मुलीची आई

मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज
धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं -
"आत्या व्हावं, मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई" ||७||
तरी जाताजाता सांगावसं वाटतं -
"जग खूप छान आहे
आव्हानाना वाव आहे
पण डगमगू नको
कारण देवाची दैवाची साथ आहे, आणि पाठीवर सदैव मायेचा हात आहे" ||८||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

व्वा, खूपच छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सासूबाईंनी लिहीलेली कविता वर काढते आहे. सहज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0