जिप्सीज : १

गात्रधूंद मद लेवून,

भयशून्य जिप्सीज

नाचताहेत.

माझ्या वेदनेसकट,

खुणावताहेत मला.

तरी इतक्या सहजी

अथकपणातून मुक्ती नाहीये.

पण नवे पर्याय आहेत.

मग स्बत:च विच्छेदन

करुन,

मी मन वेगळं करतो.

मग वेदना,

आकांक्षा,

प्रेम, श्रद्धा,

कृतार्थता वगैरे.

तिरहाईत नजरेनं.

या तुकड्यांकडे

पहातोय मी.

तेव्हा जाणवतं,

आरशात आपल्याला जसा दिसतो,

तसा नसतो आपला चेहरा.

भूतकाळाचे भयअश्व,

वर्तमानावर

खिंकाळत स्वार होतायत.

आणि भविष्यात जाणारया,

त्यांच्या नालबंद पाऊलवेलीवर,

आपण चालतोय

निर्बुद्धपणे,

त्या चिरंतन भयाशी

तडजोडी करत.

माझ्या

दिशाहीन आयुष्याच्या

वर्तुळाची टोकं,

भगव्या क्षितिजाशी

संपत नाहीयेत.

मी पिकत चाललोय

या सगळ्या

खरया खोट्या अवयवांसकट.

मग डोळ्यापलिकडले

भास नाकारुन,

मी माझं सगळं

जमा करतो आणि

हारीने मांडून ठेवतो

जिप्सी शेकोटीपूढे.

मग नाचतो,

गातो,

प्रेम करतो.

नी जेव्हा त्यांचे

हसरे डोळे

मला स्पर्श करतात,

मी पूढे करतो

माझ्या वेदनेचा

रिकामी प्याला.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आवडली.

तुमच्या कविता thought provoking ( मराठी? विचार प्रवर्तक ) असतात.
स्वतःची माणूस / मानव म्हणून ओळख होत जाताना झालेल्या जाणीवांची झलक त्यांच्यात दिसते. अशी ओळख करून घेण्याची प्रेरणा बरेचदा टोकाच्या वेदनेतून येते.तुमच्या वेदनेचे काहीसे गूढ प्रतिबिंब या कवितांमध्ये आहे काय असा मला प्रश्न पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.
माझ्या वेदनेचे प्रतिबिंब आहे, तसंच वेदनेबद्दलचं गूढ प्रेमही आहे. वेदनेवरचं प्रेम हा निराशावाद नाही पण काहीसा सत्याकडे जाणारा मार्ग आहे असं मला वाटतं. मानवी अस्तित्वाचा पाया त्याच्या दु:खात आहे. हे अस्तित्व टिकुन रहाणे, अढळ रहाणे, खंबीर होणे आणि विकसित होणे, हे दु:खाशिवाय अशक्य आहे. जगण्याचा,सुखी होण्याचा आकांत आपल्याला धडपड करायला शिकवतो.वेदनेच्या सीमारेषेपलिकडले आपण आणि अलिकडलेही आपणच, परंतु अंतिमतः दोघेही एकमेकांना अनोळखीच.
जे जे जीवनाचा भाग आहे ते ते स्वीकार्ह आहे ,अपूर्णता ,वेदना ,आनंद या जीवनाच्या अत्याज्य सीमांना स्पर्श करायचा ,त्यांना भिडण्याचा मोह स्वीकारायचा. अनेकदा हे अनिवार्य ही आहे. याच्याशी निगडीत माझा काही ओळी......
शल्य राहु दे

रक्त वाहु दे

मला पाहु दे

आयुष्य.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

वेदनेच्या सीमारेषेपलिकडले आपण आणि अलिकडलेही आपणच, परंतु अंतिमतः दोघेही एकमेकांना अनोळखीच.

क्या बात है !!!

जे जे जीवनाचा भाग आहे ते ते स्वीकार्ह आहे ,अपूर्णता ,वेदना ,आनंद या जीवनाच्या अत्याज्य सीमांना स्पर्श करायचा ,त्यांना भिडण्याचा मोह स्वीकारायचा. हे अनिवार्य ही आहे.

मान गये तुमको.

कधीतरी ही स्वत:ला स्वत:शी ओळख होते / पटते आणि मग अपूर्णता असेल, वेदना असेल तरी त्यातच एक अनामिक आनंद ही असतो.

तुमच्या म्ह्णणण्याप्रमाणे तुम्ही लहान आहात. वडिलकीच्या नात्याने येवढेच म्हणेन की कुणालाही हा अनुभव फार लहानपणी येऊ नये...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दांचे तुकडे व्यक्त करताहेत विदीर्ण वेदनेचा एक अनुभव!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.
अंतःप्रेरणा विदिर्ण करेल आणि विदिर्ण तुकडे जुळवेल ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

ही कविता आवडली
मुख्य म्हणजे कळली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.