वणवा

वणवा...

ज्वाळा या वणव्याच्या, स्पर्शिती रान सारे
बापाविना जन्मला हा, कोण त्यास आवरे....

भासती भ्रमितांना, मुखवटे हिरवळीचे
धीरास जाण आहे, हे खेळ दिखाव्याचे....

बागडे पैलतीरी, पाहून आक्रोश
बीज आहे तेथेही, आंधळा सत्यास....

उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे
हृदयग्रंथी जपून, निवाराच अंत पाहे....

अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन
भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन....

मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची
मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची....

करुणा थोर आहे, फिकीर त्या जीवांची
कल्पातही दुर्मिळ, प्रतीक्षा 'त्या' घनाची....

ही माझी पहिली कविता आहे, त्रूटी असल्यास क्षमस्व

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिलाच प्रयत्न असुनहि छान जमली आहे कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!
पल्लवी