कोठे भटकंती केलीत, करणार - भाग १

मला येत्या शुक्रवारी, शनिवारी नि रविवारी कोकणात समुद्रकिनारी शक्यतो शहरापासून दूर शांत, निवांत, स्वच्छ जागी सहकुटुंब राहायचे आहे. अ‍ॅनि सजेशन्स? अलिबाग, गणपतीपुळे आणि गोवा सोडून.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हल्ली दिवे आगार फॅशनमध्ये आहे. ते टाळा!

हर्णे मुरूड हा चांगल ऑप्शन आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

येत्या शुक्रवारी, शनिवारी नि रविवारी कोकणात समुद्रकिनारी!!!!

निवांत!!
कठिणच वाटतय.

मी एखाद्द्या खेडेगावात देखिल राहायला तयार आहे. बहुतेक महागड्या रिसोर्ट मधे हे अवघड असावे. उद्देश फक्त सात्विक शाकाहारी (नि बायकोसाठी , मुलासाठी सात्विक मांसाहारी) जेवण, एखादी समुद्रात सफर, एखादा अगडबंब किल्ला, एखादे मंदिर नि एरवी पडून राहणे आहे. बाकी सगळं उडत गेलं तरी समुद्रात बेटावर वैगेरे जायला, राहायला धम्माल वाटणार आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

कर्दे बीच मस्त आहे. दापोलीजवळ. मी आणि निपो तिथे गेलो होतो. झक्कास फ्राईड कोळंबी मिळते तिथे. बीच स्वच्छ आहे.

कर्द्याच्या जवळ केळशीचा बीच आहे. तोसुद्धा चांगला आहे. थोडा आडवाटेला आहे फक्त. पण एकुणात वर्षांताला जाताय, त्यामुळे निवांत वगैरे अवघड वाटतंय.

माझ्याकडे वाहन, ड्रायवर नि मोबाईल कनेक्शन न लागणारे जीपीएस आहे. शांत, निवांत जागा एकदम आडवाटेला असणारच. हॉटेलच्या रुममधले, वा रिसोर्टच्या आतले सौंदर्य कमी असले तरी चालेल, पण नजारा और खाना बढीया मंगता है. या जागा गुगलून पाहतो.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अजो - ऐसीला साजेसा हा धागा नाही हे नमूद करायलाच पाहिजे. अश्या धाग्यांसाठी बाकीची २ संस्थळे आहेत.

-----------
कर्द्याला "बाळ" नावाच्या फॅमिलीची बीच वर बांधलेली कॉटेज आहेत. लोकेशन बेस्ट आहे, अगदी बीच वरच आहे.
माझ्याकडे आता कॉन्टॅक्ट नंबर नाही. बर्‍याच वर्षापूर्वी मी तिथे गेले होते.

टिपिकल कोकणस्थ म्हातारा ते चालवतो, त्यामुळे नियम कानुन लागू होतात.

ओके.
====================
मला कोकणस्थ म्हातार्‍याकडे राहायला जास्त आवडेल. स्थानिक संस्कृती नि इतिहास सांगायला तो वेळ काढेल का? फिरतीवर मी रिकामटेकड्या ज्ञानी लोकांशी गप्पा मारणे पसंद करतो.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

हो त्याची नारळ-फोफळीची बाग आहे. फिरवुन दाखवेल तुम्हाला.

बाळ यांच्या नाद बीच रिझॉर्टवर दोन-तीन वर्षांपूर्वी जाऊन आलोय. चांगलंच आहे पण ही बाळमंडळी सिझन मध्ये मनाला येईल ते दर लावतात. आणि थोडं ओव्हररेटेड पण आहे. तरी जायला हरकत नाही. अगदी बीचसमोरच आहे. आणि अनु राव म्हणतात त्याप्रमाणे कोब्राश्टाईल नियमकानून आहेतच.
नाद रिसॉर्ट मुरुडमध्ये आहे. मुरुडच्याच थोडं पुढे गेलात तर कर्दे बीच आहे. तोदेखील एकदम स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे. तिथे पण सागर हिल रिसॉर्ट नावाचं सुंदर रिसॉर्ट आहे. त्याशिवाय दापोलीच्या जवळपास आंजर्ले, केळशी, कोळथरे ( ही जागा दापोलीपासून खूप आत, सुमारे २५ किमी आहे आणि तिथे एकमेव असे भावे यांचे गारवा रिसॉर्ट आहे. पण सुंदर. नारळीपोफळीच्या बागा वगैरे ), लाडघर (तेथील तामस्तीर्थ ) वगैरे सुंदर किनारे आहेत. तेही पाहू शकता. तिथेही घरगुती रिसॉर्ट्स आहेत.
रायगड जिल्ह्यात दिवे आगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही ठिकाणं पण छान आहेत.
मालवणजवळ तारकर्ली, देवबाग, भोगवे, तोंडवली, शिरोडा यांचा विचार करायला हरकत नाही पण त्याला २ दिवस पुरणार नाहीत. दापोली आणि त्याजवळची काही ठिकाणे हा पर्याय बेस्ट वाटतो मला.

यावर सविस्तर आर अ‍ॅन डी करेन. इतक्या चांगल्या उत्तरासाठी धन्यवाद.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

बोर्डीचा किनारा चांगला नाही पण ठाण्याहून जवळ.निवांतपणा नसेल पण ओप्शनस आहेत.

कोकणासाठी कळंबोली एवे-खोपोली-पाली -वाकणफाटा-गोवारोड बरा पडतो.

कोकण सम्राट गवि का येत नाहीत ऐसीवर आता?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

"टिपिकल कोकणस्थ म्हातारा ते चालवतो, त्यामुळे नियम कानुन लागू होतात."
या कॅामेंटला लोक घाबरतात असं वाटतं?

आधी सांगितले नाही असा आरोप होयला नको.

भाजी, आमटीच्या वाट्या छोट्या असतात. जेवताना, ताक ( सुद्धा ) पुन्हा घेतले तर जास्तीचे पैसे लावतात वगैरे.

हे चालत असेल तर लोकेशन बेस्ट आहे. आणि हे सर्व माहिती असलेलीच लोक तिथे येत असल्यामुळे क्राऊड पण चांगली असते.

"आधी सांगितले नाही असा आरोप होयला नको"

कन्स्युमर कायदा याफुकटच्या सल्यांना लागू होत नाही ही जमेची बाजू.परदेशातले ज्योतिषी नाही का वैधानिक इशारा "सावधान " देऊनच सल्ला देतात. हल्ली कोणती गोष्ट सर्विस ट्याक्स/RTA/Consumer Act/pil खाली येईल सांगता येत नाही.
आता झाला का धागा ऐसीवर बसण्यासारखा?

येस, गब्बु नी २-३ लिंका फेकल्या इकॉनॉमिस्ट लोकांच्या की चारचांद लागतील.

उद्या दापोली...

वाटेत कुठे जेवावं?
तिथे काय पाहावं?
काय पाहू नये...

फेसबुकावर हा धागा पाहा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"लेखिका बुद्धीप्रामाण्यवाद शिकवणार्या शाळेची मुख्याध्यापिका आहे."

- ओकओके
कट्ट्याला आलात तर हाताचीघडीतोंडावरबोट.

अचरटबाबा, तुम्ही बुद्धीप्रामाण्यवादाचे विद्यार्थी आहात का? नसलात तर हाताचीघडीतोंडावरबोट कशाला?

बुद्धीप्रामाण्यवादाच्या विद्यार्थ्यांना तोंडावर बोट ठेऊन गप्प बसवण्यातच माझा सगळा वेळ जातो. फार वचावचा बडबड करत असतात हे बुद्धीप्रामाण्यवादी.

लेखिका बुद्धीप्रामाण्यवाद शिकवणार्‍या शाळेची मुख्याध्यापिका आहे.

फादर फादर... त्या शाळेतली मुलं ज्यांना अनु बच्चन, अनु बच्चन म्हणतात त्या ह्या!!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होटेल कॉस्ट १६ ते ५० हजार रु पर नाइट असते या कालात?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

अहो हा प्राइम टाइम आहे वर्षातला. आता नाही कमवणार तर कधी?माथेरानमध्ये ज्या रुमचे (रुम भाडे असे नाहीच) कपलचे जेवण-नाश्ता -राहाणे रु पाचहजार घेत होते तीच रूम नंतर १५०रु रुमभाड्याने घेतली आहे.शिवाय थंडीत सगळे समुद्राकडे पळतात.म्हणूनच बोर्डी सांगितलं. तिकडे जाऊनच बार्गिन करा. नाही पटलं तर परत येण्याचं अंतर आहे. दमणसुद्धा फुल्ल असणार.