गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात टेकवत विचारलं.

“अम्…टेडी बीअर?”

“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”

”Management Ethics चं textbook?”

“असं abstract गिफ्ट देतं का कुणी बावळट.
Think something romatic .”

“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली. ती अशी हसली की जाम सेक्सी दिसायची.

“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”

“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलस.”

त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.

“ए ए थांब थांब इअररिंग्स आणल्या का?” ती उताविळपणे बोलली.

काहीच न बोलता त्याने मूठ उघडली, त्याच्या तळहातावरचा तो जीन्नस पाहताच तीचे डोळे आनंदाने आणि आश्चर्याने विस्फारल्या गेले.

“ सुरा???”

“यपSSS बेब”

“आय कांट बिलिव्ह धिस. तुला कसं मिळालं पण? पंचवीस वर्षाच्या खालच्यांना मिळत नाही ना.”

“माझा एक मित्र आहे निशांत फार्मामध्ये, त्याच्याकडून मिळवली एक बॉटल…फक्त तुझ्यासाठी.”

“ओह…थँक यू व्हेरी मच…आय लव्ह यू शोन्या…”असं म्हणून ती सरळ त्याच्या गळ्यात पडली

“वेट वेट…आधी हे औषध पी, मग सुरू करू. कारण आपण एकदा बॅटिंग सुरू केली की सेंचुरी मारल्याशिवाय थांबत नाही.”

“ हो का, आज बघतेच…दे ती बॉटल इकडे.” असं बोलून तिने त्याच्या हातातली बॉटल हिसकाऊन घेतली. अत्तराच्या कूपीसारख्या दिसणाऱ्या त्या बॉटलमध्ये तपकिरी रंगाचं द्रावण होतं. जणूकाही स्वयंप्रकाशित असावं अशी आभा होती त्याची. क्षणाचाही विलंब न करता तिने झाकण उघडलं अन एका घोटात द्रावण घशाखाली रिचवलं. घसा जाळंत ते पोटात शिरलं. पण याची तिला तमा नव्हती. तिने बॉटल फेकून दिली अन मधाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तिची ती आव्हान देणारी नजर अन शरीराचे सगळे चढउतार स्पष्टपणे अधीरेखीत करणारे फिट्ट कपडे…
त्याला पेटायला अजून काय हवं होतं. तिच्या नजरेत रुतवलेली नजर अजिबात न हटवता त्याने तिला जवळ खेचली. ओठांमध्ये ओठ मिसळले, अंतराच्या मर्यादा संपल्या. तो एखाद्या झंझावाताप्रमाणे तिला भिडला.

“तू रेनकोट आणलायस ना सोबत?” कसेबसे ओठ विलग करंत तिने विचारलं.

“घरूनच घालून आलोय.”

“कुत्र्याSSS “ असं म्हणून ती दुप्पट जोमाने त्याला बिलगली. तिने डोळे मिटले अन त्याच्या अधीन झाली. त्याने अलगद तिला उचललं आणि बेडरुम मध्ये घेऊन गेला.
त्यांच्याजवळ फक्त अर्धा तास होता
* * *

दोन वर्षांपूर्वी…
एव्हरेस्ट सर करायचं त्याचं स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात आलं होतं. पन्नाशी गाठलेल्या बिरजूला अजूनही विश्वास बसत नव्हता. पंधरा वर्ष, तब्बल पंधरा वर्ष प्रयत्न केल्यानंतर तो इथे पोहोचला होता. दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले असूनही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं होतं.
पण आजचा दिवस ऐतिहासिक ठरण्याचं अजून एक कारण म्हणजे………
आज सुराच्या मानवी टेस्टिंगचा दिवस होता !!

बिरजूने ट्रेकिंग बॅगमध्ये हात घालून सुराची बॉटल बाहेर काढली. अन ते अदभुत रसायन तो प्यायला. घसा जाळत गेलेली ती चव यशाच्या मस्तीत त्याला जाणवली नाही.
तिसाव्या मिनिटाला तो एव्हरेस्टवर होता. निशांत फर्माचं हेलिकॉप्टर, एका शास्त्रज्ञाला अन दोन टी.व्ही. रिपोर्टसना घेऊन आकाशात घिरट्या घालत होतं. गेली पंधरा वर्ष एका क्षणात त्याच्या नजरेसमोरुन सरकली. असंख्य प्रयत्न, हालअपेष्टा, समाजाचा उपहास, उपमर्द सोसत त्याने आज हा टप्पा गाठला होता. भारताच्या दिशेने तोंड करून त्याने एक कडक सॅलूट ठोकला. त्याचं ह्रृदय अतीव आनंद अन अभिमानाने भरून आलं अन… त्याक्षणी तो त्याच्या भावनांनी कमाल पातळी ओलांडली. तो पाषाणवत स्थिर झाला…एखाद्या जादूगाराने जणू काही त्याला मूर्ती बनवलंय.

पुढचे दहा मिनीटं तो ही परमसुखाची अनुभूती घेणार होता.
थोडक्यात सुरा रसायनाचा प्रयोग यशस्वी झाला होता.

“ मानवी आयुष्य हे खूप धकाधकीचं, अन अतीव दुःख, कष्ट अन त्राग्याने भरलेलं आहे. वाळवंटात पाणी मिळावं तसे सुखाचे मोजके क्षण आपल्या आयुष्यात येतात. पण तेसूद्धा क्षणभंगुर असतं. तुमच्या आयुष्यातले हे सुखाचे क्षण दीर्घकाळ टिकावे अन आयुष्य अधिक अर्थमय बनावं म्हणून आम्ही एक अदभुत औषध तयार केलंय- ज्याचं नाव आहे सुरा.” निशांत फार्माचा CEO Product launching च्या वेळी बोलला होता.
“आपल्या आयुष्यात आनंदाची घटना घडणार आहे असं लक्षात येताच हे औषध प्यायचं, पुढच्या तीस ते चाळीस मिनिटांत भावनांच्या पातळीने उच्चतम पातळी गाठली की तुम्ही निश्चल व्हाल आणि तो अत्युच्च भावनांचा आवेग पुढची तब्बल सहाशे सेकंद अनुभवू शकाल !!”
अर्थातच या product ने अख्खं जग दणाणून सोडलं.
प्रचंड किंमत अन भरपूर Permissions घ्याव्या लागत असूनही सुराची डिमांड कमी झाली नाही. त्यातच ‘या औषधाचा पंचविशीच्या आतल्या तरूणांकडून गैरवापर होऊ शकतो’ असा जावईशोध सरकारने लावला अन या वयोगटातील तरुणांना सुरा मिळणं बंद झालं.

* * *

तो आणि ती, तिच्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये होते. दोघांचीही अनाव्रूत्त उष्ण शरीरं ऐहिक बंधनं विसरून एकमेकांत मिसळण्याचा यत्न करत होती. शरीरं घुसळून निघत होती, चुंबनांचा पाऊस पडत होता. भावनांचा आवेग एवढा जबरदस्त होता की पहिल्या दहा मिनिटांतच ती शिखरावर पोहोचली असती, पण दोनदा महत्प्रयासाणे ती परत आली… तीस मिनिटांच्या आधी तिला तसं होऊ द्यायच नव्हतं. क्षणभर टिकणारा तो परमोच्च आनंद तिला तब्बल दहा मिनीट अनुभवायचा होता…स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का?

वेळ वेगात पुढे सरकू लागला…हा हा म्हणता वीस मिनीट झाली, वीसची पंचवीस झाली…शिखर नजरेच्या टप्प्यात आलं; आता तो धावू लागला, धावण्याचा वेग त्याने वाढवला आणि पुढच्या दोनच मिनिटांत तो अत्त्युच्च बिंदुवर जाउन पोहोचला. तिला गच्च मिठी मारून तो तिच्या अंगावर कोसळला. दोन क्षण विश्रांती घेऊन तो चक्क उठला. त्याने फरशीवर फेकलेले कपड़े गोळा करून चढवायला सुरुवात केली.

“ हे काय करतोयस तू?” तिच्या चेहऱ्यावर मह्दाश्चर्य होतं.

“कपड़े घालतोय.”

“का?”

“कारण माझं झालंय. “

“What the fuck…मी इथे उपाशी आहे आणि तू उठून चाललास. Selfish moron.”

पण तो काहीच बोलला नाही. पँटचं झिपर ओढून त्याने कमरेभोवती बेल्ट आवळला.
ती उठून त्याच्या जवळ आली; त्याचा हात तिने हातात पकडला अन त्याला जोरात बेडवर खेचलं.

“तुझी भूक मिटवायला मी तुझा बांधील नाही.” तिचा हात झिडकारत तो म्हणाला.

“अचानक काय झालंय तुला?”

“अचानक नाही. ज्या दिवशी तू मला त्या हरामी नरेशबरोबर झोपलेली दिसली तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझा बदला घ्यायचा. मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं अन बदल्यात तू मला काय दिलंस?? विश्वासघात??? आज तुला गरज आहे अन माझ्याकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणून तुला मी आठवलो..पण माझी खोटी बदनामी करून तू जेलमध्ये जाण्याची वेळ माझ्यावर आणली होतीस हे मी कसं विसरू.”

एरवी या विषयावर ती खूप भांडली असती, आकांडतांडव करून त्याला फ्लॅटमधून हाकलून लावलं असतं; पण आज ती संयमानं घेणार होती. कारण तिला कसंही करून तो परमोच्च क्षण गाठायचा होता, तब्बल दहा मिनीटं टिकणारा तो क्षण. तिला पंचविशी ओलांडायला जवळपास तीन वर्ष बाकी होते अन हा अनुभव घ्यायला ती एक हजार बावण्ण दिवस थांबू शकत नव्हती.

“मी शॉरी म्हटलंय ना तुला पिलू. “ तिने आवाजात जास्तीत जास्त मृदूता आणली, “ आता शहाण्या बाळासारखं ये बरं माझ्याजवळ.” असं म्हणून तिने आपल्या नाजूक हातांचा पाश त्याच्या कमरेभोवती गुंडाळला.

पुरूषी भावना चेतवणारे विविध पाश तिने फेकायला सुरुवात केली. पुरूषच तो…काही क्षणांपूर्वीचा त्याचा आभिनिवेश हळूहळू गळून पडू लागला.तो परत एकदा तिच्यात मिसळायला तयार झाला. तीस मिनीटं उलटून गेल्यामुळे तिला आता वाहून जाण्याची भीती नव्हती; किंबहुना तिला तेच हवं होतं. हळूहळू वादळ जोर धरू लागलं,त्याच्या आवेगाच्या लाटा तिच्या किनाऱ्यावर आदळू लागल्या. ती आवेगामधे खूप दूरवर वाहत गेली. आत्मग्लानीच्या त्या उन्मयी अवस्थेत पोहोचायला फक्त काही क्षण उरले अन अचानक एखाद्या झुरळाला झटकावं तसा तिचा देह त्याने स्वतःपासून दूर ढकलला.

“ Go and fuck yourself bitch” असं बोलून तो तडक बेडरुमबाहेर पडला.

ती भयंकर चवताळली. अंगावर चादरही न ओढून घेता ती त्याच्या मागे धावत सुटली. तो एव्हाना फ्लॅटच्या दरवाजापर्यंत पोहोचला होता. तिची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही जास्त अवघड होती. अतृप्त कामेच्छा, भयंकर अपमान, अपेक्षाभंग, क्रोध अशा संमिश्र भावनांचा प्रचंड आगडोंब उसळला होता. तिने टेबलावर ठेवलेली काचेची फुलदाणी उचलून पुर्ण ताकदीने त्याच्या दिशेने भिरकावली.

पण…त्याच, अगदी त्याच क्षणी तिच्या भावनांनी कमाल मर्यादा ओलांडली अन ती एखाद्या नग्न रोमन शिल्पाप्रमाणे आहे त्या स्थितीत थिजून गेली.

“Happy Valentines day जानू.” एवढंच तो बोलला अन दरवाजाबाहेर निघून गेला
-----------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म्हणजे तो अपमान पुढची ६०० सेकंद अनुभवत रहाणार ती? SadSad
___________
कथेतील कल्पनेची भरारी फार आवडली. एकदम सायफाय. आवडली. आणि कथेचा घाटही म्हणजे मधेच वर्तमान तर मधेच भूतकाळ (बिरजु) आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगी घाण अन चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा,
पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा

गोष्ट छान झाली आहे. स्त्रीच्याही आक्रमक कामेच्छेचे उत्तम दर्शन होत आहे.
"सुरा" या जातीचे उत्पादन (पुरुषांसाठी) आजच उपलब्ध आहे. टाडालाफिल (सियालीस) या औषधाचे नॅनोमीटर साईझचे कण वापरून बनविलेले ३० मिलीचे द्रव औषध अमेरिकेत काळ्या बाजारात मिळते (किम्मत ३० डोलर्स).याने टाडालाफिल च्या गोळीने ३ तासाचा होणारा विलंब दोन तासांच्या आसपास येतो .
Tadalafil 30mg/ml (30ml) from Rasa Research .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

स्त्री आक्रमक झाली, तिनं परंपरा मोडली की ती दुष्ट असते आणि तिला हवं ते काही मिळत नाही. पारंपरिक कथासूत्र, जरा नवीन मांडणी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"सुरा" या जातीचे उत्पादन (पुरुषांसाठी) आजच उपलब्ध आहे. टाडालाफिल (सियालीस) या औषधाचे नॅनोमीटर साईझचे कण वापरून बनविलेले ३० मिलीचे द्रव औषध अमेरिकेत काळ्या बाजारात मिळते (किम्मत ३० डोलर्स).याने टाडालाफिल च्या गोळीने ३ तासाचा होणारा विलंब दोन तासांच्या आसपास येतो .
Tadalafil 30mg/ml (30ml) from Rasa Research .

हे काय प्रकरण आहे?

हापिसातून गुगलत नाही नाहीतर आयटी सिक्युरिटीवाला भेटायला यायचा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथा आवडल्याबद्दल सर्वांचे आभार.कथा लिहताना मला प्रामुख्याने दोन गोष्टी मांडायच्या होत्या-

१. कुठलंही तंत्रज्ञान किंवा नवीन शोध जर अविचाराने वापरला गेला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात

२.आपल्या देशात कितीही नियम केले तरी त्याला भोकं पाडणारे निर्माण होणारच

कथेत जे घडलं त्याला माझं समर्थन आहे असं असं मी म्हणत नाहीये. Sex ची गरज दोघांनाही सारखीच असते, दोघेही वेळप्रसंगी आक्रमक होऊ शकतात. वरील कथेच्या संदर्भात परंपरा हा शब्द वापरणे चुक होईल ही फक्त दोन व्यक्तींमधील प्रेम, breakup वगैरेवर आधारित गोष्ट आहे.आजकाल तरुण पिढीने स्वतःपुरती आपली मूल्ये बनवलेली आहेत. तिथे सामाजिक मूल्यांचा विषय मध्ये येत नाही.

अर्थात कुणीही आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत झोपलेल पाहिलं (or vice versa) तर राग येणं साहजिकच आहे. कदाचित कथानायकाची बदला घेण्याची पद्धत चुकीची असेल.

थोडं वेगळ्या track वर जातो-

मुलगीपण sex च्या बाबतीत आग्रही असू शकते हे आपलं समाजमन accept करत नाही.
मी बऱ्याच मुलांना शारीरिक भूक भागवण्यासाठी वेश्यालयांकडे धाव घेतांना (अ) आणि हौसमौज करण्यासाठी पैसे पुरत नाहीत म्हणून काही मुली call girl बनलेल्या (ब) पाहिलेल्या आहेत.

लेखक हा जात, धर्म,प्रादेशिकता, लिंग वगैरेच्या पलीकडे पाहणारा असावा असं म्हणतात. मग
अ प्रकारच्या मुलांवर लिहलेली कथा लिहल्यास ती चालून जाईल पण ब प्रकारच्या मुलींवर लिहलेली कथा आपल्या वाचकांना रूचेल का?

असं काही लिहल्यास लेखकाला लय धुतील लोक Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

भारी कल्पना आहे! आवडली कथा. लिहीत रहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद बाळासाहेब

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

(विनोद आहे. आधीच बजावून ठेवतोय.)
..........
बोले तो, प्रस्तुत कथेत परमोच्च क्षण गाठल्यावर दहा मिनिटांकरिता जित्याजागत्या (नग्न) माणसांचे पुतळे बनतात. तर आमच्या कहाणीत परमोच्च क्षण गाठण्याकरिता (नग्न) पुतळ्यांना तासाभरापुरते जिवंत केले जाते.
..........

मध्ययुगीन युरोपातल्या कोठल्याश्या शहरातल्या कोण्या एका चौकात कोणे एके काळी एकमेकांकडे तोंड करून उभारलेले दोन नग्न पुतळे असतात. एक एका अत्यंत देखण्या, उमद्या तरूणाचा नग्न पुतळा. अगदी ग्रीक गॉडच जणू. तर दुसरा एका रंभा, मेनका, उर्वशी वगैरेंना लाजवेल, अशा लावण्यवतीचा नग्न पुतळा. दोन्ही पुतळे शतकानुशतके ऊनवारापाऊसबर्फाला तोंड देत, जणू एकमेकांच्या नजरेत नजर मिसळून एकमेकांकडे नुसते बघऽऽऽत उभे असतात.

एकदा काय होते, त्या शहरातून एक पंख लावलेला देवदूत चाललेला असतो, तो नेमका त्या चौकात टपकतो. ते पुतळे पाहतो नि तरस खातो. त्याचे हृदय द्रवते. म्हणतो, "What a waste!" मग मनाशी काही निर्धार करून पुतळ्यांपाशी जातो, नि पुतळ्यांस उद्देशून म्हणतो, "वत्सांनो, आज मी तुम्हाला एक वर देतो आहे. पुढल्या तासाभराकरिता मी तुम्हाला जिवंत करतो. तेवढ्या तासाभरात तुमच्या अतृप्त इच्छा, मन की मुरादें वगैरे ज्या काही असतील, त्या यथेच्छ पुऱ्या करून घ्या. पण लक्षात ठेवा! हे फक्त तासाभराकरिताच आहे. तास संपला, की तुम्ही दोघेही पुन्हा निर्जीव पुतळे होऊन आपापल्या पदस्थलांवर चढाल. सॉरी, मला तुम्ही कितीही आवडलात, तरी माझ्या पॉवरच्या मर्यादेत तुमच्यासाठी मी एवढेच करू शकतो. तेव्हा मिळालेली संधी जपून, विचारपूर्वक वापरा. आणि आता जा, Have fun! Your time starts now." असे म्हणून पूफ! देवदूत अंतर्धान पावतो.

इथे हे दोघे तासापुरते का होईना, पण जिवंत होतात. तसा तो उमदा नग्नतरुण त्या नग्न लावण्यवतीकडे जाऊन तीस म्हणतो...

"हे पाहा, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, त्यामुळे Let's take turns. पहिला अर्धा तास तू त्या सगळ्या कबूतरांना पकडून जमिनीवर दाबून धर, नि मी त्यांच्यावर हगतो. नि त्यानंतर मग उरलेला अर्धा तास we'll switch roles. Fair deal? लेकिन आज बदला ले के ही रहेंगे, सदियों बाद मौका जो मिला है|"

..........
व्हॉटेव्हर द्याट मे मीन. पण अशी उपमा द्यायची परंपरा असते. मराठीत याकरिता बहुधा 'साक्षात मदनाचा पुतळा' की कायशीशी उपमा आहे. पण नग्न पुतळ्याचा पुतळा कसा असू शकेल? म्हणून ती उपमा न वापरता विलायती उपमा वापरली, इतकेच. असो.

या देशी उपमा ठीक आहेत, adequate आहेत.

मध्ययुगीन युरोपात पंख लावलेल्या देवदूतांचा तुटवडा नव्हता म्हणतात. अगदी पैशाला पासरी... चुकलो, अ डाइम अ डझन... जाऊ द्यात. युरोपातल्या ज्या कोठल्या टंपडू नाण्याकरिता ज्या कोठल्या मोठ्या परिमाणाची उपमा द्यायची पद्धत असेल, त्या भावाने मिळत, अशी किंवदन्ता आहे.

तरस हे एक खाण्यायोग्य श्वापद असल्याबद्दलचे एक मत काही गोटांत प्रचलित असल्याचे कळते. आम्ही स्वत: हे श्वापद अद्याप खाऊन पाहिलेले नसल्याने त्याबद्दल (बाजूने किंवा विरुद्ध) कोणतीही ग्वाही देऊ शकत नाही.४अ सबब, क्षमस्व.४ब

४अ काय आहे, 'अभ्यासे प्रकटावे' असे कोणीतरी कधीतरी म्हणून गेलेला आहे. (नुकत्याच हाती आलेल्या बातमीवरून.)

४ब तसेही, (फॉर द रेकॉर्ड) तरस खाणारे, तरस न खाणारे अथवा खुद्द तरस, यांपैकी कोणाशीही आमचा (तूर्तास तरी) काहीही पंगा नाही. तिन्हीं पक्षांची मते आपापल्या व्ह्याण्टेज पॉइंटास अनुसरुन योग्यच असावीत, अशी आमची (कोणत्याही अभ्यासाच्या अभावे४क) अटकळ आहे.

४क "कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?" - पु.ल.

हा शब्द आम्ही विंदांच्या 'इतिहासाच्या अवजड ओझ्या'तून शिकलो. जाम आवडला! सारांश, कोण कशातून काय शिकेल, सांगवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न‌बा, तुम्ही ध‌न्य आहात...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छान कथा आहे असे दिसते आहे. कृपया पुर्ण टाका की .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

न‌बांच्या व‌र‌च्या प्र‌तिसादातील‌, " " च्या म‌ध‌ली स्पेस‌ सिलेक्ट क‌रून वाचा.. म‌जा आयेगा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

(विनोद आहे. आधीच बजावून ठेवतोय.)

आधीच‌ न‌बा, त्यातून‌ही 'सुरा' प्याला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

क‌था बाकी भारीच‌, प‌ण‌ वैय‌क्तिक आव‌ड अशा केएल‌पीडी क‌थांची नाहीये. त‌री लिखाण‌ व‌गैरे म‌स्त‌च‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं