महायुद्ध ते मोठे घडले

तेंव्हा मग त्या पाच जणांनी
शंखही केले पृथक पृथक
मनापासुनी परस्परांवर
शिवीगाळ मग अशी अथक !

महायुद्ध ते मोठे घडले
राव पडले , पंत चढले
शूर मावळे, नवे कावळे
गल्ली-बोळा-मध्ये लढले!

पाव लगाके पळो यहांसे
नही तो हम हिंदी बोलेंगे

दोआबातील पुर-भय्यांचे
हिंदी ऐकून सुटले लेंगे!

"मुलुख-मैदानी","अफझलखानी"
तोफा तेंव्हा महा गरजल्या
भिता न त्यांना मावळ्यांनीही
तलवारी उपसून परजल्या!

लढाई झाली,चढाई झाली
लाखामध्ये मुर्गी मेली
अनेक वर्षे पोरांनी त्या
यादही बिर्याणीची केली!

आता धनसत्तेची पक्कड
आधीपेक्षा पक्की झाली
नेहमीच्या त्या थैलीशहांची
सत्ता आता नक्की झाली!

हिंदू मुस्लिम भाई भाई
दोघांनाही काही नाही
दिल्ली-मुंबईमध्ये बसुनी
लठ्ठ बनिया लाडू खाई!
--
(मागच्या राज्य निवडणुकीच्या वेळची कविता)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहाहा

दिल्ली-मुंबईमध्ये बसुनी
लठ्ठ बनिया लाडू खाई!

ROFL
.

पाव लगाके पळो यहांसे
नही तो हम हिंदी बोलेंगे
दोआबातील पुर-भय्यांचे
हिंदी ऐकून सुटले लेंगे!

आ-व-रा!!! चित्रदर्शी कविता ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0