अविस्मरणीय पळस

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9a/Butea_monosperma2.jpg/800px-Butea_monosperma2.jpg
.
लहानपणी मे च्या सुट्टीत, पेटलेल्या दुपारी
लाल ज्वाळांनी वेढलेला पळस
गॅलरीच्या कठड्यावर रेलून,
अंगावर थंड वार्‍याची झुळुक घेत,अनुभवलेला पळस
आईची मेमधील सुट्टी ,नाचर्‍या आनंदी घरदारात
अनुभवलेली निव्वळ शून्यातीत दुपार
मूड त्या दुपारसारखाच,निरभ्र, निवांत
माठातील वाळ्याचा उन्हाळी सुगंध
माझ्या बालपणाचा साथीदार- भारदस्त पळस
काळाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणणारी दुपार
तुझा जुलमी अंमल माझ्यावर चालणार नाही
मी अक्षय आहे,
गॅलरीत ऊभ्या असलेल्या त्या लहान मुलीच्या
मनात माझे स्थान चिरंतन,
अविनाशी, अढळ आहे,
मरतेवेळीही जे काही अमृतक्षण तिला आठवतील
त्यामध्ये माझा नंबर अव्वल असेल.
_______

http://www.rareflora.com/butea.jpg

___________

लग गयी आग; बन में पलाश, नभ में पलाश, भू पर पलाश।
लो, चली फाग; हो गयी हवा भी रंगभरी छू कर पलाश॥
.
आते यों, आएँगे फिर भी वन में मधुऋतु-पतझड़ कई।
मरकत-प्रवाल की छाया में होगी सब दिन गुंजार नयी॥
- नरेन्द्र शर्मा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
फेकी रसाळ तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओहोहो!! सुंदरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसारा घाट या पळसासाठी योग्य.भरपूर झाडं आहेत.
द्रोण,पत्रावळींसाठी प्लास्टिक आलं ते बरं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म घाटात उन्हाळी ट्रिप केली पाहीजे.
.
हझारो ख्वाहीशे ऐसी ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गगना गंध आला मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी जळत्या ज्वाला .......
http://djsmarathi.com/filedownload/3245/43307/02.%20Gagana%20Gandh%20Aal...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मन१ ह्या आयडीनी द्यायला पाहिजे ना प्रतिसाद मनोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लेम्स ऑफ फॉरेस्ट हे नाव पळस, पांगारा अशा वृक्षांना एकत्रित दिलं जातं. सार्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हां पांगार्‍याचं झाड होतं ते. पळसाचं नव्हे Smile थँक्स गवि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांगारा. शाळेतली चटक्याची बी.

घासून घासून चटका द्यायचा. आठवतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा येस्स्स्स्स्स!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायला गवि, लै भारी आठवण काढून दिलीत राव.
===============
गेले ते दिवस. तुम्ही थोडीच तुमच्या कोपायलटला असा चटका देत असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लुंगीवाल्याला ह्याची आठवण करुन दिली पाहिजे. तो उगाच सिग्रेटी जाळत बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांगारा म्हणजेच गुलमोहर का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

किंबहुना, त्याकाळी व्यक्तिस्वातंत्र्य, पर्यावरण इत्यादी गोष्टींची गळवे समाजात फार दिसत नसत.

हे वाक्य वाचून मन थेट ८० च्याच काळात गेले. तेव्हाचा हिट सिनेमा म्हणजे 'कयामत से कयामत तक.' कयामत से कयामत तक बद्दल शेजारच्या मुली खूप भरभरुन बोलत. आमीर खान तर कसला गोड दिसतो असा त्यांचा दावा असे. मी छायागीतामध्ये क्वचित गाणी पाहत असे. पण आमीर खानने नाही पण त्याच्या गाण्यांनी जबरदस्त भुरळ घातलेली होती.

गझब का है दिन सोचो जरा
ये दीवानापन देखो जरा
हम भी अकेले तुम भी अकेले
मझा आ रहा है कसम से.

आता "दिल अपना और प्रीत पराई", "पाकीजा", "मेरे मेहबुब", शम्मी कपूरची गाणी आईबाबांना का आवडत ते कळतं. प्रत्येक पीढीची अशी गाणी असतात. जी नंतर अतोनात स्मृतीरमणता जागवितात, चुटपुट लावतात. ती गाणी लागली की मला पाऊस पडून गेल्यानंतर मैत्रिणींबरोबर सोसायटीत मारलेल्या चकरा, टेकडीवरील रपेटी आठवतात. पाऊस - हा त्यातील अविभाज्य भाग.
बेला के फूल मला वाटतं रात्री ११:३० पर्यंत लागे. ते संपताना म्हणजे पुढील गाणे हे त्या कार्यक्रमातील शेवटचे गाणे आहे, ऐकताना रोज वाईट वाटे. संध्याकाळी "भारतीय जवान्/सैनिक" यांच्याकरता हां "आप की फर्माईश" .... मस्त होता तो कार्यक्रमही.
अत्रे सभागृह, टिळक स्मारक मंदीर आदि ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लागले की मैत्रिणीबरोबर हमखास जाणे होत असे. अशाच एका प्रदर्शनात शांता शेळक्यांचे पुस्तक विकत घेतलेले होते त्यात त्यांनी लिहीलेली गाणीच होती फक्त.

जाईन विचारीत रानफुला,
भेटेल तिथे का सजण मला

.
गेल्या वेळेस पुण्यात गेले होते तेव्हा सुदैवाने पुस्तक प्रदर्शन भरले होते त्यामुळे परत एकदा स्मृतींना उजळण मिळाली. अगदी जीवलग मैत्रिण पुण्यात भेटली. मला इतकं वेडावणारं, थंड सुगंधाचं अत्तर तिने दिलं. तो सुगंध मैत्रीचा तर होताच होता पण माझ्या/ आमच्या तारुण्याचाही होता. सोळाव्या वर्षाचाही होता. त्या काळात, किती तासन तास आम्ही पाय फुटेल तिथे भटकायचो. कॉलेज सुटलं आणि ऊन नसलं की डेक्कन, शनिवार वाडा, अप्पा बळवंत चौक, सारस बाग, पर्वती आणि एकदा तर कोणत्या तरी सुंदर अनोळखी भागात पोचलो होतो. विठ्ठलाचे की गणपतीचे देऊळ होते.
.
जर कधी हिप्नॉसिस वगैरे गोष्टी ट्राय केल्या तर गेल्या जन्मी बिन्मी जाणार नाही उलट या अशा आठवणी परत जगुन येईन. बादशाही भागात आईचे माहेर होते. त्या भागात आले की त्या काळातही आईला खूप नॉस्टॅल्जिक वाटत असे. ते तिला काय वाटे हे मला इतक्या ऊशीरा, गेल्या पुणे भेटीत, मैत्रिणीला भेटल्यावर कळले. तिच्याबरोबर कितीतरी आठवणी शेअर केलेल्या आहेत. म्हणतात ना, Everybody is 'Normal' till you get to know them तशा तिच्या हटके idiosyncrasies मला माहीत आहेत आणि माझ्या तिला माहीत आहेत.
.
फेसबुकवर पहाते लहानपणीचे सवंगडी आता प्रौढ झाले आहेत आमच्यात काहीच समानता राहीलेली नाही. आणि तरीही एक समानता आहे ती म्हणजे "भूतकाळ." आट्यापाट्या
, लिंगोरचा, लंगडी, डबा ऐसपैस, , टिपी टिपी टिप टॉप, कटिंग द केक, जोडीसाखळी लपंडाव विशेषतः दिवे गेलेले असतानाचा लपंडाव, मग ते राज्य येणे, धोप्पे.... ते सर्व आठवतं. दुपारच्या उन्हात पॅसेजमध्ये खेळलेले कॅरम, पत्ते, सागरगोटे , व्यापार ते तर वेगळेच.
दिवाळीच्या, मे महीन्याच्या सुट्टीत,सायकलवर टांग मारुन कँपातील लायब्ररीत जाणे. त्या लायब्ररीतील पुस्तकांना एक विशिष्ठ सुगंध होता. तेव्हाच्या ऊनाला अनामिक आणि गूढ परंतु अत्यंत जीवघेणी सुंदर अशी झळाळी होती.
मुलगी कानाला हेडफोन लावुन गाणी ऐकत थिरकत असते आणि मला वाटते 'निश्चिंतपणे, ऐक ही गाणी कारण हीच गाणी तुझ्या तरुण रक्तात झिरपणार आहेत आणि पुढे मध्यम वयात तुला परत परत ऐकताना व्याकुळ करणार आहेत.'
.
त्या वयात समस्या नव्हत्या असे नाही. काय समस्या होत्या बर? हां अभ्यासाचा बोज, अपेक्षांचे ओझे, अंतर्मुख व अगदी मिटलेले व्यक्तीमत्व, भविष्यात यशस्वी होऊ की नाही याची काळजी, आईबाबांबरोबरचे तरुण बंडखोर संघर्ष. पण तेवढे सर्व वगळता, लिटरली, व्र्ल्ड वॉज अवर ऑयस्टर. सळसळता उत्साह होता, उत्तम इन्टेन्शन्स होते खरं तर कित्येक बाबतीत आदर्शवादच्च होता. अरे हो! आहाहा स्वातंत्र्य होते, पर्याय निवडीचे, आचार्-विचारांचेदेखील. काळज्या कमी होत्या, स्वप्ने जास्त होती. एखाद्या बीजाच्या पोटी जसे इनफायनाईट पोटेन्शिअल असते तसे पोटेन्शिअल होते. भौतिक दृष्ट्या खूप कमावलय आता, पण जे गमावलय तेही थोडेथोडके नाही. खरं तर फारच गमावलय, तो आदर्शवाद पायमल्ली तुडवलाय. फक्त व्यवहारी झाले असते तरी फारशी हरकत नव्हती,पण अनेक प्रतलांवरती मलीन झालेय. आता कोणी या वाक्याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण मागू नका.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संध्याकाळी "भारतीय जवान्/सैनिक" यांच्याकरता हां "आप की फर्माईश" .... मस्त होता तो कार्यक्रमही.

जयमाला?

एका सैन्याधिकारी मित्राने सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाची वेळ (बहुदा संध्याकाळी ७) ही जवानांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ असते. कँटीनमध्ये हा कार्यक्रम लावतात आणि तो बराच लोकप्रियही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हां जयमाला Smile
How thoughtful of them(विविध भारती) की जेवताना त्या बिचार्‍यांना प्रसन्न वाटवं म्हणून ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोटली आवड्याच प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद अजो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अिवस्मरणीय पळस...

किंबहुना...

सुंदर आहेत आठवणींचा ठेवा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0