? पोलीस त्याच्या हातातील बॅँकेचे पासबुक पाहून खात्यातून दोन लाख रुपये काढल्याची नोंद पाहून त्याच्या बोलण्यात तथ्य असल्याचे मान्य करतात. मग सुरु होतो तपास...
आणि दोन तासातच चोरीचे गेलेले दोन लाख रुपये प्रकट झाल्याचे पाहून 'हसावे की रडावे' अशी सर्वांची अवस्था होते.
मात्र वयोवृध्द नागरिकाचे चोरीला (न) गेलेले दोन लाख रुपये पुन्हा त्याच्या हातात पडल्याचे पाहून सर्वच यंत्रणेने सुटकेचा निश्वा:स सोडला.
त्याचे झाले असे...गुरुवारी दुपारी सिन्नर तालुक्यातल्या मलढोण येथील एका वयोवृध्द नागरिकाने वावीच्या महाराष्ट्र बॅँकेतून दोन लाख रुपये काढले. घरी गेल्यानंतर या वृध्दाला आपण बॅँकेतून पैसे काढले का नाही याचाच विसर पडला. काढले तर पैसे गेले कुठे या विचाराने त्याला रात्री झोप आली नाही. शुक्रवारी तो बॅँकेत आला मात्र संप असल्याने बॅँक बंद होती. शनिवारी बॅँक उघडल्यानंतर तो वृध्द पुन्हा वावीच्या महाराष्ट्र बॅँकेत आला.
बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनी 'बाबा' तुम्ही गुरुवारी दुपारी दोन लाख रुपये काढून नेल्याचे सांगत पासबुकातील नोंद दाखवली. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने आपल्याला पैसे मिळालेच नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे रोखपालासह व्यवस्थापक काहीकाळ हादरले. त्यांनी विड्रॉल स्लीप तपासली. त्यावर या ज्येष्ठ नागरिकाचा अंगठा व दस्तूर दिसून आला. मात्र या बाबांनी पैसे मिळाल्याचे नसल्याची भूमिका घेतल्याने कर्मचारी दस्तूर व्यक्तीचा शोध घेऊ लागले. दस्तूर व्यक्ती वावी गावातील होती. मात्र त्याचे टोपण नाव दुसरे असल्याने 'त्या' नावाचा व्यक्ती सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नव्हता. तोपर्यंत या वयोवृध्द नागरिकाने पोलीस ठाणे गाठले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर बॅँक कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला.
वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांनी या वयोवृध्द नागरिकाकडून घटना जाणून घेतली. दोन लाख रुपये काढण्यासाठी तुम्ही गुरुवारी बॅँकेत आला होता मग मग दोन दिवसांनंतर पैसे लंपास झाल्याची तक्रार देण्यासाठी तुम्ही आले, एवढा उशीर का झाला असा प्रश्न विचारला. त्यानंतरही बॅँक पासबुकात दोन लाख रुपये काढल्याची नोंद असल्याने सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी तातडीने बॅँकेत पोलीस कर्मचारी पाठवून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास वयोवृध्द नागरिक व त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने बॅँकेतून दोन लाख रुपये रोखपालाकडून घेतल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र त्यानंतर त्याच्या शेजारी उभा असलेला व्यक्ती दोन लाख रुपये घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. या वयोवृध्द नागरिकाने आपणच पैसे काढत असल्याचे त्याच्या मिणमिणत्या डोळ्याने ओळखून पैसे काढल्याचे मान्य केले. त्यामुळे बॅँक कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र शेजारी कोण व्यक्ती आहे ते ओळखले नाही. आपल्याला भुरळ पाडून सदर व्यक्तीने आपले पैसे लंपास केल्याचा आरोप या वृध्दाने करुन टाकला. बॅँक कर्मचारी पहिल्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडले होते. मात्र दोन लाख रुपये घेवून जाणारी व्यक्ती कोण या विचारात पोलीस यंत्रणा पडली.
बॅँकेतून दोन लाख रुपये घेवून जाणाऱ्या व्यक्तीने डोक्यात हॅट व अंगात जर्कींग घातले असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर व्यक्ती स्पष्टपणे दिसत नसल्याने अज्ञात व्यक्ती विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करावा लागेल असे जवळपास निश्चीत झाले होते. मात्र सदर व्यक्तीने बॅँकेत एका ओळखीच्या व्यक्तीच्या पाठीवर थाप टाकून त्याच्यासोबत वार्तालाप केल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.
सहाय्यक निरीक्षक आंधळे यांनी तातडीने सदर व्यक्तीला बॅँकेत घेवून येण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना सोडल्या. सदर व्यक्ती निऱ्हाळे येथील असल्याने त्याला तातडीने बॅँकेत आणण्यात आले. निऱ्हाळे येथील त्या व्यक्तीने पैसे घेऊन जाणारी ती अनोळखी व्यक्ती ओळखली. त्याने सदर व्यक्ती वावी गावातीलच व्यावसायिक असल्याचे सांगितले. तातडीने पोलिसांनी त्या व्यक्तीला बॅँकेत बोलावून घेतले. आणि त्या ज्येष्ठ नागरिकापुढे उभे केले. त्यानंतर या वृध्दाला विस्मरणात (?) गेलेल्या गोष्टी आठवू लागल्या. आपणच या व्यक्तीला दोन लाख रुपये हात उसणे दिल्याचा खुलासा या ज्येष्ठ नागरिकाने केला. वृध्दाच्या या खुलाश्याने पोलीस व बॅँक कर्मचाऱ्यांसह उपस्थितीतांची 'हसावे की रडावे' अशी अवस्था झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारीय लेख
SmileSmileSmile
तुम्हाला अजुन एक पर्याय आहे. एक शेर घ्या तोंडावर फेकायला जालीम दुनियेच्या

मुझको कदम कदम पे भटकने दो वाईजो
तुम अपना कारोबार करो
मै नशे मे हु.
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इधर आ ऐ सितमगर हुनर आजमांएंगे , तु तीर आजमां हम जिगर आजमांएंगे.

भारिच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0