Skip to main content

वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवता-वाढवता येईल?

आज भारतीय विज्ञान दिवस. सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला शोध जाहीर केला होता त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.
गेल्या अनेक वर्षात विविध सामाजिक कार्यकर्ते, नेते, विचारवंत, लेखक व कित्येक अनाम नागरिकांमुळे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व जनमानसात रुजू लागले आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक समजुती, प्रथा, सवयी या 'अवैज्ञानिक' म्हणता याव्यात. विविध क्षेत्रातील माणसाचे निसर्गनियमां विषयीचे अज्ञान, विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञानाने दूर होऊ लागले तसतसे काही समज दूर झाले मात्र काही अजूनही तग धरून आहेत. एकेकाळी ग्रहण बघणे सोडाच त्याकाळी घराबाहेर पडणे वर्ज्य होते आता ग्रहण बघण्यासाठी मेळावे भरत असले तरी तितकावेळ उपास धरणारेही काही कमी नाहीत. मांजर आडवी गेल्यावर चार पावले मागे जाणारे क्वचित असले तरी भेटतात.

आज या दिनानिमित्त चर्चाविषय यासाठीच आहे. आतापर्यंत अनेक अश्या गोष्टी असतील ज्या तुम्ही अज्ञानामुळे अथवा परंपरेने केल्या असतील ज्या पुढे तुम्हाला त्यामागचे सत्य समजल्यावर थांबवल्या असतील. शिवाय काही गोष्टी तुम्ही अश्या केल्या असतील ज्यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शेजाराला, तुमच्या इमारतीला, तुमच्या परिसराला तुम्ही वैज्ञानिक शोधांचा, दृष्टिकोनाचा आधार घेऊन फायदा झाला असेल. तर त्या गोष्टी इथे द्या जेणे करून इतरांना त्या माहीतही होतील व त्या करूनही पाहता येतील

  • तुम्ही वैज्ञानिक सत्य कळल्यावर कोणत्या सवयी बदलल्या आहेत काय? किंवा कोणत्या क्रिया करणे बंद केले आहे काय?
  • सध्या अश्या कोणत्या क्रिया आहेत काय ज्या तुम्हाला बदलायच्या तर आहेत पण कौटुंबिक/सामाजिक कारणाने त्या वैज्ञानिक दृष्टीने करायचा धीर होत नाहीये?
  • तुम्ही अश्या काही गोष्टी केल्या आहेत का ज्यांच्यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या शेजाराला, तुमच्या इमारतीला, तुमच्या परिसराला वैज्ञानिक शोधांचा, दृष्टिकोनाचा आधार घेऊन फायदा झाला आहे? असल्यास त्याबद्दल विस्ताराने लिहावे
  • तुम्हाला असे काही प्रकल्प माहीत आहेत का ज्यामुळे समाजाला अवैज्ञानिक गोष्टींपासून दूर व्हायला अधिक फायदा होईल?
  • तुम्ही तुमच्या पाल्यांमध्ये / इतर ओळखीच्या लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काही करता का? असल्यास काय? नसल्यास का?

आणि हो! भारतीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा! :)

आतिवास Tue, 28/02/2012 - 14:39

मी काही बदल केले. एक उदाहरण द्यायचे तर कोणतीही नवी अवघड गोष्ट करताना जसे परीक्षेला जाताना देवाच्या पाया पडणे - हे मी आता करत नाही जरी शालेय परीक्षा संपून वेगवेगळ्या परीक्षा नियमित चालू असतात तरी.

पण हा बदल आणि इतरही बदल काही एक वैज्ञानिक सत्य समजले म्हणून मी केले असे म्हणता येणार नाही. माझी धारणा बदलली म्हणून सवयी बदलल्या. ही धारणा बदलण्यात विज्ञानाचा मोठा वाटा होता असे म्हणता येईल; पण विज्ञानाचे कोणते तत्त्व समजल्यामुळे माझ्या व्यवहारात बदल झाला असे विचारले तर नेमकेपणाने सांगता येणार नाही.

आता त्या दृष्टीनेही विचार करेन.

रमाबाई कुरसुंदीकर Tue, 28/02/2012 - 15:03

मुलांनो,वैज्ञानिक सत्याचा आणि धार्मिक आचरणाचा संबंध का लावता? आमचा शिर्‍या म्हणतो- त्यांच्या डॉलरच्या नोटेवर- In God we trust' का काहिसे लिहिलेले असते्. हे चालते त्यांना आणि तुम्हा सर्वांना.त्यांना नाही का विचारत देव दाखवा आधि म्हणून?" मग ग्रहणाच्या दिवशी उपवास नाही करायचा हा अट्टाहास कशाला? परीक्षेच्या दिवशी पाया पडायचे ते मार्क जास्त मिळवेत म्हणून नाही तर मन प्रसन्न रहावे व कष्ट केल्याप्रमाणे गुण मिळावेत म्हणून्.इस्त्रायल्,फ्रान्स देशांचे अनेक वैज्ञानिकही धार्मिक आहेत असे वाचले होते केसरीत.
मूर्ती फोडणे,धार्मिक आचरणांना तिलांजली देणे म्हणजे काही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे असे नव्हे हो.

ऋषिकेश Tue, 28/02/2012 - 15:41

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

चर्चा धार्मिक आचरणाबद्दल सिमीत नाही.
तुमच्या इतक्या मोठ्या आयुष्यात विज्ञानामुळे अधिकची माहिती झाल्यावर कितीतरी अधिक बदल तुम्ही केले/झाले असतीलच त्याबद्दल लिहा

मात्र 'वैज्ञानिक सत्याचा आणि धार्मिक आचरणाचा संबंध का लावता? ' हा प्रश्नही तसा योग्यच आहे. माझ्या मते देव ही संकल्पना त्या माणसाला माहित नसणार्‍या 'क्ष' ची आहे. जसजसे ज्ञान होते तो अज्ञात 'क्ष' म्हणजेच देव धुसर होऊ लागतो .. त्यामुळे विज्ञान व देव-धर्म आदी बाबी समोरासमोर दिसतात

ऋषिकेश Tue, 28/02/2012 - 16:19

In reply to by आतिवास

यात अवैज्ञानिकही काहि नाही! :)
इच्छा धरणे व त्यांना (माझ्या दृष्टीने) शुभ (चांगली) असे वर्गीकृत करणे योग्यच आहे.

नितिन थत्ते Tue, 28/02/2012 - 17:33

मला वाटते २८ फेब्रुवारीला शोध जाहीर केला म्हणून "त्या" दिवसाला "काहीतरी विशेष" मानणे हे देखील अवैज्ञानिक आहे.

ऋषिकेश Tue, 28/02/2012 - 17:40

In reply to by नितिन थत्ते

त्या दिवसाला सिंहावलोकन करण्यासाठी ठेवायचा 'माईलस्टोन' - मैलाचा दगड म्हटले तर ते वैज्ञानिक होईल का? ;)
असो. दिवस विशेष असला/नसला तरी त्यानिमित्ताने ही चर्चा सुरू केली आहे
जर असे दिवस पाळणे अवैज्ञानिक वाटत असेल तर तुम्ही ते सोडू इच्छिता का? हा प्रश्न मनात येतोच :)

'न'वी बाजू Mon, 25/11/2013 - 21:52

In reply to by ऋषिकेश

जर असे दिवस पाळणे अवैज्ञानिक वाटत असेल तर तुम्ही ते सोडू इच्छिता का? हा प्रश्न मनात येतोच

विज्ञानदिन पाळत नाही. सबब विज्ञानदिन अवैज्ञानिक (वाटत असला तरी) या कारणाकरिता तो सोडून देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. (तुमच्यासारख्या झण्टलमन - नि शुकशुकशीत नि ते वैज्ञानिक द्रिष्टिकोन नि काय ते बाळगनार्‍या - लोकान्ला इतकी शिम्पल गोष्ट कळू नये?)

(बाकी इतर दिवस कधी वाटले तर पाळतो, नाही वाटले तर नाही पाळत, पण पाळले-नाही पाळले तरी 'ते अवैज्ञानिक आहेत' किंवा 'आम्ही कसे ब्वॉ, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे' म्हणून बोंबलत हिंडत नसल्याकारणाने, ते सोडण्या-न-सोडण्याचा प्रश्न सर्वस्वी आमचा राहतो.)

त्या दिवसाला सिंहावलोकन करण्यासाठी ठेवायचा 'माईलस्टोन' - मैलाचा दगड म्हटले तर ते वैज्ञानिक होईल का? (डोळा मारत)

ते काय करायचे तो तुमच्यापुरता तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मी काय म्हणतो, ते जे काही करायचे, ते खाजगीमध्ये करा ना! म्हणजे मग पब्लिक स्क्रूटिनीचा प्रश्न उद्भवत नाही. एकीकडे पब्लिकमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणत मिशीला तूप लावल्यासारखे (प्रेरणा: पु.ल.) हिंडायचे, नि दुसरीकडे 'दिन' साजरे करायचे, मग पब्लिक मापे काढणारच! (आणि एकदा पब्लिकमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणताय, म्हटल्यावर, खाजगीमध्ये जरी 'दिन' टाकताना पकडले गेले, तरी पब्लिक मग डब्बल मापे काढणार - का काढू नयेत? त्या मंगळयानवाल्यांना कोणी विचारायला गेले होते, की 'बालाजीपूजा' पर्सनल कप्याशिटीत की पब्लिक पॉलिशी म्हणून ते?)

त्यापेक्षा मी काय म्हणतो, तो जो काही 'वैज्ञानिक दृष्टिकोन' की काय तो पाळायचा, तो खाजगीमध्ये पाळा की काय पाळायचा तो - पब्लिकमध्ये कशास जाऊन बोंबलायचे त्याबद्दल. पब्लिकला ठरवू दे की आपापला काय 'वैज्ञानिक दृष्टिकोन' आपल्याला हवा-नको ते. तुम्ही कशाला ठरवायला जाता?

ऋषिकेश Tue, 26/11/2013 - 08:52

In reply to by 'न'वी बाजू

एकीकडे पब्लिकमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणत मिशीला तूप लावल्यासारखे (प्रेरणा: पु.ल.) हिंडायचे, नि दुसरीकडे 'दिन' साजरे करायचे, मग पब्लिक मापे काढणारच

=))
सहमत आहे. कोण हो असे ओरडते आहे?

तुमच्यासारख्या झण्टलमन - नि शुकशुकशीत नि ते वैज्ञानिक द्रिष्टिकोन नि काय ते बाळगनार्‍या - लोकान्ला इतकी शिम्पल गोष्ट कळू नये?

ओह माझ्याबद्दल बोलताय का? पण मग अंदाज/नेम हुकला आहे. :)
आम्ही (किमान मी) वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे नसून (यथाशक्ती यथामती) बाळगू इच्छिणारे आहोत. झालंच तर काही परंपरा, पारंपारिक/कंडीशन्ड/वैयक्तीक सवयी, कडिशन्ड विचार वगैरे फोल/गैर असतील तर ते बदलायलाही तयार आहोत. पण आमच्या सवयी/विचारांपैकी गैर काय हे नेहमीच्या लोकांव्यतिरिक्त इतरांशी चर्चा केल्याशिवाय सहज कसे कळावे? (त्यासंबंधीची पुस्तके वाचणे हा एक मार्ग आहे हे मान्य पण त्याइतका वेळ नाही, इथे कसे पब्लिक लगेच गोषवारा सांगते :) आणि तो माझ्याव्यतिरिक्त अन्य मंडळींनाही उपयुक्त ठरू शकतो.)

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 12:44

In reply to by 'न'वी बाजू

ते काय करायचे तो तुमच्यापुरता तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मी काय म्हणतो, ते जे काही करायचे, ते खाजगीमध्ये करा ना! म्हणजे मग पब्लिक स्क्रूटिनीचा प्रश्न उद्भवत नाही. एकीकडे पब्लिकमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणत मिशीला तूप लावल्यासारखे (प्रेरणा: पु.ल.) हिंडायचे, नि दुसरीकडे 'दिन' साजरे करायचे, मग पब्लिक मापे काढणारच! (आणि एकदा पब्लिकमध्ये 'वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणताय, म्हटल्यावर, खाजगीमध्ये जरी 'दिन' टाकताना पकडले गेले, तरी पब्लिक मग डब्बल मापे काढणार - का काढू नयेत? त्या मंगळयानवाल्यांना कोणी विचारायला गेले होते, की 'बालाजीपूजा' पर्सनल कप्याशिटीत की पब्लिक पॉलिशी म्हणून ते?)

मार्मिक हो मार्मिक!!!! बालिष्टर म्हणून नाव काढाल हेवेसांनल.

आपला, जालीय राईट इल्लिबरल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 09:08

In reply to by नितिन थत्ते

घरातच अवैज्ञानिक सवयी, प्रथा फारशा नसल्यामुळे विज्ञान शिकल्यामुळेच असा फारसा बदल झाला नाही. पण फळं+दूध, दही, आंबवलेले पदार्थ खाऊ नये वगैरे मला अवैज्ञानिक वाटणारी आयुर्वेदीक मतं बासनात बांधली आहेत.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 18:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला पित्त आहे. त्याच उत्तर मला फक्त आयुर्वेदात मिळालं. 'त्यापुरतं' मी अ‍ॅलोपॅथी बासनात (काय असतं हे?) गुंडाळलं आहे.

नितिन थत्ते Mon, 25/11/2013 - 18:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आंबवलेले पदार्थ खाऊ नये वगैरे मला अवैज्ञानिक वाटणारी आयुर्वेदीक मतं

केरला आयुर्वेदीय वैद्यसाला हे कोणत्या आयुर्वेदाला फॉलो करत असावेत.

मला असे वाटते की अनेक लोकल समजुती आयुर्वेद म्हणून "लोकली" सांगितल्या जात असाव्यात. केरळात किंवा जण्रल सौदिंडियात आंबवलेले* पदार्थ सर्रास (चूष म्हणून नव्हे) खाल्ले जात असताना आयुर्वेद आंबवलेले पदार्थ खाऊ नका असे कसे सांगेल?

*आंबलेले पदार्थ (पक्षी खराब झालेले) पदार्थ खाऊ नयेत हे ठीकच आहे. आणि आयुर्वेद कदाचित तेच सांगत असावा. आपल्याकडे पावाचे खच्चीकरण** करण्यासाठी आंबलेले याचे आंबवलेले असे रूपांतर झाले असावे.

**राजीव दीक्षित मोड यू सी...... :)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 25/11/2013 - 21:19

In reply to by नितिन थत्ते

आंबवलेले पदार्थ खाऊ नका असं सांगणारा आयुर्वेदिक डॉक्टर ठाण्यातच रहाणारा, मराठी इसम आहे. पावावर त्याचा खास राग नसावा (निदान आम्ही त्याचा धंदा चालवून द्यायचो त्या काळात) पण 'मॉंगिनीस'च्या केकवर होता. बरं तो केकवर असणारा राग वजनवाढ, कोलेस्टेरॉल अशा कारणांसाठी नसून यीस्ट, बेकिंग पावडरमुळे होता.

आंबट पदार्थांचा या लोकांना (हा डॉक्टर आणि त्याच्या प्रभावळीतले बाकीचेही) एवढा राग की इडली, डोसे हे तर बंद करायला सांगणारच. मला असणारा वंशपरंपरागत एक्झिमा वाढला की संत्रं, द्राक्ष, लिंबू, सगळं बंद. चिंच, कोकममात्र चालायचं. "असं कसं चालतं?" या प्रश्नाचं उत्तर कधी मिळालं नाही. मी स्वतःचं निरीक्षण करून "मला संत्र, मोसंबी, लिंबू यांचा त्रास होत नाही. कोरड्या आणि थंड हवेत चिंच आणि द्राक्षाचा त्रास होतो" हे सांगितलं तरी या लोकांची स्टँडर्ड पोपटपंची बदलली नाही.

हे सगळे सल्ले हा डॉक्टर कसा द्यायचा हे माहित नाही. साधारण पन्नाशी उलटल्यावर, चरबीमुळे त्याची मान दिसेनाशी झाली होती. पोटाचा आकार एवढा की चहाचा कप तिथे ठेवता यावा. खुर्चीतून उठतानाही (खुर्ची आणि स्वतःचे) हात वापरावे लागत होते.

---

"पाव वाईटच" हा समज मराठी लोकांमधे फार दिसतो. रुचीच्या कृपेने आता पूर्ण गव्हाच्या पावाची पाकृ मिळाली आहे, घरच्या घरीच तो करते, त्यात preservatives नसतात. ओळखीच्या मराठी लोकांना, आम्ही रोज घरचा पाव जेवतो, हे सांगितलं तर "रोज पाव खाणं चांगलं नाही" असं सांगतात. "का" या प्रश्नाचं उत्तर नाही. "पावाचं खच्चीकरण"* मराठी लोकांत व्यवस्थित झालं असावं.

*शब्दप्रयोग आवडला. लगेच वापरला.

मन Mon, 25/11/2013 - 21:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाव = मैदा हे समीकरण डोक्यात घट्त असल्यानं पावाबद्दल राग असावा.
पन गव्हाचा पाव करुनही त्याची नालस्ती होत असेल तर मामला अवघड आहे.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 10:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाव आणि केक हे राजीव दीक्षित मोडमध्ये सेमच.
कोकाकोल्यातल्या साखरेने आणि चॉकलेटांनी दात किडतात. लिंबू सरबतातल्या साखरेने आणि तिळगुळाच्या लाडवाने/चिक्कीने किडत नाहीत. ;)

कोकाकोल्यातल्या फॉस्फोरिक आम्लात दात विरघळतो लिंबाच्या आम्लात विरघळत नाही. :P

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 01:41

In reply to by नितिन थत्ते

पाव आणि केक हे राजीव दीक्षित मोडमध्ये सेमच.

इतिहासात अन्यही एका व्यक्तीच्या बाबतीत असे घडून गेलेले आहे, म्हणतात. (ती व्यक्ती तसे म्हणालीच नव्हती, तिच्या तोंडात ते शब्द कोणीतरी घुसडले आहेत, असेही म्हणतात. असो. आपणांस काय त्याचे?)

नितिन थत्ते Wed, 27/11/2013 - 09:17

In reply to by 'न'वी बाजू

>>(ती व्यक्ती तसे म्हणालीच नव्हती, तिच्या तोंडात ते शब्द कोणीतरी घुसडले आहेत, असेही म्हणतात.

कळले नाही.

लिबातील आम्लाने दात किडत नाहीत असे राजीव दीक्षित म्हणाले नसावेत. पण कोकाकोल्याला सिंगलौट करण्यामागे जी कल्पना आहे त्यातून ते इम्प्लाय होते (कोकाकोल्याऐवजी नींबूपानी प्यावे असे रेकमेंड करण्यामागे).

मन Wed, 27/11/2013 - 10:05

In reply to by ॲमी

ख्रिश्चन धर्म झपाट्याने पसरला कारण ते विहिरीत पाव टाकत.
त्यांचा देव्, ख्रिस्त पटकन "पाव"तो अशी त्यांची श्रद्धा बनत असावी.

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 18:06

In reply to by मन

किंबहुना, 'देवा, मला पाव!' हा 'ओ लॉर्ड, गिव अस अवर डेली ब्रेड' या ख्रिस्ती प्रार्थनेचा (बहुधा कोण्या पाद्र्याने बनविलेला) मराठी तर्जुमा असावा, असे आमचे अतिशय जुने आणि आग्रहाचे प्रतिपादन आहे. परंतु (आम्हांस) लक्षात कोण घेतो?

सुनील Thu, 28/11/2013 - 09:53

In reply to by मन

ख्रिश्चन धर्म झपाट्याने पसरला कारण ते विहिरीत पाव टाकत.

ओक्के. मग ती भोळी-भाबडी जन्ता बाटे वैग्रे ते तो पाण्यात भिजलेला पाव खाल्यामुळे की पावामुळे आधीच बाटलेले पाणी प्याल्यामुळे?

उत्तर जर पाव हे असेल तर, तो न खाणे हा पर्याय त्यांना उपलब्ध होताच, नै का?

उत्तर जर बाटलेले पाणी हे असेल तर, ते पाणी उकळून, गाळून वा त्यावर थोडे गंगाजल वैग्रे शिंपडून, शुद्धीकरण करून प्यायले असते तर, ख्रिस्ती धर्म झपाट्याने पसरला नसता, असे वाटते काय? ;)

Nile Wed, 29/02/2012 - 19:55

In reply to by नितिन थत्ते

मला वाटते २८ फेब्रुवारीला शोध जाहीर केला म्हणून "त्या" दिवसाला "काहीतरी विशेष" मानणे हे देखील अवैज्ञानिक आहे.

एखाद्या दिवशी काहीतरी घडलं म्हणून तो दिवस साजरा करणं वैज्ञानिक नसलं तरी काय फरक पडतो? दिवस साजरा करणे म्हणजे त्या दिवसात काहीतरी मॅजिकल आहे असे नव्हे. मजा म्हणून माणूस अनेक गोष्टी करतो. कोणत्या अवैज्ञानिक गोष्टी करू नयेत हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे.

रमाबाई कुरसुंदीकर Tue, 28/02/2012 - 17:50

सी. व्ही. रामन हे कमालिचे कट्टरपंथिय होते बरे का ऋषिकेश. कमला सोहोनींची नाव ऐकले असशीलच्.भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ त्या. दुर्गाबाई भागवतांच्या भगिनी.त्यावेळी रामन ह्यांनी सोहोनींना त्या केवळ महिला आहेत म्हणून संस्थेत प्रवेश नाकारला होता.अगदी विद्यापिठात पहिल्या आल्या होत्या त्या, तरीही.कमलाबाई शेवटी उपोषणालाच बसल्या व मगच प्रवेश मिळवला.
(थोडेफार वाचन करणारी) रमाबाई

Nile Wed, 29/02/2012 - 20:02

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

सी. व्ही. रामन हे कमालिचे कट्टरपंथिय होते बरे का ऋषिकेश. कमला सोहोनींची नाव ऐकले असशीलच्.

सी. व्ही. रमणच काय बहुतेक जण कट्टरच होते तेव्हा. पण कट्टर आजच्या व्याख्येत. प्रत्येक ट्रेंड सेटरला असे अनुभव येतातच. प्रवेश नाकारला गेल्याचं कारण "रमण यांनी नाकारला" असं नाहीए. कोणत्याचं स्त्रीला तेव्हा प्रवेश नव्हता. थोडक्यात प्रवेश "इलिजीबीलिटी क्रायटेरीयाने" नाकारला गेला.

(आठवणीतून देतोय, कदाचित तपशीलात चुक असु शकेल) मागे एकदा दुर्गाबाईंची मुलाखत रेडीओवर ऐकत असताना त्यांनी बहुतेक सांगितल्याचं आठवतं की कमलाबाईंना प्रवेश नाकारला गेल्यावर त्यांनी रमण आणि टाटा(?) यांना पत्र लिहली. पुढे रमण यांनी कमलाबाईंची मुलाखत घेऊन त्यांना प्रवेश दिला.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 21:53

In reply to by Nile

आज त्याच सी.व्ही. रमण यांनी सुरू केलेल्या रामन संशोधन संस्थेत मुली आणि स्त्रिया शिकत, शिकवत आहेत. त्या संस्थेविषयी अधिक माहिती ऐसी अक्षरे सदस्य ऋता देऊ शकतील.

रमण यांच्याकडून प्रयोग करण्यातली चिकाटी, भौतिकशास्त्र, इ शिकावेत; जेंडर बायस टाकून द्यावा. (याच न्यायाने जेंडर बायस करण्याबद्दल विवेकानंद, गौतम बुद्ध, इ. महापुरूषांना मोडीत काढावं लागेल.)

सन्जोप राव Wed, 29/02/2012 - 06:26

विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने फक्त विज्ञानावरच श्रद्धा ठेवायचा, बाकी सगळे झूट आहे हे मी फार पूर्वी ठरवले होते. म्हणजे मुद्दाम ठरवले असे नाही, पण तशी मानसिक घडण आपोआप होत गेली. अवैज्ञानिक असे काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घ्यायची या गोष्टीचा आयुष्यात पराकोटीचा त्रास झाला आहे. पावसात भिजण्याचा आणि सर्दीचा प्रत्यक्ष संबंध नाही, आंबट खाल्ल्याने खोकला वाढत नसतो, ताप आलेला असताना थंडी वाजत नसेल तर स्वेटर घालण्याची आणि पंखा बंद करण्याची गरज नाही, उघड्यावर थुंकणे, प्रातर्विधी करणे या सगळ्या समाजाच्या आरोग्याला विघातक गोष्टी आहेत, अशक्तपणा आला असेल तर शिरा, तूप, लोणी असले काहीतरी खाण्यापेक्षा फळे, पालेभाज्या, प्रथिने असले खाणे बहुतेक वेळा अधिक योग्य असते, शिंकताना नाकावर रुमाल धरणे हे फारच गरजेचे आहे, प्यायचे पाणी हे शिळे होत नसते - ते दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी फेकून देण्याची गरज नाही, घरात निर्माण होणारा ओला कचरा घराच्या आसपास मुरवला तर ते सगळ्यांनाच अधिक फायद्याचे आहे, कोणत्याही कारणासाठी कोणतेही झाड तोडू नये,भारतात झाडे लावताना लिंब, वड, पिंपळ, शेवगा ही झाडे गुलमोहर, निलगिरी सुबाभूळ वगैरे झाडांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे, प्लॅस्टिकला जाणीवपूर्वक नको म्हणणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे, आपल्याला परवडत असले तरी वीजेची उधळपट्टी टाळलीच पाहिजे, भारतातल्या पारंपारिक शेतीत बर्‍याच गोष्टी अवैज्ञानिक आहेत; त्यांचा त्याग केला पाहिजे (भारतातला मान्सूनचा पाऊस नक्षत्रांवर वगैरे अवलंबून नसतो, बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यावर असतो) .... हजारो गोष्टी आहेत. यातल्या प्रत्येक गोष्टीची फक्त टिंगल, थट्टा झाली. कुणाला झ्याट काही बदलावेसे वाटले नाही. मला चाळिशीत ब्लडप्रेशरची गोळी सुरु झाली.

आनंद घारे Wed, 29/02/2012 - 12:04

In reply to by सन्जोप राव

आपण लिहिलेल्या बहुतेक सर्वच गोष्टी मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आलो आहे. माझ्या नात्यातील एका मुलाला थोडासा ताप येऊन गेलासुध्दा होता. त्याला आंघोळ करायची होती, पण त्याची आई करू देत नव्हती. ती मला उद्देशून म्हणाली, "तुम्हीच सांगा."
मी म्हंटलं, "तुम्ही मला सल्ला विचारलात, तर मी वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर तेच सांगेन. तुम्हाला जे वाटते तेच इतरांनी सांगावे असे वाटत असेल तर दुस-या कोणाकडे जा."

यातल्या प्रत्येक गोष्टीची फक्त टिंगल, थट्टा झाली. - असे नाही

मला चाळिशीत ब्लडप्रेशरची गोळी सुरु झाली. - याचा वैज्ञानिक कार्यकारणसंबंध नक्की कशाशी आहे?

रोचना Sun, 04/03/2012 - 14:00

In reply to by सन्जोप राव

प्लास्टिक वरून आठवले - लोक कॅरीबॅग नको म्हटलं तर इतके अस्वस्थ का होतात? मी न्यू जर्सीतल्या एका भारतीय दुकानात स्वत:ची कापडी पिशवी घेऊन गेले, तेव्हा काउंटर वरची मुलगी मला म्हणाली - "इतनी दूर अमेरिका तक आए, फिर भी गँवार ही रह गये! कॅरीबॅग में सामान ले जाओ ना!" तेच पुण्यातला आमच्या कॉलनी समोरचा दुकानदार मला म्हणतो - "कॅरीबॅग फुकट ए, तरी पन तुमी पिशवी का आनते?" पिशवी = मागासलेलं किंवा कंजूस, आणि प्लास्टिक कॅरीबॅग = प्रगत आणि मॉड, ही विचित्र समीकरणं सर्वत्र दिसतात.

ओला कचरा कॉलनीतल्या सगळ्यांना एकत्र करून कॉलनीतल्याच झाडांसाठी खत तयार करण्याचा उपक्रम अयशस्वी झाला; घाण वास आणि डास-माशा-चिलटांच्या भीतीने अनेकांनी प्रस्ताव फेटाळून लावला. मग आम्ही तिघं चौघं रोजचा कचरा असाच झाडांखाली थोडा थोडा पेरू लागलो. इथे माझ्या छोट्याशा बाल्कनीतच खत तयार करायचा कुंड्यांचा एक "खांब" तयार केला आहे. गुगलताना The Daily Dump या संस्थेचा शोध लागला, आणि त्यांच्याकडून खत तयार करण्याबद्दल चांगली माहिती आणि मदत मिळाली. कोणाला कॉम्पोस्टिंग सुरू करायचे असल्यास त्यांचं पुण्यात ही दुकान आहे. (ही जाहिरात समजू नये - माझं त्यांच्याशी या पलिकडे काहीच नातं नाही)

सन्जोप राव Sun, 04/03/2012 - 15:37

In reply to by रोचना

ओला कचरा कॉलनीतल्या सगळ्यांना एकत्र करून कॉलनीतल्याच झाडांसाठी खत तयार करण्याचा उपक्रम अयशस्वी झाला; घाण वास आणि डास-माशा-चिलटांच्या भीतीने अनेकांनी प्रस्ताव फेटाळून लावला.
हाच अनुभव मलाही आला आहे. हताश व्हायला होते....

चिंतातुर जंतू Sun, 04/03/2012 - 17:03

In reply to by रोचना

>>पुण्यातला आमच्या कॉलनी समोरचा दुकानदार मला म्हणतो - "कॅरीबॅग फुकट ए, तरी पन तुमी पिशवी का आनते?" पिशवी = मागासलेलं किंवा कंजूस, आणि प्लास्टिक कॅरीबॅग = प्रगत आणि मॉड, ही विचित्र समीकरणं सर्वत्र दिसतात.

हा अनुभव सार्वत्रिक नसावा. शहराच्या मध्यवर्ती भागात तरी मला असा अनुभव कधीच आला नाही. उलट आपली एक पिशवी वाचते आहे याचा 'पुणेरी' आनंद दुकानदारांना होतो असा माझा अनुभव आहे :-)

ओला कचरा: एरोबिक कम्पोस्टिंगसाठी लागणारं बायोकल्चर आणि सल्ला/मदत आता पुण्यात सहज उपलब्ध आहे. घरच्याघरी छोट्या कुंड्यांमध्ये सर्व ओला कचरा जिरवणारं आणि कम्पोस्टचा कुजका वास टाळणारं हे तंत्रज्ञान फ्लॅटधारकांना खूप सोयीचं आहे. शिवाय, ओला कचर्‍याचं स्वतःचं स्वतः व्यवस्थापन न करणार्‍या सोसायट्यांना महापालिका आता तंबी देते आहे. त्यामुळे स्थिती लवकर सुधारेल अशी आशा आहे.

रोचना Mon, 05/03/2012 - 11:37

In reply to by चिंतातुर जंतू

उपलब्ध आहे हे अगदी खरे, पण त्याचा उपयोग करून घेणार शहरात सर्वत्र तेवढेच उत्साही नसावे! का कोणास ठाउक, आमच्या कॉलनीत तरी (शहराच्या एका नवीन, अलिकडेच "डिव्हेलप" झालेल्या भागात, मध्यवर्ती ठिकाणी नव्हे) असल्या कार्यक्रमांबद्दल खूप संशय होता आणि आहे - पावसाचं पाणी साठवण्याबद्दल ही नुसती उदासीनताच नाही, तर उघड विरोधही. मग टँकरचे पाणी उन्हाळ्यात रोज आणवावे लागते, त्याबद्दल चिडचिड. महापालिकेच्याच ठरावामुळे ओला / सुका कचरा तरी आता वेगळा ठेवून गाडी घेऊन येणा र्‍या बाईला दिला जातो. तो सोसायट्यांमध्येच जर मुरवला जाऊ शकला तर उत्तमच आहे.

ऋषिकेश Sun, 04/03/2012 - 18:05

In reply to by रोचना

कापडी पिशव्या वापरणे उत्तमच मी ही वापरतो. बिग बझार आदी तत्सम मॉलमधे खूप खरेदी करायची असताना एकदा मी मोठाल्या ज्यूटच्या पिशव्या असतात त्या घेऊन गेलो होतो. तिथे त्यांनी त्या पिशवीत सामान देणे नाकारले. तासभर म्यानेजर वगैरे गाठून भांडाभांड केल्यावर ते तयार झाले मात्र दरवेळी इतका वेळ देता येत नसल्याने काहि वेळा त्यांच्या पिशव्या मुकाट्याने घेतो :(
तिच गत कापडखरेदीची वगैरे, "कपड्याच्या दुकानात कापडी पिशव्या ठेवायला काय होते हो?" यावर विचकलेले दात आणि इतर गिर्‍हाईकांच्या 'कोण येडा आला आहे' अश्या नजरा यांना न जुमानता जेव्हा खिशातून आणलेल्या कापडी पिशवीत खरेदी केलेले कपडे द्यायला सांगतो तेव्हा मिळणार्‍या विविध नजरांना सोकावलो आहे ;)

मात्र अनेकदा ओल्या-गळू शकणार्‍या वगैरे वस्तु आणताना प्लॅस्टीकची पिश्वी मागून घेतो हे ही खरेच म्हणा. मागे एकदा फावल्यावेळात खण-खण असणारी पिशवी (प्रत्येक भाजीला एक खण - नंतर वर्गीकृत करायला नकोत - आळसातून सृजनशीलतेचा/कलात्मकतेचा जन्म वगैरे :) ;) ) भाजी आणायला घरीच शिवली होती, आता दिसत नाही याची आठवण यानिमित्ताने झाली.

बाकी कचरा ठेवायच्या डब्यांना मात्र काळी प्लॅस्टीक पिशवी विकत घेऊन लावतो (डबा खराब होऊ नये म्हणून) या मात्र माझ्यातील विरोधाभास अनेकदा लक्षात येतो - अन मी (याहीवेळेप्रमाणे) सोयीस्कर दुर्लक्ष करतो

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 18:45

In reply to by ऋषिकेश

लोक विज्ञानाचा इतका गाजावाजा करतात, पण (कचर्‍याबाबत बोलताना) हे सोयिस्करपणे विसरतात की विज्ञान आजच्यासारखे उतले मातले नव्हते तेव्हा कचर्‍याची समस्या हाताळणे किती सोपे होते.

बॅटमॅन Mon, 25/11/2013 - 18:53

In reply to by अजो१२३

सहमत, पण विल्हेवाट लावणे इतके सोप्पे असूनही लोक लावत नव्हते हेही तितकेच खरे आहे. प्लेगाच्या साथी बघा की. बाकी गावांचं सोडा, मिरजेचं माहितीये तेवढं सांगतो. प्लेगची साथ अन्य ठिकाणांसारखीच मिरजेतही आली होती. डॉक्टर वॉनलेस आणि त्यांच्या टीमने केलेल्या प्रबोधनामुळे अख्खे गाव स्वच्छ झाले आणि पुण्याइतका त्रास मिरजेला झाला नाही. रँडऐवजी वॉनलेस असल्याचा फायदा असा की चाफेकरांची आवृत्ती आमच्या इथे तयार झाली नाही.

झालंच तर लंडनमध्येही एकोणिसाव्या शतकात बर्‍याच अडचणी होत्या म्हणे की. तेव्हा विज्ञान तिथेही नुकतंच उतू-मातू लागलं होतं. माझं लंडन या पुस्तकात मीना प्रभू म्हणतात त्यानुसार गरीब गल्ल्यांतील रस्त्याच्या मधोमध चर खणलेला असे आणि लोक तिथेच हगत वगैरे. त्यामुळे विल्हेवाट लावणे तत्त्वतः सोपे असले तरी लोक ती लावत नसत.

तिरशिंगराव Fri, 16/03/2012 - 18:24

In reply to by सन्जोप राव

रावांनी लिहिलेल्या गोष्टी अमलात आणल्याच. त्याशिवाय, अदिती म्हणते त्याप्रमाणे, आधीच घरांत पूर्ण वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याने आईवडिलांच्या मनाविरुद्ध काहीच करावे लागले नाही. उलट त्यांच्याच इच्छेनुसार, ते दोघे जेंव्हा वारले तेंव्हा, कुठेलेही धार्मिक विधी केले नाहीत, त्यांच्या अस्थी स्मशानातून आणल्याच नाहीत, त्यामुळे त्या कुठे विसर्जन करण्याचा प्रश्नच आला नाही. घरांत कधीही सत्यनारायण केला नाही. आईवडिलांपासून आमच्या घरात देवच ठेवलेले नाहीयेत, त्यामुळे आणखी गणपती आणून बसवण्याचाही प्रसंग आला नाही. पोट बिघडल्याशिवाय कधी उपास केला नाही. चारधाम यात्रा केवळ सृष्टीसौंदर्य पहाण्याच्या उद्देशाने केली, कुठल्याही धामात पूजा, अभिषेक असले केले नाही. पण भक्तिधुंद तांड्यांचा उपद्रवच जास्त झाल्याने पुन्हा अशा ठिकाणांना भेट दिली नाही.

मन Mon, 25/11/2013 - 14:11

In reply to by सन्जोप राव

रेल्वेच्या डब्ब्यासारखे सारळसोट लांबलचक मुद्दे एका लायनीत लिहूनही भन्नाट प्रतिसद लिहिता येतो हे समजले.
भारिच.

सानिया Wed, 29/02/2012 - 08:34

धन्यवाद!

पटकन आठवलेल्या काही गोष्टी:
१. प्लॅस्टीकचा वापर टाळावा. दुकानात जाताना नक्कीच, पण बागकाम करतानाही बीया पेरताना प्लॅस्टीकपेक्षा बायोडिग्रेडेबल कुंड्या वापराव्या.
२. सुका व ओला कचरा वेगळा ठेवणे.
३. मुलांची उत्सुकता न दाबता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना शक्य तेवढे घटनेमागचे विज्ञान उलगडून सांगावे. त्यांच्याबरोबर बसून विज्ञानविषयक पुस्तके वाचणे, त्यांना वेगवेगळ्या विज्ञानप्रदर्शनात घेऊन जाणे.
४. विज्ञानवाहिनीसारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग.

राजेश घासकडवी Wed, 29/02/2012 - 19:12

विज्ञानाचा स्वतःच्या जीवनावर कसा परिणाम झालेला आहे हे तपासून बघण्याचा आणि लोकांना सांगण्याचा प्रकल्प आवडला. दुसऱ्यांवर अवैज्ञानिक म्हणून टीका करण्यापेक्षा आपली वागणूक कितपत वैज्ञानिक आहे हे बघणं महत्त्वाचं.

माझ्या बाबतीत तसे नक्की कितपत बदल झाले आहेत हे सांगणं कठीण आहे. आमच्या घरचं वातावरणच कर्मकांडी नव्हतं. पण आजारी पडल्यावर काय करायचं याबाबतीत काही उपचार असायचे - ताप आल्यावर तो घालवण्यासाठी भरपूर घाम काढणं, किंवा दूध आणि फळ एकत्र न खाणं वगैरे. ते सोडलेले आहेत.

मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्णपणे अंगी बाणवणं कठीण आहे. अनेक गोष्टी 'कळतं पण वळत नाही' या सदराखाली येतात. :)

विचारांच्या बाबतीत मात्र ही वैज्ञानिक पद्धत आणणं थोड्याफार प्रमाणात जमलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'अमुक तमुक व्यक्तीने असं म्हटलं आहे म्हणून ते खरं' हे लहानपणी होतं. सगळ्यांचंच असतं. ते बाजूला सारून थोड्या पद्धतशीरपणे 'हे नक्की खरं कशावरून?' असा प्रश्न विचारायला शिकलेलो आहे.

पिवळा डांबिस Wed, 29/02/2012 - 23:01

तुम्ही वैज्ञानिक सत्य कळल्यावर कोणत्या सवयी बदलल्या आहेत काय? किंवा कोणत्या क्रिया करणे बंद केले आहे काय?
होय. पूर्वी लहानपणी आवडती खिचडी खायला मिळावी म्हणून उपास करण्याचे श्रम करीत असे.
पण उपासाला चालणारे साबुदाणा, शेंगदाणा आणि मिरची हे पदार्थ सनातन भारतवर्षाला माहिती नव्हते, ते पोर्तुगीजांनी भारतात आणले हे सत्य समजल्यापासून सोडून दिलं....
म्हणजे संकष्टीला खिचडी खाणं चालूच आहे, उपास करण्याचं सोडून दिलं!!!!
:)

रमाबाई कुरसुंदीकर Mon, 05/03/2012 - 17:06

In reply to by पिवळा डांबिस

डांबिसा, अरे उपास स्वतःसाठी करायचा असतो. समजा मिरची,साबुदाणा येथेच बनले असते तर उपास चालु ठेवला असतास का रे? धार्मिक आचरण आणि विज्ञानाची गल्लत का करतात कळत नाही मला.
सी. व्ही. रामन धार्मिक कार्य, होम हवन, यज्ञही करायचे हो. म्हणून त्यांना अवैज्ञानिक म्हणणार का?
(उपवास करणारी) रमाबाई.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 19:01

In reply to by पिवळा डांबिस

साबुदाणा, शेंगदाणा आणि मिरची हे पदार्थ सनातन भारतवर्षाला माहिती नव्हते, ते पोर्तुगीजांनी भारतात आणले

वरिजनली भारतात काय काय होतं याची लिस्ट कुठे मिळेल का? काजू, आंबे, उत्तर भारतातली सगळी माणसं, नारळ, उदबत्ती, सुई, अशी बाहेरून आलेल्या गोष्टींची यादी धक्कादायक रित्या बनू लागली आहे. शाबुदाना झाडावर येतो की कारखान्यात बनतो माहित नाही पण शेंगदाणे आणि मिरची? कोणी आरामात पोहे या यादीत घुसडले असते पण ती सुदाम्याची गोष्ट सांगून त्याला गप्प केला असता. पण शेंगदाणे? चटणीभाकर हा शब्द मराठीत इतका नविन? असो.

नितिन थत्ते Mon, 25/11/2013 - 19:08

In reply to by अजो१२३

बटाटासुद्धा

बाकी सुई आणि शिवणकला भारतात नसावीच. ती पोर्तुगीजांनी आणली की मुसलमानांनी ते ठाऊक नाही. पण भारतीयांचे पारंपरिक कपडे म्हणजे धोतर, लुंगी, लंगोट, साडी*, ओढणी/दुपट्टा/उपरणे, तसेच फेटा, मुंडासे, पागोटे वगैरे शिवलेले नसतात.

*स्त्रिया शिवलेले पोलके घालीत नसत हे निदान पौराणिक चित्रांतून तरी दिसते. त्या कंचुकी नावाचे न शिवलेलेच वस्त्र गाठ मारून वापरत असत असे चित्रांवरून वाटते.

आणि पुराणांतून वर्णिलेल्या पादुका/खडावा याही शिवलेल्या नसतात

बॅटमॅन Mon, 25/11/2013 - 19:19

In reply to by नितिन थत्ते

ते एक असो, पण मग बेशिक कापड बनवायला सुई कुठेच लागत नाही का? गेलाबाजार पोती, पखाली वैग्रे शिवायला दाभण तरी? सुईला संस्कृत शब्दही आहे सूची म्हणून, शिवाय गेल्या पाचेकशे वर्षांत आलेल्या वस्तूंना संस्कृत प्रतिशब्द साधारणपणे नसतात असे निरीक्षण आहे. पादुका अन खडावा शिवलेल्या नसतात कारण त्या लाकडी असतात. साधूसंन्यासी सोडले तर जनसामान्य त्या वापरीत नसत असे वाटते. बूट वैग्रे असायला काही अडचण नसावी असे वाटते, किमान काश्मीरसारख्या प्रदेशांत तरी.

ऋषिकेश Mon, 25/11/2013 - 19:45

In reply to by बॅटमॅन

हा दुवा याबद्दल रोचक ठरावा. भारतात 'सुईकाम' (नीडलवर्क) ४००० वर्षे जुना असल्याचे म्हटले आहे.
या पुस्तकाचा आवाका आणि अभ्यास बघता हे विधान टाळत अयेण्याजोगे नाही

परिशिष्ठात तर स्पष्टपणे म्हटले आहे:
“The word in Sanskrit for a needle is suchi, from such, to sew or pierce. This is the same word as the Latin suo, to sew; so probably the common word used by the Aryans in their primeval habitations was su, and they clearly knew how to sew at that remote period. Eve sewed fig-leaves together. Adam sewed also. The Hebrew word is tafar, and clearly meant sewing, not pinning together with thorns. Sewing is the first recorded art of our forefathers.”—Letter from Mr. Robert Cust.

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 00:42

In reply to by ऋषिकेश

हे रोचक आहे. उल्लेखाबद्दल धन्यवाद!!! अजून एक रेफरन्स आठवला तो थत्तेचाचांना दिलेल्या प्रतिसादात अ‍ॅडवतो.

नितिन थत्ते Mon, 25/11/2013 - 19:54

In reply to by बॅटमॅन

कापड बनवायला* (विणायला-weaving) सुई लागत नाही. (अंदाजपंचे दाहोदरसे) पोती वगैरे वापरात नसावीत. बोचकी बांधण्याची पद्धत अजून आहे यावरून अंदाज. आणि ते पाचशे वर्षातले नसेल. मुसलमान आले इ.स. ७००-८०० ? तेव्हाचे असेल.

ट्रॅडिशनल कपडे शिवलेले नसतात** हे शिवणकला नव्हती या म्हणण्याला कॉरोबोरेट करते. मुसलमानांच्या (किंवा अन्य कुठच्यातरी) मार्गाने सुईच्या आगमनानंतर उच्चभ्रू सत्ताधारी शिवलेले कपडे वापरू लागले असतील. (अवांतर: लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या या पुस्तकात त्यांच्या समाजातल्या काही स्त्रिया पोलके घालीत म्हणून त्यांना विरोधाला सामोरे जायला लागे असा उल्लेख आहे. पण ते असो).

*कापड दोन सुयांच्या सहाय्याने विणणे (Knitting, आणि ज्याला क्रोशाचे कापड म्हणतात तेही) इथले नसावेच असे वाटते.
कशिदा/भरतकामाविषयी कल्पना नाही.
**कोकणातील कुठल्याश्या शिवाजी-प्रदर्शनाला किंवा अम्य काही धार्मिक ठिकाणी साडीच नेसावी लागते पंजाबी ड्रेस चालत नाही त्याअर्थी हे (शिवलेले) कपडे आपले नाहीत असे पारंपरिक बॅगेज असण्याची शक्यता आहे.

मिहिर Mon, 25/11/2013 - 20:06

In reply to by नितिन थत्ते

कोकणातील कुठल्याश्या शिवाजी-प्रदर्शनाला किंवा अम्य काही धार्मिक ठिकाणी साडीच नेसावी लागते पंजाबी ड्रेस चालत नाही त्याअर्थी हे (शिवलेले) कपडे आपले नाहीत असे पारंपरिक बॅगेज असण्याची शक्यता आहे.

हे कसे बरे? शिवलेले ब्लाऊज चालते ना? मला वाटते त्याचे कारण पंजाबी ड्रेस महाराष्ट्रात तुलनेने नवा असणे हे असावे. पंजाबातले लोक त्यांच्या पारंपरिक कार्यक्रमांना पंजाबी ड्रेसच घालत असावेत.
तेव्हा हा मुद्दा फारसा पटला नाही.

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 00:46

In reply to by नितिन थत्ते

ओके. पण बोचकी बांधायची पद्धत असली तरी कुठेतरी त्याला अगोदर शिवावे लागतेच की! पोती वापरात असावीत असे वाटते, अर्थात पाहिले पाहिजे.

शिवाय मेहेरगढ येथे इसपू ५०००-६००० च्या सुमारास दातांवरचे ऑपरेशन केल्याचे अवशेष सापडले आहेत. जर दातासाठीचे ड्रिल बनवता येते तर सुई बनवायला अवघड नसावी.

बाकी कपड्यांच्या फ्याशनबद्दल सहमत. जरा विचित्र प्रकार दिसतो आहे खरा. यद्यपि कपडे तसे घालत नसतील तरी सुई अज्जीच नव्हती असे म्हणणे अंमळ अवघड वाटते आहे. पण असो, नीट पाहतो जरा.

राजेश घासकडवी Tue, 26/11/2013 - 01:44

In reply to by बॅटमॅन

धाग्यांपासून विणून कापड करून त्यांचे कपडे करायच्या आधीपासून चामड्याचे कपडे तयार करत होते. ते काही ना काही प्रकारे शिवत असत.

इथे दिल्याप्रमाणे

The oldest bone and ivory sowing needles with eyelets (from 30,000 - 40,000BC) were found at a group of more than 20 sites along the Don River near the villages of Kostenki and Borshevo, 250 miles south of Moscow.

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 02:09

In reply to by राजेश घासकडवी

रोचक आहे.

पण मुख्य वाद भारताबद्दल होता. भारतातले आदिवासी अर्थात असे काही करतही असतील पण काश्मीर सोडून अन्यत्र असे वाटत नाही.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 10:38

In reply to by बॅटमॅन

काहीतरी गोंधळ होतो आहे.

सुई (पक्षी- बारीक टोकदार वस्तू) बनवता येत नव्हती असं म्हणणं नाही.

"भोक असलेल्या सुईत दोरा ओवून" त्याने शिवणाची ऐड्या सुचलेली नव्हती एवढेच म्हणणे आहे. त्या सुईशिवाय कापड शिवणे शक्य नसावे. (दोर्‍यासारखा फ्लेक्सिबल पदार्थ कापडाला मोठे भोक न पाडता कापडातून पास करणे शक्य नसावे). तसे बुटाला असतात तशी मोठी भोके पाडून त्यातून बुटाच्या नाडीप्रमाणे दोरा घालून 'शिवणे' शक्य असेलच. पण ते फारसे उपयुक्त नसेल. किंवा कडक धागा वापरून शिवता येईल (जसे बांबूची टोपली विणतात) पण तो धागा फ्लेक्सिबल नसल्याने पुन्हा अश्या शिवलेल्या कपड्याचा काही उपयोग नाही.

अदितीच्या कापडाच्या कडांबाबत: आजही सतरंज्या आणि ओढण्यांच्या कडा दोर्‍यांना गाठी मारून ठेवलेल्या असतात. त्याने विणलेल्या कापडातून धागे उसवत जात नाहीत. हे पूर्वीही केले जात असेल.

अवांतरः बोचक्याचं कापड आधी शिवायला कुठे लागतं?

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 12:52

In reply to by नितिन थत्ते

हम्म ओक्के. भोकवाली सुई नवीन असेल मग कदाचित.

बाकी पोत्याला गाठी मारून तोंड बंद करत असले तरी एका बाजूने त्याचे तोंड अगोदर दोराबिरा ओवूनच बंद केलेले असते ना?

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 13:13

In reply to by बॅटमॅन

पोते पण नंतरचेच असावे.

बोचके म्हणजे नुसत्या कापडात बांधून ठेवलेले जिन्नस. चौकोनी कापडाच्या तुकड्यावर जिन्नस ठेवून नंतर चौकोनाची दोन-दोन टोके बांधलेली बोचकी.

मन Tue, 26/11/2013 - 14:40

In reply to by बॅटमॅन

अजून एक गोष्ट म्हणजे भारतात सलवार -कुर्ता हा किमान अठराशे ते दोन हजार वर्षापूर्वीपासून वापरात असावा.
रुडहर्थाने शिवराय ज्या वेशात दिसतात, त्यांचा तो अंगरखा वगैरे तो न शिवता बनविणे कसे शक्य आहे?
तो त्यांच्याही पूर्वी वापरात असणारच की.
शिवराय हे धार्मिक विधींपुरते ट्रेडिशनल ड्रेस मह्नून धोतर घालत असावेत, राज्याभिषेक वगैरेसाठी.
.
तस्मात प्यांट सदृश सलवार ही वापरात होती.
.
शक की कुषाण ह्या मध्य आशियायी भटक्या टोळ्यांनी दोनेक हजार वर्षापूर्वी भारतावर वारंवार हल्ले केले. अत्य्म्त चपळ, वेगवान असे त्यांचे आक्रमण असे.
टोळधाडीसारखे हल्ले करुन ते निघूनही जात. त्यात त्यांचे घोडे, घोडेस्वारीचे कौशल्य , संघटन वगैरे वगैरे कौशल्य ह्या सगळ्याने यश मिळत गेलेच;
शिवाय त्यांचा पोषाखही योद्ध्यास सुटेबल होता. सलवार हा त्यांच्या वेशाचा भाग होता.
धोतरे सावरत युद्ध करण्यापेक्षा सलवार सोपी पडत असावी.
.
.
.
११९१ च्या वेळेस तराईच्या युद्धात पृथ्वीराज चौहानस घोरीने मारले.
मी जितकी अभ्यस्त लोकांची ह्याबद्दलची मानसचित्रे वगैरे पाहिली आहेत, त्यात पृथ्वीराज स्वतःच्या महालात, युद्धात आणि बंदी झाल्यावरही
सलवारम्धीच दाखवलेला आठवतोय. हे चूक असेल हे पटत नाही, तर शाम बेनेगल अशी चूक करणार नाहित.
त्याच वेळी सातवाहन्-चालुक्य - यादव ते अगदि विजयनगरचे राजे सुद्धा धोतरात दाखवलेत.(ते धोतर घट्ट गुंडाळलेले असे. कष्टकरी समजातील, शेतमजूर वगैरे गुंडाळतात तसे.)
एकप्राकरे ते सलवारसरखेच काम करे.( स्पश्ट दुटांगी रूप घेउन. शिवाय, इअक्डे तिकडे अडकून फाटणे वगैरे शक्यच नाही.)
महाभारत सिरियल स्टाइल धोतरे (मस्त हवेशीर, मोकळी ढाकळी,पितांबर्,सोवळे स्टाइल) फक्त सिरियलपुरतीच कामाची असावीत. प्रत्यक्षात ती घालून हाणामार्‍या अक्रणे सोपे नाही.

मन Tue, 26/11/2013 - 14:59

In reply to by बॅटमॅन

विविध व्यवसाय हे गावगाड्यातील "बलुतं" होते.
लोहार्,सुतार्,चर्मकार्,कुंभार्,माळी,शिंपी अशी विविध कामे केली जात.
नामदेव हे शिंपी समाजातील आहेत असे ऐकले आहे.(तसेही हरेक समाजत संत होउन गेलेच आहेत म्हणा आपल्याकडे:-
रविदास चर्मकार, नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार वगैरे वगैरे.)
तर प्रस्थापित शिंपी समजाचा उल्लेख हा असा ज्ञानेश्वर कालात जातो. इ स १२९०च्या आसपस.
आता मग सुइ न वापरतात शिंपी लोक आपले काम कसे करत असतील हे कुणी सांगेल का?
.
.
शिवाय शिवराय आणि त्यांच्यापूर्वीची मंडळी अंगरखाही वपरायची.(नुसती उत्तरीय नाही.)
तर हे अंगरखे सुईच्या सहभागाशिवाय करता येतील काय?
.
.
अगदि आठव्या शतकात मुहम्मद बिन कासीम ची स्वारी झाली तो अंगरखा घालूनच आला होता ना, तो काही उत्तरीयवाला नव्हता.
मग अगदि उशीरात उशीरा म्हणजे आटह्व्या शतकात तरी हे अंगरखे शिवायचे भारतीय शिकले असतीलच की.

बॅटमॅन Tue, 26/11/2013 - 15:03

In reply to by मन

असेच वाटते. शिंपी ही संस्थाच मुळात सुईशी निगडित आहे. सुई नाही तर शिंपी नाही, फक्त विणकरावर काम भागले असते.

अंमळ शोधाशोध केली पाहिजे यावर. जुन्या कुठल्या ग्रंथांत काय उल्लेख मिळतात वैग्रे काड्या कोणीतरी केल्या असतीलच ;) त्या पाहतो.

सुनील Tue, 26/11/2013 - 15:37

In reply to by पुष्कर जोशी

नाय बॉ!

सीतेला हरणाच्या सागुतीचे डोहाळे लागले होते, असे ऐकले आहे! ;)

बादवे, पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनदेखिल देणार नाही, असे दुर्योधन म्हणाला होता. तेव्हा त्या काळात "सुई" होती, असा निश्कर्ष काढता येईल काय? ;)

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 01:35

In reply to by सुनील

बादवे, पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनदेखिल देणार नाही, असे दुर्योधन म्हणाला होता. तेव्हा त्या काळात "सुई" होती, असा निश्कर्ष काढता येईल काय? (डोळा मारत)

त्याबद्दल कल्पना नाही, परंतु पांच पांडव (आणि त्यांतही भीम) आणि द्रौपदी यांवरून सुईच्या संदर्भात एक भयंकर अश्लील विनोद ('कूपसूचियोग': समझने वालों को इशारा काफ़ी, ना समझने वाल्यांच्या प्रबोधनाची जिम्मेदारी आम्ही घेत नाही.) ऐकलेला आहे, त्यावरून तरी महाभारतकाळात सुई होती, हे निश्चित.

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 01:45

In reply to by पुष्कर जोशी

सीतामाईला सुवर्णमृगाच्या कातड्याची चोळी शिवायची होती अशी गोष्ट आहे नव्हे ?

ष्टेपल मारण्याचा इरादा असावा.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 16:09

In reply to by मन

शिवाजी वगैरे फारच नंतरचे झाले. त्यांच्या बरीच आधी शिवणकला रुजलेली असावी.

पण नामदेव शिंपी* हे रोचक आहे.
महम्मद बिन कासिमच्या काळानंतर केव्हातरी शिवणकला आत्मसात केली असू शकेल.

* अवांतर: शिंपी याची 'शिंपेतून जन्मलेला' अशी श्रद्धाळूंमधली व्युत्पत्ती खोडून काढलेली सावरकरी सहित्यात वाचली आहे. येथे पान ६४ वरचा पहिला परिच्छेद पहा. त्यामुळे नामदेव शिंपी म्हणजे शिंप्याचा व्यवसाय करणारा यावर प्रश्नचिह्न येते.

टीप: नंतर या शब्दाने पोर्तुगीज आल्यानंतर असे समजू नये. हे नंतरसुद्धा १००० + वर्षे जुने असावे.

पादत्राणे सदृश जुन्या वाङ्मयात काय उल्लेख आहेत यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 18:17

In reply to by मन

सावरकरांनी शिंपेतून जन्मलेला हे खोडले असले तरी शिंपी व्यवसाय करणारा असे म्हटले नाही.

तरी नामदेवांच्या काळात शिवणकला असण्याची खूपच शक्यता आहे त्यामुळे नामदेव शिंपी म्हणजे शिवणकाम करणारा शिंपी असेच असावे.

ऋषिकेश Tue, 26/11/2013 - 14:24

In reply to by नितिन थत्ते

भोक असलेल्या सुईचं माहिती नाही. पण चांभार बुट कसे शिवतात तसे एकेक भोक पाडून दोरा खेचून घेत दोन कापडे जोडण्याचे टेक्नीक जुने असावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/11/2013 - 01:29

In reply to by नितिन थत्ते

कपड्यांची टोकं शिवलेली नसतील याची कल्पना करणं कठीण जातंय. साड्या, धोतरं, ओढण्या असोत किंवा पोती, बोचकी यांच्या कडा शिवलेल्या बऱ्या असतात. ज्यांना विणकाम जमलेलं होतं त्यांना कडा शिवणं माहित नसेल हे कठीण वाटतं.

कापड अंगाला गुंडाळून त्यात कलात्मकता आणि आळस+कंजूषी सगळं जमवण्याबद्दल आदर वाटतो खरा.

नीधप Fri, 29/11/2013 - 20:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्याचा संदर्भ देऊन मन यांनी काही प्रश्न विचारले होते व्यनिमधून तर त्याची उत्तरे इथेही देते.

ऋषिकेश यांनी दिलेला संदर्भ विश्वासार्ह वाटतो.
सुई हे भारताचे इन्व्हेन्शन नव्हे हे खरे. शिवलेल्या वस्तूंचा/ कपड्यांचा अगदी कमी प्रमाणात का होईना पण वापर वैदिक काळापासून होत होता. याचा अर्थ प्रवासी, भटके, व्यापारी यांच्याद्वारे सुई भारतात पोचली होती.
लेट मौर्यन काळात शिवलेल्या चोळ्या दिसतात. याचाच अर्थ सुई भारतात स्थिरावून तोवर बर्‍यापैकी काळ गेलेला आहे. गुप्त काळामधे तर सरळ सरळ मांडचोळण्यांसारखे/ ब्रीचेससारखे वस्त्रही दिसते योद्ध्यांसाठी, लांबलचक अंगरखे दिसतात, सलवारींचे पूर्वजही दिसतात.
मौर्यन आणि गुप्त काळाच्या दरम्यान अलेक्झांडरच्या स्वारीच्या निमित्ताने अशी बरीच देवाणघेवाण झालेली दिसते.
इंडो युरोपियन भाषाभ्यासाच्या धर्तीवर रोशन अल्काझी यांनी कपड्यांचा अभ्यास करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. तो बर्‍याच अंशी पुरा झाल्याचे कळले होते पण आता त्या हयात नाहीत. पुस्तकाचे काय झाले माहित नाही. शोधावे लागेल.

धोतराचे किम्वा सोवळ्याचे काठ शिवलेले असत का?
धोतरांचे, सोवळ्यांचे किंवा साड्यांचेही कुठलेच काठ शिवलेले नसतात. ते विणलेले असतात. काठ हे वार्प धाग्यांना समांतर असतात. सतरंजीसारखे म्हणजे वार्प धाग्यांच्या एकत्र करून गाठी बांधणे हे जे थत्ते म्हणतायत ते अचूक आहे. वार्प धागे म्हणजे कापडाच्या लांबीला समांतर धागे तर वेफ्ट धागे म्हणजे ज्यावर रूंदी/ कापडाचा पन्हा ठरतो ते धागे. हे हातमागाच्या रूंदीइतके असतात. वार्प आणि वेफ्टना आपले देशी शब्द ताणा (वार्प) बाणा (वेफ्ट) असे आहेत.

कापडाआधी चामडे हा घासकडवींचा सिद्धान्त फक्त युरोपापुरता खरा आहे. जगभरासाठी नाही.

पोलके घालायची पद्धत दक्षिण भारतात कधीपासून आली?
पोलके म्हणजे आज साडीवर जे घातले जाते ते म्हणायचे असेल तर तो कट (डार्टस वगैरे घालून शेपींग करणे वगैरे) आणि शिवायची पद्धत ही पोर्तुगीजांची/ ब्रिटीशांची देणगी. कॉर्सेट मेकिंगच्या पद्धतीवर बेतलेली आहे ती पद्धत.
आपल्याकडे मात्र विविध पद्धतीच्या कंचुकी, शिवलेल्या चोळ्या या अस्तित्वात होत्या. द भारतातही होत्या. पारंपारीक चोळ्या शिवण्याच्या पद्धती बर्‍याच वेगळ्या आहेत. आजही क्वचित गावाकडची एखादी खूप म्हातारी बाई जी खणाची चोळी घालते ती शिवण्याची पारंपारीक पद्धत असते. सात तुकड्यांची, बारा तुकड्यांची अश्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

नितिन थत्ते Fri, 29/11/2013 - 20:50

In reply to by नीधप

माहितीपूर्ण प्रतिसाद.

शिवणकलेचा संपर्क मौर्यकाळाइतका जुना असेल तर पारंपरिक वस्त्रे शिवलेली का नाहीत हा प्रश्न राहतोच.

नीधप Fri, 29/11/2013 - 22:41

In reply to by नितिन थत्ते

शिवणकलेचा संपर्क मौर्यकाळाइतका जुना असेल तर पारंपरिक वस्त्रे शिवलेली का नाहीत हा प्रश्न राहतोच.
नाहियेत कुठे? तेच तर सांगतेय वैदिक काळापासून शिवणकला भारतात माहिती आहे. खूप कमी प्रमाणात आहे पण आहे.
पण एखादी नवीन वस्तू एखाद्या प्रदेशाला माहिती होणे, त्याचा उपयोग रूजणे, रूळणे आणि ती वस्तू अपरिहार्य होऊन जाणे ही एक प्रक्रिया आहे.
दुसरं म्हणजे आपल्या आत्ताच्या मानसिकतेनुसार आपल्याला शिवलेले कपडे जास्त योग्य आणि गुंडाळायचे कमी योग्य असे वाटते. ते तसे का वगैरे याच्या तपशिलांमधे आत्ता जायला नको. पण ही मानसिकता वैदिक वा मौर्यन काळाची नाही.
मी आधीही म्हणल्याप्रमाणे वस्तूंची उपलब्धता, हवामान, वावरण्याच्या सवयी या सगळ्यांचा परिणाम होऊनच वेशभूषा बनत/ बदलत जातात.

हे सगळे इथे एका विरोपात उत्तर द्यायचे मुद्दे नाहीत. खंड लिहावे लागतील. दिग्गजांनी लिहिले आहेत. तुम्हाला खरेच इंटरेस्ट असेल तर वेळ होईल तशी यादी देईन पुस्तकांची ती जरूर वाचा.

बॅटमॅन Mon, 02/12/2013 - 14:38

In reply to by नीधप

मला लै इंट्रेस्ट आहे यात-यद्यपि फारसे कळत नसले तरी. पुस्तकांची यादी देताना मलाही द्यावी अशी विनंती.

मन Fri, 29/11/2013 - 22:30

In reply to by बॅटमॅन

माझ्या(व्यनि)मुळे झालं.माझ्या(व्यनि)मुळे झालं.
असं मला वर्‍हाड निघालय लंडनला मधल्या काकींसारखं म्हणावसं वाटतं.

नीधप Fri, 29/11/2013 - 20:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कापड अंगाला गुंडाळून त्यात कलात्मकता आणि आळस+कंजूषी सगळं जमवण्याबद्दल आदर वाटतो खरा.
कुठलीही पेहेरावाची पद्धती ही चला मानवाचे आयुष्य अवघड करूया असं म्हणून अस्तित्वात आलेली नाही. आणि ती प्रक्रिया एका रात्रीतलीही नाही.
हवामान, वस्तूंची उपलब्धता, गरज/ उपयुक्तता यातून त्या त्या गोष्टींचे शोध लागत जातात. तेच कापड, कपडे, पेहेरावाच्या पद्धती या सगळ्याबद्दल आहे.
तपशीलात लिहायला आज वेळ नाही कारण तो किमान चार पानी निबंध होईल.

बॅटमॅन Mon, 25/11/2013 - 19:11

In reply to by अजो१२३

गेल्या पाचेकशे वर्षांत आम्रिका खंडातून युरोपात अन तिथून आशियात आलेल्या कैक खाद्यवस्तूंची यादी इथे मिळेल.

http://en.wikipedia.org/wiki/Columbian_Exchange

अहो बाकी सोडा, पेरूसुद्धा त्यात आहे हे पाहून चक्कर आली होती. भौतेक चिक्कूही त्या लिष्टेत आहे.

बाकी मिर्चीबद्दल बोलायचे झाले तर आसामातली भूत जलोकिया नामक मिर्ची ही लोकल ब्रँड आहे असे वाट्टे. अन्य ब्रँड पोर्तुगीजांनी आणले असतीलही.

शेंगदाणे, बटाटा, मका, पपई, हेही नवीनच. तंबाखू अन रताळ्यासोबतच भाताचा एक प्रकार पाहून अचंबित झालो. भाताबद्दल शंका वाटतेय.

नितिन थत्ते Mon, 25/11/2013 - 19:18

In reply to by बॅटमॅन

भाताची एक जात असू शकेल. त्या यादीत द्राक्षे पण लिहिली आहेत आणि कंसात फॉक्स ग्रेप्स असं लिहिलं आहे.

एकादी पूर्वी नसलेली जात आलीही असेल.

नितिन थत्ते Tue, 26/11/2013 - 16:22

In reply to by बॅटमॅन

दक्षिण अमेरिकेतून बरेच पदार्थ आले. गौतमालयाशी* संपर्क पारच तुटला होता वाट्टं. ;)

*ग्वाटेमाला

रुची Wed, 27/11/2013 - 00:51

In reply to by बॅटमॅन

माझ्याकडे असलेल्या एका दक्षिण अमेरिकन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात तिथल्या स्थानिक फळांच्या यादीत सीताफळ, चिक्कू, पेरू वगैरे पाहून मीही चक्रावले होते पण नंतर त्याचे स्पष्ट दाखले मिळाले. चिक्कूला मेक्सिकोत 'सपोटे' म्हणता॑त आणि माझ्या तमिळ शेजारिणीकडूनही चिक्कूसाठी 'सपोटे' असाच शब्द ऐकला. आपल्याकडे चिक्कूतून येणार्या पांढर्या चिकामुळे त्याला चिक्कू हे नाव पडले असावे असे वाटते, पेरू हे नाव 'पेरू' देशातून आलेल्या फळामुळे पडले की काय कोण जाणे!

बाकी आंबा मात्र आपलाच हो! त्याचे शास्त्रीय नावदेखील 'Mangifera indica' असे असल्याने त्यावर तरी द.अमेरिकेचा दावा नाही. शिवाय चिंचेसारख्या वनस्पती अफ्रिकेतून द. अमेरिकेत गेल्या असाव्यात.

चिक्कूची व्युत्पत्ती पटण्यासारखी आहे. पण अमुक एक माणूस कंजूस आहे म्हणताना चिक्कू आहे असे म्हणणे म्हणजे त्या गुणी फळावर अन्याय करणे आहे. त्या चिक्कूद्वेष्टेपणाचा समस्त चिक्कूप्रेमींच्या वतीने मी निषेध करतो. लहानपणी आंब्यापेक्षाही चिक्कू आणि पेरवांवर माझे जास्त प्रेम होते.

पेरूबद्दल सांगायचे तर कन्नडमध्ये पेरल आणि बंगालीत पेयारा म्हणतात. पण हिंदीत मात्र अमरूद म्हणतात. अमरूद हे अमेरिकेशी संबंधित नाव वाटतेय खरे. पेरू हे नाव तसे विचित्र आहे, कारण स्प्यानिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषांतील नावे "ग्वाव्हा" सदृश आहेत.

'न'वी बाजू Wed, 27/11/2013 - 01:22

In reply to by बॅटमॅन

शेंगदाणे, बटाटा, मका, पपई, हेही नवीनच. तंबाखू अन रताळ्यासोबतच भाताचा एक प्रकार पाहून अचंबित झालो.

१. उपासाला शिग्रेट/तंबाखू चालावी काय?

२. 'तांबूलभक्षण' वगैरे रेट्रोफिटिंग असावे काय?

बॅटमॅन Wed, 27/11/2013 - 01:54

In reply to by 'न'वी बाजू

१. हर्कत नै. प्युअर व्हेज आहे आणि पोर्तुगीजप्रणीतही आहेच.

२. तांबूल हे पिव्वर इंडियन असल्याने रेट्रोफिटिंग नसावे.

Nile Tue, 26/11/2013 - 08:59

In reply to by अजो१२३

साबुदाणा, शेंगदाणा आणि मिरची हे पदार्थ सनातन भारतवर्षाला माहिती नव्हते, ते पोर्तुगीजांनी भारतात आणले

वरिजनली भारतात काय काय होतं याची लिस्ट कुठे मिळेल का?

काहीही नव्हतं, नाही म्हणजे तसं होतं पण मानवचं नव्हता. तो आफ्रिकेतून आला, मागे, शे-दिडशे हजार वर्षांच्या आसपास. (पंधरा वीस हजार इकडे तिकडे)

ऋषिकेश Fri, 02/03/2012 - 16:18

सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार. माझेही चार पैसे. मी आतापर्यंत अनेक सवयी बदलल्या आहेत. पावसात भिजण्याचा आणि सर्दीचा थेट संबंध नाही वगैरे गोष्टींपासून सुरवात झाली. सर्वात मोठा बदल झाला तो कोड हे संसर्गजन्य नाही ही माहिती मिळाल्यावर. तिसरी-चौथीत असेन तेव्हाची आठवण आहे. आमच्या इमारतीत एका आजोबांना कोड होते, ते आपलेपणाने सगळ्यांना गोळ्या देत. माझ्या मित्राच्या आईने ती गोळी टाकायला लावल्याने मीही ती गोळी टाकून द्यायचो. पुढे घरी आईला कळल्यावर तिने कोड म्हणजे काय, तो संसर्गजन्य कसा काहि वगैरे त्या वयात समजेल असे व योग्य उदाहरणांनी पटवून दिले. माझ्यात बदल झालाच शिवाय पुढे त्या आजोबांचा मिळालेला स्नेह अपूर्व होता
बाकी संजोपरावांनी दिलेल्या अनेक गोष्टी मी देखील टाळण्यात सुदैवाने यशस्वी ठरलो आहे.

•तुम्ही तुमच्या पाल्यांमध्ये / इतर ओळखीच्या लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काही करता का? असल्यास काय? नसल्यास का?

याबाबत अजिबात अनुभव नाही. :) ऐसीअक्षरेच्या सभासदंकडून या विषयावर मते अपेक्षित आहेत

प्रकाश घाटपांडे Sat, 03/03/2012 - 12:09

माझा फलज्योतिषावर गाढ विश्वास होता. जसजशी त्यातील तर्कविसंगती लक्षात येत गेली तसे त्यावरील विश्वास उडत चालला. १९८४ पासून ज्योतिषाबाबत चिकित्सक भुमिका मांडायला सुरवात केली. पुढे त्यातुनच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातुन सुसंवाद तसेच यंदा कर्तव्य आहे?. या पुस्तकांची निर्मिती झाली.
लहान पण धार्मिक व सनातनी वातावरणात व संस्कारात तसेच ग्रामीण भागात गेले. अंधश्रद्धांचा बराच पगडा मनावर होता.

सोकाजीरावत्रिलोकेकर Sun, 04/03/2012 - 16:23

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझा फलज्योतिषावर गाढ विश्वास होता. जसजशी त्यातील तर्कविसंगती लक्षात येत गेली तसे त्यावरील विश्वास उडत चालला

घाटपांडेकाका, ह्या विषयावर तुमच्याशी डिटेलमंदी चर्चा करायला आवडेल. कधी 'बसायचे' बोला ?

- (अभ्यासू) सोकाजी

प्रकाश घाटपांडे Sun, 04/03/2012 - 20:18

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

सोकाला यका शनिवारी श्रमपरिहाराला बोलावलच पाहिजे! डिट्टेल मदी बोलू! तव्हर आमच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचा!

अप्पा जोगळेकर Sun, 04/03/2012 - 17:09

पोहून वजन कमी होते या समजापोटी मी दररोज काही किलोमीटर पोहत असे. पण प्रत्यक्ष फरक पडत नाही असे अनुभवल्यावर गूगलवर खूप शोधाशोध केली आणि पोहण्यापेक्षा पळणेच अधिक फायदेशीर असते हे जाणवले हे अनुभवाने सांगू शकतो.
बाकी वजन आणि उंची, बीएमाय यांच्या प्रमाणाबद्दल जे 'स्टँडर्ड रेशो' आहेत असे सांगतले जाते त्यावरसुद्धा किती विश्वास ठेवावा असा प्रश्न नेहमीच पडतो ?
छान धागा आहे. आणि प्रतिसादसुद्धा आवडले.
'पावसात भिजून सर्दी होत नाही' असं जे लिहिलंय ते मात्र अजिबात कळले नाही.
ताप आल्यावर किंवा सर्दी झाल्यावर पावसात भिजू नका, पोहायला जाउ नका असं डॉक्टरच अनेकदा सांगतात तेंव्हा नक्की कोणावर विश्वास ठेवावा ?

पिवळा डांबिस Mon, 05/03/2012 - 11:34

In reply to by अप्पा जोगळेकर

ताप आल्यावर किंवा सर्दी झाल्यावर पावसात भिजू नका, पोहायला जाउ नका असं डॉक्टरच अनेकदा सांगतात तेंव्हा नक्की कोणावर विश्वास ठेवावा ?
अजिबात विश्वास ठेऊ नका...
सर्दी-ताप हा विषाणूंमुळे होतो. त्यानंतर पावसात भिजलात काय आणि न भिजलांत काय काही फरक पडत नाही...
किंबहुना त्यावर औषध घेतलेत काय, न घेतलेत काय त्यानेही काही फरक पडत नाही....
विषाणू़ंची जीवनमर्यादा संपली की सर्दी आपोआप बरी होते...
हवं तर आराम वाटण्यासाठी आल्याचा काढा (जमलं तर थोडी ब्रॅन्डी घालून, जास्त बरं वाटेल!!!) घ्या...
:)
मात्र हा बहुमूल्य सल्ला दिल्याबद्दल आमची आठवण ठेवा...
:)
स्यूडोडॉक्टर,
पिडां

सन्जोप राव Mon, 05/03/2012 - 16:41

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा डांबीस यांच्याशी सहमत आहे. आल्याचा काढा आणि ब्रॅन्डी ही कल्पनाही आवडली आहे.

रमाबाई कुरसुंदीकर Mon, 05/03/2012 - 18:30

In reply to by पिवळा डांबिस

बाबारे, ही जीवाणुंची जीवनमर्यादा सारखीच असते का ? दमट वातावरण असेल तर सर्दी होण्याचे प्रमाण वाढते हे सांगण्यासाठी नोबेल विजेता हवा का रे?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/03/2012 - 21:44

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

रमाबाई, जीवाणू असं म्हणा! तुमच्या काळानंतर फक्त अनुच्चारित अनुस्वारांचा नियम बदलला आहे, र्‍हस्व दीर्घाचा नाही!

दमट वातावरणात जीवाणू वाढत असतीलच हो! पण त्याचा आपण भिजण्याशी काय संबंध? बाहेर बदाबदा पाऊस गळत असेल तर आपण घरात बसून ओले होत नाही; किंवा घर बंद आहे म्हणून घरातली आर्द्रता कमी रहात नाही.
त्यातून डांबिसकाका विषाणूंबद्दल बोलत आहेत. विषाणू वेगळे आणि जीवाणू वेगळे.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 19:08

In reply to by पिवळा डांबिस

चार दिवस कडत्त पाण्याने आणि चार दिवस थंडगार पाण्याने स्नान करा, लगेच ताप येईल. कोणताही संसर्ग व्हायची गरज नाही.

प्रत्येक दिवसाआड आजारी न पडता थंड व गरम पाण्याने स्नान करा. असंभव आहे.

मूठभर नवरत्न तेल लावून झोपा. दुसर्‍या दिवशी सर्दी झालेली असेल.

राजन बापट Sun, 04/03/2012 - 20:32

लेख आणि अनेक प्रतिक्रिया आवडल्या. काही अवांतर सुचलेल्या गोष्टी.

आमच्या लहानपणी मराठीमधे "कुतुहल" नावाच्या पुस्तकांची मालिका आणि मराठी मधे "टेल मी व्हाय" या सारख्या पुस्तकांच्या मालिका वाचल्या; त्या वाचल्यामुळे दृष्टीकोनात निश्चित बदल झाल्याचं आठवतं. आज जेव्हा भारतातल्या पुस्तकबाजारपेठेत जमेल तेव्हा चक्कर मारतो तेव्हा पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पुस्तकं मिळ्तात याचा आनंद वाटतो. मोहन आपटे यांच्या पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो.

विज्ञानवादाची माझ्या मनातली सांगड ही आयुष्यातल्या कुठल्याही अत्यंत छोट्या किंवा आयुष्याला व्यापून राहिलेल्या गोष्टींकडे "problem solving" या दृष्टीने पाहण्याशी आहे. आता, अंधश्रद्धा असणारे, दैववादी लोक , साधुबाबाबुवामैयांच्या मागे जाणारे लोकही हाच दावा करतात ही गोष्ट खरी आहे. (किंबहुना जादूटोणा करणार्‍या एका प्रकारच्या जमातीच्या परिभाषेत ते करतात त्याला "उपाय" , "तोडगा" असंच म्हणतात !) त्यामुळे "problem solving" ही व्याख्या अपुरी आहे हे मला मान्य आहे. अधिक संदर्भ : http://en.wikipedia.org/wiki/Scientific_method

नगरीनिरंजन Mon, 05/03/2012 - 08:19

खूप विचार केला पण मुद्दामहून वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणून काही बदल केल्याचे आठवले नाही. कोणत्याही चमत्कारावर विश्वास नाही एवढाच सध्यातरी माझा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे.
प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव असतो आणि आधीच माहित असलेल्या गोष्टींवरून तो शोधता येतो एवढाच माझ्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अर्थ आहे.
बाकी अंधश्रद्धा दोन्हीकडे असतात हे बर्‍याचवेळा आढळले आहे.

नितिन थत्ते Mon, 05/03/2012 - 09:54

कॅरीबॅगसंबंधी प्रतिसाद लिहिणारे भारतात रहात नाहीत का?

सरकारी नियमाने भारतात आता सुपर स्टोअर्मध्ये फुकट कॅरीबॅग मिळत नाही. आणि आपल्या पिशव्या (कापडी किंवा कसल्याही) घेऊन गेल्यावर कोणी हसतही नाही.

ऋषिकेश Mon, 05/03/2012 - 10:19

In reply to by नितिन थत्ते

सदर सरकारी नियम एखाद्या विविक्षित राज्यापुरता/शहरापुरता मर्यादीत आहे का?
मला अनुभव मुंबई व पुण्यात आला आहे. इतरत्र माहित नाही

नितिन थत्ते Mon, 05/03/2012 - 19:24

In reply to by ऋषिकेश

माझा अनुभव मुंबई पुण्यातला नाही. पण आणंद (गुजरात) येथे बिग बझार मध्ये आणि ठाणे (महाराष्ट्र) येथे डी मार्ट आणि वेस्टसाईडमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कॅरी बॅग फुकट मिळत नाही. ठाण्याला ठक्कर नथुभाई नावाचे लोकल सुपरस्टोअर आहे तेही आता कॅरी बॅग फुकट देत नाहीत.

स्थानिक दुकानदार भाजीवाले अर्थातच कॅरीबॅग फुकट देतात.

गेले सहा महिने डी मार्ट मध्ये स्वतःच्या पिशव्या घेऊन जातो आणि त्यातून सामान आणतो. स्वतःच्या पिशव्या नेल्यावर त्यातून सामान देण्यास नकार देण्याची परिस्थिती त्यापूर्वीची असेल.

रोचना Mon, 05/03/2012 - 11:23

In reply to by नितिन थत्ते

मी माझ्या प्रतिसादात न्यू जर्सी (भारताबाहेर)* आणि पुण्याचा उल्लेख केला होता. माझा अनुभव जास्त भारतात ला आहे - पुणे, कलकत्ता सारखी मोठी शहरं आणि काही दक्षिण महाराष्ट्राकडची लहान गावं - सरकारी नियम वगैरे असले तरी सगळीकडे भाजीवाले, दुकानदार अजूनही लहान, पातळ प्लास्टिकच्या पिशव्या देतात, आणि लोक घेतातही. काही दुकानात "४० माय्क्रॉन" असे बॅगांवर छापलेले बघितले आहे - कदाचित याच आता फुकट दिल्याऐवजी विकल्याही जातात? रोजच्या लाल-निळ्या-हिरव्या फुस्स झालेल्या फुग्यांसारख्या दिसणार्‍या पिशव्यांनी भरलेले कचर्‍यांचे ढीग पाहिले की कॅरीबॅगांचा वापर अजून किती व्यापक आहे हे कळते.

चिं-जं च्या "पुणेरी" भागातच गेल्या वर्षी लक्ष्मी रोडवरच्या एका दुकानात मोठी पाटी पाहिली - "इथे प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जाणार नाहीत!" पण मला दुकानदाराने सामान मी काही म्हणायच्या आतच त्यात घालून दिली. मी पाटी कडे बोट दाखवले तर तो नुसताच हसला, म्हणाला, "लोक ऐकत नाहीत, हो!" पण सरकारच्या नियमाने म्हणा किंवा लोकांच्याच "पुणेरी" पणामुळे (:-)) म्हणा, बॅगा कमी वापरल्या जात असल्या, आणि कापडी पिशव्यांचा जमाना पुन्हा येत असला तर उत्तमच आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/03/2012 - 21:39

In reply to by रोचना

पुण्यातल्या प्लास्टीक पिशव्यांबद्दलच्या नियमाबाबत माझेही अनुभव फारसे वेगळे नाहीत. हे सगळं गेल्या वर्षाच्या मध्यापर्यंतचं. आपण आपली पिशवी नेली तरी "नको ताई, कुठे घरी जाऊन गवार आणि भेंडी वेगळी काढत बसणार आहात" असं ओळखीचा भाजीवाला सांगायचा. काही दिवसांनंतर त्याला माझ्या आडमुठेपणाची सवय झाली आणि सल्ला देणं थांबलं. पण माझ्याबरोबर एकदा एक मैत्रीण आली होती. तिने तिथेच माझ्याशी ऑलमोस्ट भांडण केलं. शिकलेल्या लोकांमधे प्लास्टीकच्या पिशव्यांबद्दल एवढी उदासीनता पाहून, त्याच्या पुढच्या वेळेस भाजीवाल्यानेच "सांगत होतो ना आधीही!" टाईप ड्वायलाक मारला.

पुण्यात परिहार चौकात भाजी घ्यायला जायचे तेव्हा अधूनमधून एक दृष्य दिसायचंच. कारमधून एखादी बाई काय काय भाज्या, फळं हवी आहेत हे सांगते आहे. तिचा नोकर, नवरा, नातेवाईक, मित्र किंवा भाजीवालाच प्लॅस्टीकच्या पिशव्या गाडीत ठेवतो आहे आणि मागे आपल्यामुळे गर्दी होते आहे, आपल्या आधी आलेल्या गिर्‍हाईकाला उशीर होतो आहे वगैरे काही विचारच नाही.

पण कापडी पिशवी वापरण्याबद्दल मला तसे बरे अनुभव आहेत. पुण्यातला घराजवळचा वाणी, मी पिशवी न्यायला कधी विसरलेच तर "ताई, तुम्हाला चालणार असेल तर माझ्याकडची कापडी पिशवी न्या. दोन दिवसांनी याल तेव्हा आणून द्या" असंही सुचवायचा. बिग बझारमधे कापडी पिशव्या नेऊ द्यायचे (अर्थात हे करताना तुम्ही चोर, दरोडेखोर आहात असा आव आणून तुमच्याकडच्या मुख्य पिशवी, पर्स, झोळीला प्लॅस्टीकचा टॅग लावून प्लॅस्टीक वापर+ग्राहकाचा अधिकाधिक अपमान या दोन्ही गोष्टी साधायचे ही गोष्ट निराळी!).
कापडी पिशवीमुळे वजन जरा जास्त असेल तर हाताला हॅंडल काचत नाही, पिशव्या खांद्यालाही अडकवता येतात हा फायदा निराळाच.

सहा एक महिन्यांपूर्वीच, ऑस्टीन (टेक्सस)मधे प्लास्टीक पिशव्यांवर बंदी आणण्याचा विचार सुरू झाला. (२०१३ किंवा २०१४पर्यंत संपूर्ण बंदी लागू होईल.) ज्या दिवशी ही बातमी आली, त्याच दिवशी टॅक्सी-कम-बसमधे दोघींचा संवाद कानावर पडला. दोघींची तक्रार सुरू होती. शेवटी मी न रहावून मधेच तोंड खुपसलं.
मी: हो पण नाहीतरी तुम्ही कारनेच खरेदीला जाता, कारमधेच पिशव्या ठेवून देत जा.
उत्तरः पिशव्या न्यायचं आठवत नाही ना.
मी: सामान आणून पिशव्या रिकाम्या केल्या की लगेच परत जाऊन कारमधे ठेवून द्या.
उत्तरः तेवढा वेळ नसतो.
मी: मग दुसर्‍या दिवशी ऑफिसात जाताना पिशव्या न्या. आठवत नसेल तर बुटांच्या जवळच लटकवून ठेवा.
उत्तरः ते ही नाही ना आठवत!

थोडक्यात गोर्‍या असोत वा ब्राऊन, मध्यमवर्गीय असोत वा गरीब वा श्रीमंत प्लास्टीकसंदर्भात सगळे भेदभाव गळून पडतात याबद्दल माझी खात्री झालेली आहे. सरकार नियम करून अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे असंच चालत रहाणार. लोकांना दोष देण्याचा मला कंटाळा आलेला आहे. पण म्हणून मी ते करत नाही असंही नाही; पण डोक्याला ताप करून घेत नाही. मी फारतर एवढंच करू शकते, अभिमानाने कापडी पिशवी मिरवणे, ते मी करते.

इंग्लंडमधे 'My bag is not rubbish' असं लिहीलेल्या कापडी पिशव्या कोणत्यातरी दुकानात मिळायच्या. तसं माझ्याकडच्या पिशव्यांवर तसं काही (उदा: "मी कचर्‍यातून भाज्या नेत नाही" असं काही) लिहीण्याची इच्छा अजून अपूर्णच आहे. कधीतरी ते ही करून टाकेन.

Nile Mon, 05/03/2012 - 11:43

In reply to by नितिन थत्ते

सरकारी नियमाने भारतात आता सुपर स्टोअर्मध्ये फुकट कॅरीबॅग मिळत नाही.

सरकारी नियमाने भारतात लोक वागतात असे वाटणारे थत्तेचाचा भारतात रहात नाहीत का? ;-)

Nile Mon, 05/03/2012 - 12:00

पावसात भिजल्याने किंवा थंडीत फारवेळ फिरल्याने अनेकांना सर्दी होते, नेहमी गरम पाण्याने आंघोळीची सवय असताना एकदम थंड पाण्याने आंघोळ केल्यास अनेकांना सर्दी होते अशा गोष्टी आपण नेहमी ऐकतो. अनेकदा तर स्वत: बद्दल अनुभवतोही. या "गोष्टींमुळे" सर्दी होत नाही हे संपूर्णपणे खरे नाही. अर्थात "नेहमीची सर्दी" ही व्हायरस इन्फेक्शनमुळे होते. पण काही कारणाने इम्यून सिस्टीम कमकुवत झाल्यास त्या व्हायरसचे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय पावसाच्या हंगामात अशा व्हायरसची लागण होण्याची शक्यताच जास्त असते.

गारव्यात फार वेळ फिरल्याने सर्दी होण्याची शक्यता असते का यावर केलेल्या संशोधनाबद्दल इथे वाचता येईल. : http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/17705968

थोडक्यात व्हायरस इन्फेक्शनशिवाय सर्दी होत नाही हे खरे असले तरी इम्युन सिस्टीम कमकुवत होईल अशा 'वातावरणा'मुळे सर्दी होण्याची शक्यत असते.

नितिन थत्ते Mon, 05/03/2012 - 19:28

In reply to by Nile

>>थोडक्यात व्हायरस इन्फेक्शनशिवाय सर्दी होत नाही हे खरे असले

माझ्या मते सर्दी व्हायरस इन्फेक्शन खेरीज अ‍ॅलर्जीमुळेही होते. आणि तशी सर्दी कदाचित पावसात भिजणे आदिंमुळे होत असेल.

Nile Tue, 06/03/2012 - 01:02

In reply to by नितिन थत्ते

वरचा प्रतिसाद "सामान्य सर्दी" म्हणजेच कॉमन कोल्डबद्दलचा आहे. जी व्हायरसमुळे होते.

अ‍ॅलर्जीमध्ये सर्दी होते का? मला माहित नाही. अ‍ॅलर्जी मध्ये लोकांना शिंका येतात, नाकातून डोळ्यातून पाणी वाहतं अनेकदा खोखलाही होतो. पण अ‍ॅलर्जी आणि सर्दी(कोल्ड) या वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं.

साधारणपणे अ‍ॅलर्जी ओव्हरअ‍ॅक्टीव (सेंसेटीव्ह) इम्युन सिस्टीमुळे होते. इम्युन सिस्टीम हार्मलेस पोलन्स किंवा धुलीकण इ.चा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. असे करताना शरीरात काही द्रव्य निर्माण होतात, नाकामध्ये सुज येते वगैरे. अ‍ॅलर्जी आणि सर्दीमध्ये काही लक्षणं सारखी असली तरी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

ऋता Fri, 09/03/2012 - 22:41

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे म्हण्जेच तर्कशुद्ध विचारांना चालना देणे असं मी समजते.
लहान वयात मुलांना बागकाम, आकाशनिरिक्षण,पक्षीनिरिक्षण, ओरिगामी वा तत्सम छंद जोपास्ण्यासाठी उद्युक्त करावं.
अशी पुस्तकं वाचावीत ज्यांमुळे विज्ञान्/गणित यांची भीती कमी होईल (क्रमिक पुस्तकं भीती घालण्याचं काम चांगलं करतात).
उदा. http://www.arvindguptatoys.com/
या गोष्टींचा प्रचार..एवढच सध्या मी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी करत आहे.

............सा… Mon, 25/11/2013 - 18:34

Dhaga faar avdla.

Prayers & music exert immense-immense calming influence , the reason for which I do practice the same everyday. I really don't care whether the prayers add up to my "PUNYA" account :)
_____________________
When folks at home insist I pray with them I do not do that because it's intensely personal experience (as in calming) not a collective one. I have been able to bear the brunt of saying a firm "No".

_______________________

Sorry ya machine varun fakt English font yetoy mhanun tyach bhashet lihile aahe.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 20:12

मी स्वतः अशक्य कोटीचा अवैज्ञानिक आहे. आईवडीलांचे ऐकावे, बायकोमुलावर प्रेम करावे, सरकारचे अधिपत्य मान्य करावे, सामाजिक संकेत पाळावेत, इ इ अवैज्ञानिक बाबींचे मी मन:पूर्वक पालन करतो. विज्ञान आणि धर्म यांचे द्वंद्व मला केवळ मांजर आडवे जाणे, पूजा करणे, इ इ गोष्टींत दिसत नाही. धर्म फार व्यापक आहे, मानवाच्या जीवनाची सर्वच अंगे स्पर्श करून तिथे त्याने काय करावे करावे हे सांगतो.

मी जर धार्मिक नसतो आणि शुद्ध वैज्ञानिक असतो तर मी कितीतरी खून, बलात्कार, चोर्‍या, अनैतिक कृती, इ इ आरामात केल्या असत्या. आणि असे करण्याचा मला कधीच विधीनिषेध नसता. आणि माझ्या मते असे नाही हे माझे नशीब. परंतु हळूहळू वैज्ञानिक दृष्टी पत्करून आपल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इतर मानवतेचे नुकसान, शोषण करणारांची संख्या विलक्षण वाढली आहे. आणि अशा वळी त्यात विज्ञानाचा काय दोष (जसे, त्यात धर्माचा काय दोष?) असे म्हणणारांची संख्या वाढली आहे. माकडाच्या हाती कोलीत म्हणायला जावे तर 'कोलिताचा काय दोष?'.

खालिल कारणांमुळे माझा वैज्ञानिकतेवर आक्षेप आहे -
१. विज्ञानाने जगात भयंकर पोल्यूशन करून ठेवले आहे.
२. शोध कसे लागतात, ते कसे कमर्शिआलाईज होतात, कसे पसरतात , त्यांचे समाजावर काय काय परिणाम होतात याचा काहीच अभ्यास व नियंत्रण नसताना ही पिल्लं बाजारात काढली जातात.
३. मानवी मूल्ये आणि विज्ञानाचे शोध यांचा अजून काही संबंध आला नाही, तरीही जनता गुडघ्याला बाशिंग बांधून आपली मूल्ये वैज्ञानिक बनवण्यासाठी धडपडत आहे.
४. मागच्या काळातली रोजगाराची हमी विज्ञानाने काडून घेतली आहे. माझा मुलगा काय शिकेल (किंवा शिकेल कि नाही), कुठे जाईल, काय करेल काहीच माहित नाही. त्याचं जाऊ द्या माझंच माहीत नाही. शाखा प्रचंड काँप्लेक्स होत आहेत आणि कोणती कधी बुडेल सांगता येत नाही. मग दुसर्‍या शाखेत तुम्हाला काही महत्त्व नाही.
५. बुद्धी हा समृद्धीचा आधार विज्ञानाने करून ठेवला आहे. पारंपारिक स्नायूशक्ती, जनशक्ती,चांगुलपण, संपत्ती, श्रम, इतर गुण यांचे मूल्य हळूहळू शून्याकडे चालले आहे. सारी सौख्ये बुद्धिमंताच्या पदरी पडत आहेत.
६. 'बुद्धिमान मनुष्य कोण्या ग्रहावर सुखाने जगत असणे' याला कारणीभूत असणारी सारी कारणे शून्यातून आली आहेत असा विज्ञानाचा प्रोपागंडा चालला आहे. हा भ्रामक प्रचार आहे. (अध्यात्म देव दाखवू शकत नाही म्हणून ते खोटे माना पण आम्हाला अर्ध्यातूनच सुरुवात करायची सवलत द्या हा वैज्ञानिकांचा पावित्रा चीड आणणारा आहे.)
७. कोणत्याही गोष्टीचे अर्धवट उत्तर देण्यात वि़ज्ञानाचा हात कोणी धरू शकणार नाही. पूर्ण संशोधन झालेली एक शाखा असेल तर सांगा. हा आक्षेप वारंवार येऊ लागल्यावर 'जे संशोधन कधीच संपत नाही' अशीच विज्ञानाची व्याख्या करून टाकली. आता पाहू कसे आक्षेप घेता?
८. पारंपारिक रित्या जे साठवता येत नाही ते साठवून (जसे श्रम) विज्ञानाने गूंतागुंतीच्या सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या आहेत. त्याने निर्माण झालेली विषमता अपार आहे.
९. विज्ञानाने जगात करोडो बगळे निर्माण करून ठेवले आहेत. ते स्वतः कोणतेही उत्पादक काम करत नाहीत पण त्यांचे जीवनमान फार उच्च असते. बगळ्यांची पण डीग्री असते. मनोरंजक शाहरुख हा पहिल्या डीग्रीचा बगळा. त्याचे फुलटाईम फॅन दुसर्‍या डीग्रीचे. त्या फॅन क्लबचा संचालक तिसर्‍या डीग्रीचा. ट्याची सेक्रेटरी चौथ्या. तिची मोलकरीण पाचव्या. सो ऑन.
१०. लोक होळीला पाणी जास्त लागले म्हणून प्रचंड कावकाव चालू करतात. मोठ्या हॉटेलांत ज्या कॉन्फरन्सा भरतात, किंवा कॉलेजात जे शिक्षण दिले जाते त्याची इफेक्टीव्ह युटीलीटी काढा म्हटले तर हेच लोक धूम पसार होतील, कारण ह्या गोष्टी इतक्या सबॉप्टीमल निघतील की बंदच कराव्यात.

बरंच आहे...

ऋषिकेश Mon, 25/11/2013 - 20:24

In reply to by अजो१२३

दृष्टिकोन वेगळा असला तरी अपरिचित नाही.. बर्‍याच जणांचे असे मत असतेच
याला प्रतिवैज्ञानिकता हा शब्द आवडला.

नितिन थत्ते Mon, 25/11/2013 - 20:43

In reply to by अजो१२३

विज्ञान कोपर्निकस-गॅलिलिओपासून (भारतापुरतं बोलायचं तर ब्रिटिश राज्य स्थिर झाल्यावर किंवा स्वातंत्र्यानंतर) सुरू झालं असं आपलं मत आहे का?

क्र ९, ८, ५, २ हे वरील गॅलिलिओ प्रभृतींच्या आधीपासूनच चालू आहे.

जगात भयंकर पोल्युशन झाले आहे/होत आहे आणि ते वाईट आहे हे वैज्ञानिकांचेच मत आहे ना?

रोजगार हमी विज्ञानाने काढून घेतली हे कळले नाही. तथाकथित रोजगार हमीचा (दुसर्‍या शब्दात मोनोपोलीचा) समाजाला (उदाहरणार्थ सुताराला सुतारकाम मिळणारच) कोणता फायदा होत होता? आणि अशी जन्माधिष्ठित रोजगार हमी लो टेक्नॉलॉजीच्या काळात (आधुनिक विज्ञानाच्या उदयापूर्वी) जगभर होती असे दिसत नाही. भारतात होती तिचा भारताला आणि ज्यांना अशी हमी होती त्यांना फायदा झाल्याचे ऐकिवात नाही. उदा पौरोहित्य करण्याची मोनोपोली ब्राह्मणांकडे असली तरी बाकीची जनता पूजाविधी करीलच याची काही शाश्वती नव्हती. त्यासाठी त्यांना मार्केटिंगच्या क्लुप्त्या लढवाव्या लागत.

अजो१२३ Mon, 25/11/2013 - 21:01

In reply to by नितिन थत्ते

विज्ञान कोपर्निकस-गॅलिलिओपासून (भारतापुरतं बोलायचं तर ब्रिटिश राज्य स्थिर झाल्यावर किंवा स्वातंत्र्यानंतर) सुरू झालं असं आपलं मत आहे का?

असं नाही.
विज्ञानाने नैतिकता आणि मानवी मूल्ये यांना जोपर्यंत हात घातला नाही, प्रचंड नीट न पडताळलेला सामाजिक बदल घडवून आणला नाही, तोपर्यंत काहीच आक्षेप नाही. माणसाने दगडाची शस्त्रे वापरली तर इतके काही ऑब्जेक्शन नाही, पण कपड्यांचा शोध लावून नग्नतेची (असण्याची/नसण्याची)वेगळीच मूल्ये चालू केली तर ऑब्जेक्शन आहे. लोक जेव्हा पडदापद्धतीचा 'अवैज्ञानिक' म्हणून विरोध करतात तेव्हा हे विसतात कि कपडा हा वैज्ञानिक शोध आहे आणि मानवतेला तो हाताळता आला नाही. तेच शस्त्रांचं. तेच बाजारांचं.

पौरोहित्य करण्याची मोनोपोली ब्राह्मणांकडे असली तरी बाकीची जनता पूजाविधी करीलच याची काही शाश्वती नव्हती. त्यासाठी त्यांना मार्केटिंगच्या क्लुप्त्या लढवाव्या लागत.

धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांचेही असेच होते का? सुतार, चांभार यांचे काय? ३% ब्राह्मणांचे उदाहरण देऊन ९७% बाकीची व्यवस्था मोडीत काढणार?

मन Mon, 25/11/2013 - 21:33

In reply to by अजो१२३

freedom is not free!
स्वात्म्त्र्याची किंमत मोजावी लागते समाजाला जबाबदारीच्या रुपानं.
अक्षरशः चपखल म्हणावे असे एक उदाहरण माझ्याच लिखाणातलं देणार होतो.
पण पडेल माणसाची पडेल कथा म्हणून तिकडं फारसे लोक* पहातही नाहित. त्यामुळे इथेच पेस्टवतोय.
ऋषिकेश वगैरेंसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता.
http://www.aisiakshare.com/node/1131
.
.
सुटका (एक लघुकथा)

तो उठला, पंख झटकले, आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहीर बघत बघत, थोडासा आळस देत तो बाहेर पडला.
सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरीप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडू लागला.
स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख, दिमाखदार तोरा आणि एकूणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेऊन,
आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातून आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावू लागला.
त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरून माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.
अरेच्च्या, पण हे मागून,....
कुणीतरी येतंय. मला वाटलं त्या धवल-पक्ष्याच्या येण्यानं हालणारी ती हवा असेल. पण... वास तर शिकारी पक्ष्याचा आहे. "
त्यानं वळून पाह्यलं. हा तर खासा ससाणा! ह्याच्याच पिच्छ्यावर असणारा. तो वेगाने इकडेच येत होता.
पण... हा इकडे कसा? ह्या जंगलाच्या परिसरात, आत-बाहेर, शेतापाशी कोण-कोण आहे कुणाचा नेम आपल्यावर आहे ह्याचा
पोपटाला चांगलाच अंदाज होता. आजवर हा होता कुठे? आला कुठून?
आता आणखी किती दिवस ह्याच जंगलात हा फिरणारे कुणास ठाऊक?
ह्या शंका पोपटाच्या मनात क्षणभरात येऊन गेल्या. पोपटाला काहीच कळेना.
हा ससाणा तो आज प्रथमच ह्या भूभागात पाहत होता.
पण आता विचार करत बसून उपयोग नव्हता. सुटायचं होतं. त्यासाठी उडत सुटायचं होतं. वेगानं उडायचं होतं.
त्यानं जीव एकवटून उडायला सुरुवात केली. वेगानं उडणं सुरू झालं. दिशा बदलून, चकवा देऊन पाह्यलं.

पण हा ससाणाही भलताच चपळ होता. अंतर कमी कमी करत तो अगदी जवळ पोचला, अगदी पंखभर अंतरावर त्याची चोच होती.
पोपटापासून. आणि एवढ्यात...
एवढ्यात पोपट घुसला जंगलात. घनदाट, दिन-काळोखी असणाऱ्या जंगलात; निबिड वनात तो शिरला. जंगल त्याच्या ओळखीचं, जणू त्याचं दुसरं, मोठ्या रूपातलं घरटंच होतं.
इथल्या दाट वनातल्या वाटा ससाण्याला नव्हत्या माहीत. पण पोपट सफाईनं इथनं अंग चोरून उडू शकत होता.
पोपट शिताफीनं सटकला, झाडातून, फांद्यांतून मिळणाऱ्या फटीतून त्यानं अंग चोरून वाट काढून घेतली.
आणि तो ढोला, अवजड, आकारानं फताडा ससाणा मात्र वाट चाचपडत बसला. आणि तशातच एका फांदीवर आपटून जखमी झाला. पोपट झाला दृष्टी आड. आणि इथं तर उलट परत जायचे वांधे झाले ससाण्याचे आता वाट शोधत बसताना.
इकडे पोपट पोचला बरोबर त्या पडक्या विहिरी पासच्या झाडावरल्या आपल्या घरट्यात.
ह्या दगदगीनं थकला होता तो आता, शारीरिक आणि मानसिकही. इतका की स्वतःला डुलकी कधी लागली,
हे ही त्याला कळलं नाही. आणि स्वप्नात होतं त्याच्या एक शेत, हिरवं गार शेत, शिकारी-ससाणारहित शेत,
माणूस नामक अन्नात आडकाठी करणाऱ्या फडतूस प्राण्यारहित शेत. डाळिंबानं भरलेलं शेत. पेरूनं मढलेलं शेत.
नंतर हळूच कधीतरी त्याचे डोळे उघडले. पोटात अन्नाचा कण नाही. भूक अख्खं शरीर जाळू लागलेली.
बहुदा अती थकव्यानं तो दीर्घकाळ झोपूनच होता. दोन-तीन सूर्य तरी उजाडून गेले असावेत झोपेदरम्यानच्या काळात.
विश्रांती झाल्यानं आता किंचित बरं वाटत होतं; भीतीचं दडपण कमी झालं होतं. अंग हलका वाटत होतं.
तो उठला आणि विहीर ओलांडून पुन्हा शेताच्या दिशेला वळणार इतक्यात............

इतक्यात बाजूलाच त्यानं पाहिलं.... तीच... तीच ती त्या दिवशीची भेदक नजर त्याचा वेध घेत होती.
ह्यानं नुकतंच जंगल ओलांडून शेताच्या हद्दीत प्रवेश केलाच होता; तेव्हढ्यात त्याला हे दिसलं.
ससाण्याला सुगावा लागला असावा; जंगलात राहणाऱ्या पोपटाचा. जंगलाच्या बाहेरच तो लक्ष ठेवून होता.
पुन्हा तेच.....
तीच धावपळ..... जीवघेणा पाठलाग.......
ससाण्यानं ह्यावेळेस तर जवळ जवळ धरलंच होतं त्याला.....
पण पुन्हा एकदा पोपट जंगलात शिरून, दाट वाटांतून पसार.
पुन्हा एक लांब झोप.
पुन्हा एक स्वप्न... सुखाचं स्वप्न... विनासायास मिळणाऱ्या मस्त आयुष्याचं स्वप्न.
पुन्हा दोन-चार सूर्यांनंतर तो उठला आणि यावेळेस तो विहिबाहेर पडायचा अवकाशच होता की...
ससाण्याच्या नजरेने त्याचा वेध घेतला... ससाणा वेगानं त्याच्याकडे झेपावला.
म्हणजे दर दिवसागणिक ससाणा त्या पोपटाच्या निवासाच्या अधिकाधिक जवळ येत होता तर.
आणि आता तर चक्क त्या विहिरीपर्यंत तो पोचला! पोपटाचं निवास असुरक्षित झालं.
पण आता? आता काय? पोपट विचार करत होता.
जीवाच्या आकांतानं उडतही होता. इथून तर आता जावं लागणार.
पण नवीन जागाही हा ससाणा शोधणारच. मग? पुन्हा पाठलाग....

जगायची स्पर्धा.... अफाट संघर्ष...... तो ह्याला कंटाळत चालला होता...
रोज उडण्याचे कष्ट त्याला फार वाटू लागले. त्यापेक्षा एखादी सुरक्षित, जिथं फार कष्ट करायची गरज नाही,
अशी जागा त्याला हवी होती. "

आणि इतक्यात....
इतक्यात खालून जाणारा एक माणूस दिसला; हातात काही तरी घेऊन....
ह्याआधीही आपले बांधव त्यानं नेलेत त्या पिंजऱ्यात....
हो. पिंजरा होता त्याच्या हातात.....
मोकळा, सताड उघडा आणि रिकामा पिंजरा.

पोपटाला सुटकेचा मार्ग मिळाला. त्यानं झटकन खली जाऊन पिंजऱ्याच्या अरुंद दारातून आत प्रवेश केला.
पाठोपाठ ससाणाही शिरायचा प्रयत्न करू लागला, पण हाय रे दैवा.
ससाणा त्याच्या मोठ्या आकारामुळं शिरू शकेना आणि त्यात पिंजर्‍याचं दार कुठुनसं झटकन लागलं जाताच
उरली सुरली आशाही सोडुन ससाणा तत्काळ माघारीही फिरला.

आणि आपल्या डोकेबाजपणावर बेहद्द खुश होऊन तो पिंजऱ्यातला पोपट (स्वतःशीच) म्हणाला
"हुश्श..... झाली बुवा एकदाची सुटका!!!! "

इतरत्र पूर्वप्रकाशित.

Nile Tue, 26/11/2013 - 11:00

In reply to by अजो१२३

शोध लावणारे हुशार असतील आणि मायाळु दयाळुही असतील, तर ते शोधाचा चांगला वापर सर्वसामान्यांना व्हावा असा प्रयत्न करतील. आता सर्वसामान्य त्या शोधाचा गाढवा सारखा (दुर-)उपयोग करतात हा दोष विज्ञानाचा कसा? काही प्रसंगी काही हलकट लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग करतात, पुन्हा हा विज्ञानाचा दोष कसा?

उद्या म्हणाल लोक इंटरनेटवर पॉर्न बघतात म्हणून इंटरनेट बंद करा, अहो तिकडे करोडो लोकांना शिक्षण मिळतंय* त्यामुळे, ते बघा! तुमचा ग्लास नेहमी संपुर्ण रिकामाच असतो का हो? ('नीट' घेत असणार!)

-----
* खरं खुरं शिक्षण म्हणतोय, पॉर्न-शिक्षण नव्हे.

Nile Tue, 26/11/2013 - 10:54

In reply to by अजो१२३

कोणत्याही गोष्टीचे अर्धवट उत्तर देण्यात वि़ज्ञानाचा हात कोणी धरू शकणार नाही. पूर्ण संशोधन झालेली एक शाखा असेल तर सांगा. हा आक्षेप वारंवार येऊ लागल्यावर 'जे संशोधन कधीच संपत नाही' अशीच विज्ञानाची व्याख्या करून टाकली. आता पाहू कसे आक्षेप घेता?

खिंडीत आलो असतो पुन्हा, पण तुम्हा लोकांसारखं मला हाफिसातून ऑनलाईन येता येत नाही म्हणून सुटलात या वेळी! ;-)

मन Tue, 26/11/2013 - 11:04

कोणत्याही गोष्टीचे अर्धवट उत्तर देण्यात वि़ज्ञानाचा हात कोणी धरू शकणार नाही. पूर्ण संशोधन झालेली एक शाखा असेल तर सांगा. हा आक्षेप वारंवार येऊ लागल्यावर 'जे संशोधन कधीच संपत नाही' अशीच विज्ञानाची व्याख्या करून टाकली. आता पाहू कसे आक्षेप घेता?

गोष्टी अर्धवट माहित आहेत; म्हणून त्या अर्धवट माहित आहेत असे सांगितले जाते.
ह्यात चूक काय?
अर्धवट माहित असताना "सगळेच माहित आहे" अशी पर्फेक्ट फूल्-प्रूफ घट्ट बांधलेली बिन्दोक थिअरी द्यायला विज्ञान म्हणजे काय धर्मग्रंथ आहे?
.
.
.
"let there be light; and there was light" अशाच टाइअपची "सगळी पर्फेक्ट उत्तरं" हवीत तर कुठल्याही आदिम मानवी काल्पनिक धारणांकडे जा.
तिथे चिक्कार "पर्फेक्ट" उत्तरे आहेत.
कुठलेच एक "पर्फेक्ट" उत्तर दुसर्‍याशी जुळत नाही!!
.
.
विजान जे सापडले ते तेवढे तसेच मांडते म्हणून अपूर्ण आहे.
अप्पलपोटेपणा , हरामखोरी,,बिन्डोकपणा, इतरंकडून डोके गहाण ठेवण्याची अपेक्षा विज्ञानाने धरली तर तेसुद्धा "अपूर्ण" उत्तरे देणे थांबवेल.
.
.
"शिंचे डोळे पूर्ण आकाशातले तारे माववून घेउ शकत नाहित. कैच कामाचे नाहित. अर्धवट माहिती देतात साले. फोडुनच घेउया स्वतःचे डोळे" ह्या धर्तीवरचा हा आक्षेप वाटला.
गोष्टी अपूर्ण आहेत; म्हणून त्या "वास्तव" आहेत.

सानिया Fri, 29/11/2013 - 23:12

मुलांना ब्रेनपॉप(http://www.brainpop.com/) च्या चित्रफिती आवडतात. शाळांमधेही अनेकदा यांचा वापर करताना पाहिलं आहे.