कविता माझ्याकरता ...

कविता माझ्याकरता काय आहे हे इतक्या कविंनी काव्यमय, सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. Myrna Badgerow यांच्याकरता कविता ही अर्धवट राहीलेले स्वप्न आहे. पंख लाभलेला विचार आहे. स्वतःचे प्रतिबिंब आहे किंवा न घ्यायचा राहीलेला श्वास अर्थात चुकलेला काळजाचा ठोका आहे. -

Poetry Is....
.
.
how do I define, describe,
make it come alive so that you
might see what it is to me.....
.
poetry is an unfinished dream, a
thought given wings, and that
moment almost forgotten... it is
.
a reflection of self, a breath never
taken, and a memory I cannot
forget... poetry is a glimpse into
.
the past, vision of tomorrow,
and truth of today... it bleeds
sorrow and radiates joy, marks
.
time and remains timeless, is rich
tapestry and blank canvas, and
it is the music that fills my heart
.
and what it means to me is
....everything.

कुठे कॅरोलिना फोर्शे (Carolyn Forche) नावाची कवयित्री सहज सांगून जाते की कविता ही मनुष्याला चिंतन करण्यास शिकवते. आत्म्याचा कोवळा हुंकार, आत्म्याचा विलास, आत्म्याचे संगीत म्हणजे कविता तर कुठे जॉय हारो (Joy Harjo) नावाची कवयित्री सांगते की प्रत्येक कविता ही प्रेमातूनच उगम पावते म्हणून प्रत्येक कविता ही प्रेमकविताच असते.
पुढे ती म्हणते की कविता ही नादमय कला आहे. एकांतात मनाशी वाचायचा हा प्रकार नसून मोठ्यांने वाचा. कविता कानावर शब्द पडतील अशी वाचा. It's an oral art. कवितेची जादू संपूर्ण बहराला तेव्हाच येते जेव्हा आपण ती ध्वनीरूपाने ऐकतो.

तर कुठे गॅरी स्नायडर (Gary Snyde) सहज कवितानिर्मितीचे विश्लेषण करताना सहज सांगून जातात -
.
How poetry comes to me

It comes blundering over the
Boulders at night, it stays
Frightened outside the
Range of my campfire
I go to meet it at the
Edge of the light

.
तर्काच्या प्रखर प्रकाशात मला भेटायला येण्यास बुजणार्‍या ठेचकाळत, चाचपडत एकेक पाऊल टाकत येणार्‍या लावण्यमयी , आदिम, सहजप्रवृत्तीच्या अशा कवितेच्या (Intuitive) विश्वाला मी अमूर्त मनचा हवाहवासा अंधार व तर्काच्या प्रकाशाची सीमारेषा या ऊंबरठ्यावरती सामोरा जातो.
हेच स्नायडर कवी कवितेला "कल्पनेच्या जगातील अभयारण्य" अशा विलक्षण नावाने बोलावतात.
.
इतकं काव्यमय आणि परिपूर्ण किंवा मनास चुटपुट लावणारे तर काही मला लिहीता येणार नाही. पण आज चपाती करताना सहजच वाटून गेले की कणकेचा गोळा आपण लाटतो, मधे तेल लावुन पीठ भुरभुरवुन, त्रिकोण करत लाटतो व चपाती-मेकिंगमध्ये एक क्षण असा येतो की तव्यावर ३ पदर सुटलेली टम्म फुगलेली, खरपूस भाजली जाऊन सुगंधाने दरवळून जाणारी, खाणार्‍याकरता पौष्टिक तसेच खाणार्‍याला तृप्त करुन सोडणारी चपाती फुलते. अमूर्त मनातून निघालेली कविता ही तशीच असते - अनेक पदर असलेली, व वाचकाचे मन सुगंधाने भरुन टाकणारी, आत्म्याकरता पौष्टिक अशी कविता.
.
आमच्यासारख्या सहाव्या घरातील शुक्र/ कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेल्या लोकांना कविता काय आहे असे विचाराल तर असेच रुक्ष म्हणा किंवा utilitarianism कडे झुकणारे उत्तर मिळेल नाही का!

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अचरटजी व मिलिंद याचे आभार

अचरटजी व मिलिंद याचे आभार (स्माईल)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

मस्तच!

-कविता ही अर्धवट राहीलेले स्वप्न आहे. पंख लाभलेला विचार आहे. स्वतःचे प्रतिबिंब आहे किंवा न घ्यायचा राहीलेला श्वास अर्थात चुकलेला काळजाचा ठोका आहे
- ३ पदर सुटलेली टम्म फुगलेली, खरपूस भाजली जाऊन सुगंधाने दरवळून जाणारी, खाणार्‍याकरता पौष्टिक तसेच खाणार्‍याला तृप्त करुन सोडणारी चपाती

-मस्तच!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

(No subject)

(स्माईल)