राधा भिडते

नदी कलंडून डोह जरासा साठून राही
शेवाळाच्या हरितफितींतून गुंतुन जाई
त्यात कशाला येईल कोणी कधी हंसिनी
अंधाराची साय रात्रीला साठत जाई

यमुनेला पारखी होऊनी आता राधा येते तेथे
कशात अडकून डोह गुंतला निरखत रहाते
तिच्या मनाच्या खोलीचे ते जणु प्रतिबिंब
आठवणींच्या शेवाळांचे मुखाभोवती कुंतल चिंब

अंधाराच्या कुशीत नाही
राधा भिडते अंधाराला
तेज जागवित...
दूर सारुनी शेवाळाच्या हिरव्या रंगा
मी- मी राधा... नाही कुणाची अनंङ्गसंगा

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

थँक्यू अरविंद कोल्हटकर.

थँक्यू अरविंद कोल्हटकर. कामाच्या धबडग्यात वेळ नव्हता झाला इथे डोकावायला.
अनंङ्ग चुकीचे लिहिले हा दोष स्वीकारते आहे.

राधावर्णन आवडले. ही राधा

राधावर्णन आवडले.

ही राधा जास्तं वास्तविक वाटते.

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

GREAT!

अंधाराच्या कुशीत नाही
राधा भिडते अंधाराला
तेज जागवित.

SUPERB!

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत हे आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके.

अर्थः सहृदयश्लाघ्यः

साहित्यदर्पणकार विश्वनाथाने 'अर्थः सहृदयश्लाघ्यः' असे काव्याचे एक लक्षण दिले आहे. कवितेकडे पाहतांना तिच्याकडे 'सहृदय' दृष्टीने पाहावे असा त्याचा अर्थ. असे जर केले नाही तर काव्याची चेष्टा करायला पुष्कळ वाव असतो. वरचे बरेच शेरे ह्याच प्रकारचे आहेत असे मला वाटते.

उदा. अचरट म्हणतात - 'शेवाळलेल्या पाण्यातच हंसिनी येतात,स्वच्छ स्फटिकासारख्या पाण्यात नव्हे हे अगाध अज्ञान कवितेत न्हाऊन देत नाही.'

हंसाना खायला किडे लागतात आणि ते शेवाळातच मिळतात, स्वच्छ पाण्यात नाही हे सामान्य ज्ञान सर्वांनाच आहे पण ते येथे दर्शवून मुग्धाताईंंच्या कवितेची कुचेष्टा करण्याचे कारण मला दिसत नाही. ही कविता भारतीय काव्यांच्या पठडीमधील आहे. ती प्राणिशास्त्राच्या पुस्तकातील धडा नाही हे लक्षात ठेवल्यास असे कळेल की भारतीय परंपरेच्या काव्यातील हंस हे मानसाच्या स्वच्छ पाण्यात विहार करीत असतात, चिखलात नाही. उदा. हा प्रसिद्ध श्लोक पहा:

कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो हंसः कुतो मानसात्
किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासंनिभम् |
रत्नानां निचया: प्रवालमणयो वैडूर्यरोहा: क्वचित्
शम्बूका: किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

अर्थ - (बगळे आणि राजहंस ह्यांवा संवाद) 'तांबडे डोळे, मुख आणि पाय असलेला तू कोण आहेस?' 'मी हंस आहे.' 'तू कोठून आलास?' 'मानससरोवरातून.' 'तेथे काय असते?' 'सोनकमळांची वने. अमृतासारखे पाणी, रत्नांचे खच, प्रवालमणि आणि वैडूर्याचे वेल.' 'तेथे कवड्या असतात का?' 'नाही.' हे उत्तर ऐकून बगळ्यांनी 'हीही' असे हसून दाखविले.

येथील हंस हा मानसाच्या स्वच्छ सुधासंनिभ पाण्यात विहार करतो. हे ध्यानी घेतले नाही तर 'तेथे कवड्या नाहीत' म्हणून दात दाखविणार्‍या बगळ्यांमध्ये अणि आपल्यांमध्ये फरक राहात नाही.

'पहीलं हे सांगा अनंगसंगा म्हंजी काय?' असा मूलभूत प्रश्न कोणासतरी पडला आहे आणि त्याला अ+नंग = नंगा नसलेला = कपडे घातलेला असे हजरजबाबी आणि वरकरणी चपखल असे उत्तरहि एकाला सुचलेले आहे. पण ही गोष्ट ह्याहून अधिक खोल आहे.

अमरसिंहाने अमरकोशामध्ये १.१.२५-२६ ह्या दोन श्लोकांमध्ये मदनाची पुढील १९ नावे दर्शविली आहेतः

मदनो मन्मथो मार: प्रद्युम्नो मीनकेतन: ।
कन्दर्पो दर्पकोऽनङ्ग: काम: पञ्चशर: स्मर:॥
शम्बरारिर्मनसिज: कुसुमेषुरनन्यज: ।
पुष्पधन्वा रतिपतिर्मकरध्वज आत्मभू: ॥

ह्या प्रत्येक नावामागे - आणि प्रत्येकाच्या पर्यायांमागे - उदा पञ्चशर म्हणजेच पञ्चबाण अथवा पञ्चसायक - काही गोष्ट आहे. ह्या नावांपैकी आठवे नाव 'अनङ्ग' असे आहे. 'अनङ्ग' म्हणजे ज्याला शरीर नाही तो, कारण त्याचा जन्म मनात होतो - मनसिज किंवा आत्मभू. तेथेच त्याचा अजून एक अर्थ 'रतिपति'असाहि दिला आहे.

सांगण्याचे तात्पर्य असे की मुग्धाताईंची कविता आवडली तर वाचा, काही विशेष चुकीचे दिसले तर तसे लिहा नाहीतर 'मौनं सर्वार्थसाधकम्' हे आठवून चूप राहा. ती आवडण्याची कोणावरहि सक्ती नाही.

नमस्कार

सादर प्रणाम.
आपला प्रतिसाद आठवला

शेवाळलेल्या पाण्यातच हंसिनी

शेवाळलेल्या पाण्यातच हंसिनी येतात,स्वच्छ स्फटिकासारख्या पाण्यात नव्हे हे अगाध अज्ञान कवितेत न्हाऊन देत नाही.

अहो अचरटसाहेब, ते स्त्रीचे

अहो अचरटसाहेब, ते स्त्रीचे विशेषण आहे. पाणी भरायला कोण येणआर तिथे!!
असं बरं!!!

तरी

आधी स्पष्ट केलेले बरे : कविता छानच आहे.

------------------

मी खाली अरविंद कोल्हटकरांनी लिहिलेला प्रतिसाद सुद्धा वाचला.

तरी वाटते, की ज्या रूपकाने अर्थ गडद किंवा स्पष्ट होत नाही (पाणी भरायला न-येणारी बाई ही हंसिनीसारखी का म्हणून आहे? कमनीय बाक असलेले - कर्व्हेशियस - आहे म्हणून? ती न-येणारी बाई हंसिनीसारखी डौलदार असण्या-किंवा-नसण्याने राधेची कथा किंवा कथेची पार्श्वभूमी अधिक गडद किंवा स्पष्ट कशी होते? ती पार्श्वभूमी बघता राधा डौलदार असूनही आली, किंवा डौलदार नसल्यामुळे आली, असे काहीही पटत नाही, अनावश्यक वाटते.)

केवळ परंपरेमुळे चालत आलेली अचित्रदर्शी रूपके ही उत्तरकाळात संस्कृत कवितेला आलेली सूज आहे. (वाढीव शब्द अंगाला आलेल्या सुजेसारखे अधिक, आणि सूज अवयव अकार्यक्षम करते, तसे हे वाढीव शब्द काव्य अकार्यक्षम करतात -- मला रूपकांचे वावडे नाही, हे स्पष्ट करू बघतो आहे.) ती परंपरा अनुकरणीय नाही, असे मला वाटते.

कुठली का राधा

कुठली का राधा असेना, तिला तिच्या कृष्णाने आमंत्रण नव्हतं धाडलं! आधी स्वतः मोहात पडायचं आणि मग त्याला दोष द्यायचा.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

कशावरून नसेल पाठवलं? तो काही

कशावरून नसेल पाठवलं? तो काही एवढा तिरशिंगराव नव्हता!

वा! डोह जसा शेवाळात गुंतलेला

वा! डोह जसा शेवाळात गुंतलेला आहे त्याप्रमाणेच घनश्यामाच्या आकर्षणात, आसक्तीत आणि आठवणीत गुंतलेली राधा मस्त वाटली. पण ती त्या आठवणी दूर सारुन स्वत्व निवडते - ये खटक्या मुझको. गुंतुन रहाणे ही मोहक असते.
___
मुग्धाताई तुमची राधा आधीच्या कवितातही एकटेपणात आनंद शोधायला शिकलेली जाणवली. शी हॅज मुव्हड ऑन.

मला उत्सुकता आहे.

या लेखासंदर्भात काही म्हणत नाही, पण मला उत्सुकता आहे. शुचिमामींनी कुठल्याही लेखाला/कवितेला एकदम सर्वप्रथम (म्हणजे इतरांचे मत येण्याआधी) काय फडतूस आहे, एकदम बकवास, भंगार, चिंधी, फालतू, थर्ड क्लास असं काही कधी म्हटलंय का? लिंक कुणी देऊ शकेल का? (डोळा मारत)

:D कशाला हो उदय. मला भीती

(दात काढत) :D (दात काढत) कशाला हो उदय. मला भीती वाटते टीका करायला - तुम्ही अजुन तो दोष उकरुन काढू नका (स्माईल)

माफ करा समजले नाही नीट

मी- मी राधा... नाही कुणाची अनंगसंगा

नाही कशी ?

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

पहीलं हे सांगा अनंगसंगा

पहीलं हे सांगा अनंगसंगा म्हंजी काय? मग विचार करता येईल कवितेतील नायिका अनंगसंगा आहे का नाही (डोळा मारत)

फोडीचा प्रयत्न

पहीलं हे सांगा अनंगसंगा म्हंजी काय?

यू आस्क्ड फॉर इट.

अ + नंग + संगा = जो नंगा नाही (बोले तो, जो कपडे घातलेला आहे), त्याचा(च) संग करते अशी. 'नाही कुणाची अनंगसंगा' बोले तो कपडे घातलेल्या कोणाचाही संग करत नाही, ही स्पष्ट कबुली आहे. (बरोबर आहे; काय पॉइंट आहे?)

(अवांतरः तूर्तास हातात शेजारच्याच ग्रोसरी ष्टोरातून आणलेल्या क्यालिफोर्नियाछाप स्वस्त क्याबरनेचा पेला आहे. (कितवा, याची मोजदाद विसरलो. बहुधा चौथा असावा. पण द्याट्स बिसाइड्स द पॉइंट.) त्यामुळे तूर्तास संजयास लाजवेल अशी दिव्यदृष्टी आहे. तसेही, मद्यात सत्य वसे - इन विनो वेरिटास - असे थोरामोठ्यांनी म्हटलेलेच आहे. तेव्हा... असोच.)

कसली हसले

(लोळून हसत) कसली हसले (स्माईल)

अनंगसंगा = रति किंवा

अनंगसंगा = रति किंवा कामविव्हल असा अर्थ असू शकेलसे वाटते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

होय अनंग म्हणजे मदन हे आठवले.

होय अनंग म्हणजे मदन हे आठवले. शंकरांनी भस्म केलयाने, अंग न रीहीलेला तो अनंग बरोबर?

Yep!

Yes!

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत हे आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके.

मुग्धाताई , माझी चुक झाली, मला क्षमा करा.

मुग्धाताई ,
माझी चुक झाली, मला क्षमा करा.
मुळातच उथळ स्वभाव असल्याने माझे भान सुटते कधी कधी आणि मी चुक करुन बसतो.
प्रत्यक्ष जीवनात संभाषणात कमी चुका करतो पण इथे सोशल मिडीयावर व्यक्ती समोर नसल्याने लवकर भान सुटते.
नंतर चुक लक्षात आल्यावर जे आपण केले त्याची अर्थातच लाज वाटते, पश्चाताप होतो.
पुन्हा एकदा क्षमस्व.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

अगदी मनातले बोललात म्हणाजे

अगदी मनातले बोललात (डोळा मारत) म्हणाजे आम्हीही असेच डिट्टॉ. (दात काढत) मग कालांतराने प्रतिसाद डिलीट करत सुटणारे (लोळून हसत)

पुन्हा राधा?

सारखं काय त्याच झाडावर?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मलाही आधी ढेरेशास्त्रींसारखंच

मलाही आधी ढेरेशास्त्रींसारखंच वाटत होतं, पण आता लक्षात येतंय की ही राधा कृष्णायनातली नसून कवयत्रीच्या मनातली नायिकेची व्यक्तिरेखा असावी...
(जसा शिरीष कणेकरांच्या लेखनात 'जाड चश्मेवाला मित्र' आहे, तशी!!) (डोळा मारत)

खरां खोटां कवयत्रीक ठांव!!!

का हो ढेरेशास्त्री? इतके का

का हो ढेरेशास्त्री? इतके का वैतागलात?