१० वे घर आणि वरुण ग्रह

I never seem to get enough of Neptune. Please bear with me.
_______________

https://venuslotus.files.wordpress.com/2015/02/pisces-dreamy.jpg?w=346&h=481
.
तोया माझी एक मैत्रिण आहे. ती एका मेटॅफिझिकल वस्तूंच्या, न्यु एज शॉपमध्ये काम करते. न्यु एज शॉप हे वरुणाचेच प्रोफेशन, अधिभौतिक, अध्यात्मिक आणि वलयांकित, सुंदर भवताल असलेले. तर तोयाला तुम्ही प्रथमदर्शनी पहाता तेव्हा ती कशी वाटते तर ती इन्ट्युइटिव्ह, वाटते, जिला तुमचे मूडस कळतात , जी लोकांचे मूडस सेन्स करते अशी. दयाळू.असे वाटते जणू तिच्या डोळ्यात आपण बुडून जाऊ किंवा जिच्याकडे पहात रहावेसे वाटते अशी. तसेच एक प्रकारचे ग्लॅमर असलेली, वलय असलेली, आणि तरीही अगदी हळूवार, सॉफ्ट म्हणजे जिला मदतीची गरज आहे अशी. म्हणजे तुमच्यातील प्रोटेक्टिव्ह इन्स्टिन्क्टस जागी करणारी. ती चालते तेव्हा वाटतं फ्लोट होतेय. Sort of she puts a spell on you. मंत्रमुग्ध करणारी, गोड्,फेमिनाइन येस्स्स १००% फेमिनाइन.
.
तर ती तशी खरोखर आहे का ही गोष्ट अलहिदा. ती तशी नाही बरं का. जिचा चंद्र मेषेसारख्या अग्नी राशीचा आहे ती आणि मदतीची गरज असलेली? यु आर किडींग! आणि ओह येस she does inherit notorious Arian temper. बरं वाटते तशी ती गोड बाहुली, बिंबो आहे का तर नाही तिचा सूर्य आहे स्मार्ट एकदम सुपरस्मार्ट कुंभेचा, वायु राशीतील शेवटची रास कुंभ. वायु राशी या तार्किक, इन्टेलेक्च्युअल राशी आणि त्यात सर्वात शेवटची म्हणजे बुद्धीमत्तेचा अर्क अशी कुंभ रास. पण हा नेप्च्युनिअन प्रभाव तिच्यावरती आला कुठुन? तर तिच्या १० व्या घरात मीन रास आहे. १० वे घर जे कुंडलीतील सर्वात जास्त प्रकाशमान घर आहे. जिथे मध्यान्हीचा सूर्य तळपतो. जे घर आपण बाह्य जगतामध्ये कसे दिसतो, आपली प्रतिमा ठरविणारे घर. आपली प्रतिमा रेखाटण्यात ,लग्न स्थानाहूनही (लग्न म्हणजे कुंडलीतील प्रथम स्थान) अधिक महत्वचे १० वे घर समजले जाते.
.
मीन आणि मीन राशीचा अधिपती वरुण (नेपच्युन) म्हणजे ग्लॅमर, जादू, वलय. ग्लॅमर शब्दाचे मूळ आहे स्कॉटिश शब्द gramarye...म्हणजे चेटूक, जादूटोणा, मंत्रजाल. आभासी प्रतिमा परावर्तित करणे, ही वरुणाची कमाल. वरुण जो की जलाशयांचादेखील कारक आहे. शांत पाणी सूर्यप्रकाशात डुचमळलं की कसं झिगझॅग प्रतिमा दाखवतं,तळाचे शिंपले देखील आभासी परावर्तित होतात, वेडेवाकडे, चमकदार, होते की नाही जादू. तसा हा वरुण, तशी ही मीन रास ज्या घरात पडेल तिथे ग्लॅमर ओतणारी , Illusions, भास निर्माण करणारी. असा हा वरुण ग्रह किंवा मीन अभिनेते, गायक, यांच्या १० व्या घरात (रेप्युटेशन) पडलेली बरेचदा आढळते. पण हेच १० वे घर म्हणजे करीअरचे आपल्या उपजिवीकेचेही घर आहे. वरुण हा कमालीचा स्पिरिच्युअल ग्रह आहे. वरुण ज्या ग्रहाच्या सन्निध येतो, आस्पेक्टस मध्ये येतो त्या त्या ग्रहाचे शुद्धीकरण होते, Any planet visiting Neptune will come away purer. This planet cannot bear coarseness. तर करीअर च्या घरात म्हणजे १० व्या घरामध्ये ज्या व्यक्तींचा वरुण पडलेला आहे, त्या व्यक्तींना एक बुलावा/हाक/calling जाणवत असते. त्यांना कुणासतरी, एकंदर समाजास आपली मदत व्हावी असे वाटते.
.
नेप्च्युनिअन व्यक्ती विशेषतः शुक्र-वरुण संबंध ज्यांच्या कुंडालीत आहेत अशा व्यक्ती (जसे मीनेचा उच्चीचा शुक्र किंवा शुक्र-नेपच्युन आस्पेक्टस असलेली कुंडली किंवा १२ व्या घरात नेपच्युन पडलेली व्यक्ती) अशा व्यक्ती प्रेमात पडल्या की वरुण ग्रह पार जादू करुन टाकतो. मग illusion-disillusion चा खेळ सुरु होतो. वरुणाची खालची पातळी म्हणजे व्यसनाधीनता, अंमली पदार्थांवरती परावलंबित्व, अल्कोहोलिझम, ड्रग्स आदि.
.
आता शेवटी नीना सिमॉनचे शॅमनिक, जादूटोणा वाले गाणे: नीना जिची सूर्य रास आहे मीन, मंगळ्-वरुण युती ( अतिरिक्त माहीती - चंद्ररास आहे मकर व शनि आहे लग्नी)-
.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

जनरली लेख बाऊन्सर जातात. हा लेख साधारण डोक्याच्या लेव्हलला आला आणि 'आरपार' निघून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या पत्रिकेत शुक्र नेपच्चून युती तुळेची भाग्य स्थानात आहे.मला कला प्रांतात काहीही गम्य नाही.बिचारा नेपच्चून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझ्याही कुंडलीमध्ये ६ व्या स्थानात, वृश्चिकेत शुक्र-नेपच्युन युती आहे. मलाही कलेत गती नाही. पण शोधून शोधून सुंदर चित्रे मुख्य फोटो आदि व्हिज्युअल कला आवडतात. म्हणजे Affinity to visual art आहे. पण आजकाल प्रत्येक कलाविष्काराची इतकी मुबलक व्हिज्युअल उपलब्धता आहे की कोणालाही चाळा म्हणुन आर्ट आवडु शकते. पण मी माझे अनेक आर्टफुल इमेजेस चे आल्बम्स स्लाईड शो वर लावुन तंद्रीत जाते, मनस्वी शांत मेडिटेटिव्ह स्टेट अनुभवते.
.
तुम्ही तसे काही करत असाल अथवा वेगळ्या रुपात ही युती तुमच्या आयुष्यात ऑपरेट होत असेल्.माझ्या कुंडलीत नेपच्युन चंद्र, शुक्राशी योग करतो तसेच मिथुन लग्न असल्याने १० व्यात मीनरास पडते. म्हणजे नेपच्युन प्रभावी आहे. मी ड्रग्स च्या आहारी तर गेले नाही. पण औषधांचे (मेडिकल ड्रग्स) चे कॉकटेल मागे लागलेले आहे. जिथे मी सतत रडत असे, रडी होते (जल-नेपच्युन कारक) तिथे औषधांनंतर रडं एकदम थांबलं पण नेपच्युन वेगळ्या रीतीने म्हणजे औषधेरुपाने कार्यान्वित राहीलाच.
.
आता भाग्यात तूळ म्हणजे तुमचे लग्नस्थान शनिची कुंभ वैचारीक, तर्कप्रवीण, बौद्धिक रास आहे. १० व्या घरात (रेप्युटेशन, तुमची जनमानसातील प्रतिमा) मनस्वी इन्टेन्स, जिला डिटेक्टिव्ह रास म्हणता येईल अशी वृश्चिक रास आहे. वृश्चिकेचा अथक डिटेक्टिव्ह स्वभाव तसेच कुंडली, ज्योतिष आदिंच्या सत्यासत्येबद्दल, कुंभाडा-खोटेपणाबद्दल छाननी करणे हे दिसून येते. आता हे मला तुम्ही जर मला रास सांगीतली नसतीत तर कळलेच नसते. तुमचा शनि केंद्रातही असू शकतो (असेलच असे नाही. माझा हा कयास आहे). शनि म्हणजे कोल्ड ट्रुथ. केंद्रातील ग्रह आयुष्यावर जास्त खोल व व्हिजिबली परिणाम करतात. शनि म्हणजे पर्‍या, देवदूत, स्वर्ग असला बकवास (?) नाही.
.
ज्योतिषी सॅम जेप्पी म्हणतात तसे ज्योतिष ही स्लॉपी, ढिसाळ पद्धत आहे. अजुन एक ज्योतिषी बाई हेसुद्धा म्हणतात की ज्योतिष हे प्रेडिक्टिव्ह सायन्स(?) नाहीच तर ते स्वभावविश्लेषक म्हणुन वापरण्याचे टूल (आयुध, हत्यार) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला कला वाटेल ती इतर कोणाला अकला वाटेल. त्याचं काही स्पष्टीकरण आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे वाक्य मी कुठे म्हटले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसं असतं नै हे सारं?
मला ब्वा कैच कळत नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याने काय होतं? तुला जे कळतं ते मला कळत नाही Smile उदा कलेमध्ये गम्य नाही. तुझी तूळ रास आहे आणि मला सारखं वाटतं की मीन आहे. कदाचित लग्नी मीन असेल किंवा मग माझा बिनबुडाचा गैरसमज असा असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतो आहे. हर्षल नेपट्युन प्लुटो तिघांबद्दल कमी माहिती आहे. पण नेपट्युन शुक्रासारखा,हर्षल मंगळासारखा म्हणतात.खूप मंदगती ग्रहांचे स्थान आणि चंद्राशी अंतर अधिक परिणामकारक असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अचरटजी. मी वाचते अतिमंदगती असल्याने नेपच्युनचा आख्ख्या पीढीवर काय परिणाम होतो ते पहातात. म्हणजे नेपच्युन तूळेत असलेली एक पीढीच्या पीढी, त्यांनी लाविलेले महत्त्वाचे शोध, कार्ये. जसे आपण म्हणतो ना जनरेशन एक्स, बेबी बूमर्स वगैरे तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0