स्वार्थाच्या बाजारी, मैत्री अशी रंगली

सावळ्याच्या प्रेमात
पडली राधा बावरी
काळ्या रंगात रंगुनी
यमुनाही झाली काळी.

द्वारकेचा राजा आला
सुदामच्या द्वारी
काळी लक्ष्मी झाली
जनखात्यात पांढरी.

यमुनेच्या काठी
अवसेच्या राती
स्वार्थाच्या बाजारी
मैत्री अशी रंगली.

द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

द्वारकेचा राजा = काळा पैसे

द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.

हे स्पष्टीकरण कवितेच्या खालीच देऊन पटाइत काकांनी चांगले केले.

गुरुंना असला अध्यात्मिक सल्ला

गुरुंना असला अध्यात्मिक सल्ला समाजाला देण्याचा अधिकार कुणी दिला?

घटनेने?

ते 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' की काय ते, कदाचित?

मी एका विख्यात अशा आध्यात्मिक गुरुंच्या आत्मचरीत्रात

महाराष्ट्रातल्या एका विख्यात आध्यात्मिक गुरुंच्या आत्मचरीत्रात ज्यांचा फार मोठा भक्त वर्ग आहे.
त्यात ते साधने संदर्भात सांगत असतात व सहज जाता जाता एक आध्यात्मिक सल्ला ही साधकाला देतात तो असा.
स्व स्त्री बरोबर माफक प्रमाणात संभोग करावयास हरकत नाही. त्याने आध्यात्मिक पतन होत नाही. साधना चालु राहते प्रगती होत राहते.
असो.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

द्वारकेचा राजा = काळा पैसे

द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला??
नाही पटली उपमा.

फोड

काळा, पैसेवाला असे वाचा.

द्वारकेचा राजा = कृष्ण = काळा. आणि राजा म्हटला तर पैसेवाला असणारच ना?

पडली राधा बाबरी तीन दिवस उशीर

पडली राधा बाबरी

तीन दिवस उशीर झाला की हो कविता टाकायला. (डोळा मारत)

राधेला बातमी कळायला तीन दिवस

राधेला बातमी कळायला तीन दिवस लागले हो...

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

बाबरी?

बाबरी पडून काही दशकं लोटली, असं म्हणतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बावरीच्या जागी जुकून बाबरी

बावरीच्या जागी जुकून बाबरी लिहिल्या गेले चूक दुरुस्त केली आहे. बाकी आमच्या दृष्टीने ते राम मंदिर आहे.

बावरीच्या जागी जुकून बाबरी

बावरीच्या जागी जुकून बाबरी लिहिल्या गेले

सिग्मंड की फिसलन?

(अतिअवांतर: प्रेरणा या सुप्रसिद्ध कथेच्या केवळ शीर्षकावरून. कथेच्या गाभ्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.)

.

.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

काय थत्तेसाहेब, रेल्वेवाले

काय थत्तेसाहेब, रेल्वेवाले कधीपासून सेरीफ फॉन्ट्स वापरायले? ते पण श्रीलिपी/कृतीचे. (डोळा मारत)
फोटोशॉप करताना परस्पेक्टीव्ह पण गंडलेय जरा.

कांग्रेसी फटुशॉप नाही करत

(लोळून हसत)
कांग्रेसी फटुशॉप नाही करत ओ...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला ते लक्षात आलं होतं पण

मला ते लक्षात आलं होतं पण तेव्हा दुसरी इमेज सापडली नाही. पण राम मंदिर खरोखरच झालेलं आहे.

http://www.business-standard.com/article/pti-stories/new-ram-mandir-stat...

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

अद्याप नाही

राममंदिर की शिवमंदिर हा वाद वर येऊ पाहतो आहे!

थोडक्यात, राममंदिर आणि वाद हे नेहेमीच बरोबर जाताहेत!

आवडली.

(स्माईल) आवडली.