मराठी स्टँडअप ऑन बॉलीवूड

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, म्हणजे अर्थातच आपली फिल्मी दुनिया. बॉलीवूड विषयी मला विलक्षण आदर आहे. म्हणजे जी industry गेली शंभर हून अधिक वर्षे कोट्यावधी लोकांना बनवून ठेऊ शकते. काय बनवून ठेऊ शकते ह्याकरता मुंबईत एक खास शब्द आहे जो मी इथे उच्चारू शकत नाही. तर बनवून ठेऊ शकते त्या industry करता माझे कोटी कोटी प्रणाम.

आता प्रणाम केलाय तर आता काशी करायला सुरुवात करूया. कारण तुम्ही काय इथे माझा प्रणाम बघायला नाही आला. मला सांगा इथे शाहरुख खानचे किती fans आहेत? अरे रे दुर्दशा!! म्हणजे मी शाहरुख बद्दल बोलू ना? काय आहे, भारतीय लोकं आजकाल कधी कोण काय कुठे कुणाबद्दल आक्षेपार्ह बोलतोय याची वाटच बघत असतात, म्हणून विचारून घेतलेलं बरं. शाहरुख बद्दल काही आक्षेपार्ह वाटलंच, तर शाहरुखच्या fans ना एवढंच सांगतो, कि तुमच्या प्रत्येकाला इथे माझ्या standup चे ५-५ fans बसलेत. आणि हाणामारी झालीच, तर जे शाहरुख आणि माझे दोघांचे fans आहेत त्यांनी स्वतःच्या थोथ्रीत मारून घेऊ नका म्हणजे मिळवली.

तुम्ही कभी खुशी कभी गम पिच्चर बघितलाय का? त्यात शाहरुख खान बापाच्या पैशाच्या जोरावर थेट लंडनला MBA करायला जातो. जेव्हा तो घरी येत असतो तो सीन आठवा. ज्यांनी सुदैवाने पिच्चर बघितला नाहीय त्यांना सांगतो. आधी तो विमानात बसतो, मग विमानातून उतरून हेलीकॉप्टर मध्ये बसतो. आणि ते हेलीकॉप्टर direct असं घरापर्यंत घेऊन येतो. आणि मुख्य म्हणजे संपूर्ण प्रवासात एक laptop bag घेऊन फिरत असतो. इथे आम्हाला २३-२३ किलो बसवताना नाकी नऊ येतात. मला तर २३ चं चुकून साडे २३ झालं आणि जुन्या underwear टाकायला लागल्या तरी जीवावर येतं ओ. पण ह्याला त्याचं काही टेन्शन नाही. हा पठ्ठ्या ह्या सगळ्यापासून परे असतो. म्हणजे security check – भानगड नाही. security check च्या वेळी पासपोर्ट, विसा, boarding pass सांभाळत laptop आणि बेल्ट वैगेरे काढणे प्रकार नाही, plane च्या एवढुश्या commode वर कुंथत बसणे प्रकार नाही, conveyer belt वर जरा वेळ आपली बॅग नाही आली तर airline वाल्यांनी ती ढापली तर नसेल ना याची चिंता नाही. हा आपला मस्त उतरून पळत सुटतो.

meanwhile, ह्याच्या घरी ह्याचे आई-बाबा म्हणजे जया आणि अमिताभ बच्चन ह्यांनी इकडे गावजेवण घातलेलं असतं. त्यामुळे ती दोघं शंभर एक मंडळींबरोबर नाचत बसलेली असतात. घराबाहेर हेलीकॉप्टर उतरवायची सोय असली ना, कि हे एक बरं असतं, कि airport ला घ्यायला जाणे प्रकार नाही. नाहीतर आपल्याकडे आपण airport मधून बाहेर पडलो कि प्रत्येकजण आपल्याकडे – आपण गुन्हेगार आणि ते साक्षीदार असल्यासारखे बघतात. एकदा तर आमचे बाबा मला शोधतायत तोपर्यंत आमची आई दुसरीकडेच कुठेतरी हाथ करून चालत सुटली. बाबा तिला मागणं ओरडतायत – “अगं भलत्याच टकल्याकडे काय हाथ करतेयस, तो आपला नव्हे”. तेव्हा आई म्हटली – “अहो नीट बघा आपलाच आहे, केस गेलेत त्याचे”. तर anyway, तो शाहरुख उतरून तिकडनं पळत सुटतो आणि जया बच्चन इकडून अशी चालत येते दारापाशी. आणि तो शाहरुख तिच्या जवळ तिला म्हणतो. आणि मी फिल्ममधला actual dialogue सांगतोय. म्हणजे imagine करा कि हे त्यांचं घर आहे आणि शाहरुख असा डुग डुग डुग डुग करत असा बाहेर हेलीकॉप्टर मधून उतरलाय आणि आईसमोर येऊन तो पाहिलं वाक्य म्हणतो – “मा, मेरे आने से पेहले तुम्हे हमेशा कैसे पता चल जाता है”. अरे मेल्या, आम्ही चाळीत असताना चाळीत कुणी जरी आलं तरी अख्ख्या चाळीला समजायचं आणि इथे तर तू एवढं मोठं धूड घेऊन घराबाहेरच उतरलायस ना.

पण काही म्हणा, बॉलीवुड गेल्या काही वर्षात बरंच सुधारलंय. म्हणजे आता हाच सीन घ्या शाहरुखवाला. हाच सीन जर एखाद्या seventies च्या पिच्चरमध्ये असता तर हिरो लंडनमधून MBA करून आलाय...impossible. उलट seventies चा हिरो “डिग्री होकर नोकरीसाठी दर दर कि ठोकरे खायचा”. आत्ताची आई छान दागिने घालून मिरवतेय आणि बाप मस्त तरण्याताठ्या पोरींबरोबर शावा शावा करून नाचतोय. Seventies मध्ये आधीतर ह्या बापाचा पत्त्याच नसायचा. एकतर त्याला व्हिलनने पहिल्याच सीनमध्ये गोळ्या घातलेल्या असायच्या किंवा तो खुळ्यासारखा ट्रेनमध्ये फुकटचा प्रवास करत फिरायचा...फिल्म दिवार. त्यामुळे ह्या आईकडे दागिने तर सोडाच, पण हिच्या साड्या देखील “कळकट्ट पांढरा” ह्या रंगाच्या असायच्या. बऱ्याच वेळेला director ह्या आईचे डोळेच फोडायचा... डोळे फोडायचा म्हणजे तिला आंधळी दाखवायचा. आता इथे खरा contrast दिसेल तुम्हाला seventies आणि आत्ताच्या पिच्चरमध्ये.

म्हणजे मी आधीचा सीन सांगितला बघा जिथे त्या जया बच्चनला “हमेशा पता चाल जाता है”. पण seventies मध्ये ह्या अंध्या मा ला स्वतःच्या पोटचा पोर त्या एवढुश्या खुराड्यात शिरला तरी कळायचं नाही. ती तिथंपण confirm करून घ्यायची – “बेटे तू आ गया बेटे?” जणू काय ह्या रातच्या टायमाला हिला दुसऱ्याच कुणाची अपेक्षा होती. आणि असाच पिच्चरच्या शेवटाला एक सीन असायचा जेव्हा हिरोच्या जागी व्हिलनचा एक ‘आदमी’ असायचा आदमी, तो आदमी तिला उचलून न्यायला यायचा. तेव्हा पण ती तेच विचारायची - “बेटे तू आ गया बेटे?” आणि खरी मजा तेव्हा यायची जेव्हा ही एरवी गाजरका हलवा वैगेरे करून देणारी मा आपल्या निरागस पोराला ऐन वेळी गोत्यात अडकवायची. बरं हा व्हिलनचा आदमी पण एकदम असा direct सांगायचा नाही कि बाबा तुझी आई माझ्या कब्ज्यात आहे. आपण बसून काय ते सौदा मिटवू, म्हणजे तू तुझा घरी जायला मोकळा आणि आम्ही आमची कामं उरकायला मोकळे. तो आधी हिरोला जरा तंगवायचा. म्हणजे हिरो ह्यांच्याच माणसांना बुकल बुकल बुकलतोय आणि हा आदमी असा लपून बसायचा. शेवटी जेव्हा बाजी हिरोच्या हातात आली आणि तो मेन व्हिलनला आता गोळी घालणार तेव्हढ्यात हा आदमी, लहान मुलं कसं भो करतात त्या स्टाईलमध्ये “ठहरो” म्हणून ओरडायचा. बरं, ही जी आई आता या crunch situation मध्ये आपल्या मुलाला म्हणतेय बघा – “बेटे तुम अपना बदला continue रखो, मेरी चिंता मत करना”. मला एक कळत नाही, जर तुझं हेच धोरण सुरुवातीपासून होतं, तर जेव्हा तो व्हिलनचा आदमी तुला घेऊन जायला आलेला तेव्हा तू त्याच्या बरोबर बागेत फिरायला निघाल्यासारखी आलीसच कशाला. तिथंच त्याला सांगायचं ना कि – “हे बघ बाबा आदमी, मला माझ्या जिवापेक्षा माझ्या मुलाचा बदला जास्त महत्वाचा आहे त्यामुळे तू काय ते मला मारायचंय ते मारून टाक”.

मला कधीकधी वाटतं कि ती आई जेव्हा म्हणते – “तुम अपना बदला लो, मेरी चिंता मत करना”, तेव्हा समजा एखादा हिरो म्हटला – “कि व्हय आई, तू म्हणतीस ते बरोबर हाय. नाहीतरी तुला आजकाल दमा असतो, तू उद्या-परवा कधी खपशील ह्याचा नेम न्हाई. रातभर खोकून खोकून तू अख्ख्या कॉलनीला तर्रास देतीस आणि डॉक्टरची औषदं बी काय सोस्त न्हाय राह्यली. मांजं त्या हिरोईनशी लगट हाय, तिचं मांज्याशी लगीन झाल्यावर ती तुला घरातून हाकलूनच देणार हाय. मंग तू म्हणतीस तसं मी माझा बदलाच घेतू”. मग इथे व्हिलनच्या आदमीची पंचाईत होईल. तो म्हणेल – “जल्ला. आयला येवढी मेहनत केली त्याच्या काय फायदा”. पण तो आदमी पण काय कच्चा खिलाडी नसतो, तो अशी कुठली रिस्क नको म्हणून तो आधीच त्या आईचं तोंड बांधून आणतो आणि म्हणतो – “आता बोल काय बोलायचंय ते”.

पण हे seventies चे पिच्चर मला एकूणच काही पटत नाहीत बाबा. हे पिच्चर complete चुकीचा आदर्श समोर ठेवतात. आता हा हिरोच घ्या. आपल्या सर्वसाधारण middle class तरुणांना काय सांगितलं जातं. पुनीत काय सांगितलं जातं? कि परक्या स्त्रीच्या नादी लागू नये. पण हा काय करतोय? हा म्हणजे हिरो, पुनीत नव्हे. म्हणजे पुनीत काय हिरोपेक्षा कमी नाही. पण आपल्या standup चा हिरो. तर श्रीमंत बापाच्या पोरीची छेड काढतोय. बरं ह्याची बहिण लग्नाला आलेली, आई – बिनकामी. ह्याच्या खिशात नाही दमडा, नोकरीचा नाही पत्ता. आणि अशा बिकट परिस्थितीत हा काय करतोय? तर हिरोईनबरोबर बागेत गाणी म्हणतोय. आणि त्यातनं मध्येच वेळ मिळाला तर व्हिलनला धमकवून सुद्धा येतो. अरे काय चाललंय काय?

याउलट या व्हिलनचा मला जाहीर सत्कार करावासा वाटतो. पूर्वीचे मोगँबो, शाकाल, लॉयन सारखे रईज व्हिलन आठवा. ह्यांचे अड्डे अशे कुठेतरी समुद्राखाली किंवा गुहेत वैगेरे असायचे. आणि काय state of the art technology!! elevators काय, automatic उघडणारे दरवाजे काय, फिरत्या खुर्च्या काय. उगीचच लोकं अंबानी आणि टाटा-बिर्ला ची तारीफ करतात. माझं तर असं स्पष्ट मत आहे कि भारतात eighties, ninetees नंतर infrastructure development ची एक औद्योगिक क्रांती झालीय त्याचा खरा पाया ह्या व्हिलन मंडळींनी रचलाय.

दुसरी गोष्ट – भारतात त्यावेळी बेरोजगारी मोकाट सुटलेली असताना व्हिलनच्या गटात नाही म्हंटलं तरी शंबर एक गुंड वेगवेगळ्या स्तरावर full time employed असायची. शिवाय तुमचे ते adhoc basis वर हात-पाय तोडून देणारे गुंड वेगळेच. आणि हीरोची हड्डी-पसली एक करायची झाली कि तुम्हाला दहा-बारा गुंड तरी सहज लागायचे. त्यामुळे तितक्या बेरोजगारांना दो वक्त कि रोटी तरी मिळायची. थोडक्यात हा व्हिलन सरकारची केवढी मोठी समस्या सोडवत होता.

ह्याच्या गटात reservation-quota प्रकार नाही. ड्रेस कोड नाही. म्हणजे तुम्ही भोकाभोकाचं बनियान घालून जॉबवर आलात – no issues. बाहेर job साठी फिटनेस टेस्ट, vision टेस्ट वैगेरे असते, पण इकडे तसला काही प्रकार नाही. उलट तुमचा एक डोळा फुटलेला असला आणि तुम्ही ती काळी पट्टी लावून आलात तर special joining bonus मिळतो म्हणे.

बरं जिथे बाहेरच्या समाजात महिलांचे शोषण व्हायचे तिथे ह्याच्या staff मध्ये मात्र मोना हीपण रॉबर्टच्याच खांद्याला खांदा लावून काम करायची. swimming pool च्या शेजारी मसाज करणाऱ्या staff मध्ये तर महिलांना विशेष प्राधान्य होतं.

शिवाय जिथे ह्या हीरोला कुणी कुत्रं विचारात नसत, आणि सुरुवातीला तर हेरोईनसुद्धा त्याला नालायक-पाजी म्हणून हिणवायची. तिथेच व्हिलन हा एक प्रतिष्टीत माणूस असायचा. त्याचं चार नामी लोकात उठणं-बसनं असायचं, शहरात त्याच्या ओळखी असायच्या. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला तो आवर्जून सांगायचा – “सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है” वैगेरे.

तर आता तुम्हीच सांगा हा वाह्याद गेलेला हिरो चांगला का सद्गुणी व्हिलन चांगला. म्हणूनच मघाशी म्हटलं तसं बॉलीवूडनी शंभर हून अधिक वर्षं आपल्याला नुसतं बनवून ठेवलेलं आहे. म्हणूनच ह्या industry ला माझे कोटी कोटी प्रणाम.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अजुन ऐक‌ल‌ं नाही प‌ण वाच‌ल‌ं आणि खो खो ह‌स‌ते आहे. एक‌द‌म म‌स्त प‌ंचेस् आहेत्. पुनीत व‌गैरे अग‌दी इन्ट‌रॅक्टिव्ह‌ही झाल‌ं आहे. एक‌द‌म‌ म‌स्त्.
___
थोड्या वेळाने ऐक‌ते व‌ म‌ग फीड‌बॅक‌ देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌स्त लिहिल‌ंय की!
क‌णेक‌रांच्या फिल्ल‌म‌बाजीच्या व‌ळ‌णाने जात‌ंय‌, प‌ण‌ अचान‌क‌ स‌ंप‌व‌ल्यासार‌ख‌ं वाट‌ल‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो मान्य करतो कि तो influence असणार कारण कणेकरी आणि फिल्लमबाजी मी बऱ्याचदा ऐकलंय. But I always try to be original. पण पु.लं, कणेकर डोकावतात विचार करताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

व्हीडीयोत नक्कीच जास्त मजा येतोय.
अस्वल म्हणतां तशी कणेकर आठवले.
पण तुम्ही स्वतंत्र ही जाणवतात
कणेकरांच्या काळातील बॅालीवुड सोप, एकरेषीय,प्रेडीक्टेबल,होतं.
सध्याचं २००० नंतरचं बॅालीवुड चे सिनेमा व त्याचे संबंधित घटक फार व्हरायटी, क्रीएटीव्हीटी असलेले व हाताळायला गंमती साठी ही कॅाम्प्लेक्स आहेत.
सध्याचं बाॅलीवुड कणेकर, मुजावर यांच्या बस ची बात रहा नाही
त्यासाठी ताज्या दमाचे गडी हवेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी चानेलच्या काही शोजमध्ये सूत्रधारही खूप विनोदी बोलतात,स्टारलोकांस मजेदार टोमणे मारतात. ते स्टँडप कॅामेडीच्या जवळ जाणारं आसे शिवाय टार्गेट लोक समोरच्या रांगेतच असतात.
त्यांपैकी पॅाल आणि भारती.
कालचा स्टार प्लसचा नच बलिये पाहा. भारती अन तिचा नवरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0