पुरोगाम्यांचा विजय

पुरोगामी विचारसरणी आणि प्रतिगामी (किंवा कॉंझर्व्हेटिव्ह) विचारसरणी यात नक्की फरक काय? माझ्या मते मुख्य फरक हा आहे की प्रतिगामी म्हणतात 'ही व्यवस्था आजपर्यंत चालू आहे म्हणून चालू राहाणार, राहिली पाहिजे. त्यासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यांवर घाला आला तरी बेहत्तर.' याउलट पुरोगामी विचारतात 'ही व्यवस्था चालू ठेवण्याचे नक्की फायदे काय? जर तोटेच जास्त असतील तर ही व्यवस्था सोडायला हवी. जर या व्यवस्थेतून थोड्यांचा फायदा आणि अनेकांचा तोटा होत असेल तर ती टाकून अधिकांचा फायदा होईल असे बदल त्या व्यवस्थेत करायला हवेत'. पुरोगाम्यांना चांगल्यासाठीचे बदल हवे असतात, तर प्रतिगाम्यांचा 'कुठचाही बदल म्हणजे ऱ्हास' यावर ठाम विश्वास असतो. म्हणून प्रतिगामी 'व्यवस्थेसाठी व्यवस्था' म्हणतात तर पुरोगामी 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' यांकडे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतात.

गेल्या अनेक शतकांचा इतिहास बघितला तर बदल हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झालेला आहे. त्यामुळे कुंपणं घालून या बदलांना मर्यादा घालण्याचे प्रयत्न उधळताना दिसलेले आहेत. 'इथे आम्ही कुंपणं घातलेली आहेत, याच्या पलिकडे जायचं नाही म्हणजे नाही' असं तत्कालीन प्रतिगामी म्हणतात. काही काळ उलटतो तसा सगळाच समाज ती कुंपणं ओलांडून गेलेला दिसतो. मग प्रतिगामी पुन्हा नवीन कुंपणं घालतात, आणि पुन्हा तेच म्हणतात. काही दशकांनी ती कुंपणं पायदळी तुडवली जातात. आणि हे चक्र सतत चालूच राहातं. प्रतिगाम्यांचं हे नवनवीन कुंपणं घालत राहाणं इतिहासाच्या पार्श्वभूमीवर फारच केविलवाणं वाटतं. कारण आत्तापर्यंत अनेक सामाजिक बंधनांना धिक्कारत पुरोगामी या मर्यादा विस्तारण्याचं आपलं काम सातत्याने करताना दिसत आहेत. खाली काही उदाहरणं आहेत.

१. शिक्षण - गेली अनेक शतकं संपूर्ण जगभरच शिक्षण ही फारच थोड्या मर्यादित लोकांची मांदियाळी होती. शतकानुशतकं ९५ टक्क्यांहून अधिक लोक 'काला अक्षर भैंस बराबर' या स्थितीत जन्मले, वाढले, जगले. पण ग्युटेनबर्गने छपाईच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि माहिती साठवून ठेवणं, ती इतरांकडे पोचती करणं हे फारच स्वस्त झालं. त्याआधी बायबलमध्ये काय सांगितलं आहे हे ऐकण्यासाठी धार्मिक दलालांकडेच जावं लागायचं. ते त्यांना सोयीस्कर अर्थ सांगायचे. भारतात तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती होती. त्यात शिक्षण कोणाला मिळणार हेच वर्णव्यवस्थेने मर्यादित केलेलं होतं. त्यात शूद्रांना केवळ वेदशब्द ऐकण्याबद्दल कानांत शिसं ओतण्याची शिक्षा ठोठावली होती. सामान्य माणसासाठीही जे काही ज्ञान होतं ते संस्कृतमध्ये होतं. ज्ञानेश्वरांनी भग्वद्गीतेचं भाषांतर मराठीत करणं हेही क्रांतीकारक पाऊल होतं. चर्च काय किंवा पैठणेतली पीठं काय, सामान्य माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात त्यांचा स्वार्थ होता. ज्ञानाच्या नाड्या आपल्या हातात ठेवून घेण्यात त्यांचा फायदा होता. त्यामुळे जगभरच प्रत्येकाने आपला परंपरागत व्यवसायच करत राहाणं आणि ज्ञानाच्या मागे न लागणं ही व्यवस्था जपण्यात ज्ञानावर मालकी असणारांचा कल होता. वेळोवेळी अनेक पुरोगाम्यांनी ज्ञानाचा विस्तार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठशे वर्षांपूर्वीची परिस्थिती बदलून आता जगभर सगळ्यांना शिक्षण मुक्तपणे उपलब्ध आहे. प्रतिगाम्यांनी शिक्षणावर निर्बंध घालण्याचे जे काही प्रयत्न केलेले होते त्यांचा पूर्ण फज्जा उडालेला आहे. गेली काही दशकं जगभरच लोक अधिक सुशिक्षित होत आहेत. इंटरनेट क्रांतीमुळे तर ज्ञानावर आणि माहितीवर नियंत्रण ठेवणं महाकर्मकठीण झालेलं आहे. 'सर्वांनी सुशिक्षित व्हावं, शिक्षणाच्या बाबतीत कोणी काय शिकावं याबाबत निर्बंध असू नयेत, आणि काही मूलभूत ज्ञानावर एकाधिकार असू नये - जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येकाला निर्णय घेणं शक्य व्हावं' या पुरोगामी विचाराचा विजय होत चाललेला आहे.

२. आरोग्य - जागतिक आरोग्यात सुधारणा होण्याची इच्छा ही काही पुरोगाम्यांची मक्तेदारी नाही. मात्र शिक्षणाचा प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ यामुळे वैद्यकीय ज्ञानात प्रचंड प्रगती झाली. प्रेतावर शस्त्रक्रिया करून शरीराचा अभ्यास करणं याला अनेक प्रतिगाम्यांचा, अनेक कारणांसाठी विरोध होता. रोग का होतात याविषयी जुन्या संकल्पना जपून ठेवणारेही होते. या कल्पनांना आव्हान देत सत्य काय आहे हे शोधून काढण्याची प्रवृत्ती ही पुरोगामी प्रवृत्ती. या पुढे जाण्यामुळेच वैद्यकात क्रांती घडलेली आज आपल्याला दिसते. सनातन काळापासून असलेली ३०-३५ वर्षांची आयुष्य-अपेक्षा वाढून आता जगभर ती ७० च्या आसपास गेलेली आहे, याचं श्रेय पुरोगामी विचारांच्या झगड्याला आणि त्यात मिळवलेल्या विजयालाच आहे.

३. पृथ्वी आणि विश्व - पृथ्वी सपाट आहे, आणि सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्याविरुद्ध काही बोलणाऱ्यांचा इन्क्विझिशनकडून हालहाल करून छळ व्हायचा आणि त्यांना मृत्यूदंड दिला जायचा. सत्य काय आहे यापेक्षा कुठच्यातरी पोथीत काय म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं मानणं, आणि त्याविरुद्ध ब्रही काढण्याची मुभा न देणं ही खास प्रतिगामी विचारसरणी झाली. चारशे वर्षांपूर्वी हे सर्रास चालायचं. आकाशात दिसणारे तारे हे सूर्यासारखेच इतर आहेत, खूप लांब असल्यामुळे आपल्याला ते ठिपक्यांसारखे दिसतात असं ज्योर्दानो ब्रुनो मानायचा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असंही तो मानायचा. त्याला मृत्युदंड देण्याची क्षमता धर्मसंस्थेत - प्रतिगामी व्यवस्थेत - होती. गेल्या चारशे वर्षांत पुरोगामी विचारसरणीचा इतका विजय झालेला आहे की पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते हे तर सर्वमान्य ज्ञान झालेलं आहेच. पण त्याहीपलिकडे धर्मसंस्थेला अशा 'पाखंड्यांना' शिक्षा देण्याचा अधिकार राहिलेला नाही. प्रतिगाम्यांचा हा प्रचंड पराभव आहे.

४. देवाबद्दलची संकल्पना - देवाबद्दलची श्रद्धा ही सनातन काळापासून सर्वच समाजांत दिसून आलेली आहे. या वैयक्तिक श्रद्धेचं रूपांतर सामूहिक धर्मांत करून अनेक धर्मांनी देवाकडे जाण्यासाठीचे मार्ग आपल्या ताब्यात घेतले. श्रद्धा, पूजा ही कशी व्हावी याबद्दल नियम बनवले. ही व्यक्तींवर आलेली बंधनंच आहेत. हे शतकानुशतकं चाललं. या श्रद्धेचा फायदा घेऊन चर्चांनी पापमुक्तीसाठी रोखे विकण्यापर्यंत मजल गेली. 'देवाच्या नावाने काहीतरी कर्मकांड करून देवाच्या दलालाला अमुक इतकी रक्कम, दक्षिणा द्या, म्हणजे तुमची पापं धुतली जातील' हे सांगणं तर सर्वत्रच होतं, अजूनही आहे. त्यासाठी स्त्रियांना बंदी, अस्पृश्यांना बंदी अशीही थेरं झाली, अजूनही चालतात. मात्र गेल्या काही दशकांत याबाबतीत प्रतिगाम्यांची माघार होताना दिसते आहे. अनेक युरोपीय देशांत चर्चेसमध्ये जाणाऱ्यांची संख्या घटताना दिसते. जे जाताहेत त्यांचीही सरासरी वयं वाढताना दिसत आहेत. म्हणजे नवी पिढी या सगळ्याला कंटाळून संस्थात्मक देवाला नाकारताना दिसते आहे. देव आणि त्याची आराधना ही कल्पना कदाचित व्यक्तिगत पातळीवर ही पिढी बाळगत असेल. पण आपल्या देवाच्या पूजनावर मंदिर-मस्जिद-चर्च वाली यंत्रणा बनवून ती भावना नियंत्रण करणारी प्रवृत्ती दूर ढकलणारा विचार म्हणजे पुरोगामी विचार. या विचाराचा विजय होताना दिसतो आहे.

५. धर्म-राज्य विभक्तता - एकेकाळी राज्यसंस्थेमध्ये धर्माला प्रचंड महत्त्व होतं. कारण लोकांवर धर्माचा प्रचंड पगडा होता. त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी राजा धर्मसंस्थेला शिरोधार्य मानत असे. काही वेळा स्वतःलाच तो देवाचा अवतार म्हणवत असे. पण मी राजा आहे, मी राज्य चालवणार, धर्म वेगळा - असं ठामपणे म्हणणं अनेक राजांना सहजशक्य नव्हतं. राज्याचे कायदे हे धर्माने ठरवून देणं हे शरीयामध्ये दिसतंच. मनुस्मृतीचे कायदेही समानतेवर आधारित असण्यापेक्षा धर्मप्रचलित असमानतेला राज्यव्यवस्थेत सामावून घेण्याचा प्रयत्न करणारे होते. सर्व राजांना कमीअधिक प्रमाणात हे धर्माचं आक्रमण चालवून घेणं भाग होतं. धर्म वेगळा आणि राज्यव्यवस्था वेगळी हा पुरोगामी विचार आहे. कारण धर्म हे पुरातन काळातल्या जीवनपद्धतीची अपेक्षा करतात. एखाद्या पोथीत कधीकाळी काहीतरी लिहिलेलं आहे, त्यामुळे ते बदलणं अशक्य आहे हे मानतात. राज्यसंस्थेवरच धर्मसंस्थेचा पगडा असणं म्हणजे राज्याची शक्तिमान व्यवस्था ही पूर्वापार चालत आलेली कुंपणं बळकट करत राहाणं ठरतं. त्यापासून सामान्य समाजाची सुटका करायची झाली तर धर्म-राज्यसंस्था विभक्त असणं महत्त्वाचं ठरतं. आज जगभर पाहिलं तर कायदेशीररीत्या तरी धर्मसंस्था व राज्यसंस्था यांची फारकत झालेली आहे. अर्थातच काही मुस्लिम देशांचे अपवाद आहेत. मात्र एकेकाळी जो नियम होता तो आता अपवाद म्हणून शिल्लक आहे, हे पुरोगामी शक्तींच्या प्रगतीचंच लक्षण आहे.

६. लोकशाही - राजसत्ता धर्मसत्तेपासून स्वतंत्र होणं ही केवळ एक पायरी झाली. मात्र जोपर्यंत राजेशाही, एकाधिकारशाही होती तोपर्यंत जनतेचा राज्यसत्तेवर अंकुश नव्हता. आपल्याला हवी तशी मनमानी करण्याचा अधिकार राजा, त्याचं निकटचं मंत्रीमंडळ आणि त्यांना सावरून धरणारे सरदार-दरकदार-जमीनदार-व्यापारी यांना होता. जनतेचं भलं होण्यासाठी राजसत्ता राबावी हा विचार आधुनिक आहे. त्याआधी जनता उठाव करणार नाही इतपतच जेमतेम काम जनतेसाठी राजा करत असे. ही व्यवस्था सरंजामशाहीला पोषक होती. अर्थातच समानतेचं आधुनिक मूल्य त्यामुळे पायदळी तुडवलं जायचं. लोकशाही पद्धतीमुळे हे चित्र अधिक संतुलित झालं. कुठलीच लोकशाही परिपूर्ण नाही, पण त्याआधीच्या सरंजामशाही आणि वसाहतवादी राज्यकर्त्यांपेक्षा बहुतांश अधिक चांगल्या चालतात. 'लोकशाही राज्यांत दुष्काळाचे बळी पडत नाहीत (किंवा नगण्य पडतात)' या अर्थाचं अमर्त्य सेनांचं वाक्य प्रसिद्ध आहे. लोकांकडे अधिक शक्ती देणारी ही राज्यव्यवस्था आता जवळपास जगभर पसरलेली आहे. पुरोगामी मू्ल्यांच्या विजयाची ही घोडदौड चालू आहे.

७. स्त्री-पुरुष समानता - दोनतीनशे वर्षं मागे गेलं तर प्रत्येक धर्माने, प्रत्येक देशाने स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला साताठ मुलं होत, आणि तिचं आयुष्य घरकाम, बालसंगोपन यातच अडकून पडे. स्त्रियांना शिक्षण देणं दूरच - तिला कुठचंच स्वातंत्र्य देऊ नये, पायातली वाहाण पायातच ठेवावी या प्रकारची वचनं प्रत्येक धर्मग्रंथात आढळतात. विसाव्या शतकात जगभर हे चित्र बदलत गेलं. संततिनियमनामुळे फर्टिलिटी रेट सातवरून दोन ते अडीचच्या दरम्यान जगभरच आलेला आहे. स्त्रिया अधिकाधिक प्रमाणात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहाण्याच्या मार्गावर आहेत. स्त्रीला ही शक्ती, स्वातंत्र्य मिळू नये आणि ती कायम पुरुषावर अवलंबून राहावी, त्याची दासी बनून राहावी याची काळजी घेणारी प्रतिगामी व्यवस्था मोडून पडलेली आहे. पुन्हा, अपवाद सापडतील. पण नियम बदलेले आहेत. आणि त्यातून मिळणारं स्वातंत्र्य हे पिढ्यानपिढ्या वाढतच जाणार हे चित्र स्पष्ट आहे. स्वातंत्र्य, समानता ही दोन महत्त्वाची मूल्यं जगाच्या निम्म्या लोकसंख्येला मिळवून देण्यात पुरोगामी शक्ती यशस्वी झालेल्या आहेत.

८. गुलामगिरी - माणसाला माणसाचा गुलाम करून त्याला प्राण्याप्रमाणे साखळदंडांनी बांधून त्याच्याकडून मरेस्तोवर काम करून घेत त्याला एखाद्या बैलासारखं वागवणं ही स्वातंत्र्य, समानतेच्या आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरुद्ध जाणारी व्यवस्था. ही व्यवस्था अनेक शतकं प्रतिगामी लोकांनी आपल्या फायद्यासाठी राबवली आणि त्यात कोट्यवधी लोकांना ती खितपत टाकलं. ही व्यवस्था आता साफ मोडून पडलेली आहे. ती वाईट का होती, आणि ती मोडणं चांगलं का यावर काही लिहिणंही हास्यास्पद ठरेल इतकं ते उघड सत्य आहे. ती नष्ट झाली हा प्रतिगाम्यांचा पराभव आणि पुरोगामी विचारांचा विजय आहे.

९. दलित, अस्पृश्य संकल्पना - प्रत्यक्ष दिसणाऱ्या साखळ्या न वापरता लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला गुलाम करण्याची पद्धती म्हणजे भारतात राबवली गेलेली वर्णव्यवस्था. अमेरिकेत काळ्या माणसाला जसं गोऱ्यांनी स्वतःपेक्षा हीन समजलं तसं कोट्यवधी लोकांना त्यांच्या जाती लक्षात ठेवून इतरांनी हीन समजलं. त्यांना पाणीही मिळण्याची चोरी व्हावी इतक्या टोकापर्यंत ही व्यवस्था राबत असे. या दलितांना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळण्याला मज्जाव करून त्यांना विशिष्ट हीन कामं करायला भाग पाडलं गेलं. अमुक जातीत जन्म झाला की तुम्ही पुढे काय करू शकाल हे ठरलं जायचं. भारतीय संविधानाने हा भेदाभेद नष्ट करून देशावरचा हा कलंक पुसून टाकलेला आहे. अजूनही सुंभ जळून पीळ शिल्लक असला तरीही आज कोणालाही 'तू अमुक जातीचा म्हणून तुला शिक्षण मिळणार नाही' असं म्हटलं जात नाही. कोट्यवधी दलितांनी शिक्षणाद्वारे स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे. संपूर्ण समानता गाठायला अजूनही वेळ असला तरीही प्रवास प्रतिगामी कुंपणं तोडून पुरोगामी विचारांच्या दिशेने चालू आहे.

१०. कुटुंबसंस्था - पुरुषप्रधान व्यवस्था, एकत्र कुटुंबपद्धती, यात एक आंतर्गत पोलादी व्यवस्था होती. घरच्या मुलींकडे दुसऱ्याघरी पाठवण्याआधीपर्यंत सांभाळायची धोंड या दृष्टीने पाहाणं त्यात अंतर्भूत होतं. घरात आलेल्या मुली व स्त्रिया यांच्याकडे मुलं निर्माण करणारी यंत्रं आणि घरात राबण्यासाठीच्या (बिन)मोलकरणी या दृष्टीने पाहाणं हेही त्यात अंतर्भूत होतं. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच आणि कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं हे एकत्र कुटुंबपद्धतीत सर्रास होतं. आता हे चित्र बदलून चौकोनी कुटुंब अधिकाधिक दिसायला लागलेली आहेत. मुलांना कुठचातरी एकच एक धंदा शिकवणे किंवा शेतात राबायला पाठवणं यापलिकडे उच्च शिक्षण देऊन अधिक विकल्प निर्माण करणं याकडे आधुनिक कुटुंबांचा कल दिसतो. एकत्र कुटुंबाची कठोर, जाचणारी व्यवस्था टिकवून ठेवणं आणि त्यापासून बदल होण्याला विरोध करणं ही प्रतिगामी वृत्ती होती. ती कमी होऊन स्वातंत्र्य, मोकळेपणा, शिक्षण या पुरोगामी मूल्यांचा अंगिकार जागोजागी होताना दिसतो आहे.

ही काही उदाहरणं झाली. यातली अनेक एकमेकांत गुंतलेली आहेत. ही पाहून लक्षात येतं की मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांमधल्या जाचक व्यवस्था मोडून पडून अधिक मोकळ्या, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना पोषक ठरणाऱ्या मूल्यांकडे प्रवास चालू आहे. हा प्रवास संपलेला नाही, पण थांबलेलाही नाही. हे पुरोगाम्यांचे विजय असेच दशकानुदशकं, शतकानुशतकं होत जावोत.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पार्टी पूपिंगबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गरीबांकडे बुद्धी, श्रम, वेळ इत्यादी स्रोत असतात >>>>>>

he jar khare asel tar te garib kaa rahaatil. they may start as Garib, but why would the finish as Garib if they are ready to put efforts and have basic intelligence.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>गरीबांकडे बुद्धी, श्रम, वेळ इत्यादी स्रोत असतात >>>>>>
he jar khare asel tar te garib kaa rahaatil. they may start as Garib, but why would the finish as Garib if they are ready to put efforts and have basic intelligence.<<<

बुध्धी आणि श्रम करण्याची इच्छा /कुवत याच्या पलीकडे संधी / योग्य वेळ वगैरे ( यात मी नशीब , नियती वगैरे लिहीत नाहीये ) महत्वाचे मुद्दे नाहीत का ?

समजा सबीर भाटिया नि २०१७ किंवा १९८५ मध्ये हॉटमेल ची आयड्या काढली असती तर त्याला ४०० मिलियन वगैरे सोडा , ४०० रुपये तरी कोणी दिले असते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Haven't you heard that proverb ADITI? - EVERYTHING looks like a NAIL when ONLY thing you have is hammer

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा सबीर भाटिया नि २०१७ किंवा १९८५ मध्ये हॉटमेल ची आयड्या काढली असती तर त्याला ४०० मिलियन वगैरे सोडा , ४०० रुपये तरी कोणी दिले असते का ? >>>>>>>

Bapat-anna, 400 milian nasate milale, pan Sabir Bhaatia garib nakkeech raahilaa nasataa naa.

Ithe prashn shrimant honyaacaa naahiye, tar garibitun baaher paDanyaachaa aahe ( fakt ).

----------
बुध्धी आणि श्रम करण्याची इच्छा /कुवत याच्या पलीकडे संधी / योग्य वेळ वगैरे ( यात मी नशीब , नियती वगैरे लिहीत नाहीये ) महत्वाचे मुद्दे नाहीत का ? >>>>
HesdMaster Bai ameriketun hi comment karat aahet. ameriket kasHt karaayachi tayaari asel tar garibitun baher padanyaachi saMdhich miLat naahi ase tumhaala mhanaayache aahe kaa?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<<<< HesdMaster Bai ameriketun hi comment karat aahet. ameriket kasHt karaayachi tayaari asel tar garibitun baher padanyaachi saMdhich miLat naahi ase tumhaala mhanaayache aahe kaa? >>>>>>

आता शेजारील देशांतील माणसे तिथे, त्यांच्या देशात संधी नाही म्हणून प्रसंगी जीवाचा धोका पत्करून (अवैध मार्गांनी) सीमा पार करून अमेरिकेत घुसायला पाहतात ते नेमके कशासाठी ? संधी नाही म्हणून की अमेरिकेत विषमता वाढलिये म्हणून ? की अमेरिकेतील त्या विषमतेबद्दल अत्यंतिक प्रेम वाटते म्हणून ??

मी तर असे ऐकलेय की जगातल्या अनेक देशातील अमेरिकन वकिलाती समोर लोक व्हिसा साठी रांगा लावून उभे असतात त्याचे एकमेव कारण हेच की त्यांना अमेरिकेत येऊन अमेरिकेतील विषमता दूर करायची असते.

सत्तर च्या दशकात अनेक चिनी लोक (अवैधपणे) मालवाहू जहाजाच्या कन्टेनर मधे बसून अमेरिकेत आले होते व अमेरिकेत स्थिरावले व अमेरिकेतील विषमता दूर केली असे ऐकून आहे.

----

(पुरोगाम्यानच्या मते गरिबांच्या गरीबीची दोन च कारणे असतात - गरिबेतरान्नी केलेले (1) भेदभाव, (2) शोषण. पुरोगाम्यानच्या मते पर्फेक्ट हा शब्द गरिबान्साठीच जन्माला आला होता. जसे पुरोगाम्यानच्या मते "प्रामाणिक व कष्टाळू" हे दोन शब्द शेतकर्यांसाठी जन्माला आलेले आहेत तसे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(पुरोगाम्यानच्या मते गरिबांच्या गरीबीची दोन च कारणे असतात - गरिबेतरान्नी केलेले (1) भेदभाव, (2) शोषण. पुरोगाम्यानच्या मते पर्फेक्ट हा शब्द गरिबान्साठीच जन्माला आला होता. जसे पुरोगाम्यानच्या मते "प्रामाणिक व कष्टाळू" हे दोन शब्द शेतकर्यांसाठी जन्माला आलेले आहेत तसे.)

+11111111

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> HesdMaster Bai ameriketun hi comment karat aahet.............. BLAAH BHLAAH BLAAH>>

चुकीची गल्ली झालीये का मुद्दाम घुसलाय? BAPAT म्हणतायत वेळ, संधी, नियती वगैरे, आणि तुम्ही बोला तिसर्यालाच (Head MASTRAIN BAAI) लावतायत आणि त्यातही तुम्हाला दुजोरा मिळतायत. कठीण आहे सगळं,
.
.
उप्स स्वारी हां दुजोरा तर आंधळ्यासारखा बाय डिफॉल्ट द्यायचा असतो - हे विसरलंएच बगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी आणि विश्व - पृथ्वी सपाट आहे, आणि सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्याविरुद्ध काही बोलणाऱ्यांचा इन्क्विझिशनकडून हालहाल करून छळ व्हायचा आणि त्यांना मृत्यूदंड दिला जायचा. सत्य काय आहे यापेक्षा कुठच्यातरी पोथीत काय म्हटलेलं आहे हे महत्त्वाचं मानणं, आणि त्याविरुद्ध ब्रही काढण्याची मुभा न देणं ही खास प्रतिगामी विचारसरणी झाली. चारशे वर्षांपूर्वी हे सर्रास चालायचं. आकाशात दिसणारे तारे हे सूर्यासारखेच इतर आहेत, खूप लांब असल्यामुळे आपल्याला ते ठिपक्यांसारखे दिसतात असं ज्योर्दानो ब्रुनो मानायचा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असंही तो मानायचा. त्याला मृत्युदंड देण्याची क्षमता धर्मसंस्थेत - प्रतिगामी व्यवस्थेत - होती. गेल्या चारशे वर्षांत पुरोगामी विचारसरणीचा इतका विजय झालेला आहे की पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते हे तर सर्वमान्य ज्ञान झालेलं आहेच. पण त्याहीपलिकडे धर्मसंस्थेला अशा 'पाखंड्यांना' शिक्षा देण्याचा अधिकार राहिलेला नाही. प्रतिगाम्यांचा हा प्रचंड पराभव आहे.>>>>>>>>>
Last year, there was a case in US supreme court. The court ruled against teaching creationist theory and in favor of theory of evolution. The plaintiff sought that creationism "too" should be mentioned in the syllabus. It fiercely argued with argument of irreducible complexity of organism. It also argued whether theory of evolution (all what it claims, not fragments) is a scientific theory at all going by the nature of requirements of scientific facts.
======
The enthusiast court hastily ruled against such mention defying all logic. Bravo ! नवीन पाखंडी आणि नवीन शिकशा , फासा पलटला आहे इतकेच .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरती पुरोगामी शब्दाची काही लोकांनी केलेली व्याख्या पाहून हसावे की रडावे हेच कळेनासे झालेले आहे. बळंच स्वतःला पुरोगामैतर मानून मग दगड्/खडे मारत बसायचे.
___________
अजून एक - राघा हे विज्ञान , उत्क्रान्ती या गोष्टीबद्दल खूप उत्साही आहेत. पण त्यांनी पुरोगामी विचारसरणीत विज्ञान का घुसडलंय ते कळालेले नाहीये. विज्ञानाला अजून देवा मान्य नाही. मग जे लोक देव मानतात ते विज्ञानाची कास धरत नाहीत पण मग ते पुरोगामी नसतात असे काही आहे का????????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरोगामी हा काय हुकमी एक्का आहे! एवढे प्रतिसाद उडाले तरी पुन्हा शतकाकडे वाटचाल चालूच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शंभर झाले. अभिनंदन.
---------
प्रत्येक व्यक्ती ही कम्पल्सरीली पुरोगामीच असते. जुन्या समजुती,आचार विचार, राहाणी स्वत:च्या नकळत टाकून देत असते. (नव्या समजुती विचार वगैरे कुणाच्या तरी प्रयत्नांनी रूढ होऊ पाहात असतात.)
पुढे सरे त्याचा, दुजा शोक वाहे,
अकस्मात तोही पुढे जात आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधूनमधून लांब पल्ल्याचे सिंहावलोकन चांगले असते. त्या दृष्टीने लेख वाचला.

कृतींची जमेल तितकी कार्यक्षम योजना करण्यासाठी कमी कालमर्यादेच्या पल्ल्याचे विश्लेषण करावे, आणि प्रत्येक पीछेहाटीनंतर अवसान गळू नये म्हणून लांब पल्ल्याचे विश्लेषण करावे, ही पद्धत मला योग्य वाटते.

कदाचित वरील काही वाद-प्रतिवादांत हेतू<->कालमर्यादेचा पल्ला यांची बांधणी स्पष्ट नसल्यामुळे विसंवाद होत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने