गद्या राधा

तिचा हात नव्हता डोईवरल्या घटावरी
तिचा हात नव्हता गालांवरी,
तिचा हात नव्हता आडवा
प्रतिक्षामुद्रेत भ्रूवरी
तिचा हात नव्हता कुण्या कदंबा बिलगुनी
आणि दुसरा हात नव्हता
पुसत डोळीचे आसू
ती दो हातांची घट्ट घडी घालून
घालते आहे येरझारा एकांतात चूर
वृंदावनापासून दूर
यमुनातीरापासून दूर
सर्वांपासून दूर
स्वत:जवळ, स्वत:ला निरखत राहणारी
स्वमग्न अशी ती गद्य राधा
कल्पिली आहे तुम्ही?
नसेल...
पण ती असते तशी
मनात माझ्या
गद्य
ताठर
राधा...

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)