अप्रकाशित कविता

जन्मतःच बिघडलेली ही कविता आता
अधिकच बिघडत चालली आहे दिवसेंदिवस !

तिला सुधारणे आता गेले आहे
मानवी प्रतिभेच्या पलीकडे,
(सुधारण्याच्या प्रयत्नांनी आणखीनच बिघडते ती ).
अधिकाधिक दाहक होत चाललेल्या
या स्थायी दुर्घटनेला
लांबचा वळसा घालूनच
इतर रचनांना जन्म घेता येतो .

तिच्या जडशीळ देहाचे काय करावे ?
नित्याचा होऊन बसलाय हा प्रश्न.
तिच्यासमोर साऱ्या प्रकाशित कविता
वाटतात पाकोळ्यांसारख्या,
आणि सर्व समीक्षा राखेसारखी!

आणि सर्व मानवांमध्ये ती फक्त मला ओळखते,
आणि तेसुद्धा मी जोपर्यंत मानव असेन ,
तोपर्यंतच.
: मिलिंद पदकी
भाषांतरकार
(असद जैदी: "अप्रकाशित कविता" (हिंदी) : हिचे भाषांतर)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आणि सर्व मानवांमध्ये ती फक्त मला ओळखते,

Smile सुंदर!

______________________________
विवेकाची ठरेल ओल ।ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।

तू शुचि आहेस का? असशील तर हे हे "तुती" नाव का घेतले आहेस. एकदम रेशीम उत्पादन आणि तुतीची पाने आठवली.