राधा... का पुन्हा पुन्हा

राधा कशी बोलत होती
कशी सांगत होती मनातले काही...
सखीला, पतीला, कृष्णाला
माहीत नाही कुणालाही
तिच्या भावविश्वाचे केंद्रक
कृष्णावरल्या भक्तकाव्यात कल्पिलेले
अथांग, असीम, अमिट प्रेमाचे
कृष्णसंगाचे, मोरपिसाच्या रंगाचे
सारेच भक्तीच्या गोड सुवासाने झिंगलेले
किती शतकांपूर्वीची असेल राधा?
तरीही ती होती नागर संस्कृतीच्या मूल्यांचा स्पर्श झालेली
पण वर्तनात कदाचित् अनागर राहिलेली राधा
एका गावाहून अतिरिक्त दूध लोणी घेऊन
मोठ्या शहरात विकायला जाणाऱ्या
सर्वच गोपींना होताच नागर स्पर्श
एका साम्राज्याच्या नायकाशी
त्याच्या किशोरवयात जमलेले प्रेमबंध
तिच्या भोवतीच्या बंधनांना कायमचे तोडू शकले नाहीत
एवढा तर निष्कर्ष मी काढतेच गद्यपणे
मी
माझ्या जगण्याचे केंद्रस्थान स्वतःच असलेली एक स्त्री मी
मी विचार करते राधेचा
अर्थातच माझ्या दृष्टीतून
तुम्ही चढवलेत राधेवर तुमच्या दृष्टीचे रंग
छद्मरंग
आता हे पहा मी उपसून टाकलेत रंगांचे ते थर
गृहीत धरलेल्या मूर्तीवरचा शेंदूर निखळून पडल्यावर
कधी आत भलतीच मूर्ती निघते
सुरसुंदरीवर लेप बसतो आणि तिचा मारुतीराया होतो.
कल्पित हतबल प्रेमिका,
चिरंतन शोकमग्न असणे किती आवडते आपल्याला
पण कदाचित् राधेवरचे कल्पक लेप निघून गेल्यावर
निघेल एक स्वमग्न, निडर नायिका
निघून गेलेल्या किशोराला फाट्यावर मारून विसरणारी
जगणारी पुन्हा एकदा...
हरकत आहे?
असू देत ना...
जरूर असू देत.
राधा तुमची वेगळी
आमची वेगळी...

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

पान्हा

राधा ... का पुन्हा पुन्हा पान्हा ?
हे शीर्षक उचित होईल.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

प्रत्येकांच्या ह्या शेपरेट

प्रत्येकांच्या ह्या शेपरेट शेपरेट राधांचा लसावि हुडकायला पाहिजे राव.
जिकडे मेजॉरिटी तिकडे आपण

ज्ञानात भर. आयला नायतर हे

ज्ञानात भर. आयला नायतर हे नळकुंडे काव्य वाचायला मिळालेच नसते. थँक्यू मारवासैब.

मुग्धाताईंची क्षमा मागुन टवाळ प्रतिसाद देतो

हा अभ्या उचकवतो म्हणुन या साठी अभ्या जबाबदार आहे याची नोंद घ्यावी.
तर अभ्या भौ या राधेचा ही लसावि काढावा. राधेचा लसावि कसा काढावा हे विचारु नये आणि यात कृपया डबल मिनींग शोधु नये. हा तुम्ही करता तो मसावि नाही ( मराठी सात्विक विनोद )
थेअरी अभ्यास विषय म्हणुन खालील पंक्ति आणि प्रॅक्टीकल अवलोकनाप्रित्यर्थ विशेष व्हिडीयो लिंक देण्यात येत आहे. इथे या विशेष व्हिडिओ चा केवळ शैक्षणिक वापर अभिप्रेत आहे.
https://www.youtube.com/watch?v=-MdlmXx_xo0
गोपियों संग घुमे कन्हैया
रास रचैया राधा ना जाए रे
अब संवारा ना भाए

राधा ओन दी डांस फ्लोर
राधा लाइक्स टू पार्टी
राधा लाइक्स तो मूव देट सेक्सी राधा बॉडी

पनघट पे आके सैयां मोड़ दे बैयाँ
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
छेड़े है हमका देयां बैरी कन्हैया
एंड एवरीबॉडी क्रेजी ओन राधा
होगा वोह लाखों दिल का चोर
हमका तो लागे वो
हुआ है ऐसे बावला जो कहता जाए

[ओ राधा तेरी चुनरी
ओ राधा तेरा झल्ला
ओ राधा तेरी नटखट नजरिया
ओ राधा तेरा झुमका
ओ राधा तेरा ठुमका
ओ पीछे पीछे सारी नगरिया

ओ..
माथे पे पंख मोरे
कहते हैं माखन चोर
बजाये बांसुरी
बड़ा आया चित्त चोर
बट राधा वांट्स मोर
ढुंढूँगी चारों और मिलेगा कोई और
दूंगी मैं हाथों में मेरे दिल डोर
कज़ राधा वांट्स मोर

ओ राधा राधा भोली दीवानी है
ओ राधा राधा दो पल जवानी है
ओ राधा को संभालो कोई इसे बता दो
की मिलेगा ना कोई सांवरिया

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

अहाहाहाहाहा मारवाजी, अप्रतिम,

अहाहाहाहाहा
मारवाजी, अप्रतिम, अत्युत्तम
राधेचा लसावि मिळण्याआधी ह्या प्रतिसादाला दाद म्हणून मी आपण केलेल्या 'अभ्या उचकावतो' ह्या आरोपाबद्दल माफ करत आहे. (डोळा मारत)

आधीच्या कवितेवर आलेल्या

आधीच्या कवितेवर आलेल्या प्रतिक्रियेमुळे-
का पुन्हापुन्हा तेच तेच झाड.
(स्माईल)