लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).

सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता. दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची. शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा. पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव काही अंशी कमी झाला असेल.

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता. नव्हते फक्त सुट्टे. अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे. कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती. श्रीमंत होण्याची जाणीव झाली. आजीने सांगितलेली एक कहाणी आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली. अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला. त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो.

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो:

स्वामी तिन्ही जगाचा
आट्या बिना उपाशी.

टीप: घरी मेक इन महाराष्ट्र आटा चक्की आहे. तरीही कधी कधी बाजारातून आटा आणावेच लागतो. पुरोगाम्यानो प्रसन्न होऊ नका, अस्मादिक पक्के देशभक्त आहोत. गोष्ट वाचल्यावर भारत माता कि जय आणि वंदे मातरम अवश्य म्हणावे.

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

काय पटाइत काका !! तुम्ही

काय हे पटाइत काका !! तुम्ही पेटीएम केलं नाहीत?

<अनु राव मोड ऑन> तुम्ही तुमच्या शेजार्‍यापाजार्‍यांची इतके वाईट वागलायत का? की त्यांनी तुम्हाला घरी आटा आणून दिला नाही !! <अनु राव मोड ऑफ>

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

अनु रावची बदनामी टाळा. (कुणी

अनु रावची बदनामी टाळा.

(कुणी विनोदी श्रेणी द्या रे.)

http://www.aisiakshare.com/no

http://www.aisiakshare.com/node/5645#comment-143566

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ते जाऊ द्या थत्ते चाचा,

ते जाऊ द्या थत्ते चाचा, खालच्या वाक्यानी खुप हसवले.

सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में

नोट देऊन वाण्याला एक अॅडवान्स

नोट देऊन वाण्याला एक अॅडवान्स पेड कार्ड बनवायचे हाय काय नाय काय

माझ्या कडे डेबिट कार्ड हि

माझ्या कडे डेबिट कार्ड हि आहेत (अर्थात ते नेहमी सौ. च्या खिश्यात राहते), पेटीम पण आहे. खरे तर मी कधीच बाजारातून आटा आणत नाही. गव्हाची बोरीच विकत घेतो. आमच्या भागात शेतकरी गव्हू विकायला येतात. २० वर्ष जुनी चक्की अजूनही व्यवस्थित काम करते. बाकी जुनी गोष्ट आठवली आणि तिला आजच्या परिस्थितीनुसार थोड बदलले एवढेच.

गेल्या काही दिवसांपासून

गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते,

तुम्ही कमरेने टंकन करता?
नाही म्हणजे आम्ही गरीब हातांच्या बोटांनी करतो, म्हणुन विचारलं!!
दिल्लीवाल्यांचा काय साला भरोसा नाय हां!!
(स्माईल)

हे विनोदाची पेरणी म्हणून

हे विनोदाची पेरणी म्हणून होते.
पटाइत काका दिल्लीमध्ये इतके वर्षं राहिल्याने बय्राच गोष्टी तुम्हाला नेहमीच्याच असल्या तरी दर शनिवारी एखादी डायरी लिहा इकडे.आम्हाला मजेशिर आणि नवीन वाटेल हे नक्कीच. सध्या प्रगती मैदानला कोणते प्रदर्शन आहे, २६ जानेवारीची तयारी कशी चालली आहे, सुरक्षितता कुठे वाढवलीय,डास आणि धुरासाठी काय करताहेत, मंडईत मूली कशी किलो इत्यादी आढावा टाका. " मी दिल्लीहून लिहितो की -----" सदर .

दिल्लीसारख्या शहरात राहून,

दिल्लीसारख्या शहरात राहून, पैशांची कमतरता नसतानाही आटा मिळवण्यासाठी जे कष्ट पडले अशा अनुभवावर लोक 'पटाइतकाका, तुम्हाला आटा मिळवता आला नाही, यात तुमचंच काहीतरी चुकलं' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहून वाईट वाटलं. पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा मिलोचा गहू खावा लागत होता तेव्हा खरोखरच भयंकर परिस्थिती होती. अन्नाचा प्रचंड तुटवडा होता. त्यानंतर हरितक्रांती झाली आणि तुटवडा नाहीसा झाला. पण त्याच आस्मानी परिस्थितीच्या रांगांची आजच्या काळात आठवण यावी यावरून सध्याची सुलतानी अवस्था किती वाईट आहे हेच दिसून येतं. माझ्या मते लेखकाला किमान सहानुभूती मिळायला हवी.

येस

एक शाब्बाश/वाह वाह तो बनतीही है.

>>'पटाइतकाका, तुम्हाला आटा

>>'पटाइतकाका, तुम्हाला आटा मिळवता आला नाही, यात तुमचंच काहीतरी चुकलं' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहून वाईट वाटलं.

त्यातले काही प्रतिसाद पटाइतकाकांना नसून इतरांसाठी होते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ते कळलं. मात्र मला इथेच नाही

ते कळलं. मात्र मला इथेच नाही तर मिसळपाववरही असे प्रतिसाद दिसले त्यामुळे दोन्हीकडे मिळूनच्या अनुभवाबद्दल दोन्हीकडे हाच प्रतिसाद दिला.

>>मिसळपाववरही असे प्रतिसाद

>>मिसळपाववरही असे प्रतिसाद दिसले

हे जनरली अपेक्षितच आहे... तिकडे तर काकांना प्रॉब्लेम आहे असं म्हटल्याबद्दल पाकिस्तानचं तिकीट सुद्धा काढून दिलं असेल.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

बादवे - या 'पाकिस्तानचं

बादवे - या 'पाकिस्तानचं तिकीट' देणार्‍या लोकांच्या स्कीममध्ये पाकिस्तानचा व्हिसाही असतो का?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

भारत माता कि जय आणि वंदे मातरम

actions not reactions..!...!

सामान्य लोक २००० नोट खिश्यात

सामान्य लोक २००० नोट खिश्यात टाकून फिरत होते. सुट्टे नसल्यामुळे खरीदारी करणे अशक्य होत होते. नगदी अभावी लग्न-कार्य पुढे ढकलल्या गेले. पैसा असूनही लोक खर्च करू शकत नव्हते. या वरून मला जुनी लोक कथा आठवली.

बालपणीच्या राशनच्या दुकानातल्या रांगा आणि आज बँकासमोरच्या रांगा त्यात साम्य दिसले.

काही स्पष्टीकरण. मला चांगला स्वैपाक बनविता येतो. सौ. नसेल तर भरपूर प्रयोग करतो. मला कसला हि त्रास नव्हता. आमची सौ. म्हणते तुम्हाला स्वैपाकी व्हायला पाहिजे होते.

डॉक्टर मी कधीही पाकीट उघडलं तर नोटा दिसत नाहीत हो!

व्हाट्स ऍप विनोद:
मनुष्य, डोळ्याच्या डॉक्टरला, काळजीच्या सुरात: डॉक्टर, मी कधीही पाकीट उघडलं तर नोटा दिसत नाहीत हो!
डॉक्टर: हो, हल्ली हा नवा रोग फ़ैलावला आहे . त्याचं नाव आहे मोदी-बिंदू!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

कोणाला सुचतात ना हे टवाळ

(लोळून हसत) (लोळून हसत)
कोणाला सुचतात ना हे टवाळ विनोद (स्माईल)

____________
“Those who cannot change their minds cannot change anything.”
George Bernard Shaw