1
पाक कोक स्टुडिओ!
भारतीय कोक स्टुडिओपे़क्षा पाक कोक स्टुडिओ शतपटीने चांगला आहे.
गरज बरस सावन - सदाबहार. हे कधीही आणि कितीही वेळा ऐकू शकतो. मित्रांबरोबर फिरायला/ट्रेक्/गेट्टुगेदर वगैरे असेल तर परत येताना हे गाणं मूड फार भारी बनवतं. पब्लिक रडणार जरूर.
दूर जेव्हा हिंदी गाणी प्लॅटॉनिक होती आणि त्यांवर इंग्रजीचे अत्याचार झालेले नव्हते, त्या काळातलं हे शेवटचं गाणं. वाद्ये झक्कास. हे गाणं ओरिजिनल इथे.
मियां की मल्हार गायिकांचा आवाज फार (मला तरी) आवडण्यासारखा नाही. वाद्ये अक्षरशः जबरदस्त. बासरी तर वाहवा घेऊन जाते.
झिन्दा हे गाणं भन्नाट. वाद्ये झकास. ओरिजिनल इथे साधारण ०५-०६ च्या सुमारास हे गाणं टीव्हीवर फार वेळा लागायचं.
छाप तिलक हे व्हिवा मध्ये त्या बुवाच्या सदरात मिळालेलं. छान आहे.
आफरीन लेटेस्ट, आणि प्रच्चंड गोड गाणं. शब्दही प्लॅटॉनिक.
कंडे उत्ते हे सगळ्यांना आवडण्यासारखं नाही, पण लेट मी क्वोट,
म्हणजे मला का ते सांगता येत नाही पण क्लिक झालं तर प्रचंड क्लिक होइल असं. एकाच विशिष्ठ मूडसाठी, प्रवृत्तीसाठी बनलेलं.
मी अक्षरश: वेड्यासारखी कोक स्टुडिओची मिळतील ती गाणी ऐकलेली आहेत. अजिबात, कुठल्याही बायसशिवाय माझं हे मत झालेलं आहे की भारतीय कोक स्टुडिओमध्ये फक्त भपकेबाजपणा/दिखाऊपणा जास्त प्रमाणात असतो. अर्थात सावन में, बन्नाडो, छन कित्थन, कजर बिन कारे इ. मास्टरपीसेस आहेतच, पण अॅव्हरेज, किंवा अक्षरशः वैतागच आणणारी तेरियां तू जाने, कट्टे, निमोली इत्यादीच जास्त आहेत. हे लोक गायचं सोडून अभिनय का जास्त करतात? बायका पुरुषांसारखं गायचा का प्रयत्न करतात? इ. प्रश्न फार मनात येतात, आणि मग मी दुसरी गाणी शोधतो.
उगीच चिखल कालवू नको रे
हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥
दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥
विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥
संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥
सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥
ब्रीदिंग अंडर वॉटर
खूप दिवसांपूर्वी हा मोती मिळाला. कर्ष काळे आणि अनुष्का शंकर ह्यांचा फार महान अल्बम आहे. ह्यातला पहिला ट्रॅक Burn हा टॉप फेव्हरिट. नंतर Oceanic Part 1. ज्यात रविशंकरही येऊन जातात. नीट ऐकल्यास कळतं की पूर्ण अल्बम मध्ये एकाच बंदिशीचा वेगवेगळा मुक्त विस्तार केलेला आहे. मूड सेट करायला भन्नाट गाणी.
१९२० च्या आसपास ग्रिअरसन नामक
१९२० च्या आसपास ग्रिअरसन नामक ब्रिटिश अधिकारी भारतभर फिरला, आणि जागोजागच्या स्थानिक बोलीभाषांचे रेकॉर्डिंग करून त्याने ते सेव्ह केले. तत्कालीन अनेक भाषांचे सँपल आयतेच ऐकता येईल, मस्त प्रकार आहे. मराठीचेही खूप प्रकार आहेत, ते सर्वही ऐकायला तितकेच भारी वाटतात.
http://dsal.uchicago.edu/lsi/Language/Indo-Aryan-southern-group
१४टॅन सॉरी आत्ता आठवलं आज
१४टॅन सॉरी आत्ता आठवलं आज नक्की दुवा देते. कुआन यिन ची गाणी शोधा. कुआन यिन ही बुद्ध धर्मातील करुणेची देवी. स्त्रीरुपातील बुद्ध्.
बुद्ध हे तत्व आहे. आपण सारेजण बुद्ध आहोतच पण आपण विसरलोय वगैरे वगैरे.
तेव्हा स्त्रिया बुद्ध असू शकतात्.
तर डाटा सेट अप कंप्लीट्.
कुआन यिन चे मंत्र्/गाणि वगैरे शोधा.
ऐकलं.
एकेकाळी मेटलहेड असलेला मी सध्या एकाएकी एकदम शांत गाण्यांच्या मागे धावतोय. कुआन यिनचे मंत्र ऐकले.
खरं सांगू? फारसे आवडले नाहीत. सॉरी!
रात्री झोपण्यापूर्वी ऐकण्याच्या गाण्यांची एक खास प्लेलिस्ट आहे माझ्याकडे. त्यातील काही वानगीदाखल-
०. अ थाऊजण्ड इअर्स
ह्या गाण्याला ० क्रमांक ह्यासाठी, की 'झोपण्यापूर्वी ऐकायच्या' गाण्यांत हे गाणं त्रिकालाबाधित ध्रुवपदावर आहे. स्टिंग फार थोर कलाकार आहे. त्याचं डेझर्ट रोझ हे गाणं एकेकाळी बर्रंच गाजलं होतं.
१. आहिस्ता आहिस्ता हे गाणं, अतिशय कमीत कमी वाद्यं आणि अतिशय गोड आवाजांमुळे कायमचं लक्षात राहीलंय. स्वदेस मध्ये हे घेण्यात का आलं नाही, माहित नाही.
२. लेरा लिनची ट्रू डिटेक्टिव्ह मधली सगळीच. ह्यांबद्दल मी आधी लिहीलंय कुठेसं.
..... आणि बरीच.
त्या पार्श्वभूमीवर कुआन यिनचं संगीत फार 'रिल्याक्सींग' वाटत नाही. ते नक्कीच 'सुमधुर' आहे, पण (माझ्या मते) 'शांत' नाही.
तरीही थॅंक्स. अज्ञात कलाकारांबद्दल, एकदमच वेगळ्या जॉन्रबद्दल कळणं हे मी परमभाग्य समजतो!
ह्म्म्म्म! खरे आहे कुआन यिन
ह्म्म्म्म! खरे आहे कुआन यिन ची सर्व व्हर्शन्स मस्त नाहीत्. पण एक विशिष्ट मूड येतो माझा मग त्या दिवशी ॐ मणी पद्मे हुम्" हा अवलोकितेश्वरांचा मंत्र, क्वान यिन चे मंत्र लावुन, माझे बुद्धाच्या शांत मुद्रेचे अल्बम स्लाईड शो वर लावुन ऐकते. मेडिटेशन्.
____
डेसर्ट रोझ मस्त आहे ऐकले आहे.
किशोरीताई १९६२, ६५, ८०
गेला संपूर्ण आठवडा 'सहेला रे,' 'आज सजनसंग मिलन बनिलवा' आणि इतर अनेक श्रवणीयांमध्ये गेला. त्यात आकाशवाणीच्या सेंट्रल आर्काइव्समधलं हे लडिवाळ रत्न सापडलं. १९६२, १९६५, १९८० मधल्या किशोरीताई. हे ते ध्वनिमुद्रण.
२ मिनिटे ३५ सेकंदांपासून सुरू.
पंडित नारायणराव व्यास यांनी
पंडित नारायणराव व्यास यांनी म्हटलेली ही बंदिश वििवध भारती वर काही वर्षांपूर्वी ऐकली होती...
‘बन में बजावत बंसी,
ए री कैसी मनहरणी,
बन में बजावत बंसी...’
यू ट्यूब वर शोधतांना त्यांच्या इतर चिजा सापडल्या, पर वरील बंदिश काही सापडली नाही. म्हणजेच ही बंदिश विविध भारती जवळच असेल...
गुरुवारी दुपारी यू ट्यूब वर सर्च करतांना त्यांची दूसरी बंदिश सापडली
-‘बलमा बहार आई...’
त्यांच्याच इतर चिजां मधे एक दिसली
ये मन हमीर...
बंदिश कळलीच नाही...एेकली नाही. काम हाेतं, राहून गेली.
रात्री घरी पोचलो तर अडीच वाजले होते. इयरफोन लावून यू ट्यूब वर जुन्या आठवणीतील एक चीज शोधत होतो. ती म्हणजे पं. नारायण राव व्यास आणि पं. विनायकर राव पटवर्धन यांची जुगलबंदी...
बन में चरावत गैंया,
लाल मुकुट, सिर मोर पंख धरे,
बन में चरावत गैंया...
चीज काही मिळाली नाही. पण विनायकराव पटवर्धन यांची एक तासाची रिकार्डिंग दिसली. राग होते पूरिया, सागर आणि एक भजन...
माहिती दिली होती 1970 मधे कोलकाताला झालेल्या सुरेश संगीत महोत्सवातील ही रिकार्डिंग आहे...सोबत सारंगी वर आहेत पंडित गोपाल मिश्र. तबला संगतकार आहेत कुणी पंडित शांताप्रसाद यांंचे पुत्र.
उत्सुकते मुळे ऐकली...
रात्री अडीच वाजता घरचे सगळे ढाराढूर झोपलेले होते...
मध्य लय मधे तबल्याशी सवाल-जवाब सुरू झाले आणि ताडकन उठून बसलो....
वाट्स अप वर काही वीडियो मधे जाकिर हुसैनला तबल्यावर हु ब हू बोल काढतांना बघितलंय....
तर या ‘पूरिया’ मधे सारंगी आणि तबल्या सोबत विनायकारावांचे सवाल-जवाब अप्रतिम आहेत...
‘पूरिया’ मधील तराना मधे अस्थायी 11 आवर्तनांची अाहे. ही सगळी माहिती गाणं म्हणतांना विनायकराव स्वत:च देतात...
रागों का समूह...
सागर बद्दल त्यांनी सांगितलं-रागों के समूह को राग ‘सागर‘ कहते हैं। इसकी कविता ऐसी है-
अस्थायी
ये मन है मीर
छाया परे श्याम की
अंतरा
चहुं देश में होवे कल्याण
हर दरबार में कहावे नायकी
इस कविता के अस्थायी में चार राग (यमन, हमीर, ) हैं और अंतरे में चार राग (देस, कल्याण, दरबारी व नायकी कानडा) हैं। मग ते चीज गाऊन दाखवतात...
रागमाला ऐेकलेली होती...
सागर हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला.
---------
विनायकराव पटवर्धन
रागसागर म्हणजेच रागमाला. रागसागर हे विनायकरावांनी रागमालेला दिलेलं नाव आहे.
'बलमा बहार आयी' गौड मल्हार आहे. चिजेची अक्षरं अशी आहेत -
स्थायी - बलमा बहार आयी, दादुर मोर पपीहा पिया पी बोले घन छाये
अंतरा - निशि अंधियारी दामिनी डराये कोयल शबद सुनाये
बापूराव पलुसकरांची आकाशवाणीची ध्वनिमुद्रिका आहे ती ऐकून पहा.
'बन में चरावत गैंया' मालगुंजी मध्ये आहे. त्यातला तराणापण सुंदर आहे. पं. विनायकराव पटवर्धन आणि पं. नारायणराव व्यास यांची जुगलबंदी हा एक लै भारी आयटम होता असे असं ऐकीवात आहे. विनयाकबुवांच्या चरित्रात बिहारमध्ये (नक्की जागा आठवत नाही, बघून सांगतो) एका ठिकाणी खास यजमानांच्या आग्रहास्तव विनायकराव, नारायणराव आणि ओंकारनाथ ठाकुर असं तिघांचं सहगायन झाल्याचा उल्लेख आहे. सुमारे दीड तास तिघांनी मिळून बागेश्री रंगवला असे लिहिलेले आहे. ती मैफिल कशी असेल या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहातात.
विनायकराव आणि नारायणरावांच्या जुगलबंदीचा एक फोटो

छान माहिती...
'बन में चरावत गैंया' मालगुंजी मध्ये आहे....
बरोब्बर...
चीज मजजवळ आहे...तराना देखील...
पण तो मी यू नळीवर शोधत होताे...नाही दिसला...
विद्याधर व्यास यांचा आमच्या इथे गायनाचा कार्यक्रम होता...इंटरवेल मधे माझा एक तबलची मित्र ग्रीन रुम मधे त्यांना भेटला. तो म्हणाला आकाशवाणीवरील संगीताच्या तुमच्या कार्यक्रमात मालगुजी सुुरू असतांना मला झोप लागली...खूप सुंदर प्रस्तुति होती...
व्यासजींनी काय केलं असेल...
इंटर नंतर पहिलाच राग घेतला मालगुजी...त्यांत दोन बंदिशी आणि तराना सादर केला...
या दोघांचा फोटो इंग्रजी दैनिकात (बहुधा टाइम्स होता) मधे बघितलेला आठवतो...कटिंग संग्रहात आहे माझ्या....
ते काही असो...गायन अफलातून होतं या तिघांचं...विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास आणि पं. ओंकारनाथ ठाकुर...
बाहुबली पार्ट २ मधील मला स
बाहुबली पार्ट २ मधील मला सर्वाधिक आवडलेले गाणे हे. तेलुगुमध्येच गाणी ऐकावीत, हिंदी डब्ड गाण्यांच्या वाटेस जाऊ नये. वरिजिनल ते वरिजिनलच. त्यातला तो प्राकृतस्टाईल "हेsssssसाss रुद्रस्साss हे सरवत्रसमुद्रस्साss" घोष मला फार म्हणजे फारच आवडला. पिच्चरमध्ये बरोब्बर प्ले होत राहतो. व्हायोलिनादिंचा यूजही मस्तच. थोडा चिनीस्टाईल वाटतो अधूनमधून.
तू तलम अग्नीची पात ....
http://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Talam_Agnichi_Paat
शब्द फार उत्कट आहेत्.
कवि - मल्लिका अमर शेख्
___________
http://www.aathavanitli-gani.com/Song/Valan_Vatatalya
ना धों महानोर्. सुंदर शब्द.
__________________--
शंकर रमाणी तर माझे आवडते गीतकार आहेतच्.
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी
ओहोहो!!
तारुण्यसुलभ हा शब्द
तारुण्यसुलभ हा शब्द कितीही क्लिशे वाटला तरी हे गाणे म्हणजे त्याचा मूर्तिमंत आविष्कार आहे. अतिशय सरळसाधं आणि म्हणूनच एकदम भिडणारं गाणं. अंमळ पौगंडसुलभ म्हटलं तरी चालेल, पण खूप भारी आहे, उगीच नाय त्याला नऊ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज!
हे एक डच लव्ह सॉङग, म
हे एक डच लव्ह सॉङग, मस्त आहे.
पारंपरिक स्कॉटिश गाणं
पारंपरिक स्कॉटिश गाणं
यातला चार्ली म्हणजे स्कॉटिशांचा 'बॉनी प्रिन्स चार्ली' याची श्टुरी लय मस्त आहे.
यूट्यूब व्हिडियोच्या तुलनेत एडिंबराच्या रस्त्यावर हे गाणं म्हणणाऱ्या बाईचा आवाज जरा चिरका होता, पण व्हिडियोमध्ये जिथे व्हायोलिन आहे त्याऐवजी बॅगपाईप वाजवत होते. मस्त अनुभव.
ही असली स्कॉटिश आणि आयरिश
ही असली स्कॉटिश आणि आयरिश गाणी म्हणजे जगातला भारी प्रकार असतो राव, असल्या गाण्यांचा मी गरगरां फिरणारा विंड टनेलातला पंखा आहे. टायटॅनिक पिच्चरमध्ये अशा संगीताशी प्रथम परिचय झाला तेव्हापासून केल्टिक गाणे म्हटले की कद्धी चुकवत नै ऐकायचे.
यार वेखो रंग लाया है / मन कुंतो मौला
सनम मारवीने गायलेले 'यार वेखो रंग लाया है' उत्तम आहे.. सुलतान बाहू आणि इतर दोन सूफी संतांच्या रचना एकत्रित गायल्या आहेत .
https://www.youtube.com/watch?v=SiIu-COuHKw
साउंडक्लाऊडवर शेर अली मेहेर अली ग्रुपने गायलेले 'मन कुंतो मौला'चे वर्जनही खूपच सुंदर आहे :
https://soundcloud.com/house-of-music-1/man-kunto-maula-by-sher-ali
मोत्सार्ट चा त्यातल्या त्यात
मोत्सार्ट चा त्यातल्या त्यात आपल्याकडे थोडाफार माहित असणारा रॉंडो . Alla turca .. सगळ्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतो.
परत ऐकतोय शेकडोव्यांदा ...
https://www.youtube.com/watch?v=quxTnEEETbo
झकास गाणं आहे. ऋषिदांचा
झकास गाणं आहे. ऋषिदांचा पिक्चर आहे असं वाचल्याचं आठवतंय्. "कैसे दिन बीते कैसी बीती रतियां" सुद्धा मस्त आहे. त्यात ल्या दुसऱ्या कडव्यात लताबाई जरा चिरकतात्.
"हाये रे वो दिन क्यों ना आये" पण झक्कास आहे. लताबाईंचा खासमखास आवाज.
.
.
.
.
.
हो सकाळ कसली प्रफुल्लीत
हो सकाळ कसली प्रफुल्लीत होऊन जाते अम्मांच्या आवाजातील व्यंव्यंकटेश स्तोत्र ऐकले की. आज काल मधुराष्टकावर प्रेम जडले आहे. फार फार मधुर्. नक्की ऐका. 'काशी विश्वनाथ सुप्रभातम' ऐकतो आज.
भीमसेन जोशींचे - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा व राजस सुंदर मदनाचा पुतळा
ऐकलीयेत मामी. फार फार सुंदर आहेत दोन्हीही भजने. 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हे युट्युबवर 'नवदुर्गा' नावाच्या छोटुकल्या मुलींच्या ग्रुपमधील एका गोड पोरीनी गायले आहे. अक्षरश्: स्वर्गीय. नक्की ऐका. त्याच ग्रुपचे 'अयगिरी नंदिनी' हे महिषासुरमर्दिनी स्तोत्र सुद्धा अफाट सुंदर आहे.
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.
अधीर मन...
पावसाळ्याच्या सुरुवातीला हे मधूर गाणं ऐकायला हरकत नाही. चित्रपट, निळकंठ मास्तर.

हम्म, भारीच आहेत. गुल पन्राला
हम्म, भारीच आहेत.
गुल पन्राला बघितलं, जरा जरा नर्गिस फखरी आहे काय वाटलं. भारी दिसती एकदम. आतिफ अस्लम नेहमीप्रमाणेच.