मिलेनिअल्स (१९८०-२००४मधील पीढी)

The Baby boomers are the generation that was born following World War II, generally from 1946 to 1964 a time that was marked by an increase in birth rates. The term "baby boomer" is sometimes used in a cultural context. Therefore, it is impossible to achieve broad consensus on a defined start and end date. The baby boom has been described variously as a "shockwave"and as "the pig in the python". This generation is also referred to as the Me Generation, and the latter portion of the Baby Boomer generation as Generation Jones.
.
Generation X, commonly abbreviated to Gen X, is the generation born after the Western Post–World War II baby boom. Demographers and researchers typically use starting birth years ranging from the early to mid-1960s and ending birth years ranging from the late-1970s to early-1980s. The term has also been used in different times and places for a number of different subcultures or countercultures since the 1950s.
.
Millennials, also known as the Millennial Generation or Generation Y, are the demographic cohort following Generation X. Demographers and researchers typically use starting birth years ranging from the early-1980s and ending birth years ranging from the mid-1990s to early-2000s. As of April 2016, the Millennial generation surpassed the Boomer generation in size in the USA, with 76 million Boomers and 77 million Millennials.
.
Generation Z, also known as the "Founders" or Post-Millennials the iGeneration, or Homeland Generation, is the cohort of people born after the Millennials. Demographers and researchers typically use starting birth years ranging from the mid-1990s to early-2000s, while there is little consensus yet regarding ending birth years.

_____________________________
http://hellogiggles.com/ageism-towards-millennials/
हा लेख आज वाचनात आला. प्रचंड आवडला. जरी एका अमेरीकन मिलेनिअलच्या दृष्टीकोनातून लेख आहे तरी हा स्थलातीत आहे. तो भारत, जर्मनी, यु के कोणत्याही तरुण पीढीला, सर्व मिलेनिअल्सना तितकाच लागू पडतो.
________________________________

नेहमीप्रमाणेच ८१ वर्षाच्या माझ्या शेजाराच्या आजोबांनी मला बिनदिक्कीत झोपेतून उठविले. "रिया मी माझ्या ग्राहकांना आजची तरुण पिढी ज्याला आपण "मिलेनिअल्स" (१९८०-२००४) म्हणतो त्यांच्याबद्दल काही प्रेझेंटेशन देणार आहे आणि मला आपल्या सोसायटीतील एका मिलेनिअलचे म्हणजे तुझे मत जाणून घ्यायला आवडेल."
मी मनात विचार केला - खरं की काय? माझे मत तुम्हाला खरंच हवे आहे? तुम्ही तेच ना जे रोज सकाळी मी दिसले की माझ्या दिनचर्येवर ,माझ्या निर्णयांवर बिनदिक्कीत कोणताही विचार ना करता शेरे ओढता. मला ऊठसूठ फुकटचे सल्ले देता जसे काही ते सल्ले ऐकले नाही तर माझ्या आयुष्याला काही गंभीर वळण लागेल, मी वायाच जाईन.मी परत एकदा तपासले की हे काका माझ्याशीच बोलतायत की अन्य कोणाशी. परंतु तिथे आम्हा दोघांच्या खेरीज कोणीही नव्हते.
.
कॉलेजमध्ये गेल्यानंतर लवकरच माझ्या एक लक्षात आले की अगदी आमच्यावरती दबाव आणला नाही, तरी आधीची पिढी आमच्या पिढीबद्दल टीका करण्यात फार पुढे होती. अगदी आमच्यावर उघड अन्याय करता नसली तरी पूर्वीची पिढी आम्हाला कुचकामी समजते, आळशी, गर्विष्ठ आणि असंवेदनशील समजते हे मी ताडले होते, सतत ऐकून घेतले होते. काका माझ्याशीच बोलताहेत हे जाणवून मी बियॉन्से चे संगीत थांबवून, माझ्या एका कानातील एक "इयरबड' काढला व तात्पुरता एका कानाने काका काय म्हणतात ते दिखाऊ आदराने ऐकू लागले. मला नवलच वाटले की आधीच्या पिढीतील कोणी एका व्यक्ती चक्क माझे (आमच्या पिढीचे) मत जाणून घेऊ इच्छित होती. पण थांबा नाही तसे काहीही नव्हते.
जरी काकांनी तसे प्रथमदर्शनी भासविले तरी त्यांना माझ्याशी बोलायचे नव्हते, मला उपदेशाचा डोसाचं पाजायचा होता, प्रवचन झाडायचे होते. काय वेडी आहे मी, मला वाटले जुन्या पिढीतील हे काका माझे मत जाणून घेऊ इच्छितात. हीच ती पीढी दूषणे देणारी - तुम्हा आजकालच्या पिढीला सगळे हातात रेडीमेड हवे कशाकशाची म्हणून किंमत नाही तुम्हाला कारण सगळं आयतं मिळतंय ना.
.

अहो काका थांबा तरी. उचलली जीभ लावली टाळ्याला करण्याआधी फॅक्टस तरी तपासा. खरंच आम्हाला सर्व आयतच मिळालय - जसे "स्टुडन्ट लोन, बेरोजगारी, आणि आमच्या पालकांनी सही दिल्याशिवाय ना घेता येणारे भाड्याचे अपार्टमेंट? If I had a dollar for every time a BabyBoomer complained about my generation, I'd have enough money to buy a house in the market they ruined

.
मी हे नवीन ऐकत नव्हतं आधीच्या पिढीतले अनेक काका-काकूंचे हेच मत होते की आमची पिढी कशी ऐतखाऊ आहे, आमच्यात कशी मोटिवेशन ची कमतरता आहे. आमची पिढी ही कशी समस्यांच समस्याच आहे.
कधी आधीच्या पीढीतील कोणी उद्योजक आमच्यातल्या एखाद्या नालायकाला नोकरी देणार आणि त्याचा धंदा बोंबलला की स्वतः:च्या चुकीच्या निर्णयाला नावे ठेवण्याऐवजी आमच्या अख्ख्या पिढीला नावे ठेवणार. कधी आमाच्यांतील कोणी नास्तिक झाले तर कोणी आजोबा-आज्जी आमच्या आख्ख्या पिढीला दुषणे देणार का तर आम्हाला स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची परवानगी नाही. एखादा आदल्या पिढीतील बॉसही आमचे विचार ऐकून घेणारच नाही तर जेव्हा अगदी तेच विचार एखाद्या म्हातार्या खोंडाने मांडले तरच ते स्वीकारणार. आम्हा तरुणांचे ऐकून घायचेच नसते आणि आमचे म्हणणे तर अजिबात स्वीकारायचे नसते. एकंदर काय तर कोणीही ऐरागैरा पितदृष्टी दुढ्ढाचार्य आमची पिढी कशी ते ठरविणार. "kids these days have it too easy" said the generation that could buy a house on a wage from unskilled work at age 21"
.
काका जर कां आणि डोळे उघडे ठेवलेत तर आज माझी सकाळ कशी चालली आहे ते मी कदाचित तुम्हाला सांगेन. सांगेनच याची शाश्वती नाही पण जर खुल्या मानाने ऐकणार असाल तर कदाचित प्रयत्न तरी करेन -
माझा वेळ अत्यंत मौल्यवान आहे आणि मिळणाऱ्या प्रत्येक क्षणाची मला गरज आहे. याउलट हे पेन्शनर/रिटारार्ड काका सकाळचे केव्हाच ऊठून बसले आहेत आणि जणू काही माझा वेळ यांच्या तीर्थरुपांची पेंड आहे अशा अविर्भावात माझा वेळ खात आहेत. मी जर कधीकाळी रिटायर होउ शकलो तरी या काकांसारखा अरेरावी होण्याची सुतराम शक्यता नाही.
.
हा आता या काकांबद्दल माझया मनात काहीही वैरभावना नाही किंबहुना या काकांना ना माझ्या खर्‍याअडचणींशी काही देणेघेणे आहे ना ते माझ्या दिनचर्येत फारशी लुडबुड करतात, हां एखाद्या दिवशी सहज येऊन येऊन मी बरी आहे ना ते पाहून , विचारपूस करून जातात तेवढेच. प्रेमळ आहेत. त्यांच्या परीने माझी काळजी घेतात.पण तेवढेच. त्यांच्या या प्रेमळपणाला जागून,मी खोटा खोटा इंटरेस्ट घेत त्यांचे म्हणणे ऐकू लागले. ते म्हणत होते - तू techsavvy आणि उत्तम multitask-er आहेस हे मी मान्य करतो परंतु तुम्हा आजाकालच्या मुलामुलींना सारखे कौतुक हवे असते व ते ऐकण्याची सवय झालेली आहे. लवकर झोपून जरा लवकर उठलीस तर तुझी कितीतरी कामे सहज फत्ते होतील, व्यायाम, पूजा, ऑफिस आणि अन्य अनेक. पण तू काही लवकर उठत नाहीस. पण असे समजू नकोस की मी हे फक्त तुलाच म्हणतो आहे, तुमची आख्खी पिढीचं आळशी आहे आणि हे तुझया पिढीबद्दल मी सांगतो आहे. अरे खरच की, माझ्याबद्दल हे काका कधीच बोलत नाहीत, बोलतात ते आमच्या संपूर्ण पिढीबद्दल आणि मी असते ती नेहमी अपवाद पण ऐकून मात्र सदैव मलाच घ्यावं लागतं. तुमची पिढी-तुमची पिढी - जशी काय आमची पिढी एक आ वासलेली मोठ्ठी समस्यांचं आहे. This identity belongs only to all my friends, siblings, and peers who, like me, came of age during the Great Recession with an average of $29,400 in student debt and entry-level jobs that demand 2+ years of experience on top of a college degree.
.
पण हे मिलेनिअल फोबियाने पछाडलेले लोक आमचे स्टुडन्ट लोन कधी पहाता नाहीत की आमच्या समस्याच कधी लक्षात घेत नाहीत कारण यांना कोणावर तरी नेहमी ठपका ठेवायचा असतो - "तुमच्या डेटिंग Apps मुले विवाहसंस्थेचा पावित्र्य कसे धुळीत मिळाले आहे किंवा सर्व डिजिटल संदेशवहनांच्या यंत्रणेमुळे परस्परातील संवाद कसा कमी कमी होत जात आहे याचेच खापर आमच्या पिढीवरती फोडायचे असते. It’s easier to accuse Millennials of being too lazy to move out of our parent’s house than to acknowledge that economics have not been kind to us. एक लक्षात घ्या की आम्हाला काही पालकांच्या घरी राहायची हौस नाही. कारण पालकांचे घर + डेटींग = ब्रह्मचर्य. आम्हालाही हे नियम, पालकांबरोबर राहणे, जाचक वाटते. पण करणार काय - Celibacy and curfew .
मी पाच वर्षांपूर्वी कॉलेजमधून पास आऊट झाले आणि माझा एका "जनरेशन स्टीरीओटाइप" मध्ये प्रवेश झाला. आणि काही काळ तरी मी या सर्व दोषारोपांवरती विश्वास ठेवला. सततचे आरोप ऐकून ऐकून माझी जवळजवळ खात्रीच झाली की माझे सर्व मित्रमैत्रिणी हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ चारित्र्याचे , महत्त्वाकांक्षी, ओव्हर अचीव्हर्स आहेत आणि मी व माझी पिढी तेवढी आळशी, फूड स्टॅम्प्स वरती जगणारी, बेरोजगार व वाया गेलेली पिढी आहे. आणि या सर्व नकारात्मक ब्रेन वॉशिंग मुळे मी माझीच आयडेंटिटी नाकारू लागले. मिलेनिअल असण्याचीच नाकारू लागले इतका मी माझ्या पिढीचा तिरस्कार केला. मला वाटले मी मिलेनिअल नसते तर किती बरे झाले असते , मिलेनिअल बनून, मी केवढां तरी गमावले आहे. पण मग,मी विदा गोळा केला, फॅक्टस तपासया, माहीती गोळा केली,I researched and I documented and I made graphs and wrote outlines, trying to make sense of the data — trying to make the identity we had been prescribed make sense. But it didn’t. And it still doesn’t. ब्रेनवॉश झाल्याने मी "मिलेनिअल स्टीरीओटाइप" इतका नाकारला होता, की मी स्वतः:लाच दूषणे देऊन, मी या "मिलेनिअल फोबिया" ची लागण झालेला रोग्यांच्या गैरसमजूतींचा विरोध करणेच विसरले. त्यांना मी हे पटवूनच देणे सोडून दिले की आमची पिढी ही अत्यंत कष्टाळू आहे, बोलते कमी कदाचित संवाद कमी साधते पण ती डोळे उघडून पहाटे, निरीक्षणातून शिकते, टेक सॅव्ही तर आहेच्ह, मल्टाइ टास्कर तर आहेच पण अत्यंत हुषार आहे, बुद्धीमान आहे. मी हे कधीच बोलले नाही फक्त दूषणे ऐकत गेले त्यांचा विरोध केला नाही.
.
पण आता पुरे! माझ्या सहनशक्तीचा आज अंत झालेला होता.मला आता बोलायचय. आज मी या काकांना चोख उत्तर देणार होते. -

आम्ही का त्याच त्याच प्रवचनांना देवळात येत नाही कारण आम्ही tech savvy आहोत. आम्हाला अनेक थोर बुद्धीमान लोकांचे, शास्त्रज्ञ, संशोधकांचे विचार अत्यंत सहज आमच्या गॅजेट्स वरती उपलब्ध आहेत. संस्थाचे मंद कारभार आणि रेड टेपना आम्ही भीक घालत नाही. आमच्या काळात केवढी तरी उलथापालथ झालेली आहे, होते आहे. अनेक संस्था , रूढी मोडीत निघालेल्या आहेत.
Institutions are lost on us. We care about missions. What do you stand for? What does your business stand for? These are the things we care about, and our brand loyalties are fierce because of it.”

.
काका मला कधी नव्हे ते इतके आवेगाने, पोटतिडीकेने बोलताना पाहून अवाक झाले पण पुन्हा सावरून ते मलाच खोट्यात काढल्यासारखे हसत म्हणाले "पुरे पुरे. तू काहीही म्हण पण कळलंच तुम्ही काय दिवे लावले आहेत ते." व ते वळले. त्यांना जाताजाता मी म्हणाले - "हवं तर तुमचे प्रेझेंटेशन बनवायला मी मदत करते." पण ते म्हणाले "नको. माझे ग्राहक खूप जुनेजाणते लोक आहेत आणि त्यांना तुम्हा तरुण मुलांकडून धडे घेणे अजिबात आवडणार नाही." एवढे बोलून ते परत वळले पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली नव्हती तर आमच्या पूर्ण पिढीकडे, पिढीच्या सक्षमतेकडे, गुणांकडे परत पाठ फिरवली होती.
.
Like every other Millennial-phobe, he did not want truth to rob him of stereotype, because these stereotypes absolve his generation of any responsibility. It’s easier for Traditionalists, Boomers or Gen Xers to point fingers than to admit that maybe they could have been better stewards of the economy Millennials have inherited. It’s easier to stagnate in routine than to evolve, and easier to talk than listen. But we are tired of being the scapegoat and we are tired of this resistance to change.
.

त्याने आम्हाला फरक पडत नाही. आम्ही मिलेनिअल्स उच्च शिक्षण घेतलेली अमेरिकेतील पहिली पिढी म्हणून अगोदरच उदय पावलेली आहोत. आम्ही समाजातील एक फार मोठा श्रमिक वर्ग आहोतच आहोत. आणि २०२० पर्यंत आमच्याकडे २०० बिलिअनची "पर्चेसिंग पॉवर" येईल असे भाकीत आहे.It’s time. Traditionalists, Boomers, and Gen Xers –please hear us out. We are a generation defined by action, mission, technology and efficiency, and all we want is a voice valued not in spite of our youth, but because of it. We are better together, but only if Millennials can be seen for who we are instead of who we’ve been depicted to be.Those who risk understanding us may just find that Millennials aren’t all we’re cracked up to be. (And that having groceries delivered by drone isn’t so bad either).

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता किती आणि त्यातून परतावा (रिटर्न्स )कसा /काय वेगाने मिळणार हे पाहून ती गोष्ट करायची का नाही हे ठरवणारी असे प्रत्येक पुढच्या पिढीचे वर्णन करता येईल.इतकंच नाही तर हे मोजमाप घेण्याची अचुकताही वाढत आहे. श्रमिक कोणास म्हणावे याचीही व्याख्या बदलायची वेळ आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रमिक हे "लेबर फोर्स" या शब्दाचे भाषांतर आहे. ते चुकले आहे बहुतेक.

We are already the largest labor force,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाब्दिक भाषांतर असं म्हणायचं नसून उदा शेती करणे विरुद्ध किबोर्ड बदडणे.गोठ्यातले काम वि० कंम्प्युटर हार्डवेर रिपेअर.काही वर्षांनी पहिल्या प्रकारची कामं करणारे श्रमिक मिळणार नाहीत.
पहिल्या प्रकारात सकाळी लवकर उठून दिवसाउजेडी कामं उरकावी लागतात उलट करमणूकीच्या क्षेत्रातले /हॅाटेल व्यवसायात पहाटे तीनला झोपायला जातात,"लोळत पडतात", अकरा बाराला उठतात. सगळेच तसे करू लागले तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0