सावली

कुणी का म्हणो बापुडी सावलीला
स्वतःहून ना ती उभी ठाकते,
जरी श्याम रंगी सदा रंगलेली
मुळातील दोषांस ती झाकते.

अबोली अनाहत तिची साथ लाभे
असो दिन माध्यान्ह वा सांजही,
अंधारता पण जाई विरूनी
कमी ना कुणाला तिची भासते.

सुखावून जाई पांथस्थ कोणी
शीतल अशा वृक्ष छायेतळी,
सदा भूवरी राहते नम्रतेने
मालिन्य कधी ना तिला गाठते.

असो रंक राजा निर्जिव जीव
तिचा फक्त आकार तो वेगळा,
जगा बांधणारे असे एक सूत्र
सदा सांगते ती मला वाटते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्म्म्म!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता! पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!
पल्लवी

धन्यवाद! माझा इथला पहिलाच प्रयत्न होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0