अंदाज करा - किती पैसे जमा होतील?

८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या. १५.४४ लाख कोटी रुपये या नोटांमध्ये आहेत असं आरबीआयकडून सांगण्यात आलेलं आहे. गेल्या चाळीसेक दिवसांत त्यातले बरेच पैसे बॅंकांत जमा झालेले आहेत. आपल्याला अंदाज असा करायचा आहे की नक्की किती पैसे जमा होतील. हा अंदाज करण्यासाठी खालील आलेख वापरायचा आहे. क्ष अक्षावर आठ नोव्हेंबरपासूनची दिवसांची संख्या आहे. ९ तारखेला बॅंका बंद होत्या. त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत सुमारे ५० दिवसांची मुदत आहे. य अक्षावर त्या त्या दिवसांपर्यंत जमा झालेल्या रकमेची संख्या लाख कोटीमध्ये दिलेली आहे. वरची आडवी रेषा ही साधारण १५.४४ लाख दर्शवणारी आहे.

खालच्या आलेखात दिसणारा कर्व्ह हा बऱ्यापैकी स्मूथ आणि काहीसा अपेक्षित आहे. पहिल्या काही दिवसांत अनेक लोकांना निकड म्हणून ताबडतोब पैसे बदलून घेतले. त्यामुळे नोटाबदलाचा दर खूप जास्त होता. त्यानंतर जसजशी गरज कमी झाली, तसतसं नोटाबदलांचं प्रमाण कमी झालं. मात्र बदलण्यासाठी नोटांची उपलब्धता, वरच्या मर्यादा, रांगा वगैरेंमुळे अजूनही अनेक लोक असे असू शकतील की ज्यांनी सगळ्या नोटा बदललेल्या नाहीत. त्यामुळे हा दर अगदी कमी झालेला नाही.

तर, प्रश्न असा आहे की या आलेखाकडे बघून, तुम्हाला हवी ती गृहितकं धरून, ३० डिसेंबरच्या शेवटी नक्की काय आकडा असेल? ३० डिसेंबर म्हणजे खरंतर ५१ किंवा ५२ दिवस असं तुम्हाला वाटत असेल तर तेही तुमच्या आकडेमोडीत नोंदवायला हरकत नाही. ऐसीअक्षरेच्या सदस्यांनी मांडलेला अंदाज आणि आरबीआयने सांगितलेला शेवटचा आकडा यांची तुलना करून पाहू.

आलेख

आलेख

आकडे
3.5 2
6 3.86
10 5.45
17 8.45
28 11.55
32 12.44
(पहिला आकडा ३.५ आहे कारण 'शनिवार दुपारपर्यंत गोळा झालेली रक्कम' असा उल्लेख होता. तो ४ घेतल्याने फार प्रचंड फरक पडू नये.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

भेअर इज दा ग्राफ ?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

द नेशन इज डिमांडींग द आन्सर.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघतो.

लिंक दुरुस्त झालेली आहे. अदितीचे धन्यवाद. (तिने सांगितलं धन्यवाद लिही म्हणून, लिहितो आहे.)

आलेख अजूनहि दिसत नाही. म्हणून view source करून पाहिले तर 'येथे जायला तुम्हाला परवानगी नाही' असा उद्धट जबाब आला!

"रैन का सपना मैं कासे कहूँ री अपना" - राग ललत.

आलेखाची लिन्क उघडत नाही आहे .

मला आता आलेख दिसत आहे. ऐसीची कॅशे रिकामी करून पाहते. आपापल्या ब्राऊजरांवर कंट्रोल+आर -> रिफ्रेश करून बघाल का? अन्यथा ही लिंक पाहा.

मला आता क्रोममध्ये आलेख दिसत आहे. आणखी तक्रार असल्यास लिहा; त्यावर इलाज सापडेलच असं नाही. पण कोणत्या ब्राऊजरमध्ये सर्वसमावेशकता आहे याचा उलगडा होईल एवढंच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखात ग्राफ दिसत नाही. अदितीने दिलेल्या लिंकवर गेलो तेव्हा एरर मेसेज आला,पण डाऊनलोड लिंक पण दिसली. तिथून डाऊनलोड केल्यानंतर ग्राफ दिसला.
(उबुंटू आणि फायरफॉक्स वापरताना).

आता बघा दिसतोय का...

हो, आता दिसतोय ग्राफ.

> खालच्या आलेखात दिसणारा कर्व्ह हा बऱ्यापैकी स्मूथ आणि काहीसा अपेक्षित आहे.

ही स्मूथता भासमान आहे. समजा भुदर्गडमधल्या कुठल्यातरी बॅंकेत ढीगभर नोटा जमा झाल्या. तर तिथे कॅशियर म्हणून काम करणाऱ्या, थकल्याभागलेल्या, आयुष्याला कंटाळलेल्या आणि अमेरिकेतला नवरा उगीच नाकारला म्हणून स्वत:च्या कर्माला दोष देणाऱ्या पाटीलमॅडम त्या सगळ्या नोटा मोजून तितक्याच कंटाळलेल्या मॅनेजरची लेजरवर सही घेऊन तो डेटा दिल्लीला पाठवणार. यात सोमवारचा हिशेब बुधवारी केला आणि शुक्रवारचा सोमवारी केला असं होणारच. त्यानंतर दिल्लीत आरबीआयमध्ये कामाला असलेल्या चष्मिष्ट वर्मामॅडम असला सतराशेसाठ ठिकाणाहून आलेला गोळाबेरीज डेटा आपल्या मॅनेजरकडे जेव्हा पाठवणार तेव्हा त्यात आणखी चारसहा दिवसांचा घोळ होणारच. अशा प्रकारे तयार झालेल्या महाकिचकट स्प्रेडशीटवरून आरबीआयचा स्टॅटिस्टिशियन काहीतरी कर्व्ह फिट करून आपल्या बॉसकडे पाठवून देऊन रात्री एक वाजता झोपायला जाणार. या सगळ्यातून नर्मदेतल्या गोट्यासारखा स्मू्थ कर्व्ह आला तर काय नवल? यामध्ये किती आणि कुठे एरर असेल याचा हिशेब कोण ठेवणार? आणि अशा कर्व्हवर विसंबून राहून इंटरपोलेशन करण्यात काय अर्थ आहे?

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ डेटा गॅदरर्स. तुम्ही गणितज्ञ आयव्हरी टॉवरांमध्ये बसून शुद्ध गणितं सोडवता तेव्हा असले प्रश्न तुम्हाला भेडसावत नाहीत.

पण म्हणूनच मूळ लेखात प्रश्न मांडताना 'तुम्हाला हवी ती रास्त गृहितकं धरून' (अशाच काहीशा शब्दांत...) गणितं करा आणि अंदाज सांगा असं म्हटलेलं आहे. त्यात येऊद्यात भुदर्गडमधल्या पाटीलमॅडम आणि दिल्लीतल्या वर्मामॅडम...

बाकी नर्मदेतल्या गोट्याचा स्मूथनेस येण्यासाठी निव्वळ कोट्यवधी लोक ट्रॅंझॅक्ट करण्याची गरज आहे. त्यांनी निव्वळ रॅंडम वॉक केला तरी तो पृथ्वीहून चंद्राला जाणाऱ्या यानाच्या कक्षेप्रमाणे स्मूथ येईल - नर्मदेच्या गोट्याचं काय घेऊन बसलाय?

शेवटचा आकडा १५.४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त येईल असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे.

असाच अंदाज आरबीआय/सरकारचाही झालेला असावा, कारण शेवटचे दहा दिवस उरलेले असताना अचानक डिपॉझिट लिमिट खाली आणली गेली आहे.

इतक्या १५-१६ लाख कोटी रुपयांत, मनी "लाँडरिंग" करणारे लोक काही २-४ लाख कोटी रुपयांच्या नोटा स्वतःकडे ठेवून सुमारे दीड महिना, व्याज खाऊन वापरत होते, असा संशय असावा. तो सर्व पैसा शेवटी एक उसळी मारून बँकांत येईल असा सरकारी कयास, ही लिमिट लादण्याच्या पाठी असण्याची दाट शक्यता आहे.

(संपादनः १५.४४ लाख कोटी नोटा छापल्याचा डेटा बँकेकडे असेल तर जास्त पैसे कुठून येतील, ही एक रास्त शंका आहे. माझा अंदाज असा, की २००५ पूर्वीच्या पांढरी तार असलेल्या जुन्या नोटा ज्या पडून राहिल्या होत्या, त्या सगळ्याच आता बाहेर येतील, त्यामुळे हा आकडा वाढेल, असा आहे.)

**

जाता जाता : लाइनीत उभे रहायची गर्दी केलं तर लायनी जास्त मोठ्या दिसतील, म्हणून उशीरा जमा करू म्हणणारे एक (भक्त) मित्र सकाळपासून फोन उचलेना झालेत. Wink

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काल जाहीर झालेली 5000ची लिमिट म्हणजे अपेक्षेहून अधिक पैसा गोळा झाल्याचं लक्षण आहे. तेव्हा तुमचा अंदाज बरोबर ठरेल असा आपला माझा अंदाज

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>माझा अंदाज असा, की २००५ पूर्वीच्या पांढरी तार असलेल्या जुन्या नोटा ज्या पडून राहिल्या होत्या, त्या सगळ्याच आता बाहेर येतील, त्यामुळे हा आकडा वाढेल, असा आहे.

जुन्या पांढरी तार असलेल्या नोटा कधीच बंद झाल्या ना? त्याबदल्यात नवीन नोटा घ्या, असं सरकारने त्याच वेळी जाहीर केलं होतं.

मित्राने जमा केल्या गेल्या आठवड्यात असल्या नोटा. खूप जुन्या सिरीजच्या ऑल्रेडी बाद झालेल्या.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

+१

बहुधा त्या (जुन्या पांढरी तारवाल्या) नोटा घेतल्या जाणार नाहीत. (ऑलरेडी बँकांनी घेतल्या असतील तर कमाल आहे).

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

विनातक्रार घेत आहेत. कंपल्सरी ५०० घ्या वाल्या दिवसांत माझ्याकडे ५०० व हजारच्याही ३५-४० जमा झाल्या होत्या, त्या बँकेने विनातक्रार घेतल्या.
खेड्यापाड्यातल्या खूप लोकांकडे त्या जपून ठेवलेल्या होत्या असे दिसते. व त्या नोटा जमा करवून घेण्याचे काम त्यावेळी तितक्याशा एफिशियन्सीने झालेले नव्हते असे दिसते.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(आलेख तर आहेच पण) एका तक्त्यात संख्याही देता येतील का?

आकडे दिलेले आहेत. पण अंदाज करा मालिकेत प्रथम नजरेने अंदाज करायचा, आणि मग गणित करून अंदाज करायचा अशी प्रथा असते. इथे मुळातच ती रेंज खूपच लहान असल्यामुळे ते लिहिलं नव्हतं.

यह सांख्यिकी का धागा असल्याकारणाने नज़रअंदाज करते हुए ३१ दिसंबर को मद्देनज़र रखा गया है.
ता. क.- अंदाज कितीही जास्त आला तरी 'पडलो तरी नाक वर' या न्यायाने उत्सव साजरा करता यावा.
एक ग्रामीण म्हण आहे : नाक कापले, चांद झाला. चांद कापला, उदो केला.

सिंगल एक्स्पोनेन्शियल फिट : १४.२२
खाली आकडे न वापरता नुसता अंदाज केला, त्यात शेवटा-शेवटाला पुन्हा जमा वाढेल, असे गृहीत धरून अधिक अंदाज (१५.२५) ठोकला आहे.

काय कल्पना नाय बुवा.
पण गवर्मेंटने थोडीतरी डोक्यालिटी लावली असेल असा अंदाज आहे त्यामुळे १५.४४ लाख कोटीपेक्षा किंचित का होईना कमी रक्कम जमा व्हायला हवी.
लेटेश्ट बातमीनुसार आणलेल्या ५के च्या मर्यादेमुळे आता ग्राफ फ्लॅट होईल आणि जमा व्हायचा दर कमी होईल.
उद्याच आणखी काही नियम लावले तर मग ग्राफ तसा नाचेल.

धत्तेरेकी. काहीतरी आकडा सांगा ना राव. बोली लावण्याचे पैसे नाहीत. इकडे फक्त १२.५ च्या वरचा आणि १५.५ च्या खालचा आकडा सांगायचाय... तुम्ही पण ना...

गेल्या दोन दिवसांत कोणीच गंभीर उत्तरं दिली नाहीत म्हणून माझं उत्तर लिहून टाकतो.

१. नुसत्या नजरेने पाहून - उत्तर साधारण १५.२ आलं. म्हणजे जिथे क्रॉस सेक्शन आहे त्याच्या किंचित खाली.
२. ग्राफवर बिंदू ठेवून - पुन्हा, कुठचंही समीकरण न वापरता, आलेख डोळ्याला चांगला दिसतो की नाही यावरून - उत्तर १४.९ आलं.

तुमची उत्तरं सांगा भराभर.

नवीन नियमामुळे कमि रक्कम जमा होईल. तेव्हा फायनल आकडा १४ **
सरकार मोकळे विजय घोषीत करायला की १.५ लाख कोटी काळे धन चलनातुन बाद केले!

आत्तापर्यंतची उत्तरं (२२ डिसेंबर)
राजेश घासकडवी - १४.९
आडकित्ता - १६
अजयजी - १४
धनंजय - १५.२५
अनु राव - १४.७
अनुप ढेरे - १५.०
अस्वल - १५.३५

सरासरी - १५.०३

नवीन उत्तरं आल्यास मी ते आकडे मोजून नवीन सरासरी जाहीर करेन.

चर्चा करण्यासाठी दुसरा धागा आहे. इथे फक्त तुमच्या अंदाजाचा आकडा सांगायचा आहे. तो चुकला तर कोणीही तुम्हाला शिक्षा करणार नाही, बरोबर आला म्हणून बक्षीसही देणार नाही. तेव्हा सांगायला काय हरकत आहे?

गुर्जी - माझा आकडा १४.७ लाख कोटी.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/mess-in-india-after-demonetizat...

या बातमीनुसार बेसिकमेच लोचा आहे. बाजारात टोटल चलन २० लाख कोटींचं आहे, अशी नवी गोल पोस्ट आहे.

तेव्हा १६च परत आले, तर उरलेले ४ लाख कोटी ब्लॅक होते, असे नगारे बडवायला नुन्नुशेट अन ग्यँग मोकळी!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

१५.२५

मला वाटतं तो आकडा क्ष अक्षावरती ५२ या आकड्यापाशी साध्य होइल.

३० डिसेंबरपर्यंत किती पैसे जमा होतील हे या आलेखावरून सांगायचं आहे. तेव्हा काहीतरी एक आकडा सांगा.

माझा आकडा १५ लाख कोटी

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तुमच्या ग्राफला माझ्या ग्राफपेक्षा जास्त कर्व्हेचर का आहे?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

भला उसका ग्राफ मेरे ग्राफसे कर्व्ही कैसे?

सुपर-स्केल की चमत्कार, ज्यादा गोल, और ज्यादा गरगरीत. आइना बदलो, और अपनी फिगर सुधारो!

आता सरकारने जमा रकमेचे आकडे देणे बंद केले आहे. नो फर्दर एम्बॅरेसमेंट.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

१४.५