मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद

"विश्वसंवाद" या पहिल्या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस 'ऐसी अक्षरे'वर प्रसिद्ध करण्याची संधी मला मिळते आहे, ही आनंदाची बाब आहे.

मराठीतला हा पहिला पॉडकास्ट. नव्यानं ओळख झालेल्या या माध्यामानं गेली काही वर्षं अगदी झपाटून गेल्यासारखं झालंय. इंग्रजीतले अनेक, वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्टस ऐकल्यानंतर, मराठीत हा प्रकार आणायलाच हवा असं वाटत होतं. जवळजवळ वर्षभराच्या तयारीनंतर १ जानेवारी २०१७ पासून मी हा पॉडकास्ट प्रसिद्ध करतोय.

या मराठी पॉडकास्टचं स्वरूप आहे मुलाखतीचं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांशी गप्पा मारत त्यांना समजून घेण्याचं कुतूहल आणि पॉडकास्टींग हा नवीनच सापडलेला छंद या दोन गोष्टींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम. शीर्षक आहे: विश्वसंवाद. वेब-साईट: www.vishwasamwaad.com आणि फेसबुकवर: www.facebook.com/vishwasamwaad

आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या एपिसोडसमधले पाहुणे आहेत:
- ज्येष्ठ मराठी लेखक/समीक्षक विजय पाडळकर
- अंतराळात झेप घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या Scientist-astronaut candidate अनिमा पाटील-साबळे
- Friends of Anandwan या संस्थेच्या चंदा आठले

आणि काही आगामी पाहुणे असे:

- भारतीय तालवाद्यांच्या सिंथेसायझरचे जनक जयवंत उत्पात
- खगोल-संशोधक / शास्त्रज्ञ आशिष महाबळ
- मराठी कीर्तन परंपरेचे फ्रेंच अभ्यासक एरिक फेरिए
- बहुभाषिक डिजिटल डिक्शनरीचे जनक सुनील खांडबहाले

हे सगळे एपिसोडस यथावकाश "ऐसी अक्षरे"वर येतीलच. या सुरुवातीच्या पोस्टबरोबर या पॉडकास्टची आरंभ-धून देतो आहे. "ऐसी अक्षरे"च्या रसिक आणि चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया, सूचना समजून घ्यायला नक्कीच आवडेल.

* * पॉडकास्ट या माध्यामाशी परिचित नसणाऱ्या वाचकांसाठी:

पॉडकास्ट म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा (on demand) ऐकता येईल असा ऑडिओ (किंवा विडिओ) कार्यक्रम. सर्वसाधारणपणे पॉडकास्ट हे अगदी फुकट ऐकता येतात. जगभरात पॉडकास्ट हे बहुतेक वेळा मोबाइल फोनवरून ऐकले जातात पण वेब-साईटवरूनही ऐकणं सहज शक्य असतं. काही लोकप्रिय पॉडकास्टना जाहिरातदारांचं पाठबळ असतं पण बाकी पॉडकास्ट हा स्वान्त-सुखाय आणि हौसेचाच मामला असतो.

* * कसा ऐकाल "विश्वसंवाद" पॉडकास्ट?

- पॉडकास्टच्या वेब-साईटवरून (www.vishwasamwaad.com)
- Google Play Music वरून (www.bit.ly/mandar-vs-gplay)
- iPhone वर Podcasts नावाचं App आहे, ते वापरा.
- Stitcher नावाचं App कोणत्याही मोबाईल फोनवर (iPhone, Android, Windows) चालतं. यापैकी कोणत्याही App मध्ये जाऊन "vishwasamwaad" असं नाव शोधा. Subscribe केलंत तर नवे एपिसोडस आपोआप डाऊनलोड होतील आणि नवीन एपिसोडस आल्याचंही कळेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिल्यांदा जेव्हा हा लेख इथे प्रसिद्ध केला तेव्हा आरंभ-धून ऐकू येत नव्हती, म्हणून आज पुन्हा एकदा पोस्ट करतोय. राजेश घासकडबी यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार.

आधी लिहिल्याप्रमाणे, इथल्या चोखन्दळ मंडळींच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहे, कृपया तुमची मते, सूचना जरूर लिहाव्यात अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------
जे सुचले ते सांगावे, गवसले ते दावावे, सुगंधित ते आदरावे, बकुल वा प्राजक्त
---------------------------------------------------------------------------------

उपक्रमाची तोंडओळख झालेली आहे. आता एकेक एपिसोड इथे टाकलात तर लोकांना ते ऐकून मतं देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेकॉर्डिंग स्पष्ट आहे. राघांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Podcast म्हणजे आवाजाच्या शेअरिंग साइट्स. पुर्वी रेडिओवरून मुलाखती प्रसिद्ध होत असत. नभोनाट्य हासुद्धा प्रकार होता. कार्यक्रम होऊन गेल्यावर तो पुन्हा ऐकण्याची सोय नव्हती ती या podcast मध्ये आहे. आता वाट्सपमधून आपण ओडिओ क्लिप पाठवतो तेही एकप्रकारचे हेच माध्यम आहे. हव्या त्यावेळी आवाज ऐकण्याची सोय.
इथे ऐसी अक्षरे अथवा इतर कोणत्याही वेबसाइटवर आवाजाच्या माध्यमातून कवितावाचन, भाषण, गाणे ,वादन इत्यादी इतर वाचकश्रोत्यांना ऐकवायचे असेल तर काही साउंडशेअरिंग साइट्स आहेत. जसे इथे फोटो देण्यासाठी दुसय्रा कोणत्या फोटोशेअरिंग साइटवर फोटो अपलोड करून त्याची फक्त इमिज लिंक देतो तसेच काम करता येते. फोटो दिसतो तसा ओडिओ प्लेअरही देता येतो. वाचकश्रोत्यांना लिंक क्लिक करावी लागत नाही. अशी एक चांगली ओडिओ शेअरिंग साइट https clyp dot it आहे. तुमच्या podcast पेक्षा अधिक व्यापक आहे. कोणत्याही अॅपचा आधार न घेता ,फोन नंबर न देता हे काम होते.

उदाहरणार्थ -
जयोस्तुते / बासरी

ओडिओ फाइल साइझ 500Kb



  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Could not understand what is meant by " तुमच्या podcast पेक्षा अधिक व्यापक आहे. कोणत्याही अॅपचा आधार न घेता ,फोन नंबर न देता हे काम होते.". can you please elaborate?
Did you try the link that I have shared in the beginning of my post? Did it ask you to download any app or asked for your phone number? I will have to dig deeper in that if it is so. Just curious...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------
जे सुचले ते सांगावे, गवसले ते दावावे, सुगंधित ते आदरावे, बकुल वा प्राजक्त
---------------------------------------------------------------------------------

नाही.
थोडं तुलनात्मक लिहिलं गेलं. ओडिओ फाइल ऐकवण्याच्या माध्यमांची तुलना एवढेच आहे. विश्वसंवाद नावाच्या podcast वर काही फाइल्स आल्या की त्यातिथे ऐकता येतील, वाटसप ग्रुपवाले एकमेकास त्यांच्या फाईल देतील, इथे वेबसाइटचे सदस्य clyp dot it वापरू शकतील त्यांचे रिकॅार्डींग देण्यासाठी. ( "तुमच्या" म्हणजे तुमच्या नव्हे फक्त मराठी podcast या अर्थाने आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I will start uploading my podcasts today.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------
जे सुचले ते सांगावे, गवसले ते दावावे, सुगंधित ते आदरावे, बकुल वा प्राजक्त
---------------------------------------------------------------------------------