कार्ला कट्टा

मी भूतमूल असे काहीतरी लिहितो, बाकिच्यांनी एडिटावे.
-------------------------------------------------------
आम्ही जेव्हा कट्ट्याला पोचलो तेव्हा पोचण्याआधी देखिल जवळजवळ एकत्रच होतो कि काय असे वाटले. मंजे पुण्याहून सगळे एकत्र आलेलो तेव्हा कट्टा अधिकृत वेळेआधी चालू झालेला. मग कुठून तरी अचरट अवतरले व मला कळले कि एक वयस्कर माणूस देखिल अचरट सारखे नामाभिधान घेऊ शकतो. जागेचा चॉइस त्यांचा होता नि (किमान आम्हा दिल्लीकरांच्या दर्जाने) नयनरम्य जागा होती.
===============
चर्चा झालेले विषयः
१. जलनिस्सारण तंत्रे
२. स्वयंप्रकाशित शैवालके
३. Ratio of invitees and attendees in a Kokanastha marriage
४. १९८० चे भीमाशंकर
५. पुरोगामी लोकांनी केलेले अपप्रचार
६. केंद्र सरकारचे कर्ज व्यवस्थापन
७. शासकीय योजनांची नफाशीलता
८. मनोबीय कट कादंबरी
९. संजय सोनवणी यांचा लेख
१०. भारतीय धर्मांतरांचा इतिहास
११. नव्या व जुन्या नोकर्‍यांतील (न आढळलेले?) फरक
१२. Procurement philosophy: by Acharat et all (2017)
१३. ब्राह्मण लोकांचे देशाच्या विविध भागांतील वर्गीकरण
१४. मराठी संस्थळांतील स्पर्धा
१५. संस्थळावरील सदस्यांच्या ओळखीपाळखी
१६. दारुचे व्यवन
१७. (अखंड?) भारत इस्लामिक बनलाय का नाही? का?
१८. नथूराम गोडसे
१९. मराठ्यांचे ऐतिहासिक रेप्यूटेशन
२०. बालाजी तांबे
================
अन्न बर्‍यापैकी लिमिटेड व्हरायटीजचे होते आणि बेचव होते. (तिथेच अचरटांना सांगायची हिंमत झाली नाही.). पार्किंग शांतता, झाडी, इ इ खूप छान होतं. कुटुंबासहित आले (कि आलो) असते तरी चाल्ले असते. मनोबा त्याची ४० कोटीचे हिरे असलेली बॅग घेऊन आलेला म्हणे. बापट सर आणि माझे सूत मस्त जुळले. तरी त्यांनी माझ्यावर प्रतिगामी नसल्याचा लांछनास्पद आरोप केलाच. नशीब म्हणावं. लोणावळ्याला जाउन चिक्की घेऊन कट्टा संपवला. बहुतेक बापटांना आणि मनोबाला झोप येत असताना मी अजून सिलॅबस संपला नाही मोड मधे त्यांना जागे ठेवले.
=============
व्यक्तिगत कामांमुळे, दूर असल्याने इ इ आलो नाही असे लोक म्हणत असले तरी काही अजोसारख्या ड्यांजर मानसापास्नं दूर राहायला पाहिजे असा विचार करत कट्ट्याला बगल देणारे असावेत असा विचार पिंगा घालायचे सोडत नाहेय.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कोकणस्थांची लग्नं, बालाजी तांबे आणि मनोबाकडे असलेली हिऱ्यांची बँग या दोन विषयांवर आणखी गॉसिप हवं. फोटो इथे लावा की!

--

पारंपरिकरीत्या, म्हणजे १९९१च्या नंतरच्या काळात, एमटीडीश्यांबद्दलचं माझं मत असं की त्यांचं ठिकाण अतिशय सोयीचं आणि नयनरम्य ठिकाणी असतं. आतल्या परिसराची काळजीही व्यवस्थित घेतलेली असते. राहण्याची सोय समाधानकारक असते. पण अन्न सर्व भारतीयांना लाज आणेल असं असतं. अजोंशी या बाबतीत मत जुळलं म्हणजे जगबुडी आली म्हणावं का कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, कोकणस्थ असे कोकणस्थ तसे असे माझा भाऊ म्हणत असतो. पण मला काही कधी पुराणांमधला खंग्री को़कणस्थ भेटलाच नाही. आजकालची लग्ने, त्यांचे वेळ, मीन्यू असा विषय निघाला. अचरट सांगत होते बरंच काही काही. ते बापटांना सांगत असल्यामुळे त्यांना ते लक्ष देऊन ऐकावंच लागत होतं. बापटांनी एक कोकणस्थ लग्नाचा किस्सा सांगीतला. सकाळी त्यांचे कोणी शेजारी - मोजून तीन - नवरा, बायको नि मुलगी नि तीन बॅगा घेऊन जाताना दिसले. बापटांनी "कुठे?" म्हणून विचारल्यावर त्या पोरीचे लग्न आहे हे कळले. "बाकीची तयारी?" त्यावरही त्यांनी " पाहुणे शहरातलेच आहेत, येतील आपोआप वेळेवर" इ इ टिपिकल कोकणस्थी उत्तरे मिळाली. तास दोन तासानी पुन्हा नवरा, बायको नि दोन बॅगा घरी येताना दिसले. बापटांनी प्रश्न केला - "काय?". उत्तर - "झालं ना. एक बॅग आणि एक पोरगी कमी! लग्न संपलं"
मग पुन्हा अचरटांचा किस्सा चालू झाला. त्यांचा टोन थोडा टिपिकल आहे नि पकडायला वेळ लागत होता. ऑफिस - मित्र - आमंत्रण - पत्रिका - फोन - १०० -१०० -१०० असं काहीतरी ऐकू आलं. मी चौकशी केली. तर कळलं कि कोण्या कोकणस्थाने शंभर निमंत्रणे दिली. तर मोजून शंभरच लोक लग्नाला हजर होते. आणि तेच्च फक्त बोलावलेले लोक. नो सबस्टिट्यूट. (बहुतेक एखादा जास्त आला असता उपाशी परत पाठवला असता असं त्यांना म्हणायचं असावं.)!! आम्ही लातूरकर चाटच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मळवली एमटिडीसी कट्टा थोडक्यात:-

हो ना हो करत फक्त चारच जण येताहेत हो असं अण्णांचा निरोप आला. म्हटलं घाबरु नका उत्सवमूर्ती येतेय मग तर झालं.
ठरल्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच अरुणजोशी, A.N.Bapat आणि मन तिघे पुणे मुंबई रस्त्याने आले तेव्हा गाडीतच काही चर्चा झालेली.मी मळवली स्टेशनकडून पावणेअकराला आलो आणि लगेच रेस्टारोंमध्ये चहावड्याने सुरुवात केली. चौघे प्रथमच एकमेकांस पाहात होतो. जागा कट्ट्यासाठी चांगली आहे मत पडले.{ वेटरने तीन चारवेळा ओर्डर दिली का? गिळलंत ना? आता लवकर टेबल रिकामे करा वगैरे तंबी देण्या अगोदरच बाहेर पडलो}


बाहेरचा परिसर एमटीडीसीचाच असल्याने लगेच बाहेर पडून ठिकठिकाणी ठेवलेल्या बाकड्यांवर बसत गप्पा सुरू झाल्या.
विषय अर्थातच पुरोगामी प्रतिगामी. नंतर नदीकाठच्या झाडीत पाचोळ्यावर बसून दीड तास किस्से कथन झाले.पुरोगामी चर्चा थोड्या सूक्ष्म पातळीवर (brass tacks level) -कोब्रा/देशस्थ कडे नेताना लातूरकडचे अरुणजोशींचे फ्लेवर मी प्रथमच ऐकत होतो. सदाशिवपेठ संस्कृतीवर बापटअण्णा बोलले. जसे कोलकाताला गेल्याशिवाय बोंगाली विश्व समजणे अवघड आहे तसं पेठेत दोनचार वर्ष राहिल्याशिवाय पेठ कळणार नाही. मनोबा थोडा गप्प होता कारण त्याच्या वयाचे कोणी नव्हते. तरी अण्णांशी त्याचे सूत जमले अन आइटीवाल्यांचे विश्व त्याने उघड केले. माझ्या पिढीला इंटरनेट थोडे वय उलटल्यावर हाताशी लागले हे पदोपदी जाणवते आणि ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये तरुणांना फुकटचे सावधगिरीचे सल्ले देणारे काका ही भुमिका मी करतोय हे वाटत राहाते. कट्ट्याला मोठा ग्रुप जमला असता तर मौन साधता आले असते परंतू मी धरून चारजणच असल्याने मीपण चारदोन वेळा पुरे म्हणतील इतकी लांबड लावली. दीड वाजता परत रेस्तारोंकडे जाऊन पोटोबा केला. तीन वाजता लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याकडे जाऊन चिक्क्या घेऊन शेवट गोड केला.


१ ) {मी} अचरट आणि अरुणजोशी.


२ ) कालच्या मिनीकट्टा मळवली एमटीडीसीची जागा.इंद्रायणी नदी,बंधारा ,मागे दाट झाडीत कार्ला एमटीडीसी .


३) एमटीडिसी रेस्टारोंमध्ये {डावीकडून} श्री अरुणजोशी, मन आणि A.N.Bapat.


४ ) {मी} अचरट आणि अरुणजोशी. नदीकाठच्या झाडीत.


५ ) मन ,{मी}अचरट.


६ ) लाल प्रतिगामी, आडव्या उभ्या पट्ट्यातले स्मार्त (स्मार्ट) पुरोगामी यांचे एकमत झाल्यावर.



--------------------------------------------------------
अरुणजोशींकडून

१ ) इंद्रायणी नदीच्या बंधाय्रावरून पाठमोरे अचरट,मन,A.N.Bapat.


२ ) अचरट


३ ) मनोबा


४ ) डिजाइनर अँगलमधून मनोबा.


५ ) अचरट,मन, बापट. प्रतिगामी चर्चा देवळाच्या पार्श्वभूमीवर.


६ )


७ ) परिसर


८ ) बापट,मन.


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा चौघांचाच हे काही बरे नव्हे. पुढच्या वेळेस शहरातच ठेवा म्हणजे जास्त उपस्थिती राहील. वृत्तांत सपक वाटतोय, थोडा मसाला घालून परत लिहा. चर्चा कुठली झाली यापेक्षा काय झाली हे समजण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार लोक चार तास काय काय बोलले लिहिणे अवघड आहे हो.
================
बाकी कार्ला पुण्याच्या बाहेर आहे असे धड म्हणवत नाही. मनोबा राहतो तिथून ३० मिनिटांवर होते जुन्या हायवेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अचरटकाकांच्या शर्टाचे खिसे एक नंबर आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अचरटकाकांच्या शर्टाचे खिसे एक नंबर आहेत!

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो, मदिरापान करणारे कुणी होते काय, ग्रुपमधे ? असल्यास बेत काय होता - व्हिस्की/बियर्/टेकिला/रम्/ब्रँडी/व्हडका/वाईन .... ??

जेवण बेचव होते हे ऐकून विशाद जाहला. साला आज्काल्चे लोक ब्येकारच बगा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय हो, मंजे होते पण मंगळवारी सगळं वर्ज्य असतं उत्तर भारतात! जेवण काय इतकेही असे नव्हते, पण रिसॉर्ट क्वालिटीचे नवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>>अजो, मदिरापान करणारे कुणी होते काय, ग्रुपमधे ?व्हिस्की/बियर्/टेकिला/रम्/ब्रँडी/व्हडका/वाईन .<<<
हे सर्व आवडीने घेणारा मी बहुधा एकटाच होतो . ( अरुण जोशी पण ह्यातले असावेत असा उगाचच संशय आला) एकटाच असल्याने मी हा प्रस्ताव मांडला नाही .
आपण इथे आलात कि भेटा , मनोबाला काजू बदाम वगैरे चखना खायला लावायचा कार्यक्रम ठरवू शकतो . ( आपल्याशी बऱ्याच , म्हणजे बहुतेक सगळ्याच विषयांवर मतभेद आहेतच , ते ही मद्याबरोबर उरकून घेता येतील !!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटसाहेब, एकतर कट्टा मंगळवारी नव्हता आणि उत्तर भारतात तर नव्हताच नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनोबाचा मागुन फोटो घ्यायचे काही विशेष कारण? Wink हां ती बॅग दाखवायला - अमेरीकन तुरीस्ट का काय्शी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर फोटो मनोबाचा नाही. त्या ४० कोटीच्या हिर्‍याच्या बॅगेचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र क्रमांक तीन मध्ये मी अख्खा मनोबा कॅप्चर केलाय. "मनाशी टाकिले मागे गतीशी तुळना नसे, आणोपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे" अशा हनुमन्तालादेखिल लाजवेल असा विराट मनोबा! पण खूप शांत होता त्यादिवशी म्हणून कॅप्चर झाला असावा. बापटांनी त्याला त्याच्या शक्तीची जाणिव करून देऊन आसमंती भरारी घ्यायला सांगीतले पण एखादी लहानशी ढांग सोडता कोणते अ‍ॅरोबिक्स पाहायला मिळाले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फोटो पहायला फार मजा येते Smile
____-
एकंदर चर्चेचा आवाका विशाल वाटतोय. - स्वयंप्रकाशित शैवले काय न काय न काय.
___
च्यायला दर फोटोत ते बटाटेवडे तस्से टोणगे आणि ढोले च्या ढोले. कोणी खार्ल्लेत तरी का? की आपले फोटोंपुरता मागवलेले Smile
_________
आहा देऊळ किती गोड दिसतय. गेलात की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजोंनी मांडलेल्या मुद्दे क्र. ८ व १७ बद्दल अधिक वाचायला आवडेल, बाकी वर्गीकरण वाचून अजोच्या स्मरणशक्तीला एक दंडवत. (साधासुधा नाही तर थ्री इडियटवाला सलाम)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे मनोबा भीतीदायक अशा शांतपणे आणि एकाग्रतेने चर्चा ऐकतो. म्हणजे कोणत्याही नवबडबडाधिकारप्राप्ताला आपण खरेच फार विद्वान आहोत अस्सेच वाटावे असा माहौल बनवतो. अगदी ज्या विधानाला ऑब्जेक्शन घ्यायला हवं तिथेही आश्चर्यकारकरित्या मान डोलावतो. आम्हा थोरल्या तिघांना तो लहान, गुणी, आज्ञाधारक, ज्ञानपिपासू आहे असे भासवतो. मात्र मधे मधे इकडे तिकडे पाहून त्याला झालेले आश्चर्य लपवताना मी पाहिले आहे. शिवाय तो सगळे कट्टे श्रद्धेने करतो (प्रत्येकाच्या श्राद्धाला जाणारे लोक असतात तसे). आणि या सगळ्याचं काहीही स्पष्टीकरण त्याच्याकडे नाही. मनोबीय निरीक्षणबुद्धीचं भय मला अगोदरपासूनच आहे. मंजे मुलगा खत्तरनाक हुश्शार आहे नि बहुतेक लपून "मला भेटलेल्या मूर्खांच्या चर्चा" अशी कादंबरी भेजा फ्राय लाइनवर लिहित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खी खी खी खी.

ते तर आहेच, पण या केसमध्ये त्याने काही मत मांडले की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साळसूद नकार दिला. पण मला विश्वास नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवबडबडाधिकारप्राप्त!
खल्लास शब्द निर्मिति! प्रणाम !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हा दोष जुन्या पिढीचा आहे. ते अगदी कमी बोलले तरी वळण,सूर जुनाटच असतात. अर्थात नवतरुण बाचकूनच असतात. ऐसिकर चालवून घेतात या सबबीखाली मी वेळेला भोकं पाडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी जाउ दे , अरुण जोशीन् वर मी प्रतिगामि नसल्याचा आरोप केला नाही. माझ्या मते ते कट्टर पुरोगामी आहेत. प्रतिगाम्याना गाफिल आणि पुरोगाम्याना एलर्ट रहावे म्हणुन ते जे काही लिहीतात ते लिहीतात. ( अजुन जास्त नन्तर रविवारी लिहिन )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अरुण जोशीन् वर मी प्रतिगामि नसल्याचा आरोप केला नाही. माझ्या मते ते कट्टर पुरोगामी आहेत. प्रतिगाम्याना गाफिल आणि पुरोगाम्याना एलर्ट रहावे म्हणुन ते जे काही लिहीतात ते लिहीतात. <<

अजो आणि बॅट्या पुरेपूर पुरोगामी आहेत हे माझं जुनंच मत आहे. बापटांनी अनुमोदन दिल्यामुळे खात्री पटली. बापट आता पुढच्या कट्ट्यात बॅट्याला भेटा आणि मग तुमचं मत ऐकवा.

(कट्टा पुण्यात केलात तर थोडा वेळ येऊन जाईन हे वचन मी बापटांना दिलं होतं. अजोंनी आपल्या उपस्थितीमुळे लोक गळल्याचा माज करू नये!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजोंनी आपल्या उपस्थितीमुळे लोक गळल्याचा माज करू नये!

मी पुरोगामी आहे असा (सनातन) गैरसमज असल्यामुळे तुमचं तसं नसेल हो, पण देव जाणो कशामुळे मला वाटत राहतं कि खूप ऐसीकर मला "अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तोटे" या सदराखाली गिनत असावेत.
===========
बाय द वे, तुम्हाला गैरसमज असल्याचा समज अगोदरच नै का कन्व्हे करायचा राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या मते कट्ट्टयाला असलेल्या लोकांची आदर्श संख्या सहा ते आठ. पण बहुतेक वेळा खूप लोकांना एकदम भेटता यावं म्हणून मोठ्ठा ग्रुप बरा पडतो. पण मग लग्नात समोर येणाऱ्यांना हसून नमस्कार करायचा आणि दोन शब्द बोलायचे इतकंच करणं कधीकधी जमतं. कमी लोकं असले की एका टेबलावर बसून सगळ्यांना एका ग्रुपमध्ये बोलता येतं. त्यामुळे चार लोक थोडे कमीच असले तरी कट्टा इंटिमेट झाला असणार याबद्दल खात्री आहे.

फोटोपैकी अचरट यांचा बाकावर बसून हात विस्तारून 'हे, एवढं मोठं...' असं काहीतरी सांगतानाचा फोटो भारी. अरुणजोशींचे फोटो सगळे फारच विचारमग्न आलेले आहेत. बापटअण्णा सतत काहीतरी मांडवली करण्याच्या पोझमध्ये. पण सगळ्यात आवडला म्हणजे मनोबाचा पारावर उभा राहिलेला फोटो. 'ती तिकडची पारंबी पकडून जर जोराचा झोक घेतला तर पलिकडच्या इलेक्ट्रिकच्या खांबाला हात लावता येईल का? लावल्यास किती उंचावर लागेल?' अशी काहीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ती तिकडची पारंबी पकडून जर जोराचा झोक घेतला तर पलिकडच्या इलेक्ट्रिकच्या खांबाला हात लावता येईल का? लावल्यास किती उंचावर लागेल?' अशी काहीतरी कॅल्क्युलेशन्स चालू असावीत.

स्वतःबद्दल सर्वात कमी माहिती असलेला प्राणी म्हणजे मनोबा. त्याच्याबाबत 'असा विचार का केलास रे मनोबा वा असं का केलंस रे मनोबा' या प्रश्नाचं उत्तर 'मैत नै' असं असण्याची शक्यता ५१% असते. शिवाय असं मैत नसणं थोडं हटके आहे याची जाणिव त्याला अद्यापि नाही.

अरुणजोशींचे फोटो सगळे फारच विचारमग्न आलेले आहेत.

वैचारिक कमतरता लूक्सनि भरून काढायचा भाबडा प्रयत्न.

बापटअण्णा सतत काहीतरी मांडवली करण्याच्या पोझमध्ये.

नै हो. ते मात्र सर्वात कूल होते. पण ते पारावर वा बाकावर वा पाचोळ्यावर बसण्यापूर्वी बराच अनालिसिस करतात म्हणून असे वाटले असावे. (ह. घ्या)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्वतःबद्दल सर्वात कमी माहिती असलेला प्राणी म्हणजे मनोबा. त्याच्याबाबत 'असा विचार का केलास रे मनोबा वा असं का केलंस रे मनोबा' या प्रश्नाचं उत्तर 'मैत नै' असं असण्याची शक्यता ५१% असते.

असहमती व्यक्त करतो, बाकी प्रत्यक्श भेटीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हायला भारी झाला कट्टा.
मनोबा बेसिकली भक्तीभावाने युक्त असा श्रोता दिसतोय. त्याचा चेहरा फोटोजेनिक आहे.
बापटाण्णा त्या पोलीस कमिशनरचे काम करणार्‍या मराठी अ‍ॅक्टरासारखे दिसताहेत. (अ‍ॅक्टराचे नाव आठवेना)
जोशीसाहेब कुठल्याही अँगलने जोशी वाटत नाहीत. यादव अथवा झा असावेत.
अच्चुकाका बघून माहीत झालेले आहेत. ते तसेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोशीसाहेब कुठल्याही अँगलने जोशी वाटत नाहीत. यादव अथवा झा असावेत.

म्हणून मी नेहमी आय कार्ड घेऊन फिरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्यक्तिगत कामांमुळे, दूर असल्याने इ इ आलो नाही असे लोक म्हणत असले तरी काही अजोसारख्या ड्यांजर मानसापास्नं दूर राहायला पाहिजे असा विचार करत कट्ट्याला बगल देणारे असावेत असा विचार पिंगा घालायचे सोडत नाहेय.

आपल्या असण्यानसण्याने लोकांचे निर्णय बदलु शकतात इतके आपण प्पावरफुल आहोत असा आत्मविश्वास कुठून येतो हो अजो तुमच्यात? Wink (ह. घ्यालच)

बाकी, कट्टा पुण्यातच ठेवला असतात तरी येण्याचे जमले नसते. तेव्हा माझे सोडा - मात्र सगळेच पुण्यातले असूनही मुंबई-पुण्याच्या मध्यावर कट्टा घेण्याने संख्या थोडी तरी नक्की घटली असावी असा माझा कयास!

मात्र, जागा छान वाटतेय. कट्ट्याच्या गप्पांच्या विषयाच्या यादीला अर्थ नसतो. मजा तपशिलात असते आणि ती फक्त उपस्थितांनाच मिळते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या असण्यानसण्याने लोकांचे निर्णय बदलु शकतात इतके आपण प्पावरफुल आहोत असा आत्मविश्वास कुठून येतो हो अजो तुमच्यात?

प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सोयीस्कर असा अर्थ काढावा असे माझे सूत्र आहे. आणि कारण असो नैतर नसो, गावाकडच्या गड्याचा आत्मविश्वास लै भारी असतो; तुम्हाला अनुभव नाही म्हणून काय झालं? अहो मी काही मॉनिटरमधून अवतरत नाही, तरी लोक धाग्यांवर मला प्रतिसाद द्यायची किटकिट नको म्हणतात. मग असा आमने सामने अजोला झेलणे मंजे विचार करायला लावणारीच गोष्ट आहे.
====================
बाकी कट्टा घेण्यास सुयोग्य जागा असा देखिल एक विषय झालेला. त्यात (मला माहित नसलेले) कोणते तरी पॅराडाइज म्हणून गलबल्याचे हॉटेल आहे, तसल्या जागी न ठेवता शहरांपासून दूर नयनरम्य जागी ठेवावा असे एकमत झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मागे न आठवलेले पण चर्चिले गेलेले विषयः
१. घार आणि (पौराणिक?) गरुड यांचेतील फरक
२. आर एस एस प्रचारकाच्या कन्येचे परधर्मीयाशी लग्न
३. अजोची कोकणस्थ या शब्दाशी ओळख कशी झाली
४. तंत्रज्ञान आणि अचरट यांची रिलेटिव वेलॉसिटी
५. मराठी संस्थळावर आपण कसे धडकलो, कधी?
६. मराठी आंतरजालावरील प्रसिद्ध हेवे दावे
७. अनु राव स्त्री आहेत काय? (त्यांच्या ड्यू आयडी असल्याचा नसल्याचा शोध, बाकी कै नाही.)
---------
मी अजून काही फोटो फेसबूकवर टाकलेत. सदस्यांना फोटो पाहायला आवडते असे दिसते. अचरटांनी ते इकडे आणावेत ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तंत्रज्ञान आणि अचरट यांची रिलेटिव वेलॉसिटी

हाहाहा.
बाकी सर्वजणांचे तोंडवळे, दिसणे माहीत होते एक्सेप्ट अचरटजी. त्यांना पहील्यांदाच पाहीले. सर्वच फोटो मस्त आले आहेत. असे कट्टे अजुन होऊ द्यात्."परस्परा जडो मैत्र जीवांचे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो अजून आहेत का? बघून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी फोटो अरुणजोशींकडून

८ )


९ )


१० )


११ )


१२ )


१३ )


१४ )


१५ )


१६ )


१७ )


१८ )


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४-१५-१६-१७ - फोटो जानलेवा आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबाला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच जाड झालेलं बघतोय. कल्जी घे रे बाबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबा जीवनासोबतच बहुधा जेवणाशीही एकनिष्ठ रहात असावा. असे असूनही फिट आहे. नायतर आम्ही, पोटाशीच एकनिष्ठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

are तो हेल्दी खातो. त्याचे "माझे खाद्यजीवन" वाचलेस की नाही? वरण च चाप, शेंगदाणेच खा कुठे कोथिंबीरच खा, डाळंच (ते चिवड्यात घालतात दे डाळं) घे वाटीभर. त्यामुळॅ तो फिट रहाणारच ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाब्बौ! हेsss एवढय सगळ्यांचं लक्षय माझ्याकडे ?! आभार दोस्तहो.
.
.
मस्त गेला वेळ कट्ट्यात. फुरसतीत अधिक टंकेन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबाच्या वयाचे { आणि कट्ट्याला येणारे} ऐसीवर कोणी नसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! झकास वृत्तांत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक छोटी तांत्रिक करेक्शन अजो : "स्वयंप्रकाशित शैवालके"नाही, स्वयंप्रकाशी बुरशी ( शैवाले म्हणजे algae , आपण algae बद्दल बोललो नाही . Fungi म्हणजे बुरशी . ) तर असो.
अवांतर : आपली स्मरणशक्ती व लिस्टिंग कॅपॅबिलिटी भारी आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टा रेंगाळत चालू ठेवायला ही जागा योग्य आहे. दरवर्षी संक्रांत आणि २६ जानेवारी यामधला रविवार इथे वार्षिक कट्टा फिक्स करून टाका. बाकी आणखी कट्टे दुसरीकडे कराच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबौ! चित्रे खल्लास! आणि एकाच मीटिंग मध्ये अख्ख्या महाराष्ट्राचे विचारविश्व बदलले असेही दिसत आहे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

छान झालाय हा कट्टा.

अजोंना पाहण्याची इच्छा पुरी झाली.

लोणावळ्यात बंगला(ले) घेऊन साग्रसंगीत ओव्हरनाईट कट्टा अरेंज करायचा असल्यास सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदीबी. (मंजे मी केव्हाही तयार आहे.)
======
ओवरनाईट कट्टा मंजे फन अल्लिमिटेड असेल. इतक्या प्रगत विचारांचे लोक मराठी आंतरजालावर नसतील म्हणून अशी कल्पना कधी सुचली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी बी , कधीबी !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओवरनाईट कट्टा मंजे फन अल्लिमिटेड असेल. इतक्या प्रगत विचारांचे लोक मराठी आंतरजालावर नसतील म्हणून अशी कल्पना कधी सुचली नाही.

कॉय कॉय मज्जा अपेक्षित आहे तुम्हाला अजो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोणावळ्यात बंगला(ले) घेऊन साग्रसंगीत ओव्हरनाईट कट्टा अरेंज करायचा असल्यास सांगा.

हा फक्त पुरुषांसाठी असावा.

यात (बहुतांश) स्त्रियांना मज्जाव असावा.

( मज्जाव का असावा त्याची कारणे स्त्रियांना सांगणे हे पुरुषांसाठी बंधनकारक नसावे. "कारणे सांगणे बंधनकारक नाही" ह्याचे कारणही सांगणे पुरुषांसाठी बंधनकारक नसावे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारणे सांगणे बंधनकारक नाही" ह्याचे कारणही सांगणे पुरुषांसाठी बंधनकारक नसावे. पण का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा फक्त पुरुषांसाठी असावा.

(प्यायल्यानंतरही स्ट्रेट) पुरुष ओव्हरनाईट/एकांतात/दूर जाऊन जे जे करतात तिथे इतर समानशील स्त्रिया(लग्नाच्या/बिनलग्नाच्या/किंवा कशाही समानशील शब्द महत्त्वाचा) असल्याने नक्की काय फरक पडतो?
का गब्बरशी समानशील बाई जन्माला यायचीये असे काही आहे? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला फारसं काही समजलं नाही. पण न समजल्याने नक्की काय फरक पडतो?

(बाकी समान ह्या शब्दाची मला अ‍ॅलर्जी असल्याने समानशील म्हंजे काय ते जाणून घेण्याप्रति माझी अनुत्सुकता जास्तच आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"समानशीलेषु व्यसने च कट्टा" यातील 'समानशीला'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा बसू तिथे बोलू होता.ऐनवेळी चारपाचजण गळले तरी बजेट कोलमडत नाही. झाडाखाली बसून बोलण्यात कसलंच दडपण नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0