आपली मराठी - काय वाट्टेल ते!

मराठीच्या गमतीजमती-----
काय वाट्टेल ते!
गेल्या आठवड्यात आम्ही एका मैत्रिणीकडे जमणार होतो. आम्ही दोघी-तिघी इतर मैत्रिणींची वाट बघत बागेच्या कोपर्‍यावर थांबलो होतो. थोड्या वेळाने आम्ही आत सरकत गेटजवळच्याच एका बाकावर बसलो. शेजारी हिरवळीवर आमच्या नातीच्या वयाची एक छोटी खेळत होती. चेंडूच्या मागे पळत ती आमच्याजवळ आली. मी चेंडू तिच्या हातात ठेवला. तो घेऊन क्षणभर आमच्याकडे टक लावून ती पाहात राहिली. मग विचारलं,
"ए, तू तिथे काय करतेस"?
"बसलीये". मी तिच्याच सुरात म्हणाले.
"का बसलीयेस"?
"वाट पाहतेय".
"कोणाची वाट"? तिनं निरागसपणे यिचारलं.
"दुसर्‍या एका आजींची".
"का"? सग्गळ्या मुलांचा आवडता प्रश्न.
मग मीही थोडी गंमत केली. "आम्ही नंऽ, सगळ्या मिळून खेळणार आहोत ----- चेंडू"!( काय खेळणार हे विचारायच्या आत मी चपळाईनं म्हटलं.)
ती तिचा चेंडू घेऊन घाईघाईने पळाली. जरा वेळाने सगळ्या जमल्या आणि आम्ही निघालो. छोटी दिसली नाही. शोभाताई म्हणाल्या, "गेली वाटतं ती ढालगज भवानी"! सगळ्या हसलो.
मला आठवलं, माझी मावशी पण नेहमी तिच्या मुलींना 'ढालगज' म्हणत असे. त्या दोघी अगदी लहानपणापासूनच खूप बोलक्या होत्या. अगदी मोठ्ठ्या माणसासारखं बोलायच्या. कधी कधी अगाऊपणेही. ( "काय काकू, आटोपल्या का पोळ्या"? किंवा "अहो मावशी, उरका की जरा पटपट"!) मग मावशी चिडून म्हणे, "ए, ढालगजपणा करू नको हं"!
अगाऊ, भोचक मुलींसाठी किंवा नको त्या चौकशा, नको ते उपद्व्याप करणार्यांना दिलेल्या या विशेषणाचा अर्थ तरी काय होतो? शब्दकोशात ढालगज म्हणजे साहसकार्य करणारा, पुढे होणारा असा दिला असला तरी श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून खरा अर्थ असा कळला---
भवानी ही पेशव्यांची हत्तीण. स्वारीवर निघताना ही सर्वात पुढे असे. ढाल आणि गज घेतलेले शिपाई तिच्याबरोबर असत. म्हणून तिला 'ढालगज भवानी' असं म्हणत.
त्या शूर भवानीचा आपण अगदीच अर्थ बदलून टाकला. ढालगज भवानी, भोचक भवानी एवढंच काय, भवानी हे देवीचं नावही किंचित उपहासानं वापरलं जातं. ए भवाने, मधून त्या 'भवानी' वरचा कृतक्‌ का होईना, पण रागच प्रकट होतो.
शाळेत शिकवत असतानाची गोष्ट. एका शिक्षिकेला लेझिम गटासाठी त्यांच्या कुलाची मुलगी हवी होती. स्टाफरूम मधे त्यांनी शेजारी बसलेल्या सरांना त्यांच्या वर्गातल्या एका मुलीबद्दल विचारलं. "पाठवतो, पण तिला लेझिम पेलेल का नाही कोण जाणे. अगदीच पाप्याचं पितर आहे ते"
आमच्या एका अमराठी मैत्रिणीनं लगेच कान टवकारले. "काय"? ती म्हणाली, "यू सेड पाप्याचं पितर? मीन्स व्हॉट?"
तिला पाप मीन्स सिन्‌ हे माहीत होतं. तिच्या कामवालीकडून तिनं पितर शब्दही ऐकला होता. कारण पितरं आहेत म्हणून कामवालीच्या रजा असायच्या. मग आता या मुलीचा आणि पापाचा, किंवा पितर म्हणजे पूर्वजांचा काय संबंध? या तिच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर आम्हीही देऊ शकलो नाही. फक्त तो कोणत्या अर्थानं वापरतात ते तिला समजावलं. तेव्हापासून अशक्त, काडीपैलवान मुलांसाठी तीही तो सर्रास वापरू लागली. 'काडीपैलवान' पेक्षा तिला तो आवडला. नंतर एका पालकांसाठीही तो वापरायच्या बेतात असताना तिला आवरावं लागलं; आणि त्यात कसा चेष्टेचा सूर आहे हे समजवावं लागलं.
कोणत्याही भाषेत असे रूढ झालेले शब्द असतात.त्यांचा खरा अर्थ वेगळा असेल, पण ते त्या भाषेत चांगलेच रुळलेले असतात. मागच्या एका लेखात उल्लेख केलेले, अपरोक्ष आणि सुजलाम्‌-सुफलाम्‌ हे असेच रूढ झालेत. अपरोक्षचा अर्थ खरा म्हणजे समक्ष, डोळ्यांदेखत. पण आपण बरोब्बर उलट अर्थाने म्हणजे एखाद्याच्या पाठीमागे या अर्थाने तो वापरतो. आणि आता तो इतका रूढ झालाय की मूळ अर्थाने वापरला तरच अर्थाचा अनर्थ व्हायचा.
तसंच सुजलाम्‌-सुफलाम्‌ याचं. मधे तर एका कार्यक्रमाचं नाव 'सुजलाम्‌-सुफलाम्‌ भारत' असं वाचण्यात आलं. भारत किंवा देश हा पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून सुजल, सुफल भारत असं पाहिजे. भारतमाता म्हटलं, तर स्त्रीलिंगी आहे, तरी सुजला-सुफला अशी तिची विशेषणं होतील.
सुजलाम्‌-सुफलाम्‌ हे द्वितीयेतलं रूप वापरायची खरं तर काहीच गरज नाही. पण----------!
बोलीभाषेत 'सबकुछ चलता है'! आवडलेले शब्द परत परत वापरावेसे वाटतात हेही खरंच.
एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी एक वक्ते येऊ शकले नाहीत. संयोजकांनी बोलताना , 'त्यांच्या गैरहजेरीत आपण----- ' च्या ऐवजी 'त्यांच्या पश्चात्‌ आपण----' असे म्हटले. श्रोत्यांनीच समजून घेतलं म्हणून ठीक. शेवटी काय, आपण कधी कधी काय वाट्टेल ते बोलतो. तेव्हा दुसर्याला समजून घेणं महत्त्वाचं.
आमचे एक नातलग खूप गमत्ये होते. त्यांच्या बायकोला 'कानाला खडा!' --असं म्हणायची सवय होती. पुढे पुढे तिच्याआधी तेच म्हणायचे; पण कानाला डायमंड, असं. म्हणे 'लावून लावून काल्पनिकच लावायचा तर साधा खडा का? डायमंडच लावा ना!'
एकदा त्यांनी एका मित्राच्या लग्नात आलं चांगलं पॅक करून त्याचा अहेर केला.वर स्पष्टीकरण----तुम्हीच म्हणालात, "लग्नाला आलंच पाहिजे!"
आमच्या दारावरून आलं विकत जाणारा एका फेरीवाला आलं आलंऽऽऽऽऽऽ! असं ओरडत जातो, तेव्हा त्याच्या दुसर्या आलंऽऽऽऽ मधे मिष्किलपणा भरलेला असतो.
रोजच्या धावपळीत आपण नाही का, खालच्या गॅसचा उल्लेख टाळून त्यावरचा कुकर 'बारीक' करतो, शेगडीवरची भाजी/दूध 'बंद' करतो. चपलेत,बुटात पाय सरकवतो, पण तोंडानं म्हणतो 'पायात' चप्पल घातली.
असं आपण कधी कधी काय वाट्टेल ते बोलतो. त्याचा शब्दश: अर्थ एरवी कुणी काढत बसत नाही. पण चेष्टाच करायची असेल तर तेही केलं जातं. परवा माझ्या लेकीनं फोनवरून विचारलं, "काय करते आहेस?"
"कॉम्प्युटरवर बसले आहे."(अर्थातच माझा अर्थ काम करायला असा होता.)
"काय?" ती हसत सुटली. "अगं कॉंप्युटर 'वर' कशाला बसलीस? मोडेल ना तो!"
पण ते असंच असतं. आपण गच्ची'वर' जातो ते ठीक आहे, पाण्यासाठी नळा'वर', हौदा'वर' जायची काय गरज आहे?
मध्यंतरी एका सोसायटीत लोकांनी चोराला पकडला आणि धू धू धुतला. (पण पाणी किती लागलं असेल? असं कुणीच विचारलं नाही.)
'करून टाक' चं असंच आहे. आपण केस कापून टाकतो किंवा केर काढून टाकतो हे अगदी बरोबर आहे. ते कापलेलं/काढलेलं खरंच टाकायचं असतं. पण भाजी/पोळ्या करून 'टाकतो', कपडे/भांडी धुवून 'टाकतो.'(??) एवढंच काय, सगळे हजर आहेत म्हणून मीटिंगही घेऊन 'टाकतो'. काम चट्‌कन आवरण्याच्या, उरकण्याच्या दृष्टीनं हे म्हटलं जातं हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे या सगळ्या गमतीजमती करतो, तरी आपण प्रचंड समजूतदार असतो. आपण शब्दश: अर्थ घेत नाही.
शब्दश: अर्थ घेतला तर भाषांतर इतकं भन्नाट होतं. शाळकरी मुलांची तर ही खासीयतच आहे. खूप मुलांच्या इंग्रजी निबंधांत मराठी वाक्यांचा सरळ सरळ अनुवाद दिसत असे. आय्‌ 'टुक' टी इन्‌ द मॉर्निंग. किंवा वुई 'टुक' ब्रेकफास्ट. आय्‌ टुक आउट टाइम टु डू---मी त्या कामासाठी वेळ काढला.
एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर त्याचं वर्णन करताना चक्क वुई प्लांटेड 'रोप्स'. बाईंनी विचारल्यावर पुढील स्पष्टीकरण दिलं---- रोपाला शब्द आठवला नाही; पण तुम्हाला तर माहितीच आहे ना? शिक्षकांनी किती समजूतदार असावं!
एका कँप-फायर च्या वेळी खूप थंडी होती--- सो दे वेअर 'शेकिंग' हँड्‌स ऑन द फायर.
एका विद्यार्थ्याने संस्कृतच्या,--- 'तिच्या गळ्यात कंठा होता' या वाक्याचं इंग्रजी भाषांतर केलं, -शी हॅड अ नेकलेस 'इन द थ्रोट' गळ्यात = 'इन द थ्रोट' !
पण वाचताना माझ्याच घशात टोचू लागलं.
मुलांचं जाऊ दे.एका सरकारी फॉर्ममधे पालकांसाठी प्रश्नावली होती. पाल्याच्या मित्र/मैत्रिणींविषयी मतं त्यात अपेक्षित होती. आता मराठीत फ्रेंड शब्दासाठी मित्र/मैत्रीण असे वेगळे शब्द असताना कोण्या महाभागानं त्याचं पुढीलप्रमाणे शब्दश: भाषांतर केलं होतं देव जाणे!
वाक्य असं होतं --- सपोज युअर सन्स फ्रेंड ऑफ द सेम सेक्स अराइव्हज------आणि याचं भाषांतर --------समजा तुमच्या मुलाचा समलिंगी मित्र आला----- हे वाचून हसावं का रडावं? यापेक्षा चिमणरावांचं 'माय आइज हॅव कम, हे बरं'.
आमच्या लहानपणी मुद्दाम अशा गमती करायची फॅशनच होती. फॉक्सपुरची मँगोलेडी यू मी ब्रेड= कोल्हापुरची अंबाबाई तू मला पाव; हे त्यातलं ठरलेलं. आडनावांचीही भाषांतरं व्हायची. करमरकर = डू डाय्‌ डू, रानडे= फॉरेस्ट दिन, पटवर्धन =क्लॉथ इनक्रीज, दोंदे = गिव्ह टू इ.इ.
बोलून चालून हा शब्द मोठ्यांकडून खूप वापरला जायचा. ते काय, बोलून चालून व्यापारी, असं कोणी म्हटलं, की लगेच त्याचं भाषांतर ---दे व्हॉट, टॉकिंग वॉकिंग मर्चंट्‌स--- तयार. अर्थात्‌ ही सगळी चेष्टा, गंमत किंवा करमणूक असायची.
तरी 'विंग्रजी' मुळे अशा खूप गमतीजमती होत असतातच. ड्रायव्हर लोक ट्रॅफिकला हमखास ट्रॉफिक म्हणतात. तर ऑटो चं स्पेलिंग ए वरून असल्याने ॲटो असं बरेचदा दिसतं. एकदा आम्ही कुठेतरी जायचं ठरवत होतो. आमचा एक शिपाई सारखं 'शेपटी नाय तिथे'. असं सांगत होता. आम्ही अडाण्यासारखे शेपटीचा संबंध लावू पाहत असतानाच त्यानं पुढे स्पष्टीकरण दिलं, ---लई डेंजरवार आहे ते. तेव्हा कुठे आमच्या डोक्यात 'सेफ्टी' चा प्रकाश पडला. आणि टेंपरवारी चा हा डेंजरवार भाऊ अम्हाला खूप आवडला.
लहान मुलं तर काय? येत असलेल्या सगळ्या भाषांमधून लीलया बागडत असतात. परंतु त्याआधी त्यांची काय अवस्था होत असेल? माझ्या मैत्रिणीचा दोन-अडीच वर्षांचा छोटा नातू --- काऊ/चिऊचे घास खाऊन शाळेत जाई. आणि तिथे मात्र बाई हम्माच्या चित्राला काऊ का म्हणतात ते त्याला कळत नसे म्हणून रडायचा. घरी सगळे जाई,जुई, मधुमालती अशा फुलांच्या झाडाला वेल म्हणत. आणि बाई मात्र पुस्तकातल्या विहिरीच्या चित्रावर बोट ठेवून वेऽऽऽऽल असं (त्याच्या मते काय वाट्टेल ते) सांगायच्या. हा मात्र त्या चित्रातल्या विहिरीशेजारच्या वेलीवर बोट ठेवायचा. दुसरी एक छोटी बा बा-ब्लॅकशीप नंतर आई-ब्लॅकशीप, आजोबा-ब्लॅकशीप, आजी- ब्लॅकशीप अशी यादी करायची.
एकदा माझा भाऊ त्याच्या मित्राकडे गेला होता. सध्याच्या परिस्थितीवर, महागाईवर गंभीर चर्चा चालू होती. शेवटी एकजण म्हणाला, "सोऽऽ टुडे द मोस्ट इंपॉर्टंट थिंग इज------------"
'मनीऽऽऽऽऽऽऽऽ!' तिथे बसलेला त्याचा नातू एकदम् ओरडला. सगळे थक्क झाले. पण खरं कळल्यावर तिथे खसखस पिकली. कारण दारातून त्यांची मनीमाऊ आत येत होती.
याच मित्राची आई इ-मेल ला ईऽ मेलं आणि हॉट-मेल ला हात् मेलं म्हणायची.(म्हणजे त्यांना लक्षात ठेवायला सोपं जायचं म्हणे.)
एकूण काय, शब्दांचा कीस (दीर्घच वाचावे) काढूच नये असं नाही.थोडी गंमत, थोडा विनोद, थोडी चेष्टा असं चटकमटक हवं असेल तेव्हा जरूर काढावा. शेवटी रोज पोळी-भाजी झाली की कधीतरी
हलकी फुलकी लज्जतदार भेळ/मिसळ हवीशी वाटतेच ना! एरवी मात्र आपला नेहमीचा समजूतदारपणाच हवा!
--------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

k

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मादाम पावसकर (ने’ पोतदार), आय प्रेझ्यूम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सिएसके. माझ्या नाना वाडा शाळेतील विद्यार्थी.
- पोपा मॅडम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म‌राठीच्या आण‌खी ग‌म‌तीज‌म‌ती माहीत‌ क‌रून‌ घ्याय‌च्या अस‌तील‌ त‌र‌ हे दोन‌ जुने धागे अव‌श्य‌ डोळ्याखालून‌ घालावे.

मातीचे कुल्ले, नागवे कोल्हे व इतर - अर्थात, मायमराठीची लेणी
http://www.aisiakshare.com/node/363
पैसाअड‌का इत्यादि
http://www.aisiakshare.com/node/1068

आता केव‌ळ‌ वाच‌न‌मात्र‌ अस‌लेल्या 'उप‌क्र‌म‌'म‌ध्ये "मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने' अशी ६ लेखांची मालिका आली होती. तिच्याम‌ध्ये २० गुणिले ६ =१२० नेह‌मी वाप‌र‌ली जाणारे स‌ंस्कृत‌ व‌च‌ने आणि त्यांचा उग‌म‌ ह्याबाब‌त‌ लिहिले होते. त्यात‌हि अनेक‌ म‌राठी श‌ब्दांचे म‌नोर‌ंज‌क‌ उग‌म‌ दिले आहेत‌. हे लेख‌ येथे ब‌घ‌ता येतील:
http://mr.upakram.org/node/3599
२) http://mr.upakram.org/node/3607
३) http://mr.upakram.org/node/3616
४) http://mr.upakram.org/node/3630
५) http://mr.upakram.org/node/3637
६) http://mr.upakram.org/node/3647

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिश‌य‌ वाच‌निय‌ असे दुवे आहेत्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आव‌ड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌राठीत‌ एकाच‌ श‌ब्दाचे निराळ्या स‌द‌र्भात वेग‌वेग‌ळे अर्थ‌ होतात्.
तेच‌ वाक्य‌ र‌च‌नेचे देखिल‌. श‌ब्दांची ज‌रा उल‌टापाल‌ट‌ केली की अर्थ‌च‌ ब‌द‌ल‌तो.
श‌ब्दोच्चार‌ची तीच‌ त‌ऱ्हा. तोच श‌ब्द‌ वेग‌ळ्या प‌द्ध‌तीने उच्चार‌ला की वेग‌ळा होतो.
त्यामुळे भाषांत‌र‌ क‌र‌ताना स‌म‌जून उम‌जून क‌रावे लाग‌ते. नुस‌ते श‌ब्दार्थ माहिती अस‌ले की झाले असे नाही चाल‌त‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

कोल्हटकर धन्यवाद. आपले जुने धागे खरंच अभ्यासपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या धाग्याव‌र, अचान‌क, कोल्ह‌ट‌क‌रांचा ख‌जिना साप‌ड‌ला, त्याब‌द्द‌ल त्यांचे आभार्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

( बाकी ते " ए काउज हजबंड रनिंग रनिंग केम आणि धप्पकन फेल इन वाटर" छाप विनोद करून पाचवीत फिदिफिदि हसायचो.)
खफवरती बो'वरून किती कोट्या झाल्यात पाहा याच दोन दिवसात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

( बाकी ते " ए काउज हजबंड रनिंग रनिंग केम आणि धप्पकन फेल इन वाटर" छाप विनोद करून पाचवीत फिदिफिदि हसायचो.)

याची आवृत्ती आम्ही "ए काउज हजबंड ढ‌क‌लिफाइड मी इंटु द चिख‌लिफिकेश‌न" अशी ऐक‌ली होती. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या आईसाहेब नागपुरातल्या असल्याने त्यांच्याकडं मराठी म्हणजे पार हिंदी भाषांतर केलेलं असतं ...
मै वहा जा राहा था -> मी तिथे जाऊन राहिलो होतो वगैरे असतं...
बाकी मराठी शब्द लै खतरनाक वापरतात तिथे , स्क्रू ड्राइवर ला पेचकस , टेबल ला मेज , ऐना (आरसा ), आर्शी / चाळशी (चष्मा ), भोकणा (आंधळा ) असे अनेक...
आगे जाके (इन future ) ला "समोर जाऊन" वापरल्यावर झीट यायची बाकी होती.

आमची आई इंग्लिश शब्दांचं यथेच्छ मातेरं करत असते , ब्यांक , म्यानेजर , क्याश , आलाराम , व्ह्याट , ट्याक्स इत्यादी इत्यादी Smile Smile
आणि हिंदीतून मराठीची कत्तल चालते ती वेगळी ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

पेच‌क‌स‌, मेज‌ आणि आइना हे हिंदीच‌ श‌ब्द‌ आहेत‌.

पेच‌ म्ह‌ण‌जे स्क्रू आणि पेच‌क‌स‌ म्ह‌ण‌जे स्क्रू क‌स‌नेका (क‌ंब‌र‌ क‌स‌णे म‌ध‌ला क‌स‌ना) औजार‌. स्क्रू ड्राय‌व्ह‌र‌ला भ‌य्या सुतार "डिस‌मिस‌" म्ह‌ण‌ताना ऐक‌ला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेज‌ व आईना हाही ब‌हुधा हिंदी मुळाचे श‌ब्द‌ नाहीत, अनुक्र‌मे पोर्तुगीज़् आणि फार‌सी मुळाचे श‌ब्द‌ आहेत असे वाच‌ल्याचे आठ‌व‌ते. चेक‌व‌ले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेज हा श‌ब्द म‌राठीत पूर्वीपासुन् ( हिंदीशी ज‌व‌ळीक वाढ‌ण्याच्या आधी ) वाप‌रात आहे. राद‌र टेब‌ल हा श‌ब्द न‌ वाप‌र‌ता "मेजा"व‌र ठेव‌ले आहे असे बोल‌णारी लोक ब‌घित‌ली आहेत्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

य‌ग्जाक्ट‌ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...तेवढा इंग्रजी शब्द, पण त्याला मराठी प्रतिशब्द म्हणून पोर्तुगीजातला पाव तेवढा चालतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मेज‌ व आईना हाही ब‌हुधा हिंदी मुळाचे श‌ब्द‌ नाहीत, अनुक्र‌मे पोर्तुगीज़् आणि फार‌सी मुळाचे श‌ब्द‌ आहेत असे वाच‌ल्याचे आठ‌व‌ते.<<

mesa - मूळ पोर्तुगीज‌ श‌ब्द‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थॅंक्स फॉर क‌न्फ‌र्मिंग‌ माय‌ गेस‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेज‌ व आईना हाही ब‌हुधा हिंदी मुळाचे श‌ब्द‌ नाहीत, अनुक्र‌मे पोर्तुगीज़् आणि फार‌सी मुळाचे श‌ब्द‌ आहेत असे वाच‌ल्याचे आठ‌व‌ते. चेक‌व‌ले पाहिजे.

आईना फार‌सीच.
लॅटिन‌ मेन्सा --> स्पॅनिश‌/पोर्तुगीज‌ मेसा --> म‌राठी मेज‌ असा प्र‌वास‌ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे अनेक‌दा सांगुन झाल‌य‌ प‌ण पुन‌र‌पि-
एक‌दा कार‌ने न‌व‌रा व‌ आम्ही आणि दुस‌ऱ्या कार‌म‌ध्ये न‌व‌ऱ्याचा मित्र व‌ त्यांचि फॅमिली चाल‌लो होतो.
आम‌च्या कार‌म‌ध्ये अन्य काही प‌र‌के लोक‌ही होते
हुश्श!!! डेटा सेट‌ अप‌ क‌ंप्लीट्.
.
त‌र‌ दुस‌ऱ्या मित्राची कार मागेच राहीली. त‌र न‌व‌रा म्ह‌ण‌तोय - "ए ज‌रा रुक‌ वो लोग‌ पीछे प‌ड‌ ग‌ये."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही सांग‌ली जिल्ह्यातील एका खेड्यातून चाल‌लो अस‌ताना एका गाव‌कऱ्याने आम्हाला 'नीट जा, राईट मारा, पोहोचाल' असा प‌त्ता सांगित‌ला होता. त्याची एव‌ढी काळ‌जी पाहून भाराव‌लेले आम्ही, र‌स्ता ख‌राब असेल असे वाटून त्याने सांगित‌ल्याप्र‌माणे काळ‌जीपूर्व‌क पुढे गेलो आणि गोल फिरून त्याच चौकात आलो. य‌थाव‌काश योग्य र‌स्ता साप‌डून जिथे पोहोचाय‌चं आहे तिथे पोहोच‌लो. तिथे पोहोच‌ल्याव‌र आम‌च्या स्नेह्यांना हा किस्सा सांगित‌ला तेव्हा ते आधी भ‌र‌पूर ह‌स‌ले आणि म्ह‌णाले की 'इथलं नीट जा म्ह‌ण‌जे तुम‌च्या पुण्याक‌ड‌चं स‌र‌ळ जा, कुठेही न व‌ळ‌ता'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेल्वेम‌ध्ये लेडिज‌ ड‌बा माहीत‌ कुठे लाग‌तो न‌व्ह‌ता तेव्हा एका चंप‌क‌ बिहाऱ्याला विचार‌ले होते. ते येड‌ं नबोल‌ल‌ं य‌हीं ल‌ग‌ता है. म‌ग‌ मी खूष्ह‌ झाले काय‌ योगायोग‌ आप‌ण अग‌दी योग्य‌ जागी आहोत ईत्यादि.
प‌हाते तो जेंट‌स लाग‌ला आणि मैल‌भ‌र‌ दूर लेडीज म‌ग‌ जी काय‌ धाव‌प‌ळ झाली Sad
.
तेव्हापासून कोणाव‌र‌ही अव‌ल‌ंबुन‌ र‌हाय‌चे नाही हे शिक‌ले. आप‌ण शोधाय‌च‌ं ... स‌ग‌ळ‌ं साप‌ड‌त‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0