बॉक्स

अर्धा तास. पुढच्या साधारण अर्ध्या तासामध्ये या जगातील प्रत्येकाचं आयुष्य, हे कायमचं बदलून जाईल अशा माझ्या खात्रीला, ह्या बदलाला कारणीभूत आपण स्वत: आहोत ही जाणीव, उगाचच एका साशंकतेच्या कोंदणात बंदिस्त करत होती.

"द बॉक्स हॅस फॉलन. आय रीपीट, द बॉक्स हॅस फॉलन...."

'२५' या जमातीतील एक पोलीस, माझ्या उजवीकडेच काही अंतरावर उभा राहून त्याच्या रेडीओमध्ये ओरडत होता. त्याचा कापरा आवाज आणि आजूबाजूचा गोंधळ यांच्या पार्श्वभूमीवर, माझ्या कानात मंदपणे ऐकू येणारे माझ्याच हृदयाचे संथ ठोके मला भलतेच विसंगत वाटत होते.

या जगामधील प्रत्येक पोलीस हा '२५' या जमातीतलाच होता. या जगाच्या अशा अनेक विचित्र पैलूंमध्ये एरवी बेमालूमपणे गुरफटून जगणाऱ्या मला, गेला महिनाभर मात्र हेच विचित्रपण अस्वस्थ करत होतं.

"गुन्हेगार पॉजीटीव्ज आहे. '२०' या जमातीतला. लूक्स हेल्दी. सध्या आम्ही त्याला कैद केलय..."

कैद हा शब्द ऐकल्याबरोबर माझ्या कानात ऐकू येणारे हृदयाचे ठोके बंद झाले. कोणीतरी जादू करून बंद पाडल्यासारखे. मी हलकंसं हसून माझ्या हातांमधल्या बेड्यांवर नजर टाकली. हसण्याचं कारण असं की मला कैद हा शब्द अचानक आणि उगीचच विनोदी वाटू लागला होता. माझा मेंदू हे असले खेळ माझ्यासोबत नेहमीच खेळत असे. आत्ताही आपण घाबरून जायला हवं हे मला माहीत होतं, पण ऐकू येत नसले तरी माझ्या हृदयाचे ठोके हे पूर्वीइतक्याच संथपणे पडतायत याची मला १००% खात्री होती. हे ठोके रेकॉर्ड करून एखाद्या लाऊडस्पीकरवरून वाजवले तर उजवीकडे जमलेल्या कवींच्या घोळक्यातून ऐकू येणाऱ्या घोषणांना छानपैकी ताल देतील, असा एक निरर्थक विचार माझ्या मनात आला.

मी राहत होतो हे जग आकड्याचं होतं. मी, टॉम, '२०' या जमातीमधला होतो. आमची जमात ही लिखाणामध्ये अग्रेसर होती. आमच्यातले सर्वजण मोठे होऊन पत्रकार किंवा लेखक बनत असत.

"टॉम, तू वेगळा आहेस! यू वेअर नेव्हर मेन्ट टू बी या रायटर. तू कवी आहेस..." माझ्या बायकोचे, डोरोथीचे हे शब्द मला पुन्हा जसेच्या तसे आठवले. ती सुद्धा '२०' जमातीतलीच होती. माझ्या डावीकडे जमलेल्या पत्रकारांच्या गर्दीत डोरोथीचा चेहरा शोधण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला.

एकेकाळी सांस्कृतिक वारसा समजल्या जाणाऱ्या आणि सध्या सरकार ज्या जागांची अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवत असे अशा निवडक जागांपैकी एक अशा 'बॉक्स'ची नासधूस करून त्याला निकामी केल्याबद्दल कैदेत असलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून डोरोथीची काय प्रतिक्रिया होईल? या गुन्ह्याची शिक्षा मृत्युदंड आहे, हे तिला नक्कीच माहीत असणार. तिच्यासाठी एक कविता लिहिली पाहिजे. तिची आणि माझी पुन्हा भेट होईल की नाही सांगता येत नाही. पण कविता लिहिलेला एखादा कागद तिच्यापर्यंत कोणामार्फत पोहोचवणं ही फार अवघड गोष्ट नव्हती...

अभावितपणे माझा उजवा हात शर्टाच्या खिशाकडे गेला. मी तिथे नेहमी एक डायरी ठेवत असे. माझा डावा हातही उजव्या हातासोबत वर आला. बेड्या चांगल्याच वजनदार होत्या. माझ्या जिभेवर एक कडवट चव दरवळली. इतका वेळ संथ, पण नियमितपणे धडधडणाऱ्या माझ्या हृदयाने एक इर्रेग्युलर ठोका दिला. हळूहळू मी दोन्ही हात पुन्हा मांडीवर ठेवले. 'डोरोथी समजून नाही घेणार', माझ्या मनातला आवाज हळूच कुजबुजला. त्याचं बरोबर होतं. राहूदे तिच्यासाठी कविता वगैरे करणं....

मी सोडलो तर '२०' जमातीतल्या इतर कोणालाच कवितालेखनात गती नव्हती. '२१' जमातीचे लोक मात्र जात्याच कवी! काही जण त्यांना 'स्वैर विचारांचे' वगैरे म्हणून हिणवत असत, पण त्यामुळे कवींना काही फरक पडत नसे. भावनांच्या वाहत्या आवेगाला बांध न घालताही स्वता:च्या मनाप्रमाणे वळवण्याचं त्यांचं विलक्षण कौशल्य पाहून, कदाचित शाईलाच स्वतःच्या काही भावना आहेत की काय असा आभास, वाचणाऱ्याच्या मनात निर्माण होणं साहजिकच होतं.

पण माझं मत थोडंसं वेगळं होतं. कलेला काहीतरी हेतू असावा, तिचा अस्तित्वाशी काहीतरी संबंध असावा असं मी नेहमी म्हणायचो. त्यांच्या कविता या कुठल्याशा अगम्य टापूवरून कालातीत वाहणाऱ्या भावनांच्या नदीसारख्या होत्या. अशा नदीचा उगम सापडत नाही आणि तिला कोणत्याही समुद्राला जाऊनही मिळायचं नसतं. प्रवाह हेच तीच ध्येय! स्वता:च्याच सौंदर्यात गुरफटून वास्तवाशी फारकत घेणारी कविता मला कधीच आवडत नसे.

कविता लिहिण्याचा छंद असलेला '२०' जमातीतला मी एकटाच! माझ्या कवितांमध्ये नेहमी एखादी गोष्ट असे. माझ्या ह्याच कौशल्यावर डोरोथी फिदा झाली होती, असं तिचं म्हणणं होतं. पण मी माझ्या कविता कधीच अधिकृतपणे प्रकाशित केल्या नाहीत. यामागचं कारण सोपं होतं. कविता मी लिहिल्या आहेत हे सरकारला समजलं असतं तर मला सरळ उचलून बॉक्स मध्ये टाकण्यात आलं असतं.

बॉक्स ही वास्तू माझ्यासारख्या अपसेट्स ना बरं करण्यासाठी वापरली जात असे. मी 'अपसेट' असल्याची डोरोथीची जवळजवळ खात्रीच होती. अपसेट म्हणजे एका जमातीत जन्मलेला आणि कौशल्य मात्र दुसऱ्याच जमातीचं असणारा. माझं कवितालेखन हे डोरोथीच्या दृष्टीने मी अपसेट असल्याचा सर्वात मोठा पुरावा होतं. माझा मात्र यावर विश्वास नव्हता. म्हणजे मी कविता लिहू शकत होतो हे खरं असलं, तरी माझ्या कविता या तशा मीडीओकरच असायच्या. झालंच तर माझं गद्य लिखाणही फार उच्च दर्जाचं असे, असंही नाही. मी कोणीतरी वेगळाच होतो. ना धड २०, ना धड २१!

"काम ऑन टॉम, जाऊन ये ना बॉक्समध्ये! त्यामुळे तू एकतर २० किंवा २१ होशील. हे असं धेडगुजरी किती दिवस राहणार?" डोरोथी नेहमी म्हणायची.

"मी जसा आहे तसा तुला नाही आवडत का?" माझा ठरलेला प्रतिसाद.

साधारण अशाच स्वरूपाची कित्येक भांडणं गेल्या वर्षभरात आमच्यामध्ये झालेली होती. त्याची आठवण होताच माझे डोळे आपोपाप मिटले गेले. मेंदुने त्याचा खेळ पुन्हा सुरू केला. खटका दाबून टीव्ही बंद करावा तसे माझ्या आजूबाजूचे आवाज बंद झाले. हृदयाने त्याचे मंद ठोके पुन्हा सुरु केले. त्यांचा हलकासा आवाज एखाद्या गूढ पार्श्वसंगीतासारखा माझ्या कानात घुमू लागला. पुढे काय होणार याची मला कल्पना आली. अपेक्षेप्रमाणे माझ्या मेंदूने माझ्या डोरोथीसोबत ४ दिवसापूर्वीच झालेल्या एका भांडणाची कॅसेट माझ्या कानात वाजवणं चालू केलं. मेंदूने हे असं काही सुरू केलं की शांत बसून हा सर्व प्रकार तटस्थपणे अनुभवण्याची मला सवय झालेली होती. आत्ताही मी तेच केलं. डोरोथीचे पुढचे शब्द धडधडीचा मुलायम पडदा टरकन फाडून, माझ्या कानात उमटले...एखाद्या कवितेची अस्फुट सुरुवात व्हावी तसे...

"पण आहेस कोण तू टॉम? सांग ना. कोण आहेस? २०? की २१? माझं ऐक, बॉक्स मध्ये जाऊन ये. तिथे तुला शुद्ध २० किंवा शुद्ध २१ बनवलं जाईल...सध्या तू नॉर्मल नाहीयेस!!"

जादू संपली. आजूबाजूचे आवाज इमानेइतबारे मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं कंटाळवाणं काम कानांनी पुन्हा सुरू केलं. डोळे उघडताना माझ्या चेहर्यावर एक कडवट भाव रेंगाळतो आहे याची मला झाली.

नॉर्मल. तिच्या मते मी नॉर्मल नव्हतो. माझ्यातलं जे कौशल्य तिला माझ्याकडे खेचून घेऊन आलं होतं, तेच कौशल्य आज ती माझ्यापासून लांब जायचं कारण म्हणून वापरत होती. ४च दिवसांपूर्वी तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मी बॉक्समध्ये जाऊन स्वतःवर उपचार केले नाहीत, तर ती माझ्यापासून दूर जाणार होती. आमच्या नात्याची सुरुवात ज्यामुळे झाली तीच बाब आज आमच्या नात्यात भिंत म्हणून उभी होती. मनात उमटलेल्या पण शब्दात न मांडता येणाऱ्या कवितेसारखी...

२१ जमातीतील कवींना बॉक्स नष्ट व्हावा असं वाटत असे. बॉक्समुळे अभिव्यक्तीला मर्यादा येतात वगैरे काहीतरी त्यांचं म्हणणं होतं. मला सुरुवातीला बॉक्स हा हलकासा इनकन्व्हीनियन्स वाटत असे. माझ्या कविता या मी फक्त स्वतःसाठी लिहीत असे, लोकांसाठी नाही. त्यामुळे मी त्या प्रकाशित करत नाही तोपर्यंत सगळं ओके होतं. पण हाच बॉक्स जेव्हा डोरोथीला माझ्यापासून खेचून घेऊन लांब नेऊ पाहू लागला, तेंव्हा मात्र काहीतरी करणं आवश्यक होतं..

बॉक्सबाहेरच्या सुरक्षारक्षकांनी एखाद्या २१ जमातीच्या माणसाला कधीच आत सोडलं नसतं. पण माझ्यासारख्या सामान्य लेखकापासून बॉक्सला काही धोका असेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसावं. मला आत जाण्यापासून कोणीही रोखलं नाही...

"...ऑल युनिट्स रिपोर्ट टू सॅन्क्टम एसॅप...द बॉक्स हॅस फॉलन..." पोलीस अजूनही कापऱ्या आवाजात ओरडत होता.

कापऱ्या आवाजात...

मी चमकलो. २५ जमातीच्या एखाद्याचा आवाज भीतीने किंवा आदरवाईज कापणं शक्यंच नव्हतं. '२५' जमात ही स्थितप्रद्न्यता, शौर्य आणि हिंमत यासाठी प्रसिद्ध होती.

मी या पोलिसाकडे लक्षपूर्वक पाहिलं. तोही माझ्याकडेच पाहत होता. आमची नजरानजर झाली.

तो हलकंसं हसला. कळेल न कळेल असं. आणि मग, जणू मला धन्यवाद देतोय अशा अविर्भावात त्याने हळूच मान तुकवली.

त्याच्या त्या तुकवलेल्या मानेमध्ये एक काव्य होतं. २१ जमात रचत असे तितकं उत्कट नसेल कदाचित, पण होतं नक्कीच. त्यात एक प्रकारची ऊब होती. ती ऊब हळूहळू माझ्या रक्तात पसरू लागल्याची मला जाणीव झाली आणि मग एखादा बांध फुटावा तशी माझ्या डोळ्यांच्या कडांमधून ती बाहेर आली. गालावरून घरंगळणाऱ्या थेंबांना बाजूला करून माझे दोन्ही हात खिशातल्या डायरीकडे गेले. कविता. मात्र ही कविता डोरोथीसाठी नव्हती, माझ्यासाठी होती! भावनांचा प्रवाह...ज्याला उगम होता आणि अंतही...
डावीकडे पत्रकारांची गर्दी वाढत होती. त्या गर्दीत क्षणभर मला डोरोथीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला. पण मी फार लक्ष देऊन पाहिलं नाही. डोरोथी हा विषय माझ्यासाठी संपला होता.
२५ जमातीतल्या त्या पोलिसाने माझ्या खांद्यावर थोपटलं.
"कसं वाटतंय तुम्हाला?" त्याने विचारलं.
मी शांतपणे माझ्या दोन्ही बाजूंना पाहिलं. उजवीकडे विजयघोषणा देणारे '२१' जमातीचे कवी आणि डावीकडे, इतर पोलिसांना न जुमानता गर्दी करणारे '२०' जमातीचे पत्रकार....
"घरी असल्यासारखं वाटतंय" मी उत्तर दिलं.

**************************************************************************************

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त!! पण कल्पना लगेच आली होती कारण "कॉन्टेक्स्ट" मुळे तुम्ही एक तशाच प्रकारची अपेक्षा निर्माण केलीत Smile
.
http://parafruiteducation.com/wp-content/uploads/2012/11/Parafruit-Education-Cartoon1.jpg

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Oops!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Oops!! - याचा उद्गाराचा अर्थ कळला नाही. कार्टुन आवडले की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्टून आवडले! ॲक्चुली मी हे कार्टून आधी पाहिले होते पण मी पाहिलेल्या वर्जन मध्ये शेवटचा मुलगा, ज्याला आऊट ऑफ द बॉक्स विचार करायला शिकवल गेलय, नव्हता!

खर तर माझ पर्सनल मत अस आहे की, तो मुलगा नसलेलच वर्जन चांगल आहे! तुम्ही जे दाखवलय ते पाहिल की 'ओव्हरकील' असा शब्द मनात येतो. म्हणजे एखादा जोक पंचलाईन नंतरही चालूच रहावा तस वाटल!

ऱाग मानू नका! प्रामाणिकपणे जे वाटल ते सांगितल!

आणि ऊप्स हा उदगार तुम्हाला गोष्टीचा गाभा आधीच कळला यासाठी होता! अजून चांगल लिहिल पाहिजे म्हणजे! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दाशब्दाशी सहमत आहे. पहीला शब्द ते शेवटचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

गोष्ट हीच ओव्हरकील आहे का? Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. मांडणी थोडी बाळबोध वाटली. पण या शब्दसंख्येच्या मर्यादेत ते होणं स्वाभाविक आहे. माझ्या मते ही कथा मोठी असायला हवी, आणि यात नरेटरकरवी जी माहिती दिली आहे ती प्रत्यक्ष व्यक्ती, घटना यांतून आली असती तर कथेला एक खोली आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thanks Rajesh for the suggestion. I agree that the length should have bee a little more. Actually I had written this story initially in English for a blog named 'Three minute stories'. For the stories that would take 3 minutes or less to read.Hence the shortened length! ☺
Thanks again!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0