पश्चिम घाट बचाव मोहीम आणि जगदीश गोडबोले

पश्चिम घाट बचाव मोहीम आणि जगदीश गोडबोलेजगदीश गोडबोले हे पुण्याचे अवलिया पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्व, ज्यांनी पर्यावरण क्षेत्रात ३०-३५ वर्षांपूर्वी इतके काम करून ठेवले आहे, पण मला वाटते ते आणि त्यांचे काम काहीसे विस्मृतीमध्ये गेले आहे. काही वर्षांपूर्वी वाचनालयात सापडलेले जगदीश गोडबोले यांचे मोहीम इंद्रावतीची हे पुस्तक वाचले होते. इंद्रावती नदी जी महराष्ट्र, आणि आजचे छत्तीसगड ह्या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते, त्या भागातील आदिवासी जीवनाच्या शोधमोहीमेबद्दलची माहिती त्यात होती. जगदीश गोडबोले यांनी पवना धरणग्रस्तांच्या बाबतीत काम केले आहे. ते अधिक झोतात आले ते त्यांनी काढलेल्या सह्याद्रीच्या जंगलाच्या, आणि तेथील आदिवासी ह्यांच्या हक्कांच्या जागृतीबद्दल काढलेल्या पश्चिम घाट मोहीम बचाव मोहीमेमुळे(Save Western Ghat March). परवाच मला जगदीश गोडबोले यांनी ह्या मोहिमेचा वृत्तांत लिहिलेले पुस्तक मिळाले. हे १९८९ मध्ये प्रकाशित झालेली आवृत्ती आहे. त्याची नवीन आवृत्ती देखील आली आहे, जी ह्या मोहिमेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्यांचा पत्नीने, अर्चना गोडबोले, यांनी त्यात आणखी भर घालून आणले. जगदीश गोडबोले यांचे तसे पहिले तर अकाली निधन झाले. त्यांच्या नावाने पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्याला दरवर्षी पुरस्कार देखील दिला जातो.

ह्या पुस्तकात जगदीश गोडबोले यांच्या हरहुन्नरी, आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीचा ठायी ठायी प्रत्यय येतो. सह्याद्री हा तर माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कित्येक वर्षे मी सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर असलेल्या किल्ल्यांवर, तसेच काही जंगलातून भटकंती केली आहे. लवासा(Lavasa) प्रकल्प, Aamby Valley City प्रकल्प, तसेच इतर गोष्टीमुळे जंगलाला होत असलेला धोका याबद्दल आपण वाचत असतोच. निळू दामले यांनी लिहिलेल्या लवासा या पुस्तकातून प्रकल्पाची केलेली भलावण वाचून वाईट वाटले होते. तसे मी त्यांना कळवले देखील होते. २५-३० वर्षांपूर्वीच ह्या प्रश्नावर जागृती करण्यासाठी काढलेल्या ह्या मोहिमेबद्दल पूर्वी कुठेतरी थोडेसे असे वाचले होते, पण असे पुस्तक आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे मी ते अधाशासारखे वाचून काढले. त्यात परत जगदीश गोडबोले यांच्या शैलीमुळे ते अगदी वाचनीय झाले आहे. कुठेही कंटाळा येत नाही.

पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ आणि मानववंश-शास्त्रज्ञ कैलाश मल्होत्रा यांच्या एका संशोधन वृत्तांतामुळे जगदीश गोडबोले सह्याद्रीच्या अभ्यासासाठी अशी मोहीम काढण्यास प्रेरित झाले. कैलाश मल्होत्रांनीच ह्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. सुरुवातीच्या काही पानातून, अशी शंभर दिवसांची ही मोहीम आखण्यातील अडचणी, वेगवेगळया तऱ्हेचे अनुभव, विविध व्यक्तींचा सहभाग ह्याची त्यांनी अगदी तपशीलवार, आणि रोचकपणे मांडली आहे. मला ह्या मोहिमेचे नाव सह्याद्री बचाव मोहीम असे का दिले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. सह्याद्री दक्षिणोत्तर असा पसरला आहे, जो महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, शेवटी काही भाग तामिळनाडू मधून देखील जातो. सगळीकडे तसे पहिले तर सह्याद्री हे नाव प्रचलित आहे. लेखक याचा उलगडा करतात. ब्रिटीश सरकारने दिलेल्या ह्यामुळे देखील सह्याद्री ओळखला जातो, त्यामुळे मोहिमेला हे नाव त्यांनी दिले. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे मोहिमेचा वृत्तांतच आहे, पण निरस माहितीने भरलेले नाही. ही मोहीम उत्तरेकडून(खानदेशातील नवापूर) आणि दक्षिणेकडून(कन्याकुमारी) एकाच वेळी सुरु झाली. आणि शेवटी दोन्ही गट गोव्यात एकत्र येऊन मोहिमेची सांगता झाली. लेखक प्रामुख्याने उत्तरेकडून मोहिमेवर असलेल्या गटासोबत असल्यामुळे त्या प्रवासाची माहिती येते. तसे पहिले तर लेखकाने आधीच कबुल केल्याप्रमाणे, हे पुस्तक कार्यकर्त्यांच्या नोंदवहीवर बरेचसे बेतले आहे. पण, तसे असले तर दक्षिणेकडून सुरुवात करून मोहीम पूर्ण केलेल्या गटाच्या वृत्तांत का आला नाही हे कळाले नाही. तीच गोष्ट पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या मोहिमेत सहभागी झालेल्या साथीदारांची यादीमध्ये, दक्षिणी नावे बिलकुल नाहीत.

अशा प्रकल्पातून लोक सहभाग, तसेच मोठे मनुष्यबळ लागते, ते देखील एकाच ध्येयाने प्रेरित झालेले, शिस्तबद्ध काम करणारे असे हवे असते. नाही तर दहा लोकांची दहा दिशेला तोंडे, अशी परिस्थिती होते, आणि मूळ उद्देश बाजूलाच राहतो. या पार्श्वभूमीवर गोडबोले यांची धडाडी, पूर्वीच्या मोहिमांचा अनुभव, तसेच, विलक्षण लोकसंग्रह यामुळे, विशेष चकमकी न झाडता मोहीम फत्ते झाली. चिपको आंदोलनाचे सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट यांचे मार्गर्शन, तसेच चंडीदास यांचा प्रत्यक्ष मोहिमेत काही काळ झालेला सहभाग, तसेच ठिक-ठिकाणी विविध प्रथितयश व्यक्तींचा सहभाग, चर्चा, यामुळे देखील मोहिमेला फायदा झाला. सह्याद्रीमध्ये अशा मोहिमा याआधी देखील निघाल्या आहेत. आम्हा ट्रेकर्समंडळीमध्ये trans Sahyadri expedition, जो साधारण १०००-१२०० किमी किल्ल्यांवरून केलेली भटकंती असते, बरीच प्रसिद्ध आहे. पण जगदीश गोडबोले यांच्या मोहिमेचा उद्देश वेगळा होता, जो सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून राहणाऱ्या लोकांशी, संस्थांशी, संघटनांशी संपर्क साधणे, आणि त्यांच्या दृष्टीकोनातून विनाशाची कारणे व त्यावरील उपाय समजावून घेणे हा होता असे पुस्तकात नमूद केले आहे. म्हणजेच सह्याद्रीचे जंगल, त्याच्याशी निगडीत वनसृष्टी, जीवसृष्टी यांच्या ऱ्हासाची कारणे, तसेच ह्या सर्वाशी तेथील लोकांचे, आदिवासी यांचे असलेले अनुबंध, वेगवेगळया कारणामुळे त्यांच्या जीवनात निर्माण झालेले पाणी, चार, इंधन या सारखे प्रश्न, यांचा समन्वय कसा घालता येईल हे सर्व पाहणे हाच उद्देश होता.

मोहीम गावा-गावातून जाते तेथील अनुभवांचे वर्णन येते. ह्या निमित्ताने, सभा, भाषणे, मिरवणुका, बैठकी, लोकांकडून माहिती गोळा करणे, स्वागत समारंभ, पथनाट्ये, प्रदर्शने, घोषणेबाजी(जंगल बचाव-मानव बचाव) या सर्वांचा जल्लोष, आणि उडालेला धुराळा याचे आणि त्यानिमित्ताने आलेले कटू, तसेच हृद्य, मजेशीर अनुभवांचे खुमासदार शैलीत तपशील येतात. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य हा प्रश्न त्यांना दिसला, धरणांच्या आसपास असलेल्या गावातही पाण्याचा प्रश्न त्यांना त्यावेळीही दिसला. पण एकूण इतर काय प्रश्न होते, चर्चा काय झाल्या, किंवा सर्वसाधारण उपाय काय असू शकतील या बद्दल विशेष मला लिहिलेले दिसले नाही. त्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या अहवालात असेल तर माहिती नाही. मोहिमेच्या वृत्तांताच्या ओघात लेखक बरीच विविध माहिती पुरवत जातात, जी नक्कीच नवीन(आजही) आहे. उदाहरणार्थ, धुळ्यापासून जवळच ४१०० हेक्टर परिसरात लळिंग-कुरण नावाचे अशियामधील सर्वात मोठी Fodder Bank आहे. साधारण १० वर्षांपूर्वी लळिंग किल्ल्यावर मी गेलो होतो, पण ह्या बद्दल माहिती नव्हती. निलगिरी सारख्या एक-प्रजातीय वृक्षांची लागवड, त्यातील फायदे, तोटे याबद्दल झडलेल्या चर्चा देखील येते. शिवाजी महाराज यांनी वन रक्षणाच्या संदर्भात काढलेल्या आज्ञापत्राचे रेखाचित्रदेखील त्यांनी दिले आहे, हेही मी कधी पहिले नव्हते. कोल्हापूरजवळ दाजीपूरचा जंगलात झालेल्या चर्चेत कुमरी शेतीचे(shifting cultivation) तोटे आणि त्यावर उपाय यावर चर्चा झाली.

भारतातील पर्यावरण चळवळीतील एक महत्वाचा टप्पा असलेल्या ह्या मोहिमेच्या संदर्भात हे पुस्तक वाचायला, त्यातच जगदीश गोडबोले यांच्या लेखनशैलीची मजा घ्यायला हे पुस्तक वाचायला हवेच. आता एवढ्या वर्षानंतर, ह्या मोहिमेचे काय झाले हे समजावून घ्यायला नक्कीच आवडेल. अर्चना गोडबोले त्यांच्या Applied Environment Research Foundation या संस्थेद्वारे हे काम पुढे नेत आहेत, तसेच डॉ. माधव गाडगीळ यांनी सुद्धा ह्या विषयावर भरीव काम केले. त्यांनी तर २०१० मध्ये पश्चिम घाटाच्या विषयीचा अभ्यासपूर्ण अहवाल भारत सरकारला सादर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी काही होत असताना दिसत नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वा वा , कुठे वाचायला मिळेल हे ?

परवाच श्रीवर्धन येथील पर्यटनात दिसलेल्या मलबारी धनेशाचा फोटो खरडफळ्यावर टाकला होता. सह्याद्रीतील डोंगरांच्या पश्चिम उतारावर घरे बांधता येत नाहीत म्हणून नाइलाजाने तो भाग वाचला आहे. अन्यथा देशाकडून /कोकणाकडून तुफान "डिवेलपमंट" झाली आहे. हे मोठे पक्षी जगण्यासाठी उंच आणि जुनाट झाडांची आवश्यकता असते. प्लॅाट्स पाडून जमिनी विकल्यावर मालक सर्व झाडे काढून तिथे परदेशी फुलझाडे लावतात. हे कसे थांबवणार?

प्लॅाट्स पाडून जमिनी विकल्यावर मालक सर्व झाडे काढून तिथे परदेशी फुलझाडे लावतात. हे कसे थांबवणार?

का थांबवायचे?

तुम्हाला 1. हे खरंच माहित नाहीये 2.जाणून घेण्याची इच्छाच नाहीये ,3. का विकास , कॅपिटलीसम वगैरे दैवी शब्दांच्या मखरापुढे बाकी काहीही बाकी सर्व फालतू , फडतूस वगैरे असल्याने तोडून फोडून नष्ट करावे असे वाटते 4. का उगाच भडकाऊ म्हणून लिहिलेत 5. इतर काही ? ... यातील काहीही खवचट , चेष्टा म्हणून लिहिलेले नाही ..... काळजी घ्या !!!( आणि प्रश्न/काळजी हि परदेशी झाडे लावल्याची नाहीये ) हा प्रतिसाद हा अनुताईंच्या का थांबवायचे या प्रश्नाला आहे .

मी सविस्तर उत्तर देऊ शकते पण तुम्ही पठडी सोडुन विचार करु शकणार नाही हे माहीती असल्यामुळे देत नाही. म्हणुनच अत्यंत छोटा प्रश्न विचारुन थांबले होते.
तुम्हाला कॅपिटलॅसम वगैरे च्या बाहेर काही सुचणार नाही, त्यामुळे सोडुन द्या. जालावर ह्यावर आधी चर्चा बरीच झाली आहे. मला लोकांना शिकवण्यात कधीच रस नव्हता.

धन्यवाद , शिवाय जालावर विशेषतः मराठी आंतरजालावर पूर्वी बरच चर्चा झाली आहे म्हणजे झालंच कि अंतिम .आणि मी चर्चेत नसतानाही मी पठडी सोडून विचार करू शकणार नाही हे ओळखून आपण एक छोटा प्रश्न विचारून थांबलात या बद्दल हि धन्यवाद .

तुमच्या इंग्लंडात बांधतात का हो दिसेल तिकडे घरं? उगा उचलली बोटे दाबला कळफलक.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद आवरावेत अशी विनंती.

जालावर, सार्वजनिकरीत्या लिहिल्यावर आपल्याला कोणीही प्रतिप्रश्न करू शकतात आणि अशा प्रश्नांना उत्तर न देता व्यक्तिगत आरोप करणं बेजबाबदारपणाचं वर्तन आहे, याची कृपया नोंद घेणे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

का थांबवायचे?

अनु राव यांचा हा प्रश्न उचित आहे.

आपण हे थांबवू शकणार नाही.(तिडिक)
तिकडे एक तेल्या माड नावाचे सुरेख झाड असते. ( पाम प्रकारातले )त्याला सुपारीएवढ्या जांभळासारख्या पण काळ्या तुरट फळांचे घोस लागतात. एकेक घोस सत्तर ऐंशी किलोचा असतो. ही फळे फक्त धनेशच गट्टम करतात. ही निरुपयोगी झाडे पहिली तोडतात.

फिशटेल पाम म्हणून एक माड असतो. त्याला मराठीत सुरमाड, भेरली/भेरला/येडा/येडला माड, डोंगरी माड (खरे तर या नावाने आणखी एक प्रजाति ओळखली जाते, ती पाम कुळातली नसते. पुण्यात एम्प्रेस गार्डनमध्ये ही झाडे आहेत.) अशी काही नावे आहेत. शास्त्रीय नाव Caryota urens. पण याची फळे सुपारीसारखी असली आणि घोसांनी येत असली तरी हिरवी असतात. कालांतराने काळी होतात.

होय,हाच माड.
फुलझाडं काय चारचार महिन्यांनी बदलू शकतो पण जुने माड,झाडं सत्तर ऐंशी वर्षांचे गेले की गेलेच.

घाट / अरण्ये इत्यादी वाचवा वगैरे हाक देणे ठीक आहे पण ते वाचवण्यात काय अडचणी आहेत त्यांचा लवकर विचार करायला हवा होता. जमीन वनखात्याची असेल ती वाचेल पण इतर खासगी शेतीजमीनी आहेत त्या वाचवणे कठीण आहे॥ वारस म्हणतात यातून उत्पन्न काहीच नाही, बाहेरून पैसा आणून ओतून झाडे आणि घरे संभाळावी लागतात. ज्यांची अपत्ये परदेशी आहेत ती धन पाठवतात पण इथले जमिन विकतात. येणारे मालक त्यांच्या मिळकतीवर काहीही करायला मोकळे आहेत. घाट म्हणजे केवळ सह्याद्रीचा डोंगर उतार नव्हे तर पायथ्यापासून चाळीसपन्नास किमीटरपर्यंत समुद्रापर्यंतचा किनारपट्टीचाही भाग आहे.त्यावरची वनसंपदा,पशुपक्षी हे आलेच.नारळी पोफळी हे पिक धरल्याने त्यांना वृक्षतोडप्रतिबंध कायदा लागू होत नाही.आंबा,फणस,जांभूळ,रिठा,बिब्बा,हिरडा,पपनस हे तोडता येत नाही.

अचरट राव , हे वायलं आणि कशाला थांबवायचे वायलं !!

होय.
विषयाला धरून लिहिलं थोडं पुढे.

# परदेशात काही शहरात घरं बांधली की नियम लागू करतात स्थानिक नगरपालिका. गवत कापलेच पाहिजे. झाडं अस्ताव्यस्त वाढता कामा नयेत. कपडे बाहेर लटकत वाळवायचे नाहीत, घरात धूर करायचा नाही. मग तिकडे नागरी स्वातंत्र्य कायदा नाही का? पुण्यातही बहुतेक औंध सिध सोसायटीत कायदे आहेत.यावर चर्चा करून काही फायदा नाही.

//का थांबवायचे?
अनु राव यांचा हा प्रश्न उचित आहे.//

मालकी ही पूर्णपणे मालकीच असायला हवी.

आपल्या राज्यपद्धतीत व्यक्तिस्वातंत्र्य दिल्यानंतर कुठेकुठे त्याच्या कपच्या उडवत बसण्यात अर्थ नाही. मोठेमोठे भाग अभयारण्य म्हणून राखले की आपोआपच कायद्याच्या चौकटीत राहून घाट वाचवता येतील. घाटमाथ्यापासून समुद्रापर्यंत पाचपाच किमिचा पट्टा राखीव ठेवला तर पशुपक्षी यांना लागणारे संतुलित वन निर्माण होईल.सध्या जे तुकड्यातुकड्यात राखीव भाग आहेत ते उपयोगाचे नाही.

एकदम सहमत. जोरदार सहमती.

--

प्लॅाट्स पाडून जमिनी विकल्यावर मालक सर्व झाडे काढून तिथे परदेशी फुलझाडे लावतात.

अनु च्या प्रश्नातला अप्रकट अर्थ हा आहे की परदेशी फुलेझाडे ही स्थानिक जैविक विविधतेमधे भर च घालतात. व म्हणून अशी फुलेझाडे लावणार्‍यांना न थांबवता त्यांना प्रोत्साहित करावे.

--

परदेशात काही शहरात घरं बांधली की नियम लागू करतात स्थानिक नगरपालिका. गवत कापलेच पाहिजे. झाडं अस्ताव्यस्त वाढता कामा नयेत. कपडे बाहेर लटकत वाळवायचे नाहीत, घरात धूर करायचा नाही.

ह्यातल्या काही बाबी पण उचित आहेत. अशा प्रकारच्या नियमांमागील उद्दिष्टांना Internalizing the Externalities असं म्हणतात.

एका टीशर्ट ला २०००+ लि पाणी लागते, चामड्याच्या बुटाला २८०० लिटर.
जो खरा पर्यावरण प्रेमी असेल तो फक्त कपड्यांचे दोनच जोड वापरेल. चामड्याच्या वस्तू तर अजिबात वापरणार नाही.

निसर्ग /पर्यावरण/पशुपक्षी जाणकारांकडून कोणती आदर्श स्थिती असेल त्याचा आराखडा घ्यावा. त्यांनी टीकाटिप्पणी सूचना केल्या की राजकारण सुरू होतं.
आदर्श स्थिती किती आणि कुठे आणता येईल याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा.

अभयारण्यातून रस्ता नेताना पाचपाच किमीचे कृत्रिम बोगदे करून त्यावर माती टाकली की अरण्याचे दोन तुकडे होणार नाहीत, छोटेमोठे प्राणी निर्बंध वावर करतील. आठनऊ किमीचे बोगदे कोकण रेल्वेवर आहेतच आणि त्यातून डिजल एंजिनाच्या गाड्या जातात. धूर दोन्ही बाजूकडून आणि मधल्या धुरांड्यातून बाहेर काढतात पंखे लावून.
कल्याण - नगर रेल्वेसाठी एका कंपनीने भिमाशंकर डोंगरात आतून बोगदा_ घाट बांधून देण्याची तयारी दर्शवली.

रोचक माहिती आभार!

अनुराव, नुसत्या दोन तीन ओळींत पिंका टाकण्यापेक्षा तपशिलात काही लिहिलंत तर त्याचं खंडन किंवा सहमती काहीतरी शक्य व्हावे. तोवर.. असो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा छद्म-सेक्युलरांचा मोदींवरील हल्ला मानायचा काय? ते तर कोळशापासूनचे वीजउत्पादन डबल करायला निघालेत! त्यामुळे भू-तापमान वाढून भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरील शहरांना (पंचवीसेक वर्षात ) कोणताही धोका पोचणार नाही अशी त्यांची पक्की धारणा आहे .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ऋ - अरे ह्या विषयावर कीती चर्चा झाल्या आहेत. मुळात पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे संरक्षण म्हणजे काय इथ पासुन सुरुवात होते,

इथले सर्वच्या सर्व लोक जे गहु तांदुळ खातात, ते ज्या शेतीतुन निर्माण होतात ती मुळात तिथले जंगले तोडुन निर्माण झाली आहे ( आणि त्याला आपण कृषि संस्कृती वगैरे नाव दिले आहे ). ते गहु, तांदुळ चालतात. काही वाईन आणि कोनॅक प्रेमी ज्या द्राक्षांच्या दारू पितात, त्याच्या बागा पण जंगले तोडुन निर्माण झाली आहेत. इतकेच नव्हे तर ही द्राक्ष, गहु, तांदुळ हे त्या प्रदेशातले मुळचे नव्हतेच.
ते चालते, पण कोणी स्वताला आवडते म्हणुन स्वताच्या मालकीच्या प्लॉट वर फुलझाडे लावली तर आरडाओरड कशाला?

बर कोणाला माड आवडतो, हॉर्नबील बघायचा असतो हे काय तिथली झाडे तोडायची नाहीत ह्याचे मुळ कारण होऊ शकते का?

मी राजीवसाने गटातली आहे ह्या जैवविविधतेच्या बाबतील. जे पक्षी प्राणी सध्या दुर्मीळ आहेत, त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी आधीचे कित्येके पक्षी प्राणी प्रजाती संपवल्या आहेत.

-------
हवा, पाणी, जमीन ह्याचे पोल्युशन ही पूर्ण पणे वेगळी गोष्ट आहे, ती कमीत कमी होयला पाहिजे ह्यात दुमत नाही.. पण मला वाटतील ती झाडे लावायची नाहीत हे पटत नाही.

या प्रतिसादाला विनोदी श्रेणी का देण्यात आली आहे ते समजले नाही.

तुम्हीच बघा. आधी म्हणायचे की एका शब्दाची पिंक का टाकली. मग १०० शब्दांची ओकारी केली की त्याला विनोदी म्हणायचे. तुम्ही नविन आहात का हो इथे?

हा हा हा. मुद्दा बिनतोड आहे!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

या प्रतिसादाला विनोदी श्रेणी का देण्यात आली आहे ते समजले नाही.

काही श्रेणीदात्यांना विनोदी वाटला म्हणून.

श्रेणीदात्यांनी केलेले मूल्यांकन चांगल्यापैकी त्यांचे स्वतःचे मत असते (कारण कोणत्या श्रेणीदात्याने किती, कोणाला व काय श्रेणी दिल्या हे अप्रकट असल्यामुळे तसेच Verifiable नसल्यामुळे "Transactions costs" निर्माण होतात व त्या कॉस्ट्स श्रेण्या विकत घेण्याच्या वृत्ती ला मारक असतात. विकत म्हंजे पैसे देऊन विकत असं नव्हे ... तर इतर मार्गांनी.).

ही "Transactions costs" ची संकल्पना Secret Ballot ला पण लागू आहे.

दोन टोकं आहेत,
१. अजूनही शेतीमुळे काही प्रमाणात जैवविविधता नष्ट होउ शकते हे मला मान्य आहे. मात्र आता शेतीखाली नव्याने येणारी जमीन किती? जंगलाचे रुपांतर शेतीत होऊन कितीतरी वर्ष लोटली आता ते पुन्हा फिरवणे अशक्य आणि माणसासाठी त्याने काही भले होईल असेही नाही. पर्यावरण रक्षण म्हणजे जंगलात आदीम स्वरूपात राहणारा व्हावे किंवा आदिवासींसारखे जगावे हे समजणारा मी ही नाही.
२. याचे दुसरे टोक जमिन माझी आहे म्हणजे मी तिथे काहीही लावेन - भवताल गेला खड्ड्यात! जेव्हा माणसाने शेती केली तेव्हा आपल्या कृतीचा पर्यावरणावर नक्की काय दुष्परिणाम होतो आहे हे समजण्या इतकी त्याला अक्कल नव्हती. आपल्याला ती आहे हा मुख्य फरक! आता समजून उमजूनही केवळ जमिन आपली आहे म्हणून भविष्यातील धोका समजत असूनही दुर्लक्ष करणे माणसासाठी घातक आहे.

मला पर्यावरणाची तितकीशीच चिंता नाही ते पुरेसं अडाप्टेबल आहे. पण माझी व पर्यायाने माणसाची आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन गोष्टी आहेत ऋ.

१. मुळात प्लॉट वर काही केमिकल प्लँट टाकत नाहीये, किंवा शेतीपण करत नाहीये. नेटीव्ह झाडे काढुन परदेशी झाडे लावतोय. हे खरोखर पर्यावरण विघातक आहे का?
२. तुझा दुसरा मुद्दा जो आहे त्याच्याच सारखा मुद्दा हाम्रीका आणि युरोप पर्यावरण परिषदेत मांडत आहेत आणि भारत, चीन ला पर्यावरण कायदे लावायला सांगत आहे. भारत आणि चीन म्हणतायत की, तुम्ही ( यु.हा. ) मजा करुन घेतलीत आणि आम्हाला मात्र मागास रहायला सांगत आहेत. ऋ तू नॉर्मली ह्या बाबतीत भारताच्या बाजुनी असतोस, इथे का वेगळा स्टँड. कोणाची असतील स्वप्ने प्लॉट घेउन त्यावर परदेशी फुलझाडे लावायची.
समुद्र रीक्लेम करुन बंगला बांधुन त्यात रहाणार्‍यानी, परळच्या चाळीत वाढलेल्या कोणीतरी पैसे मिळवुन बंगला बांधायची स्वप्ने बघणार्‍यांना बंदी का घालावी?

---------
तिसरा मुद्दा, व्यक्तीने समाजासाठी स्वताची स्वताची दुसर्‍यांना त्रास न देणारी स्वप्ने पण मारुन टाकायची का? स्पेसिफिकली जेंव्हा नक्की काय परेणाम आहेत हे सुद्धा कोणाला माहीती नाही.
गब्बु चा मुलींच्या भृणहत्येच्या बाबतीतला अश्या प्रकारचा युक्तीवाद माझ्या स्मरणात आहे.

जाउ दे. वेळेअभागी पास!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झाडे लावली तर ठीक आहे अनु. हे लोक झाडे कापून इवलीशी फुलझाडे लावतायत मग मोठ्या पक्ष्यांनी कुठे घरटे करावे? Sad त्यापेक्षा, झाडांच्या पायाशी ही झुडपे लावा की.

बरं मग पक्षी का जगावे?

आपल्याला पर्यायाने एकंदरच मनुष्याला नेत्रसुख+कर्णसुख.

✿ ~When you get in debt, you become a slave - Andrew Jackson ~✿

सर्वप्रथम, पर्यावरण, झाडं, बागकाम वगैरे गोष्टींचा हौस म्हणूनही मी फार अभ्यास केलेला नाही. घरी थोड्या भाज्या पिकवते, फार्मर्स मार्केटात कधीमधी जाऊन खरेदी करते आणि माझ्या मैत्रपरिवारात काही लोकांना पर्यावरण विषयाबद्दल कळकळ आहे; त्यामुळे ह्या विषया‌वर लिहून आलेल्या गोष्टी हे लोक प्रसृत करतात, एवढंच मला त्यातलं समजतं.

परदेशी फुलेझाडे ही स्थानिक जैविक विविधतेमधे भर च घालतात.

जैव-विविधता ही गोष्ट विविधतेसाठी विविधता प्रकारची नसते. स्थानिक पर्यावरण - यात हवा, पाणी, ऊन, तापमान, जमिनीचा पोत, पावसाचं प्रमाण, परागीकरण करणारे घटक - माश्या, किडे, वारा, अशा अनेक गोष्टी येतात. माणसाने ढवळाढवळ केल्याशिवाय विविध जीव अनेक सहस्रकांपासून आपापल्या भागांमध्ये टिकून आहेत. ते टिकून आहेत याचं कारण म्हणजे स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेणं त्यांना शक्य झालेलं आहे. हा समतोल माणसांच्या ढवळाढवळीशिवाय स्थिर असतो. बदलाचा वेग माणसांना लक्षात येणार नाही एवढा कमी असतो.

यात परकी झाडं आणून लावण्याचे निरनिराळे परिणाम होतात. या झाडांना पाणी किती लागतं; जर आवश्यकतेपेक्षा कमी पाणी मिळालं तर ही झाडं मरतील, अधिक पाणी मिळालं तरीही. झाडांना निरनिराळ्या प्रकारची कीड, रोग लागतात. स्थानिक वातावरणात परकी झाडं टिकू शकतीलच असं नाही, मग त्यावर विविध रासायनिक फवारे मारावे लागतील. यात पाणी, कीडनाशक/रोगनाशक अशा गोष्टींचा वापरामुळे स्थानिक जीवजंतू, किडे-मुंग्या टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. विविधतेसाठी विविधता आणली की आहे ते पर्यावरण नष्ट होण्याचा धोकाच जास्त.

गब्बर सिंग बहुदा म्हणायचा प्रयत्न करत आहेत की ज्ञान आणि माहितीवर कोणाचीही मक्तेदारी नाही; ते खरंच आहे. तशी विनोदांवरही कोणाचीही मक्तेदारी नाही. ज्ञान, माहिती मिळवण्याची आणि विनोद करण्याची मुभा सगळ्यांना आहे; त्याचा जरूर वापर व्हावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीताईंच्या "समांतर" विषयाच्या प्रतिसादाखाली टाकयचे होते हे -

तुमचे सगळे बरोबर आहे पण बाहेरची झाडे वाढवायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? जगली, रुजली तर चांगलेच आहे की.
सगळ्यांनीच असा विचार केला असता तर आपला परमप्रिय वडापाव कसा खायला मिळाला असता?

...

शिवाय, झाडांवरच अन्याय का? माणसे देश बदलून इकडे-तिकडे लिगली/इल्लिगली गेली तर त्यांचे कौतुक, पक्षी पण जगभर फिरतात, आपण बिचार्‍या झाडांना मदत करायला नको का, एकेका परागकणाने सात समंदर बिना-हेल्प पार करायचे का काय?

माणसांच्या प्रजाती निरनिराळ्या असतात, निरनिराळ्या प्रजातींची माणसं आपसांत समागम करून प्रजोत्पादन करू शकणारी प्रजा निर्माण करू शकत नाहीत, निरनिराळ्या प्रजातींच्या माणसांना एकाच प्रकारच्या विषाणू-जीवाणूंमुळे निरनिराळे रोग होतात किंवा काहींना रोग होतात, काहींना होत नाहीत; असं काही सुचवताय का?

('समांतर' प्रतिसादाखालीच हा प्रतिसाद आला आहे. 'डिस्प्ले : थ्रेडेड' करून तसंच दिसावं, अशी अपेक्षा आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो विनोद करायचा एक प्रयत्न होता(असफल). म्हणून ... देवून खाली लिहीले होते.

वडापावचा उल्लेख असलेले वाक्य सिरीयसली लिहीले होते.

वडापावर म्हटल्यावर मला भीती वाटते. मराठी अस्मितेचं प्रतीक आहे तो! मग मी विनोद-बिनोद समजून घेऊ शकत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवीन येणाय्रा फुलझाडांपेक्षा एका मोठ्या पट्ट्यातली जुनाट झाडे जाण्याचे भय आहे.पडणाय्रा ढलप्यांखाली भुंगे असतात ते धनेश,सुतारपक्षांचे अन्न आहे. शेंडातुटके माड सुतारपक्षांचे आश्रयस्थान आहे

अवांतर ष्टोरी : सुमारे ११ वर्षांपूर्वी मी या स्वयंसेवी संस्थेच्या एका स्वयंसेविकेशी बोललो होतो. या संस्थेचे लोक निवडक बेटांवर जाऊन तिथल्या प्राण्यांच्या प्रजातिंपैकी कोणत्या नामशेष होत आहेत त्याचा अभ्यास करून त्या नामशेष होणार्‍या प्रजातिंना (species) पुनरुज्जिवित करायचा यत्न करतात. उद्देश असा की त्या प्रजातिंना नामशेष होण्यापासून वाचवणे. तिने सांगितलेला किस्सा - ती एका बेटावर अभ्यासासाठी गेली होती व सकाळी ८ ते १२ सर्व्हे केल्या नंतर दुपारचे जेवण करून अंगणात पुस्तक वाचत बसली होती. तर एक छोटा पक्षी येऊन तिच्या हातातल्या पुस्तकावर येऊन बसला. त्या पक्ष्याला तिचे भय वाटले नाही. त्याला ecological naïveté असं म्हणतात. म्हंजे एखाद्या प्रजातिंच्या सदस्यांना दुसर्‍या व संभाव्य भक्षक प्रजातिंच्याबद्दल माहीती व अनुभव नसल्यामुळे त्या संभाव्य भक्षकाबद्दल भय न वाटणे. अर्थातच त्या स्वयंसेविकेचा हेतू त्या पक्ष्याला मारण्याचा नव्हता.

वडापावर म्हटल्यावर मला चिमाजि अप्पांची आठवण येते. तो वसईच्या लढाईत पोतृगिजांकडून जिंकून आणला. मराठी अस्मितेचं प्रतीक आहे तो.
हा विनोद नसून इतिहास आहे.

# बेटावर हातावर येऊन बसणारा पक्षी - खरं आहे.बेटांवर छोटेमोठे पक्षी मोठ्या वादळांत वेगाने पोहोचले. तिथे चार पायांचे उंदिर,कोल्हे प्राणी नव्हते. मनुष्यालाही । त्यांच्यासारखेच दोन पाय असल्याने त्यांना मनुष्याचे भय वाटत नाही.ती फिल्म पाहिली आहे. एक मुलगी खायला देतेय आणि तिच्या अंगा खांद्यावर चिमण्या बसल्या आहेत.

मुद्दा हा आहे की, बटाटा इथे रुजला आणि त्याचे पिक व्यवस्थित येवू लागले. लोकांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत परदेशी झाडं लावायचे प्रयोग केले तर त्याला आडकाठी निर्माण करण्यात येवू नये.

मनोबानी ही जुनी ऐसीवरची चर्चा शोधुन दिली आहे.

http://www.aisiakshare.com/node/2253

//ज्या शेतीतुन निर्माण होतात ती मुळात तिथले जंगले तोडुन निर्माण झाली आहे ( आणि त्याला आपण कृषि संस्कृती वगैरे नाव दिले आहे )//

अनुराव यांनी ऋच्यासाठी दोनतीन ढासू मुद्दे मांडलेत.आम्हा चा पिणाय्रांना केवळ अंगठे धरायची शिक्षा न देता चाबकाचे फटकेही पडतील एवढी डोंगरांची हानी केलीय. एक दिवस लाक्षणिक प्रायश्चित्त घ्यावे म्हणतो.कॅाफीवाले खरे पर्यावरणप्रेमी. मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात कॅाफीची झाडे."कशाला थांबवायचे?" चा धोंडा बाजूला केल्यावर बरेच विंचू बाहेर पडलेत. मनोबानेही लिंक फेकून हा हन्त हन्त केलय.चला मजा आली.
हे गुणी बाळ