जिजीविषा

http://www.terrafirmaconsultancy.com/landscape-architect-blog/wp-content/uploads/2016/02/ferns-on-wall.jpg
.
एखादे नाते कम्फर्ट झोन बनण्याआधीच तोडता येते का? व्यक्ती हळूहळू आवडते व नंतर एका टप्प्यावरती आवडणे थांबून फक्त सवय बनते. सवय बनल्यावरती गरज बनते. हे सर्व स्थित्यंतर होण्याआधीच नात्याच्या मधुचंद्र काळातच मूव्ह ऑन करता येते का? वर्षाने घडा मोडला. चिखलामातीचा परत गोळा केला, व परत पहिल्यापासून घडा बनविणे चालू केले. परत घडा बनविण्याच्या चक्राबरोबर, मनातले चक्र चालू झाले. दादा आई ला वृद्धाश्रमात ठेवायचे म्हणतो आहे. म्हणजे रोखठोक व ममत्व सोडून पाहिले तर आई चे कुटुंब बदलणार, तिच्या जीवनात एक मोठे स्थित्यंतर येणार. मुले-सुना-नातवंडे जाऊन नवीन सोबती हे कुटुंब बनणार. ती या वयातही या स्थित्यंतरास धीराने सामोरी जाते आहे. आणि आपण वैधव्याच्या धक्क्यातून नुकतेच बाहेर पडलो आहोत. पण आईइतका धीर का नाही आपल्यात? तिची गुणसूत्रे आहेत की आपल्यात. मूल न होउ देण्याचा निर्णय एक प्रकारे योग्यच होता की मूल झाले असते तर एकाकी वाटले नसते? ४3 व्या वर्षी असे निपुत्रिक, विधवा हा शिक्का दुर्दैवी आहे की न्यूट्रल आहे? तसे काही नसते. आपण आपल्या छंदांमध्ये, पैसे व स्वतः:पुरता सुरक्षितता निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये समाधानी आहोत की. मग क्वचित सेल्फ पिटी मध्ये ओढले का जातो? असे का वाटते की आयुष्य हां हां म्हणता वाऱ्याच्या झुळुकी सारखे निघून गेले व काही हाती लागले नाही.
.
आपल्या आयुष्याचे चालक मालक, कर्ते निभावते आपण होतो याचा अभिमान बाळगायचा की आपण हट्टी असल्याने कोणाला जुमानले नाही याचे खंतमय introspection करायचे? अनिकेतचा प्रचंड सपोर्ट आपल्याला आजारात मिळाला. मूड्स पिसाटासारखे हेलकावे खात असताना, त्याने सावरून धरले. त्याने शुश्रूषा केली, जेव्हा आपल्याला वाणीसामान, जीवनावश्यक वस्तू आणण्याचे बळ नव्हते तेव्हा त्याने साथ दिली, करून खाऊ घातले व मुख्य म्हणजे मोराला बूस्ट केले. erratic मूड्स स्विन्ग्स मध्ये त्याने ना कच खाल्ली ना खाऊ दिली. औषधे वेळेवर घेण्याचेही भान आपल्याला नव्हते तेव्हा त्याने औषधे दररोज पथ्य वेळा सांभाळून हाती दिली, मी घेते का नाही ते डोळ्यात तेल घालून पाहिले. एका ठराविक वेळी झोपण्याचे वळण लावले, व्यवस्थित झोप मिळते की नाही त्यावर लक्ष ठेवले. ऑफिस तर चालू होते आपले पण सारे काही मानसिक कुबडी घेऊन चालले होते.
.
बरे तर झालो. पण त्याच्या आरोग्याचे, एकंदर नात्याचे जे वेअर & टेअर झाले होते ते भरून कसे निघणार? Stress took it's toll on his health. आपल्याला बरे करून तो मात्र निघून गेला. आपली सवय बनून, त्याने निरोप घेतला. काही लोक फक्त अंधारात मार्ग दाखवण्यापुरते वाटाडे राहातात का? इतरांचे माहीत नाही तो मात्र वाटाड्याची भूमिका करून निघून गेला. म्हणजे नक्की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण होतो का? आपणच कर्ते सावरते निभावते होतो का? नाही. अनिकेत शिवाय या आजारावर आपण मात करू शकलो असतो का? का गर्तेमध्ये succumb होऊन विनाश पावलो असतो? या जर तर ला काय अर्थ? त्याने आपल्याला समजावून, धाकदपटशा दाखवून योगासने , व्यायामाची सवय अंगी बाणवली, औषधे वेळेवर घेण्याची सवय लावली, त्याने वाडिलांच्या कर्तव्यकठोरतेने व आईच्या मायेने आपल्याला सांभाळले. व शेवटी बरे झाल्यावरती मात्र निघुन गेला, दुरावला.
.
या आजारावर मात करण्याच्या अनेक अनेक तंत्रांपैकी एक तंत्र म्हणजे spirituality , आपल्या कोत्या जीवनापेक्षा काहीतरी भव्य, दिव्या, उदात्त, मंगल असण्याचा विश्वास हळूहळू जोपासण्याचे तंत्र. हे आपल्याला सहजसाध्य व्हावे कारण लहानपणापासून तसे देवाविषयी आपण बाळबोधच. फार विचार करून बाल की खाल न काढता, ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारे. खरं तर आपली आई जशी नवीन विशाल कुटुंब आनंदाने, धीराने स्वीकारते आहे, तशी आपल्याला नवीन आयुष्याची सवय होईलच. कोणाचेही आयुष्य कोणाकरता किंवा कोणाच्या अनुपस्थितीमुळे थांबते थोडीच! आपल्याला आपला आजार हे एक challenge आहे. खरं तर that is one of the driving forces. रोज उठून त्यावर मात करायची जिजीविषा आपल्यात आहे, हेच खूप आहे. अनिकेत कदाचित पूर्वी कधी नव्हता तेवढा आपल्या निकट आहे. आपण खिन्न झालेलो त्याला आवडले नसते, जिथे आहे तिथे त्याला ते आवडत नसणार. मग का नाही नव्या जोमाने, हुरुपाने आयुषाची सुरुवात करायची, का नाही अनिकेतच्या आठवणी जपून आयुष्याला परत सामोरे जायचे!
.
घडा पूर्ण व सुघड बनला होता. फक्त रंगकाम बाकी होते ते उद्या पूर्ण करायचे या निश्चयाने वर्षा उठली होती.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कथा सामान्य आहे. यातून

कथा सामान्य आहे. यातून वाचकांना जर काही देण्याचा हेतू असेल तर तो हा की - बर्‍याच आजारांत औषध वेळेवरच अगदी काटेकोर त्या वेळीच घेणे अति महत्त्वाचे असते, नियमित व पुरेशी झोप ही सवयच मी ओव्हर-इन्सिस्ट करु शकत नाही. पुरेशी नियमित झोप, सकस आहार, बर्‍यापकी चांगला शारीरीक फिटनेस, कौटुंबिक आधार व औषधे - हे अक्षरक्षः बॅकबोन आहेत, असे खांब आहेत ज्या वरती आजारावरती मात करण्याचा डोलारा ऊभा असतो.आणि मुख्य म्हणजे जगात दुर्दैवी वगैरे काही नसते, प्रत्येक संकट कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्याला समृद्ध करुन जाते.

____________
“Those who cannot change their minds cannot change anything.”
George Bernard Shaw

हे चित्र या कथेला समर्पक

हे चित्र या कथेला समर्पक वाटतय.उगाच लांबलचक कथा देण्यापेक्षा ही वैचारिक छोटी आवडली.

धन्यवाद अचरटजी.

धन्यवाद अचरटजी.

____________
“Those who cannot change their minds cannot change anything.”
George Bernard Shaw